इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पॉलला, या सिरीज मुळे, फिफ्टी शेडस ऑफ ग्रे मध्ये नायकाची भूमिका करायला मिळाली.>> ओह, माहित नव्हतं. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे बघायचा योग अजून आला नाही.

तिसरा सीजन कधी आला माहीतच नाही, त्यामुळे बघितला नाही. दुसऱ्या सीजनचा फिनाले बघून वाटलं की सिरीज तिथेच संपली असती तरी चाललं असतं.

मिलन कुंदेरा म्हणजे कोणीतरी भारतीय माणूस असेल वाटलेलं. पण हा तर फ्रेंच निघाला. वाचावं का पुस्तक विचार करत होते तेवढ्यात सर टवणेंच्या प्रतिसादाने वाचवलं...

===
The Fall चांगली वाटतीय कथा. नक्की बघणार. जेमी डॉर्नन Fifty Shades मधे आवडलेला. त्याखेरीज किएराचा एक्स एवढीच माहिती होती त्याच्याबद्दल.

अर्धवट नसतं का वाटलं?
नाही...
मला तर असे शेवट आवडतात, जे पडद्यावर अर्धवट वाटतात, पण आपल्या मनात पूर्ण होतात.
पण तिसरा सीजन कधी आला कळलंच नाही, त्यामुळे बघायचा राहून गेला.

१. सायलंट पेशंट वाचून झालं, त्यावर विचार पण करून झाला, पुस्तक चांगलं आहे.

२. गुडरीड्स वरचे रिव्हयुज वाचून, पुस्तक वाचायला घेतलं, बरेच रिव्हयुज असे होते की, हे कथानक इतकं वेगवान आहे की, पुस्तक वाचताना तुम्ही झोपणार नाहीत, म्हणून मी रात्री दहा वाजता, पुस्तक वाचायला घेतलं, पण साडे दहाला घोरायला लागलो.

३. कारण पुस्तक मध्ये फार संथ होतं, मिस्टरी जॉनर आहे, त्यात हू डन इट अशी मिस्टरी नसून व्हाय डन इट ही मिस्टरी आहे, त्यामुळे लेखकाला फुलवायला जड गेलं असेल. अर्ध वाचून सोडून देणार होतो, पण साडे तीनशे पानाचंच पुस्तक आहे, लगेच संपवू असा विचार करून पुढे वाचत गेलो

४. कथानक शेवटाकडे झुकताना वेगवान होतं, तेव्हा वाचायला मजा आली, टॉप नॉच, गोष्टी पटपट घडू लागतात, विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही, मग योग्य असा ट्विस्ट येतो.

५. ट्विस्टचा अंदाज येतो, पण ओळखता येत नाही. लेखकाचं यश यात आहे की ट्विस्ट विश्वसनीय वाटतो, शेवट सुद्धा छान जमला आहे. पण एकच मोठा प्लॉट ट्विस्ट आहे, त्यावरच सगळं कथानक अवलंबून आहे. त्यामुळे वाचताना जर ट्विस्ट लक्षात आला, तर मग मजा निघून जाईल

६. मला वाटतं पुस्तक गाजेल, लोक वाचतील, याचं प्रोमोशन चांगलं सुरु आहे, यावर सिनेमा पण येऊ शकतो

२ & ३. हो ना गुडरीड्सवरचे बरेच रिव्हयुज 'वेगवान कथानक, सायकोलॉजिकल थरार' असेच आहेत. मला दोन्ही पटलं नाही. निवेदक सायकोलॉजिस्ट आहे म्हणून त्याला सायकोलॉजिकल थरार म्हणायच का Proud

५. > ट्विस्टचा अंदाज येतो, पण ओळखता येत नाही. > सहमत.

६. आलाच तर २ तासाचा सिनेमाच ठिकय. तेवढाच जीव आहे कथानकात. लेखक स्क्रिप्टरायटरच आहे ना. दोन चित्रपट येऊन गेलेत.

===
मी सध्या Firefly Lane वाचतेय. २५% पर्यंत लय भारी वाटलेलं. आता ५०% ला ठिकठिक वाटतेय.

The Fall चा पहिला सीझन बघितला. पहिला भाग फार संथ वाटला. दुसऱ्या भागामधे गुन्हयानंतरचे रिच्युअल्स बघून 'अर्रे हे तर टेड बंडीसारखं वाटतंय!' म्हणलं. पुढेपुढे आणखी साम्य जाणवत गेलं. जेमी थोडाफार दिसतोदेखील टेडसारखा. नंतर कथानकाचा वेग वाढला कि मीच आधी होता त्या वेगाशी जुळवून घेतलं माहित नाही. चौथ्या एपिसोडमधला व्हायलेन्ट सीन डिस्टरबिंग होता. हे असलंकाही पडद्यावर दाखवू नये असं वाटतं. 'मॅच कट' प्रकार रोचक आहे.

एकंदर बऱ्यापैकी आवडली मालिका. पुढचे सीझन बघेनच.

===
> नाही...
मला तर असे शेवट आवडतात, जे पडद्यावर अर्धवट वाटतात, पण आपल्या मनात पूर्ण होतात. > अरे तू Sometimes I Lie वाचलं कि नाही अजून?

१. पहाटे पहाटे मला जाग आली, कारण आज ऑस्कर होते.

२. "स्पायडरमॅन इंटू द स्पायडर व्हर्स" ला बेस्ट ऍनिमेटेड फिचर फिल्मचा ऑस्कर मिळाला. हा सिनेमा, या धाग्यावर, एका सजग प्रेक्षकाने आधीच रेकमेंड केला होता.

@ॲमी
३. तो सायकोलॉजिस्ट नाही सायकोथेरपिस्ट असतो, येगळं ते ए.
पुस्तकात नायक तसं स्पष्ट पण करतो ना. मला आधी काही माहित नव्हतं.

४. समटाईम्स आय लाय, चाळीस पानं वाचलं, अन मग दुसरं कुठलं तरी पुस्तक वाचायला घेतलं होतं, आय एम लिटिल बिट साशंक अबाऊट द बुक.

५. धन्यवाद जिद्दु, दोन्ही चांगले सिनेमे वाटत आहेत, पण नेटफ्लिक्स वर यायला हवेत

६. स्टार वर्ल्डवर अनरिअल नावाच्या सिरीजचा तिसरा सीजन सुरु आहे, रात्री कधीतरी दाखवतात, या सिरीजचे पहिले दोन सीजन भन्नाट होते, बघावेत. आता तिसरा सीजन बघतोय, बॅचलर किंवा बॅचलरेट, या प्रकारचे रिऍलिटी शो, कसे शूट होतात, पडद्यामागे काय काय सुरु असतं? असं या सीरिजचं कथानक आहे. बघाच.
टीव्हीवर फार छान सेन्सॉर करतात, सवांद म्यूट करतात, त्यामुळे नेमकं काय घडतंय हे स्वतः शोधून काढावं लागतं.

७. बाकी आयुष्य, चांगलं पुस्तक शोधण्यात घालवतो आहे...

१. आज ऑस्कर होते हे विसरलेच!

२. Proud Proud

३. सायकोलॉजिस्ट म्हणजेच सायकोथेरपिस्ट ना? पुस्तकात नायक सायकॅट्रीस्ट आणि सायकोथेरपीस्तबद्दल बोलतो.
Because psychiatrists are trained medical doctors, they can prescribe medications, and they spend much of their time with patients on medication management as a course of treatment. Psychologists focus extensively on psychotherapy and treating emotional and mental suffering in patients with behavioral intervention.

४. परत शेवट्पर्यंत वाच असे सुचवते. भरपूर ट्विस्ट आहेत आणि शेवट open to interpretation आहे.

@जिद्दु
१. माबोवर जॉर्ज ऑरवेलवर काहीच धागे नाहीयेत.

@ॲमी
२. मी याबद्दल वाचत होतो, मला एवढं कळालं की, सायक्राट्रिस्ट मेडिकल डॉक्टर असतो, तो पेशंटला औषध देऊ शकतो, त्याला तो अधिकार असतो, पण थेरपिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट ला हा अधिकार नसतो. त्यामुळे पुस्तकात पण प्रोटॅगनिस्ट फक्त नायिकेशी बोलत असतो, एक वेगळा डॉक्टर तिला औषध देत असतो.

३. सम टाईम्स आय लाय वाचतो..
किलर'ज माईन्ड पुस्तक चांगलं वाटत आहे.. पहिला चॅप्टर वाचला.

जिद्दु तुम्हाला ऑरवेल मिलन कुंदेरा सारख्या लेखकांवर चर्चा करायची असेल तर वाचू आनंदे ग्रूपमध्ये सामील व्हा. तिथे अनेक जण आपण वाचलेल्या वा वाचायची इच्छा असलेल्या पुस्तकांवर चर्चा करतात.
https://www.maayboli.com/discuss-marathi-books

इथे तुम्ही मी वाचलेले पुस्तक या धाग्यावर लिहू शकता किंवा स्वतंत्र लेखनाचा धागा सुरू करू शकता

मायबोलीवर शोधा या ऑप्शनमध्ये ऑरवेल असे मराठीत शोधा. तुम्हाला काही धागे मिळतील. उदा
https://www.maayboli.com/node/29222

मी sometimes i lie सुरु केलंय. सुरुवातीला काहीच कळत नाहीये काय चाललंय. त्यात त्या बाईने सुरुवातीलाच 'आय लाय' असं सांगितल्यामुळे नेमकं काय खरं काय खोटं कळत नाहीये Lol
The underground railroad कोनि वाचलंय का? बरं आहे का?

@टवणेसर खूप धन्यवाद ... कॉलेजला असताना त्याची ऍनिमल फार्म , कॅच २२ आणि १९८४ वाचली आणि झपाटूनच गेलो . त्याच द्रष्टेपण आज फार ठळकपणे जाणवतं . सध्या निवडणुका येऊ घातल्यात तेव्हा तो १९८४ सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून माझ्या सर्व मित्रांना पुन्हा पुन्हा आग्रह करून पाहायची विनंती करत असतो . लोकसत्ताला गेल्या वर्षभर ऑरवेलची भविष्यवाणी असं काहीतरी सदर चालू होत , मस्त लिहायचे ते लेखक. मीपण लिहिलं काहीतरी वेळ मिळाल्यावर त्याच्यावरती . बाकी इथं फार जबरदस्त लिहिणारी मंडळी आहेत आणि बरीच माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त वयाची असून त्यांचा एवढा अनुभव लिखाणातून डोकावत असतो म्हणून इथं काहीतरी अनाडी लिखाण करण्यापेक्षा वाचायलाच जास्त मजा येते .

कॅच २२ :: ऑरवेलची नाही ही कादंबरी. जोसेफ हेलर लेखक आहे. एक जबरदस्त कलाकृती.

बाकी वाचू आनंदे धाग्यावर बोलू. इथे रहस्य/थरार कथा-कादंबर्‍यांवर आणि त्यावर आधारीत मालिकांवर चर्चा होतात. त्यामुळे बहुतेक हा धागा वाचू आनंदे ग्रूपमध्ये नसून विरंगुळा विभागात आहे.

१. कॅच २२ वर परत एक नवीन सिनेमा येतोय, जॉर्ज क्लुनी करत आहेत, ट्रेलर तर भारी वाटलं
२. The underground railroad चं विकिपीडिया पेज वाचलं, भारी पुस्तक वाटून राहिलं, पुस्तकाला बरेच अवॉर्डस मिळाले आहेत.

कॅच २२ वर परत एक नवीन सिनेमा येतोय, जॉर्ज क्लुनी करत आहेत, ट्रेलर तर भारी वाटलं
>>
भारीच. मिनिसिरीज येत आहे. पुस्तकाला एक मिनीसिरीज न्याय देऊ शकेल सिनेमापेक्षा.
मी पुर्वी आलेला सिनेमा पाहिला नाहिये तेव्हा तो कसा होता ते काही सांगू शकणार नाही. पण पुस्तकाची रचना मिनीसिरीज करण्यासाठी अगदी योग्य आहे.

मेजर मेजर मेजर असे पात्राचे नाव असू शकणारे पुस्तक ग्रेटच!

@टवणे सर @चैतन्य तुम्हीच १९८४ वर आजचा संदर्भ घेऊन एखादं समीक्षण/ रसग्रहण टाईप लिहा .. आवडेल वाचायला

१. अरे हो.. कॅच २२ वर मिनी सिरीज येतेय.. भारी वाटतेय. बघेनच.

२. टवणे सरांनी १९८४ वर लिहायला हवं आणि त्या धाग्यावर पहिली प्रतिक्रिया माझी असेल.

स्टिफन किंग ची कॅसल रॉक मागच्या वर्षी हुलू वर आलीय . भारी जमलीय . हुलू इथं नसल्याने टोरंन्ट वरून मिळाली

हो ना, कॅसल रॉक बघायचं होतं, पण हुलु वर आहे, हुलुच महिन्याचं भाडं चाळीस डॉलर आहे, एवढ्या पैशात माझं
एका महिन्याचा नाश्ता, दोन वेळेचं जेवण, चहा पाणी सगळं होतं..

चैतन्य,

३. सध्या Killer's Mind वगैरे वाचण्याच्या मनस्थितीत नाहीय मी, The Fall बघत असल्याने Sad
https://www.dailymail.co.uk/tvshowbiz/article-2846810/Top-criminologist-... <- हा चांगला लेख सापडला. मला जे वाटलं ते + मला ज्या लक्षात आल्या नव्हत्या त्या गोष्टी नीट लिहल्या आहेत.

===
सनव,
Sometimes I Lie वाचत रहा. आवडेल तुला.

===
> इथे रहस्य/थरार कथा-कादंबर्यांवर आणि त्यावर आधारीत मालिकांवर चर्चा होतात. त्यामुळे बहुतेक हा धागा वाचू आनंदे ग्रूपमध्ये नसून विरंगुळा विभागात आहे. > Not that it matters पण धागा विरंगुळा विभागात का काढला ते मी पान १ वरील एका प्रतिसादात लिहलं आहे.

===
जिद्दू,

मागे कुठल्यातरी पानावर तू जपानी चित्रपटांबद्दल बोलला होतास. जमलं तर त्यावर वेगळा धागा काढ, चित्रपट विभागात.

@जाई.
१. मी ईबुक्स विकत घेतो, स्वस्त पण पडतं, आयपॅड किंवा मोबाईलवर वाचत बसतो.

२. ऍमेझॉन वरून "किंडल अनलिमिटेड" हा प्लॅन घ्यायचा, पहिला महिना फ्री, नंतर एकशे एकोणसत्तर रुपये, या प्लॅनमुळे ईबुक्स खूप स्वस्त मिळतात.

3. पेपरबॅग एडिशन जर पाचशेच्या खाली मिळत असेल तर ऍमेझॉन वरून घेतो, पुस्तक फारच भारी असेल, तर हार्ड कव्हर घेतो, किंग काकांच पुस्तकं पहिल्यांदा हार्ड कव्हर मध्येच येतं, त्यानंतर एखाद वर्षाने ते पेपर बॅग मध्ये येतात. आऊटसायडरचं पेपर बॅग एडिशन अजून आलं नाही

३. तीन चांगल्या लायब्ररीचे सद्सत्व आहेत, तिथून पुस्तकं मागवतो.

४. ऑडिबल आणि स्टोरीटेलवर अकाउंट होतं, पण ऑडीबल महाग आहे त्यामुळे आता वापरत नाही, स्टोरीटेल वर चांगली मराठी पुस्तकं ऐकतो, पण स्टोरीटेलवर नवीन इंग्रजी पुस्तकं नसतात

६. बाकी पुस्तकांच्या दुकानात, डिस्काउंट सुरूच असतात, जाऊन बघायचे. चांगली मिळून जातात.

थँक्स चैतन्य !

मला दुसरा पर्याय परवडेल असे वाटते.

हार्ड कॉपी घेऊन ठेवायला जागा नाही Sad

१. माझ्या घरात सुद्धा पुस्तकांना जागा नाही, पण हार्ड कॉपी वाचायला भारी वाटतं, पटकन वाचून होतात.
२. वॉलमार्टने इबुक्स क्षेत्रात शिरकाव केला आहे, त्यांची kobo.com वर सगळी इबुक्स उपलब्ध आहेत, जर एखादं पुस्तक ऍमेझॉन पेक्षा स्वस्त असेल, तर तिथून घ्यायचं

Pages