इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. गोल्डन ग्लोब मुळे काही चांगल्या सिरीज, चित्रपट कळतात. त्यापैकीच बऱ्याच चित्रपटांना पुढे जाऊन ऑस्कर मिळतो. यावेळेस रोमा नावाच्या चित्रपटाला बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं आहे, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे, मला अजून बघायचा आहे. याला चार पाच तरी ऑस्कर मिळतील अशी चर्चा आहे.

२. रायली सिजरच "द लास्ट टाईम आय लाय" हे पुस्तक मी वाचत होतो, जुलै २०१८ ला, हे बुक ऑफ द मंथ होतं, म्हणून वाचायला सुरुवात केली, पण मग कंटाळा आला, म्हणून अर्ध्यावर सोडून दिलं, त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक फायनल गर्ल्स भारी आहे, मजा आली होती, दोन मेजर ट्विस्ट आहे, पण मध्ये शंभर एक पानं उगाच.. भावना अँड ऑल, याचं वर्णन केलं आहे, काहीच घडत नाही, तेव्हा मग कंटाळा येतो. शेवटचा प्लॉट ट्विस्ट भारी होता, म्हणून आवडलं.
त्यांची लेखन शैली प्रभावशाली आहे, प्रोज छान असतात, चांगलं इंग्रजी वाचायला मिळतं.

३. खिडकीतली बाई मधला, जो मध्यंतराचा ट्विस्ट आहे ना तसाच सेम ट्विस्ट "एलेनोर ओलिफन्ट इज परफेक्टली फाईन" मध्ये सुद्धा आहे. मला वाटतं आता अशा ट्विस्टचा पॅटर्न सुरु होईल.

४. "लिटल फायर्स एव्हरीव्हेअर" पण वाचायला घेतलं होतं, पण दुर्देवाने ते पण मध्येच सोडून दिलं, पण पानं कमी आहेत, लगेच वाचून होऊ शकतं.

गेले ६ महिने NF वरची Breaking Bad बघत होतो. सावकाश रवंथ करीत पहिली. अमेरिकी कौटुंबिक व समाजजीवनाचे सुरेख दर्शन जवळून झाले. मात्र ड्रग माफियांचा हिंसाचार बघायला नकोसा वाटला.
मालिकेच्या शेवटून तिसऱ्या भागात Hank ला मारून टाकले त्याचे मला दुःख झाले ! मला तो खूप आवडला या मालिकेत; अगदी Walter पेक्षाही. गोल गुटगुटीत !

@ कुमार१
मालिकेच्या शेवटून दुसऱ्या भागात Hank ला मारून टाकले<<<<
शेवटून तिसऱ्या भागात हँक स्वर्गवासी होतात.

सनव,
सध्या Circe वाचतेय ते पूर्ण झालं कि मग लिटल फायर्स घेईन वाचायला.
Everything आवडेल तुला असे वाटते. त्यातदेखील 'आई' आहे पण फार रोचक पद्धतीने.

खिड्कीतल्या बाईमधे मला सगळयात जास्त काय आवडलं असेल तर काळ्यापांढऱ्या क्लासिक न्वार चित्रपटांची नावं. ते सगळे कुठूनतरी मिळवून बघावेसे वाटतायत Happy

तुला हे पुस्तक न आवडण्यामागे आणि चैतन्यला रायली सिजरची (मी याचा उच्चार वेगळाच काहीतरी करत होते) पुस्तकं न आवडण्यामागे एकच कारण आहे असे वाटते - पुस्तकाची लांबी. रहस्य थरार कथा २५० पानांच्या असल्या तर पटकन वाचून होतात, वाचकांची रुची राहते तोपर्यंत.

===
चैतन्य,
१. बरोबर आहे.
२. The Last Time I Lied चा तो सगळा प्लॉट आणि प्रिमाईसच मला फार आवडला. मला वाटतं चांगली सुरवात करून पुढे फसलेली पुस्तक यात लेखकाइतकाच संपादकदेखील दोषी असावा.
३. तू हेच पूर्वीदेखील एका प्रतिसादात लिहलं होतं पण मला काही तो साम्य असलेला ट्वीस्ट आठवत नाही.
४. पानं कमी असली तरी पुस्तक लवकर वाचून होईल याची काही खात्री नाही मला. Everything I Never Told You वाचताना मी इतकी दुखी होत होते कि दुसरी हलकीफुलकी पुस्तक वाचायला घेतली Wink

===
कुमार१
ब्रेकिंग बॅड मी अजून पाहिलं नाही. पण तुमची सावकाश रवंथ करत मालिका पहायची पद्धत आवडली.

शेरलॉक नंतर ऑल टाईम फेव्हरेट ब्रेकिंग बॅड आहे.
सगळं काही सोडून ब्रेकिंग बॅड बघायला हवं, अजून आठवतं मला, फारच भारावलेले दिवस होते ते. ब्रेकिंग बॅडच्या प्रत्येक एपिसोडची वाट बघायचो, सिरीजचा फिनाले बघून फार वाईट वाटलं होतं, पण मग "बेटर कॉल सॉल" सुरु झालं, अन जखमेवर बँडेड लागलं. "बेटर कॉल सॉल" ब्रेकिंग बॅडचा प्रीक्वल आहे, बाय गॉड टू गुड!! ब्रेकिंग बॅड मधली सगळी जुनी पात्र या सिरीज मध्ये परत येतात.

@अॅमी
एलेनोर ओलिफन्ट इज परफेक्टली फाईन मध्ये एलेनोरची आई आणि वूमन इन द विंडो मधल्या ऍनाची, मुलगी आणि पती, यांचा ट्विस्ट सेमच आहे.

@टवणे सर
बेटर कॉल सौल मला ब्रेकिंग बॅडपेक्षा अधिक दर्जेदार वाटते आहे, +१११
लेखन छान आहे,

शेरलॉक नंतर ऑल टाईम फेव्हरेट ब्रेकिंग बॅड आहे.
सगळं काही सोडून ब्रेकिंग बॅड बघायला हवं, अजून आठवतं मला, फारच भारावलेले दिवस होते ते. ब्रेकिंग बॅडच्या प्रत्येक एपिसोडची वाट बघायचो, सिरीजचा फिनाले बघून फार वाईट वाटलं होतं, पण मग "बेटर कॉल सॉल" सुरु झालं, अन जखमेवर बँडेड लागलं. "बेटर कॉल सॉल" ब्रेकिंग बॅडचा प्रीक्वल आहे, बाय गॉड टू गुड!! ब्रेकिंग बॅड मधली सगळी जुनी पात्र या सिरीज मध्ये परत येतात+++++11111111111111111

एमी, मला दीर्घ पुस्तक वाचायला चालतात पण काही तरी content तर हवं. खिड्कीतली बाई मध्ये नुसतंच पाणी घालून पेजेस वाढवली आहेत. मूव्ही रेफरन्स मलापण खूप आवडले आणि ते सर्व मूव्ही बघावेसे वाटले. पण मला पुस्तक नाही आवडलं कारण तो मधला धक्का बसल्यावर पुढे इंटरेस्ट कमी झाला.लिटल फायर्स मात्र पटपट पुढे जातं. एक शब्द वा वाक्यही 'उगाच लिहिलंय' टाईप नाहीये.

वावे,
खिडकीतली बाई म्हणजे The Woman in the Window Lol

===
चैतन्य,
> एलेनोर ओलिफन्ट इज परफेक्टली फाईन मध्ये एलेनोरची आई आणि वूमन इन द विंडो मधल्या ऍनाची, मुलगी आणि पती, यांचा ट्विस्ट सेमच आहे. > ऍनाचा चुकून झालेला अपघात असतो आणि एलेनोरच्या आईने मुद्दाम घडवून आणलेलं असतं ना?

===
सनव,
हो दीर्घ पुस्तकं वाचायला चालतातच की पण मला वाटतं दीर्घ रहस्य, थरार वाचणे एवढे थरारक होत नसणार.
किंवा तू मला सुचवू शकशील का एखादी ५००+ पानांची मस्त रहस्यकथा?

१. मिस्ट्री जॉनरचं पुस्तकं हे साधारण अडीचशे तीनशे पानाचं असावं किंवा असतं. अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं अडीशे तीनशे पानांची असतात, त्यांनी बहुतांश मर्डर मिस्ट्रीज लिहिल्या आहेत.

मर्डर मिस्ट्रीज मध्ये खून होणे अन शेवटी खूनी कोण हे कळणे, हे दोनच महत्त्वाचे घटक असतात. म्हणजेच कथानकाचा जीव कमी असतो, साहजिकच पानांची संख्या कमी होते. खिडकीतली बाईच्या पुस्तकाचा जॉनर मिस्ट्री आहे, पुस्तक साडे चारशे पानाचं आहे.

२. सस्पेन्स जॉनरचं पुस्तकं, जिथे पुढे काय घडणार याची उत्सुकता असते, ते मग चारशे पाचशे पानाचं पण असतं, शेल्डन यांची सगळीच पुस्तकं, साडे चारशे पानांची आहेत, पण वेगवान कथानक असतं, एका रात्रीत वाचून व्हायचं. आपल्या डॅन दादांचं, "दा विंची कोड" चारशे ऐंशी पानं. "द लास्ट सिम्बॉल" पाचशे नऊ पानाचं आहे.

३. हॉरर जॉनर असेल, तर वातावरण निर्मिती करायला लेखकाला बरेच प्रयत्न करावे लागतात, जास्त शब्द वापरले जातात, पानं जास्त लागतात. उदारणार्थ आपले आपले किंग काका, पहिली शे दीडशे पानं पात्रं घटना डेव्हलप करायलाच घेतात, तशी गरज सुद्धा असते. मग एकदा कथानकाने वेग पकडला की पुस्तकं सोडवत नाही. त्यांची सगळीच पुस्तकं साडे चारशे अन त्याच्या वरच्या पानांची आहेत.

सारांश असा की, कादंबरीची पानं ही कथानकाचा जीव अन कथानकाची शैली/ जॉनर यावर अवलंबून असावीत.

स्पॉयलर्स...
पुस्तकं वाचलं असेल तरच पुढचं वाचावं.

एलेनोर ओलिफन्ट इज परफेक्टली फाईन
एलेनोर आठवड्यातून एकदा आईशी फोनवर बोलत असते असं पुस्तकाच्या सुरुवातीला दाखवलं गेलं आहे. पण ट्विस्ट असा आहे की तिची आई, घरात लावलेल्या आगी मध्ये आधीच स्वर्गवासी झालेली आहे, तिच्या आईशी फोनवर बोलणे हे सर्व तिच्या डोक्यात घडतं असतं.

वूमन इन द विंडो
एना तिच्या पती अन मुलीशी, फोनवर बोलत असते पण तिचा पती अन मुलगी हे ऍक्सीडेन्ट मध्ये आधीच मारले गेले आहेत. हे फोनवर बोलणं सर्व काही तिच्या मनात/डोक्यात घडतं आहे.

या दोन्ही ट्विस्टचा पॅटर्न मला सारखाच वाटतो.

जुनी पुस्तकं आठवलं साहस-थरार-थोडे रहस्य एकत्र असणारी १०००+ ते ५०० पानं:
Count of Monte Cristo, Three Musketeers, Papillon, Vendetta.

काही दिवसांपूर्वी दा विंची कोड चित्रपट बघितला टीव्हीवर.
पुस्तकापेक्षा बराच बदल होता कथानकात, शेवटही वेगळा केलेला, पुस्तका एवढी मजा नाही आली.

खिडकीतली बाई म्हणजे The Woman in the Window Lol>> ओके ओके Happy
माझं इंग्लिश वाचन अगदीच मर्यादित आहे. त्यामुळे या धाग्यावर वाचनमात्रच. तरी आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी आवडलेली-
Tuesdays with Morrie by Mitch Albom
निवृत्त झालेल्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त, तरी वृत्तीने उत्साही अशा प्राध्यापकाबरोबर लेखकाने दर मंगळवारी साधलेला संवाद असं या पुस्तकाचं स्वरुप आहे. साधी भाषा आणि तरीही सखोल आशय. कॉलेजला असताना वाचलेलं होतं.
The Alchemist हे सगळ्यांना माहीतच असेल.
The Godfather
Sherlock Holmes जवळजवळ सगळं.
The good Earth by Pearl buck.
याबद्दल मागे हायझेनबर्गांच्या धाग्यावर ( पुस्तकावरून चित्रपट) लिहिलं होतं.
Man-eaters of Kumaon by Jim Corbett
The Second Jim Corbett omnibus ( यात My India, Tree tops आणि Jungle lores अशी तीन पुस्तकं आहेत)

Sapiens by Yuval Noah Harari
हेही सगळ्यांना माहीतच असेल.

इंग्लिश मालिकांमध्ये Bones आवडायची. Suspense thriller.
चित्रपट बरेच आहेत तसे आवडलेले.

चैतन्यच्या पोस्टमुळे बराच उलगडा झाला. मिस्टरी जॉनर कमी पेजेसमध्ये वर्क होतो हा एमीचा मुद्दाही पटला.

कालच velvet buzzsaw चा ट्रेलर बघितला. अचाट वाटला. एक कम्प्लिट वेगळं पॅकेज असेल असं वाटतंय!

१. व्हेल्वेट बझसॉ.. ट्रेलर लूक्स सिक!! बघायला हवा, त्या डिरेक्टरचा नाईट क्रॉलर पण चांगला होता.

२. काल रातच्याला, दोन तास शोधल्यावर नेटफ्लिक्सवर "नथिंग टू हाईड" नावाचा फ्रेंच पिक्चर बघितला, भन्नाट आहे, आवडला, वेगळं कथानक, ट्विस्ट आहेत, मजा आली. मस्ट वॉचच्या यादीत टाकतो.

Everything i never told you संपवलं. Celeste NG चं हे पहिलं लिखाण. दुसरं लिटल फायर्स मी आधी वाचलं होतं. हे पण छान आहे. एमी तू रेकमेंड केल्याबद्दल धन्यवाद.

आता स्पॉयलर घ्या.----

तर मला शेवटी नक्की काय झालं ते कळलंच नाही. लिडियाने सुसाईड केलं की अपघात झाला. मग मी गुगल केलं तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असल्याचे कळले. मला आता वाटतं की अपघात असावा/ओव्हरकॉन्फिडन्समुळे झालं असावं.
बाकी लिडियाचा suspense नीट सोडवला नसला तरी लिखाण जबरदस्त आहे. विशेषतः लिडियाच्या आईचं कॅरेक्टर परिणामकारक बिल्ड होतं.

अरे वाह लगेच वाचलंपण का पुस्तक. आवडलं का यातलं 'आई'च रूप?

/स्पॉइलर अलर्ट
लिडियाचा अपघातच झालेला असतो; पण हे तिच्याखेरीज इतर कोणालाही कळणार नाही. घरातले आणि बाहेरचे सगळेजण तिने आत्महत्या केली असेच समजत राहतील, आणि आपण ती थांबवू शकलो असतो का याचा विचार करत स्वतःला दोष देत राहतील. अशा केसेसमधे पूर्ण क्लोजर मिळणे जवळपास अशक्य असते.
/स्पॉइलर संपला

> Submitted by चैतन्य रासकर on 9 January, 2019 - 12:11 > पर्फेक्ट! अगदी हेच म्हणायचं होतं.

===
> Submitted by चैतन्य रासकर on 9 January, 2019 - 12:20 > ओह अच्छा त्याबद्दल बोलत होतास होय तू. वेल दोन्ही पुस्तकात हे 'ट्विस्ट' आहेत असं मला वाटलं नव्हतं किंवा ते झोल आहे हे आधीच कळलं होतं.

खरं सांगायचं तर 'हे पुस्तक वाचून तुम्ही रडला नाहीत तर तुम्हाला हृदयच नाही' असे म्हणली जाणारी एलेनोर आणि ओव्ह ही दोन्ही पुस्तकं मला थोडीफार बोअर झाली होती Lol

===
> Submitted by चैतन्य रासकर on 10 January, 2019 - 21:40 > अरे वाह मालिका बनवणार आहेत का Sometimes I Lie ची! आता कमीतकमी ती प्रदर्शित व्हायच्या आधीतरी संपव वाचून ते पुस्तक Wink

मला The Kind Worth Killing आणि The Thirteenth Taleदेखील पडद्यावर बघायचे आहेत.

मानव,

> Count of Monte Cristo, Three Musketeers, Papillon, Vendetta > पॅपिलॉन खेरीज इतरसगळी अजून वाचली नाहीत. जुनी आणि ५००+ पानं वाचायची म्हणलतर थोडी धडकीच भरते आजकाल Lol भाषा जड वाटते.

Da Vinci चित्रपट अजून बघितले नाहीत. त्या मालिकेतील पुस्तकदेखील दोनच वाचली आहेत. खरं सांगायचं तर मला ती किंचीत बोअरच झाली होती, लांबीमुळे आणि धर्माबद्दल असल्याने.

वावे,

माझंतर मराठी वाचन, नाटक-मालिका-चित्रपट बघणे अगदी शून्य आहे तरीपण मी मराठी आंतरजालावर बागडत असते Lol Lol
तू दिलेल्या यादीतील The Alchemist, The Godfather, Sherlock Holmes वाचली आहेत. बाकीची नोंदवून ठेवते.

केरा थॉमसचं द चीअरलिडर्स वाचून झालं, या चीअरलिडर्सने फार डिप्रेस केलं.
कथानकाच्या सुरुवातीला दोन खून, एक ऍक्सीडेन्ट, एक सुसाईड, एक एन्काऊंटर झालेलं असतं. मला वाटलं आता अजून दोन तीन लोकं तरी मरतील, पण शेवटी सगळेच जिवंत राहतात, शेवटी मरतो तो माझा उत्साह...

कथेची नायिका मोनिका, जिच्या मोठ्या बहिणीने आत्महत्या केली आहे, कारण त्यांच्या मैत्रिणींचा खून झालेला आहे, पुस्तकभर मी मोनिकाला म्हणत होतो, महत्त्वाचं वर्ष ए, अभ्यास कर, करियर घडवं, पण नाही. आजकालची तरुण पिढी, अजिबात ऐकत नाही हो.. मोनिकाला काय काम धाम नसतं, मग ती खूनी शोधत बसते. असं काहीस कथानक आहे.

एकचं चांगली गोष्ट आहे की, पुस्तकामध्ये चांगलं इंग्रजी आहे, प्रोज छान आहेत. प्रसंगांचं वर्णन, थोडक्यात पण प्रभावशाली केलं आहे, पण ट्विस्ट टुकार होता. त्यामुळे बेकार हिरमोड झाला.

लय अपेक्षा घेऊन वाचलं होतं, पण कटाळा येऊन गेला.

5794 लोकांनी रेटिंग दिलेलं पुस्तक तू 'फार' अपेक्षा घेऊन कसं काय वाचतो रे Lol

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157104115847028&id=5342756... हे बघितलं का? ऐतिहासिक काल्पनिक मी शक्यतो वाचत नाही (दुसरया महायुद्धाबद्दल असेल तर अजूनच नाही) पण सगळेजणतेच वाचताय्त त्यामुळे
The Glass Castle
The Great Alone
The Pillars of the Earth
Orphan Train
The Thorn Birds
यादीत टाकून दिलेत.

Solipsism (/ˈsɒlɪpsɪzəm/ ( listen); from Latin solus, meaning 'alone', and ipse, meaning 'self') is the philosophical idea that only one's own mind is sure to exist.

Caroline Kepnes च्या YOU या कादंबरीतला एक शब्द. या पुस्तकावरून बनलेली त्याच नावाची मालिका गेल्या विकांताला बघितली.
जो गोल्डबर्ग या बुकस्टोअर मॅनजरची (जो क्रिपी स्टॉकर आहे) ही गोष्ट. कथेला सेकण्ड पर्सन निवेदक असणे हे किंचीत जास्त अवघड आणि त्यामुळे जास्त रोचक! आणि परत हे असलं काहीतरी लिहणाऱ्या बायका मला जरा जास्तच fascinating वाटतात Wink
सिरीज थोडीशी लांबल्यासारखी वाटली, ७-८ भाग पुरेसे होते. पॅको हा जोच्या शेजारी राहणारा मुलगा फक्त मालिकेत आहे पुस्तकात नाही. पौगंड जोखेरीज इतर कास्टिंग आणि सगळ्याचा अभिनय छान झाला आहे. प्रेमकथा वाचणार्या आणि लिहणाऱ्या सगळ्यांनी नक्की बघावी अशी हि मालिका.

एमिली मेचे पुस्तक समीक्षण
https://www.goodreads.com/review/show/1082804588?book_show_action=true&f...

मालिकेचे समीक्षण
https://www.nytimes.com/2018/09/07/arts/television/you-review-lifetime.html

https://www.independent.co.uk/arts-entertainment/tv/features/netflix-you...

आणि लेखिकाची व दिगदर्शिकेची मुलाखत
https://www.nytimes.com/2018/09/07/arts/you-lifetime-sera-gamble-carolin...
===
या विकांताला Eternal Sunshine of Spotless Mind बघितला. मस्त आहे!

आणि 12 Monkeysदेखील पाहिला. रोचक वाटला.

एमी मी 'नऊ सुयोग्य अनोळखी' संपवली. मॉरिआर्टी काकूंचं बुक म्हणजे मला घरचं कार्य असा उत्साह आणि उरका असतो.
पण हे ठीकठाक आहे. काहीच ट्विस्ट नाही, जो मेन ट्विस्ट आहे तोपण उगाचच आणला आहे की बाबा चला आता काहीतरी ट्विस्ट देऊ या. तो भाग तर खूप ताणलाय, झोप येत होती.काकू चला आवरा आता असं झालं. शेवटी ५ इयर्स नंतरचा भाग अधिक वाचायला आवडलं असतं तर तिथे उरकून टाकलंय थोडक्यात.
आय विल रेकमेंड ओन्ली टू हर कट्टर फ़ॅन्स (आय ऍम वन!).

सनव Lol पहिल्या पानावर मी लिहलेलं परत कॉपीपेस्ट

> Nine Perfect Strangers वाचून झालं. मध्यंतरापर्यंत ठीक चाललं होतं. मग ट्विस्ट आला जो मला आवडला. पण मग पुढे काहीतरी बिझारेच चालू झालं :अओ:. शेवट उगाच ओढूनताणून केलाय.
निकोलने एक शब्दही न वाचता हक्क विकत घेतले होते म्हणे. बघू काय होतंय. चांगला दिग्दर्शक मिळाला तर ठिकठाक चित्रपट/मालिका बनू शकते >

Pages