इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल संडे ट्रीट (स्वतःलाच) म्हणून द डीपार्टेड बघितला!
पुन्हा बघितला!!! पुन्हा आवडला! +१११११११११
हा खुप म्हणजे खुपच भारी आहे...

मी shipping up to boston ऐकण्यासाठी आणि गाड्यांचा सिन बघण्यासाठी दहा बारा वेळा रिपीट करतो!

"यू" सिरीज नेटफ्लिक्स वर बघत होतो, पुस्तक आवडलं होतं, पुस्तकातले सगळे सवांद सिरीज मध्ये आहेत, मला तो डायलॉग खूप आवडतो, "आय एम नॉट मे बी, आय एम द वन.."
कास्टिंग जमलंय, प्रोटॅगनिस्ट भारी ए, भाव खाऊन जातो, पुस्तकं वाचताना जसं इमॅजिन केलं होतं, तशाच गोष्टी आहेत, पण तो शेजारी राहणारा लहान मुलगा, प्रोटॅगनिस्टला सहानुभूती मिळावी म्हणून त्याचा सिरीज मध्ये समावेश केला आहे. कॅरोलाईन केपणस यांचं दुसरं पुस्तकं 'हिडन बॉडीजला" निगेटिव्ह रीव्हयूज मिळाले आहेत, म्हणून वाचलं नाही.

"जेन डो" हे पुस्तकं "यू" सारखं आहे, मला रीव्हयूज वाचून तसं वाटलं.

@ एमी
इतिहास फ्रेंच रेव्होल्यूशन पासून कोल्ड वॉर पर्यंत सगळं वाचून काढलं होतं, पण हिस्टोरिकल फिक्शन जास्त काही नाही वाचलं.
"द बॉय इन द स्ट्रिप्ड पजामाज" वाचलं होतं, छोटंच आहे, चांगलं होतं.
याच जॉनरचं "ऑल द लाईट वी कॅन नॉट सी" हे तर वर्षभर बेस्टसेलर होतं, पण वाचावंस वाटलं नाही.
"द पिलर्स ऑफ द अर्थ" नऊशे त्र्याहत्तर पानाचं आहे, एवढं जड पुस्तकं वाचायला जड जाईल.
"द ग्रेट अलोन" चांगलं वाटतंय.

लहानपणी, डिपार्टेड थेटर मध्ये बघितला होता,
ऑस्कर नॉमिनेशन नुकतेच जाहीर झाले होते, याला बरेच नॉमिनेशन होते, त्या वेळी इंटरनेट कॅफे असायचे, मला आठवतंय, याहू मुव्हीज नावाची वेबसाईट असायची, त्यावर नवीन सिनेमांचे ट्रेलर यायचे. डिपार्टेडचं ट्रेलर बघून पिक्चर बघायला अलकाला गेलो होतो, सकाळी दहाचा शो होता, थेटर मध्ये कोणीच नव्हतं, त्यांच्या पोलीस चीफला टेरेस वरून फेकून देतात आणि डी कॅप्रिओला लिफ्ट मध्ये गोळी मारतात हे सीन्स सेन्सॉरने कट केले होते, पप्पी शप्पीचे सीन्स पण कट केले होते. आता टीव्हीवर सगळं व्यवस्थित दाखवतात. "कॉप्स ऑर क्रिमिनल्स, इफ यू आर फेसिंग लोडेड गन्स.... व्हाट्स द डिफरंन्स" हा डायलॉग अजूनही लक्षात आहे.

नंतर कळलं की डिपार्टेड "इन्फेर्नल अफेअर्स" चा रिमेक होता, तो सुद्धा बघितला, तो पण भारी ए. ओरिजनल ते ओरिजिनल.. काही सीन्स कट टू कट कॉपी आहेत. हिंदी मध्ये केके मेननचा "छल" नावाने सिनेमा होता, डिपार्टेड आधी आला होता, त्याचं कथानक सुद्धा "इन्फेर्नल अफेअर्स" वरून घेतलं असावं.

एमी , bizarre हाच शब्द योग्य. आणि sleep inducing.

ऑल द लाईट व्ही कॅनॉट सी चांगलं आहे पण स सस्पेन्स थ्रिलर वाचणाऱ्याना ते वाचायला सांगणं म्हणजे रोज बटर चिकन किंवा व्हेज कोल्हापूरी खाणाऱ्या लोकांना वरणभात देण्यासारखं आहे.

The Departed अद्याप बघितला नाही.

===
चैतन्य,

You मधले मला आवडलेले डायलॉग:
• At the end of the day, people really are disappointing, aren't they?
• If your IQ is above a certain number....Life is pretty much unbearable. And the number is not even that high.

जो आणि पॅकोचे नाते सुरवातीच्या भागात फार आवडलं मला.

बादवे बेकचे काम करणारी मुलगी गब्बू श्रद्धा कपूरसारखी दिसते आणि क्लॅन्दीसचे काम करणारी मुलगी आलिया भटसारखी दिसते अस वाटलं का तुला?
You च्या कास्टिंगबाबत अजूनेक लगेच लक्षात येणारी बाब म्हणजे बेकच्या मैत्रिणी वेगवेगळ्या वंशाच्या दाखवल्या आहेत, ब्लाईथ ट्रान्स दाखवली आहे. They are really trying to become inclusive.

Hidden Bodies मीदेखील वाचलं नाही मिक्स रिव्ह्यू असल्याने. पण वाचेन सीझन २ यायच्या आधी.

Jane Doe वाचावं काय??

===
सनव,

Lol Lol हा हा चिकन आणि वरणभात अगदी बरोबर!
बर्याचजणांनी नवीन वर्षाची सुरवात हिस्टोरीकल फिक्शनने केली आहे त्यामुळे I just want to give it a try.
All the light चेदेखील मिक्स रिव्ह्यू आहेत.

===
मी सिरीज बघताना You परत वाचलं. आणि आता मला Kind Worth Killing परत वाचावंस वाटतंय. Circe बाजूलाच पडलं Sad जेव्हा परत उचलेन तेव्हा परत सुरुवातीपासून वाचावं लागणार.

१. मी तर सगळं वाचायचा प्रयत्न करतो, "फ़ॉल्ट इन अवर स्टार्स" खूप आवडलं होतं, पिक्चर पण भारी होता. म्हणून "टर्टल्स ऑल द वे डाउन" वाचलं, अन निराशा झाली.

२. मी परत सिरीज बघत होतो, बेक ब्लॉन्ड ए, काळे केस असले तर श्रद्धा कपूर सारखी वाटली असती. क्लॅन्दीसचे डोळेच वेगळे आहेत, पीच किती छान ए..

३. काईन्ड ऑफ वर्थ किलिंगचा दुसरा पार्ट यायला हवा, कारण शेवट तसाच केला आहे.
जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो, तेव्हा सोडवत नव्हतं, पण मग बाहेर जायला लागलं, पुस्तक घरीच ठेवलं, मग गाडीतून जाताना पुस्तकाबद्दल विचार करू लागलो, राहवलं नाही, म्हणून किंडलवर विकत घेतलं अन वाचू लागलो...

४. जेन डो 267 पानाचं आहे, लगेच वाचून होईल, माझ्या आवडत्या बुकट्युबरने साडे तीन स्टार दिले आहेत, ऑडिबल वर पण चांगलं रेटिंग ए.

५. मी आता व्हेरिटी वाचतोय.. बघू काय व्हरायटी मिळतेय का..

१. Fault in आणि My sister's keeper दोन्ही मला फारसे आवडले नव्हते. पण My sister's ने गंभीर विचार करायला भाग पाडलं. Fault in चित्रपट पाहिला नाही अजून.

२. कितीदा बघतोयस ती You मालिका? पीच आवडली का तुला! नॉट माय टाईप. केस छानेत पण तिचे. आणि मला केस बांधलेले असतानाची बेकच आवडली. आणि कुठल्यातरी एका एपिसोडनंतर तर ब्लाईथच आवडायला लागली Lol

३. Kind Worth चा ओपन एन्ड शेवट आवडला मला. दुसरा भाग आला तर आनंदच आहे. नाही आला तरी ठीक.
> जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो, तेव्हा सोडवत नव्हतं, पण मग बाहेर जायला लागलं, पुस्तक घरीच ठेवलं, मग गाडीतून जाताना पुस्तकाबद्दल विचार करू लागलो, राहवलं नाही, म्हणून किंडलवर विकत घेतलं अन वाचू लागलो... > भारी _/\_

४. ओके. वाचते Jane Doe.

५. ऑ कोलीन हुवरची पुस्तकं मुलगेपण वाचतात :-O
हे ऐकून मीपण Verity च वाचायला घेतलं आणि तिची इतर सगळी स्टँड अलोन पुस्तकं डाउनलोड केली.

रेसिपी - एक कप गर्ल ऑन द ट्रेन खरपूस भाजून घ्या.
त्यात पाऊण कप बिग लिटल लाईज मिसळून घ्या. थोडं गॉन गर्ल घालून गॅस बंद करा आणि वुमन इन द विंडो ने गार्निश करा. द वाईफ बिटविन अस तयार आहे.

स्पॉयलर अलर्ट -
जोक्स अपार्ट, हे पुस्तक या वरील सर्व व इतर काही पुस्तकांची आकर्षक मिसळ आहे. आवडलं. बऱ्यापैकी भीती वाटते जे थ्रिलर वाचताना व्हायला पाहिजेच. फक्त शेवटचा ट्विस्ट काहीच्या काही आहे, मला वाटलं आता जेसन पण आणतात की काय न्यू यॉर्कमध्ये पण तेव्हढं नाही केलं.

आता मी अमेरिकन मॅरेज वाचायला सुरुवात केली आहे. आय गेस तू आणि चैतन्य दोघांनी वाचलंय ते ऑलरेडी.
समटाईम्स आय लाय आणि रेडी प्लेयर वन पाईपलाईनमध्ये आहे. अजून नवीन सुचवा.

अमेरिकन मॅरेज चैतन्यने वाचलं नाहीय बहुतेक. मी वाचलंय. ठीक वाटलं होतं. रेडी प्लेयर वन मी वाचलं नाही अजून. तू किती पटपट पुस्तकं वाचतेयस _/\_

https://www.goodreads.com/blog/show/1469 इथे बघ काही रोचक वाटतंय का.

१. काल रात्री व्हेरिटी वाचत होतो, इट्स क्रीपी.. कसलं भारी ए. सो फार सो गुड. वाचायला मजा येतेय. चाळीस टक्के वाचून झालंय, कामं सोडून वाचावंसं वाटतेय. लवकरात लवकर संपवेन.

२. सनव, अमेरिकन मॅरेज वाचलं नाही, आता वाचत नाही, पण त्यांच्या अनोनमस गर्ल चे रिव्ह्यूज चांगले आहेत.

३. पीच आवडली का तुला!<<<<<<
माझं वय झालंय...आता काय कोण आवडणार Proud

माझ्या झोपेचं खोबरं झालं कि काल त्या Verity मुळे Angry
मस्तय पण! शेवट थोडा गंडल्यासारखा वाटला पण रात्री न झोपता वाचत राहावे असे पुस्तक बऱ्याच दिवसांनी मिळाले. थँक्स चैतन्य Happy
सनव, हे वाच.

अ‍ॅमी, चैतन्य मला अक्षरशः हेवा वाटतोय तुमच्या दोघांचा! कुठून आणता इतका वेळ वाचनासाठी..
एवढी नवीन पुस्तकं कुठून वाचता? काही लिंक वगैरे असतील तर सांगा. शेअर करण्यासारखी असतील तर शेअर करू.

मॅगी Happy

या हेवा वाटण्याच्या भावनेतून मी नुकतीच गेले आहे. डिसेंबरअखेरीस जेव्हा काहीजण मी ३०० पुस्तकं वाचली मी ३१८ वाचली सांगत होते तेव्हा अगदी हेच वाटायचं कि कशी काय वाचतात हि लोकं एवढी पुस्तकं? कुठून मिळत असेल यांना एवढा वेळ?
त्यांनी उत्तरं दिली होती कि ते ६०+ वयाचे आहेत, निवृत्त झालेले आहेत, एकटेच राहतात, डिप्रेशन आहे, सकाळी एकाध तासात त्यांचं सगळं कामधाम उरकून होतं, मग ते दिवसभर पुस्तक वाचत बसतात. तुम्ही तरुण आहात, दिवसभर काम करता, परत जोडीदार, मुलबाळ वगैरे जबाबदाऱ्या असतात, तर कमी पुस्तक वाचण्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका आणि जास्त पुस्तक वाचणार्या आमच्यासारख्यांचा हेवादेखील करू नका.

एनिवे
तर हेवा करण्याइतकी पुस्तकं मी वाचते असे मला वाटत नाही. यावर्षीदेखील फक्त २४+ पुस्तक वाचण्याचं चॅलेन्ज घेतलं आहे. दररोज ३५-४० पानं वाचायची ठरवलं आहे, जे माझ्यामते नोकरदार तरुणांनादेखील बऱ्यापैकी सहज शक्य आहे. तर या वेगाने एका महिन्यात १००० पानं म्हणजे ३ पुस्तक वाचून होतात. तेच मी करतेय Lol

पुस्तकं गुगल करून मिळतात, एकच खास अशी लिंक नाही.

१. मी ईबुक्स विकत घेतो, स्वस्त पण पडतं, आयपॅड किंवा मोबाईलवर वाचत बसतो.

२. ऍमेझॉन वरून "किंडल अनलिमिटेड" हा प्लॅन घ्यायचा, पहिला महिना फ्री, नंतर एकशे एकोणसत्तर रुपये, या प्लॅनमुळे ईबुक्स खूप स्वस्त मिळतात.

२. पेपरबॅग एडिशन जर पाचशेच्या खाली मिळत असेल तर ऍमेझॉन वरून घेतो.

३. तीन चांगल्या लायब्ररीचे सद्सत्व आहेत, तिथून पुस्तकं मागवतो.

४. ऑडिबल आणि स्टोरीटेलवर अकाउंट आहे, तिथून पण ऑडिओबुक्स ऐकतो, स्टोरीटेलवर ईबुक्स पण मिळतात.

५. जयपूर लिट्रेचर फेस्टिवल आज सुरु झाला, मला जायचं होतं, पण कंटाळा केला. तिथं स्वस्त पुस्तकं मिळाली असती, दिल्ली बुक फेअरला पण पुस्तकं स्वस्त मिळतात.

६. बाकी पुस्तकांच्या दुकानात, डिस्काउंट सुरूच असतात, जाऊन बघायचे. चांगली मिळून जातात, काल अक्षरधाराला गेलो होतो, तिथे अगाथा ख्रिस्तीची सहा पुस्तकं बाराशेला होती.

७. पुस्तकं मिळून जातात, त्यात काय प्रॉब्लेम नाही, पुस्तकं वाचण्यापेक्षा, चांगलं पुस्तकं शोधायला, जास्त वेळ लागतो.

चैतन्य ,
ऑडिबल घ्यावं /की स्टोरीटेल ?

अमी , 35-40 पानं ! आयडियेबद्दल थंम्ब अप

स्टोरीटेल > ऑडिबल
१. ऑडिबल महाग आहे, पण त्यांच्याकडे खूप जास्त स्टॉक आहे.
२. स्टोरीटेलवर ऑडिबलच्या मानाने कमी पुस्तकं आहेत, पण ते स्वस्त आहे. स्टोरीटेलवर ईबुक्स पण मिळतात, मराठी ऑडिओबुक्स पण आहेत.

अमेरिकन मॅरेज चैतन्यने वाचलं नाहीय बहुतेक. मी वाचलंय. ठीक वाटलं होतं. रेडी प्लेयर वन मी वाचलं नाही अजून. तू किती पटपट पुस्तकं वाचतेयस _/\_

https://www.goodreads.com/blog/show/1469 इथे बघ काही रोचक वाटतंय का

धन्स! सध्या पटपट वाचून होतंय. बाहेर बेक्कार थंडी आणि सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर असा आहे की लवकर वाचावंच लागतं.नॉन फिक्शन माझं इतकं फास्ट वाचून होत नाही.

गुडरीड्सची लिंक उपयुक्त आहे.
पण त्यात ते एक where'd you go Bernadette आहे ते मी अर्धं वाचून फेकून दिलं होतं., हॉरिबल आहे.
लिटल विमेन मूव्ही येऊन गेला बहुतेक, मी पूर्वी चौघीजणी मराठीत वाचलं आहे.

काल मुव्ही मॅरेथॉन करत हॅरी पॉटरचे सर्व भाग बघितले...
नेक्स्ट sat आणि sun होबीट आणि लॉर्ड ऑफ द रिंग एकत्र करण्याचा मानस आहे!

सनव,

> बाहेर बेक्कार थंडी आणि सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर असा आहे की लवकर वाचावंच लागतं.नॉन फिक्शन माझं इतकं फास्ट वाचून होत नाही. > खरंय.

Where'd you go Bernadette चे सिनोप्सिस तर चांगलं वाटतंय....

Little Women वाचलं नाही मी अजून. चित्रपट आणि मालिकादेखील आहे बहुतेक!

===
अज्ञातवासी,

अर्रे वाह हॅरी पॉटर का!
LOTR सिनेमामात्र मला आवडले नाहीत.

===
माझा विकांत!
• Amélie - मस्त आहे. फेसबुक पानावरची एक प्रतिक्रिया
Amanda Jay reviewed Amélie —
One of my favorite movies. It examines a form of dysfunction and maladaptation that is seldom discussed: becoming overly invested in strangers lives. So many people, myself included, use fictional characters, stories, and worlds, or even reality television, to avoid dealing with the things that make us uncomfortable. Amelie does this by meddling with her coworkers and neighbors to varying degrees of success, but ultimately is only satisfied when she confronts her fear of intimacy.
• Moulin Rouge - बेक्कार सिनेमा. इतका बोअर झाला कि शेवटी टर उडवत बघावा लागला.
• High Noon - गॅरी कूपर, ग्रेस केली, वेस्टर्न जॉन्र वगैरे. आवडला.
• Body of Lies - १७ मिनिट बघितला आणि झेपेना म्हणून बंद करून टाकला.

Little women चं मराठी भाषांतर (चौघीजणी) शांता शेळक्यांनी केलं आहे . सुंदर आहे. पिक्चरपण चांगला आहे.

हो चौघीजणी बद्दल ऐकलं आहे.

विकीवरून कळलं :
दोन मूकपट १९१७, १९१८
पाच बोलपट १९३३, १९४९, १९७८, १९९४, २०१८
सहा मालिका त्यापैकी चार BBC च्या १९५०, १९५८, १९७०, २०१७
आता परत २०१९ मधे सिनेमा येतोय...

===
१८६८ मधल्या पुस्तकाकडून फार अपेक्षा नव्हत्याच म्हणा पण तरी हा लेख सापडला
https://www.vulture.com/2018/09/were-sorry-to-say-that-little-women-is-n...

चौघीजणी मी वाचलं नाहीये, खूप मोठं पुस्तक ए, पण माझ्या आईने जेव्हा वाचलं होतं, तेव्हा तिला आवडलं होतं.

एमि ती व्ह्ल्चर ची लिन्क कूल आहे.
मी चौघिजणि लहानपणी वाचलंय. तेव्हा आवडलं होतं. पण फेमिनिस्ट नाहीच वाटलं ते. गोड जुन्या काळातली कथा आहे. त्या काळाच्या context मध्येच वाचावि. मूळ इंग्रजी पुस्तक वाचलेलं नाहि किंवा शो / मुव्हि पाहिलेले नाहीत. त्या काळातलं वर्णन वगैरे छान वाटतं शांताबाईंचं लेखन म्हणजे प्रश्नच नाही.

फायनली फायनली फायनली व्हेरिटी वाचून झालं
चांगलं होतं पण...
१. पुस्तकाची सुरुवात मस्त वेगवान होती, लेखिकेने गळा पकडून वाचायला लावलं, काही प्रसंग खूपच भारी आहेत. पण मग अर्ध्या पुस्तकानंतर कथानक पुढे सरकेना.

२. प्लॉट ट्विस्टचा अंदाज आला होता, शेवट बऱ्यापैकी तसाच होतो, पण मला वाटलं, लेखिकेला शेवट काहीतरी भलताच करायचा होता, तिला तो काही कारणाने करता आला नाही, कारण शेवट न फुलवता, उरकला.

३. पुस्तकात सगळंच आहे, रोमान्स, भीती, रहस्य, प्रेम अँड ऑल, त्यात ही कथा एका बंगल्यात घडते, तीनच मुख्य पात्र आहेत, त्यामुळे निर्मितीचा खर्च एवढा होणार नाही,यावर एखादा सिनेमा किंवा सिरीज नक्की येईल, पण सिनेमा आलाच तर तो चालणार नाही, कारण शेवट काय होणार याचा अंदाज येतो.

४. यातले काही प्रसंग मोठ्या लोकांना सुद्धा वाचता येणार नाहीत असे प्रचंड भयानक, त्रासदायक असे आहेत. मला त्या प्रसंगा बद्दल नमूद पण करता येत नाही. हे प्रसंग वाचताना पुस्तक फेकून द्यावे असं वाटेल, पण लेखिकेला वाचकांची ही प्रतिक्रिया अपेक्षित असावी.

५. "साध्या गोष्टीची ऍलर्जी असणे, त्यामुळे अपघाती मृत्यू होणे" हे आता बऱ्याच वेळा, बऱ्याच पुस्तकातून वापरलं गेलं आहे. त्यामुळे ऍलर्जी असणारं पात्र मध्येच कुठेतरी मरणार हे सुरुवातीलाच कळून येतं

६. व्हेरिटी अजून भारी झालं असतं, इट वॉज गुड... जस्ट गुड.. नॉट बेटर

बाकी आता नवीन पुस्तकाचा शोध सुरु झाला आहे.

Pages