इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थर्टीन रिझन्स व्हाय>>
तद्दन फाल्तु वाटलं मला ते, आत्महत्या करायची कारणं एकदम फाल्तु वाटली.

Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way.

या वाक्याने सुरु होणार्या, लिओ टॉलस्टोयच्या ऍना करेनिना या पुस्तकावरून बनलेले दोन चित्रपट पाहिले

१९३४ - यांनी फक्त ऍनाच्या कथेवर लक्ष दिले आहे आणि लेविनला पाहुण्या कलाकाराइतकेच दाखवले आहे. कित्येक सीन इतके अनावश्यक आहेत कि ते गाळून लेवीनची कथा दाखवता आली असती. ग्रेटा गार्बो मलातरी आवडली नाही पण तिचा आवाज चांगला आहे, घोगरा. ती आणि व्रोस्की नृत्य (कसला विनोदी प्रकार होता हा त्या काळी :हहगलो:) करत असतात तेव्हाचे संवाद भारी आहेत. चित्रपट ठीकच.

२०१२ - दिग्दर्शक जो राईट आणि त्याची म्युज अभिनेत्री कियेरा नाईटले यांचा हा तिसरा चित्रपट. आपण चित्रपट बघत नसून एखादे नाटक बघत आहोत असे वाटते स्टेज, पडदा, मधेच पपेटशोसारख्या दोऱ्या वगैरे. कियेराचे फक्त फोटो बघत होते तेव्हा फार आवडायची ती, पण पडद्यावर पाहताना तिची ती हनुवटी बाहेर काढून बोलायची सवय फारच इरिटेट करते. इतर सगळ्यांचा अभिनय चांगला झाला आहे. किटी आणि लेवीन यांचा अल्फाबेट ब्लॉक्स वापरून संवाद साधण्याचा सिन गोड आहे. १९३५ पेक्षा हा चित्रपट चांगला आहे पण वेगळी ट्रीट्मेंत, कपडे, भव्य सेट यामधे कादंबरीचा जीव हरवून गेला असेदेखील वाटले. हा एक चांगला लेख मिळाला
https://www.newyorker.com/books/page-turner/is-anna-karenina-a-love-story

===
PhoneBooth देखील पाहिला. चांगला थ्रिलर आहे.

सनव,

अरेच्चा गॉन गर्ल सत्यघटनेवर आधारित आहे माहित नव्हतं.
https://www.rollingstone.com/culture/culture-news/laci-peterson-murder-e...
भरपूर साम्य आहे की Sad

ट्रुली मॅडली गिल्टी आणि सेव्हन हजबंड्स वाचायच्या यादीत आहे.

थर्टीन रिझन्स मलापण एवढं खास वाटलं नाही.

नॉनफिक्शन पुस्तकावरील लेखाच्या प्रतीक्षेत.

भरपूर साम्य आहे की Sad

हो ना.
सध्या इथे कोलरॅडोमधील watts murder trial चं कव्हरेज येत होतं त्या बातमीत सिमिलर केस म्हणून पिटर्सन केसबद्दल माहिती होती. तेव्हा मला कळलं की गॉन गर्ल ट्रू क्राईम बेस्ड आहे. युट्यूबवर laci peterson केसवर असंख्य documentaries आहेत त्यातली एक पाहिली- रादर काम करताना ऐकली- तेव्हा लक्षात आलं की फ्रेम टू फ्रेम कॉपी म्हणू शकता (except Amy's twist).
असं काही fiction म्हणून वाचणं ठीक पण खऱ्या बातम्या असल्या कि फार वाईट वाटतं.

ऍना करेनिनाबद्दलचाच एक लेख वाचत होते
The world is still an awfully harsh place to those who step out of line or who cannot enter into prescribed ways of thinking and feeling.

याच थीमवर असलेले अल्बर्ट कामुचे The Stranger किंवा The Outsider हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचले. इतर काहीही न वाचता माझे मत

भाग १: वाचकाला रेस्टलेस करणं याखेरीज इतर काही उद्देश असतो का या असल्या पुस्तकांचा?
भाग २: कोर्टातले सीन विनोदी आहेत. जाम हसू येतंय. पण हे तर फिलॉसॉफिकल पुस्तक आहे ना? काळा विनोद??
निकालानंतर शेवटचे म्युजिंगतर वरवर वाचलं, कंटाळा येतो हे असलं वाचायला, लेविनपण नंतरनंतर असाच बोअर मारत होता :-|

===
मग इतरत्र थोडंफार वाचन केलं. पुस्तक Existentialism (a philosophy which holds that human beings create the meaning and essence of their own lives) बद्दल आहे म्हणे.

कथानायकाचे गुण-अवगुण
• In general, he considers other people either interesting or annoying, or feels nothing for them at all.
• Meursault is someone who 'lives for the moment', 'does not consciously dwell on the past', and 'does not worry about the future'.
बर्रर्र.

गुडरिड्सवरचे काही रिव्ह्यू चांगले आहेत ( पुस्तकापेक्षा Wink )
https://www.goodreads.com/review/show/25770679

https://www.goodreads.com/review/show/22789681

https://www.goodreads.com/review/show/1427460115

https://www.goodreads.com/review/show/214498580

असो. यानिमित्ताने ज़रिया चेम्बरलेनची केस आणि डिंगो म्हणजे काय ते कळलं
https://en.m.wikipedia.org/wiki/Death_of_Azaria_Chamberlain

> असं काही fiction म्हणून वाचणं ठीक पण खऱ्या बातम्या असल्या कि फार वाईट वाटतं. > खरंय Sad तो वॅट्स खून खटलापण डेन्जर आहे. त्यांचे Happy Family फोटो पाहिले कि वाटतं बापरे हे इतके Normal दिसताहेत. काय, कुठे चुकलं असेल? कशामुळे सामान्य दिसणारा मनुष्य असा snap होत असेल....

लव्हस्टोरी या जॉनरमधील काही इंटरेस्टिंग आहे का कोणाला माहीत ?अचानक मला साक्षात्कार झालाय की सध्या यातलं काहीच वाचलेलं /पाहिलेलंनाही.

प्रेमकथाच्या वाटेला मी शक्यतो जात नाही. पण गुडरीड्स रोमान्स विजेता नक्की वाचते.

या वर्षीच विजेता The Kiss Quotient आता परवाच वाचलं. बर आहे.
ही बाकीची यादी उपयोगी पडू शकेल
https://www.goodreads.com/blog/show/1390-the-most-beloved-romance-books-...

डायना गबोल्डनच्या आऊटलँडर सिरीजमधली पहिली ४.५ पुस्तकं वाचली आहेत. मस्त!

जे आर वॉर्डच्या ब्लॅक डॅगर बर्डरहुड सिरीजमधली ७ की ८ पुस्तकं वाचली आहेत. पॅरानोर्मल रोमान्स किंवा व्हॅम्पायर एरॉटिक आहेत या. यांच्या फॅन्सचा स्वतःचा एक कल्ट आहे.

कोलीन हुवरच्या It Ends with Us आणि Without Merit ठिकठीक.

यंग अडल्ट रोमान्स चालणार असेल तर Fangirl आणि Eleanor and Park आवडले होते.

एरॉटिक हव्या असतील तर Crossfire Series.

परफ्यूम नावाची जर्मन सिरीज आलीय नेटफ्लिक्स वर . सहा भागांचा पहिला सीजन आहे . आज दिवसभरात पाहून काढलीय आणि अजूनही डोकं भंजाडलेलंच आहे . मागच्या वर्षी डार्क नावाची जर्मन सिरिज पाहिली होती तीही अप्रतिम होती .. आता जर्मन सिनेमाकडे वळावं लागणार

मी पुस्तकं वाचायला सुरुवात अशी २०११ मधे केली म्हणता येईल; म्हणजे वयाची तिशी ओलांडल्यावर. त्याआधी मित्रमंडळीकडून मिळणारी सिडनी शेल्डन- चेतन भगत- वुडहाऊस- क्वचित कधी प्राइड अँड प्रिजुडाईस- गॉन विथ द विंड- मेमॉयर ऑफ गिशा- मिडनाईट्स चिल्ड्रन सारखे क्लासिक, किंवा स्वतः विकत घेतलेले शेरलॉक- मिस मार्पल- ऑस्कर वाईल्ड वगैरे एवढेच माझे वाचन होते.

आतापर्यंत मी केवळ दोनच फोन विकत घेतले आहेत; २००३ मधे घेतलेला नोकिया २१०० आणि २०१० मधे घेतलेला नोकिया २७००. तर २०११ साली माझ्याकडे नोकिया २७०० होता. त्याच्यावर इंटरनेट प्लॅन घ्यायला सुरुवात केली. मग गटेनबर्ग ही साईट माहित झाली. तिथे वुडहाऊस, चेस, ब्रॉंटे, टॉल्स्टॉय, दोस्तोयेवस्की वगैरेचा भरपूर साठा मिळाला. मी तिथून pdf डाउनलोड करायचे, ते स्वतःलाच जीमेलवर अटॅचमेन्ट पाठवायचे, मग ऑपेरामिनीमधून ती अटॅचमेन्ट html म्हणून उघडायची, पेज ऑफलाईन सेव्ह करायचे आणि पुस्तक वाचायचे. असा सगळा खटाटोप :D.

२०१२च्या नोव्हेंबरमधे गुडरीड्सवर अकाउंट काढला (माबोवर त्यानंतर अजूनेक महीन्याने आले होते). तिथून इतर नवनवीन पुस्तकं, लेखक, जॉन्र कळायला लागले. pdf साठी इतर टोरंट साईट धुंडाळायला चालू केलंच होतं. गुडरीड्सवर पुस्तकाला तारे देणे, वाचून पूर्ण केल्याची तारीख टाकणे, पुस्तक टू-रिड यादीत टाकणे, वर्षाच्या सुरुवातीलाच किती पुस्तक वाचणार याचे चॅलेंज घेणे वगैरे प्रकार चालू झाले आणि एकंदरच वाचनाला थोडी शिस्त आली.

मग २०१४ मधे कधीतरी मआंजावरच्या एका मित्राने अलबाईट रीडर नावाचे ऍप सांगितले. ते डाउनलोड केल्यावर नोकिया २७०० वर इपबदेखील वाचता येऊ लागले. इपबची साईझ pdf पेक्षा कमी असतेच आणि परत वर लिहिलेल्या खटाटोपसाठीचा डेटा वाचला. मी युट्युबवर जुने नवे हिंदी चित्रपट बघत होतेच त्यासाठी थोडासा अधिक डेटा मिळू लागला. स्वप्ना राज सध्या ज्या चित्रपटांबद्दल लिहतेय ते मी याच काळात नोकिया २७०० वर पाहिले आहेत (*_*)

२०१७ जानेवारीपासून मला जुना वापरलेला सॅमसंग ड्युओस मिळाला, आता मी त्यावर अल्डीको रीडर वापरून पुस्तकं वाचते.
नवाकोरा लॅपटॉपदेखील त्याचवेळी घरात आला. पण शिस्तीत चांगले चित्रपट पाहायला मात्र ऑगस्ट २०१७ उगवावा लागला. Imdb Top 250 आणि ऑस्कर बेस्ट चित्रपट नामांकन असलेले चित्रपट टोरंटवरून मिळवून विकांताला बघणे तेव्हापासून चालू केले आहे.

आज वर्षाखेर आणि पुढच्या वर्षी मी चाळीशीत जाणार म्हणून हा थोडासा मागील दशकाचा आढावा.

===
तर यावर्षी २४ पुस्तकं वाचेन असं माफकच चॅलेंज घेतलं होतं. नाकापर्यंत पाणी आल्यावर, धापा टाकत, नोवेला वगैरे वाचून ते कसंबसं पूर्ण केलं. गुडरीड्सवरून मिळवलेले स्टॅट्स:

वर्ष - पुस्तकं - पानं
2018 - 24 - 07606
2017 - 30 - 09609
2016 - 39 - 15524
2015 - 38 - 16541
2014 - 29 - 09815
2013 - 41 - 11193
2012 - 75 - 23152
2011 - 84 - 18841
2010 - 09 - 01767
2009 - 01 - 00078
2008 - 14 - 05896
2007 - 15 - 04817
2003 - 07 - 02315
2002 - 17 - 04902
2001 - 13 - 05932

२०११- ८४ म्हणजे महिन्याला ७ पुस्तकं. चार दिवसांना एक. बापरे.
कोणते जॉन्र आवडीचे ठरले? आवड बदलत गेली का?

२०१८ मधे वाचलेल्या पुस्तकांची यादी

The Secret Place
Everything I Never Told You
The Trespasser
Eleanor Oliphant Is Completely Fine
Why Didn't They Ask Evans
The Hate You Give
Without Merit
The Woman in the Window
Then She Was Gone
The Hours
Rita Hayworth and Shawshank Redemption
On Chesil Beach
The Descendants
An American Marriage
Sharp Objects
The Prestige (not complete)
Nine Perfect Strangers
Still Me
The Wife Between Us
Sometimes I Lie
The Stranger
Charlie and the Chocolate Factory
Bared To You
The Kiss Quotient
Four: A Divergent Story

चित्रपटांच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष फारच छान गेलं. यावर्षी बघितलेले चित्रपट

Argo
Strangers on a Train
Rashoman
Gold Rush
The Girl with Dragon Tattoo 1 2 3
It Happened One Night
Gandhi
Toy Story 1 2 3
The Game
Johnny Gaddar
Dial M for Murder
Perfect Murder
Memento
Sherlock Holmes 1 2
Lolita 1962 1997
Notorious
Some Like It Hot
Jerry Maguire
Roman Holiday
The Help
Catch Me If You Can
Spotlight
Birdman
Grand Budapest Hotel
Kate and Leopold
Raman Raghav 2
Oceans 1 2 3
Shawshank Redemption
Breakfast at Tiffany's
Om Shanti Om
Descendants
Suspicion
Kapoor and Sons
The Hours
Little Miss Sunshine
Double Indemnity
The Good, the Bad and the Ugly
Prestige
Hunger Games 1 2 3 4
City Lights
Bridget Jone's Dairy
Miss Peregrine's Home for Peculiar Children
Andhadhun
Twilight 1 2 3 4
Inception
The Hobbit 1 2 3
LOTR 1 2 3
Three Billboards outside Ebbing Missouri
Invisible Guest
Beautiful Mind
Mr Smith Goes to Washington
Dark Places
Birds
Jane Eyre 1943 1997 2011
Divergent 1 2 3
Anna Karenina 1935 2012
James Bond Pierce Brosnan 1 2 3 4 Daniel Craig 1 2 3 4

मालिका
Mr Mercedes 1 2
Outlander 1 2 3
Sherlock BBC's 1 2 3 4
Sharp Objects

> २०११- ८४ म्हणजे महिन्याला ७ पुस्तकं. चार दिवसांना एक. बापरे.
कोणते जॉन्र आवडीचे ठरले? आवड बदलत गेली का? > बापरे म्हणण्यासारखं नाहीय ओ ते. तिकडे गुडरीड्सवर लोकं मी 185 पुस्तकं वाचली, मी 250 वाचली वगैरे सांगत असतात मग मलाच लाज वाटते :-(. कसं काय जमतं त्यांना माहित नाही.

आवड बदलत गेली असे म्हणता येणार नाही. अजूनही रहस्य, थरार हाच पहिला प्रिफरन्स असतो. पण Young Adult, Fantasy, Dystopia हे नवीन प्रकार माहित झाले आणि त्यातली लेटेस्ट पुस्तक वाचता आली.

पुढील वर्षी कोणती पुस्तकं वाचायची हे ठरवण्यास उपयोगी पडू शकतील अशा लिंक

https://www.goodreads.com/choiceawards/best-books-2018

https://www.goodreads.com/choiceawards/best-of-the-best-2018

https://www.goodreads.com/blog/show/1453-the-24-most-popular-book-club-p...

https://www.goodreads.com/blog/show/1439-the-most-read-books-of-the-2018...

===
गेल्यावर्षी वेगवेगळ्या जॉन्रमधे जी पुस्तकं प्रकाशित झाली त्यात काय ट्रेंड्स होते याचे अनालीसीस

१. सुरवात अर्थातच रहस्य आणि थरार जॉन्रने

https://www.goodreads.com/blog/show/1455-mystery-solved-the-thriller-tre...

Trend #1: Women dominate the genre (as men try to blend in).
Trend #2: Mysteries go mainstream.
Trend #3: U.K. mystery writers stake a claim.

२. त्यानंतर तरुण प्रौढ

https://www.goodreads.com/blog/show/1451

Trend #1: Culturally inspired fantasies.
Trend #2: Teens take a stand.
Trend #3: The immigrant experience.

३. सायफाय आणि फॅन्टसी

https://www.goodreads.com/blog/show/1440-the-sci-fi-fantasy-trends-of-2018

Trend #1: Retellings and reimaginings of beloved stories.
Trend #2: Books that blur the line between fantasy and science fiction.
Trend #3: More fantastical stories about women, by women.

४. आणि शेवटी रोमान्स

https://www.goodreads.com/blog/show/1461-the-romance-trends-of-2018

Trend #1: The romantic comedy returns.
Trend #2: Romance covers get a fresh new look.
या ब्लॉगवर आलेले प्रतिसाद वाचनीय आहेत.

@अॅमी
दण्डवत घ्या!
नारायणाने जसा नारदमुनींचा आणि हनुमंताने जसा भीमाचा गर्व हरला तशीच कृपा आपणही माझ्यावर केलीत, आता मला २०१९ मध्ये वाचनावर आणि मुव्हीजवर नीट लक्ष द्यावं लागेल!

@अॅमी
दण्डवत घ्या!+१११
तुमच अफाट वाचन पाहुन थक्क झाले.. Happy भारीच

स्पायडर मॅन इंटू द व्हर्स हा चित्रपट बघितला, मस्त आहे, आवडला, एखाद्या कॉमिक्स बुक सारखा चित्रपट आहे, वेगवान कथानक, त्यात ट्विस्ट अन विनोदी सुद्धा आहे, सगळ्यात भारी तर साऊंड ट्रॅक आहे, शक्य झाल्यास आयमॅक्स थेटर मध्ये बघावा, व्हिजव्हल्स अप्रतिम आहेत. मस्त वॉच!!

एमी, भारी आहे लिस्ट! Keep it up this year.

मी लिटल फायर्स एव्हरीव्हेअर वाचलं. मस्त आहे. एंटरटेनिंग आहे. चायनीज लेखिकेने लिहिलं आहे म्हणून विशेष कौतुक वाटलं.

प्लॉटबद्दल थोडं (स्पोयलर काही नाही पण अलर्ट घ्या!)

तर सतत मदरहूड ऑर द लॅक ऑफ इट वरचा फोकस जरा बोअर झाला. आई झाल्याशिवाय आयुष्य अर्थहीन किंवा शेवटी सख्खी आई ती आईच टाईप जरा जुनाट विचार वाटतात. आवरा आता, असं झालं मला. पण बाकी बुक टीपी आहे ,सर्व पोरापोरींची characters मस्त झाली आहेत. ९०चं दशक कालखंड आहे हा आणखी एक नॉस्टॅल्जीक फ़ॅक्टर.

नेटफ्लिक्सवर ब्लॅक मिरर बॅन्डरस्न्याच हा एपिसोड बघितला, खूपच आवडला. असं काही आधी कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे खूपच मजा आली. कथानकाबद्दल अजून काही सांगितलं तर स्पॉईलर्स ठरू शकतात. काही वेळानंतर, यातलं कथानक किचकट होतं जातं, त्यामुळे शांतपणे, लक्षपूर्वक बघावे.

काल गोल्डन ग्लोब अवॉर्ड सेरेमनी झाली.
"स्पायडरमॅन इंटू द स्पायडर व्हर्स" ला बेस्ट ऍनिमेटेड फिचर फिल्मचा अवॉर्ड मिळाला.
"बॉडीगार्ड" मधल्या रिचर्ड मादानला सुद्धा अवॉर्ड मिळालं.
"द मार्व्हलस मिसेस मेझल" च्या हिरॉईनला सुद्धा अवॉर्ड मिळालं आहे.
या तिन्ही सिरीज मी आधीच रेकमेंड केल्या होत्या, त्यामुळे मी भारी!!
असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. मोठेपणा वगैरे नकोच Wink
विनर्सची लिस्ट

त्यामुळे मी भारी!!
असं मला अजिबात म्हणायचं नाहीये.
>>
मग "आ" टाका मध्ये. तुम्ही रिकमंड केलेल्या सिरीजना त्यांनी अवार्ड्स दिल्या बद्दल.

अज्ञातवासी, किल्ली, टवणे सर, मानव आणि सनव

खूप आभार _/\_

===

सनव,
Celeste Ng चे Everything I Never Told You गेल्यावर्षी बऱ्यापैकी सुरुवातीलाच वाचलेलं आणि खूप आवडलेल पुस्तक. Little Fires Everywhere देखील वाचायच्या यादीत आहेच. रिज वेदरस्पून यावर चित्रपट बनवतीय माहित असेलच.

===
मी यावर्षाची सुरुवात Riley Sager चे दुसरे पुस्तक The Last Time I Lied वाचून केली. जवळपास २/३ पुस्तक मी खूप प्रभावीत झाले होते लेखनशैलीमुळे आणि एकंदरच प्लॉटमुळे, पण तिथे आलेला ट्विस्ट मलातरी काहीही वाटला. पुढे थोडंथोडं बोअर होत गेलं. अगदी शेवटी आलेला ट्विस्ट चांगला होता पण तोपर्यंत माझा इंटरेस्ट मरुन गेलेला.

===
या लेखकाने अकनॉलेजमेंट मधे The Picnic at Hanging Rock चा उल्लेख केला आहे म्हणून ते पुस्तक वाचायच्या यादीत टाकले, १९७५चा कल्टक्लासिक चित्रपट पाहिला आणि २०१८ची मालिकादेखील पाहिली. मला मालिका जास्त आवडली.

चैतन्य,
किती ती विनम्रता!! Lol Lol

गोल्डन ग्लोब्जमधे जॉन्रनुसार वर्गीकरण केल्याने आणि चित्रपट-टीव्हीमालिका दोन्ही असल्याने फारच लांबलचक नामांकन यादी होते आणि मी गोंधळून जाते. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ऑस्करच ठिकय माझ्यासाठी.

एमी ,
लिटल फायर्स लवकर वाचण्याचे करावे म्हणजे इथे डिस्कस करता येईल. मी तिचं ते पहिलं पुस्तक वाचणार आहे.

तर मी खिड्कीतली बाई वाचलं, त्याबद्दल लिहित आहे, न वाचलेल्याना स्पोयलर अलर्ट.
मला मधल्या आणि शेवटच्या दोन्ही ट्विस्टबद्दल सुरुवातीला अंदाज आला होता पण मधल्या वेळी सॉलिड धक्का बसतो. डोक्याला शॉट लागतो एकदम. तरी ते हलोवीनच्या संवादावरून मला वाटलेलं. But still.
नंतरचा भाग आणि फायनल ट्विस्ट ठीकठाक होते. ओव्हरऑल पुस्तक अजून वन थर्ड कमी करता आलं असतं. यापेक्षा मी लिटल फायर्सच जास्त एन्जॉय केलं.

Pages