इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. नेफ्लीवर व्हॉट द हेल्थ नावाची डॉक्युमेंटरी बघून माझ्या एकंदरीत आयुष्यात कमालीचा बदल झाला, यात एक डॉक्टर "साखरेमुळे डायबेटीज होतं नाही" असं म्हणाला, धक्कादायक!! या डॉक्युमेंटरीत फार डोक्यालिटी आहे, जरूर बघावी

२. ग्रीन बुक सिनेमा बघितला, यातले काही सवांद तर लिहून काढून, फ्रेम करून भिंतीवर चिटकवून टाकावेत, इतके भारी आहेत. Falling in love with you was the easiest thing I've done in my life.
असले भन्नाट सवांद आहेत.
मस्त मस्ट वॉच...

३. क्रेझी रिच एशीअन बघितला, भंगार आहे, बघू नये. लोकं या पिक्चरचा दुसरा पार्ट का म्हणून काढून राहिलीत??

४. बोहेमिअन रॅपसीडी बघितला, आवडला, मेन हिरोने स्क्रीन फोड अभिनय केला आहे, पण सगळ्यांना नाही आवडणार, कारण त्या गाण्याबद्दल किंवा बँड बद्दल माहिती असणं गरजेचे आहे.

५. मॉडर्न फॅमिलीचा नववा सीजन बघतोय, खतरनाक जोक्स, सगळ्या प्रकारचे विनोद आहेत, येकदम इंटेलिजंट ह्युमर पण ए.. सगळंच ए..

अरे हा, ते पीअर प्रेशर मध्ये येऊन, अव्हेंजर इंडगेम पण बघितला, पीटर ब्रॅडशॉने पाच स्टार दिले आहेत, म्हणून लय अपेक्षा घेऊन गेलो होतो, पण ठीक ए यार, म्हणजे लैच मोठा ए, तीन तासाचा ए, त्यात गाणी पण नाहीयेत.. अर्जितच्या आवाजातलं एखादं गाणं शेवटी टाकलं असतं ना, दहा मिलियनने बॉक्स ऑफीस कलेक्शन अजून वाढलं असतं...

अर्रे वाह भरपूर सिनेमा बघितलेस की!
मी सध्या गेम ऑफ थ्रोन्स बघतेय.

आणि The Unhoneymooners नावाचे बेक्कार पुस्तक वाचतेय Uhoh

अजून एक आठवलं, "द त्रु कॉस्ट" नावाची डॉक्युमेंटरी नेफ्लिवर बघितली, चांगलीच भयानक ए, यूएसए, ऑस्ट्रेलियामध्ये मिळणारे कपडे, मेड इन बांगलादेश असतात, पण हे तयार करणारे लोकं आणि त्यांचं आयुष्यमान, कसं असतं, यावर आहे.बरीच नवीन माहिती कळाली.. बघावी

द अनहनीमूनर्सचं संक्षिप्त वर्णन, गुडरिड्सवर वाचलं, त्यावर सगळीच स्टोरी सांगून टाकली आहे.
एक तो सिनेमा होता ना, ब्राईडमेड्स नावाचा, तसंच काहीसं कथानक आहे असं वाटलं.

ब्राईड्समेड सिनेमाबद्दल काही माहित नाही. मला The Best Romance Books of May इथे The Unhoneymooners चे नाव कळाले. पुस्तक १४ मे ला बाजारात येणार आहे. पण मला अगदी सहज मिळालं म्हणून वाचायला घेतलं आणि पूर्ण पश्चाताप Sad
===

खरंतर मी Game of Thrones ची पन्नासेक पानं वाचली होती. पण मग म्हणलं आधी पूर्ण मालिका बघून घेऊ आणि मग पुस्तक वाचू.
===

All Your Pertects वाचलं नाही पण कोलीन हुवर प्रेमकथा+ काहीतरी गंभीर समस्या असे लिहित असते. Without Merit मधे नैराश्य होतं, It Ends with Us मधे घरगुती हिंसाचार होता.

ऑल युअर परफ़ेक्टस वाचायला सुरुवात केली आहे, सो फार सो गुड. या शैलीमधली पुस्तकं जास्त वाचत नाही, पण हे पुस्तक लगेच वाचून संपवेन असं माझ्या अंतःकरणाने सांगितले.
बघू काय होतंय...

ऍमेझॉनवर पुस्तकांवर सेल चालू आहे, ६० टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे. ऍनिमल फार्म, ग्रेट गॅटसब्बी असे अशी क्लासिक्स पुस्तके फार स्वस्तात मिळत आहेत. सेल आज रात्री संपेल

१. या लिस्ट मधल्या यु आर द वर्स्ट सिरीजचे पहिले दोन सीजन बघितले आहेत, ब्लॅक कॉमेडी आहे, विषय आपला तोच, तरुणाई, मैत्री, प्रेम, नाती वगैरे वगैरे पण मांडणी मध्ये नावीन्य आहे, त्यामुळे सिरीज आवडली होती. या सिरीजच शीर्षक गीत खूप आवडतं, छान आहे.

२. आय अडोअर माईन्डहंटर. इट्स सिक, प्रोफाऊंड अँड फ्रांटिक. या सिरीजचं लेखन काळाच्या पुढे जाणारं आहे, इतकं प्रभावशाली लेखन, मॅड मेन सिरीज नंतर बघायला मिळालं. या सिरीजचा नाही म्हटलं तरी नकारात्मक प्रभाव पडतो, त्यामुळे या सिरीजच्या विषयाबद्दल मी जास्त विचार करत नाही. ही सिरीज सबटायटल्स घेऊन बघावी कारण सवांद अचाट, वेगवान आहेत. बऱ्याच वेळा सिरीज चालू असताना मध्येच पॉज करून सवांद वाचून घ्यायचो, मग समजून घ्यायचो

<<< पुस्तक १४ मे ला बाजारात येणार आहे. पण मला अगदी सहज मिळालं म्हणून वाचायला घेतलं >>>
तुम्हाला प्रकाशनाच्या आधीच पुस्तके मिळतात का थेट प्रकाशकाकडून?

काल टीव्हीवर कलर ऑफ द मनी चित्रपट बघितला, स्कॉर्सेसी सरांचे जवळपास सगळे चित्रपट बघून झाले आहेत, पण हा चित्रपट बघायचा राहिला होता. याचं आयएमडीबी रेटिंग कमी आहे, म्हणून बघायचा कंटाळा केला होता.

लेखन छान आहे, सशक्त आहे, नावं कलर ऑफ द मनी असलं तरी, पैशांच्या पलीकडे जाणारी कथा आहे, पैसे येत जात राहतात, पण जगणं एकदाच घडतं, त्यामुळे थांबू नका, जगून घ्या असा मतिथार्थ कथेत आहे.

या चित्रपटासाठी पॉल न्यूमन यांना अभिनयाचा ऑस्कर मिळाला होता, बहुतांश वेळा चित्रपटात एखादं पात्र कूल किंवा भारी असेल, तर ते चित्रपटभर ते भारी असतं, असं पात्र सगळ्याच सीन मध्ये बाजी मारून जातं, सगळ्या पोरी त्याच्या मागे लागतात, सगळे छान वन लायनर त्याला म्हणायला मिळतात, पण या सिनेमात असं होतं नाही, पॉल न्यूमन यांनी साकारलेला एडी, कूल पण आहे, नाटकी पण आहे, तो रडतो, रागावतो, चुकतो सुद्धा त्यामुळे ते पात्र अजून जिवंत वाटतं, आपल्यातलं वाटतं.

स्कॉर्सेसी यांचे नेहमीचे डॉली झूम शॉट्स इथे आहेत, शार्प कट्स इथे सुद्धा आहेत, आता आपल्याकडे सगळंच स्लो मोशन मध्ये होतं आहे, त्यामुळे असे शार्प, एजी कट्स बघताना बरं वाटतं.

अजून एक चांगली बाब म्हणजे, कथानक प्रेडिक्टबल होतं नाही, अंदाज बांधता येत नाही, शेवट सुद्धा वेगळा होतो, हेच ते लेखकांचं यश आहे. प्रत्येक पात्र छान लिहलं गेलं आहे, सशक्त आहे, एका सीन मध्ये फॉरेस्ट व्हिटेकरच्या पदरी फक्त तीन चार सवांद आहेत तरी ते पात्रं भाव खाऊन जातं.

बाकी हा चित्रपट चांगला आहे, आवडला.

माझा सध्या वाचन स्लम्प चालू झालाय बहुतेक. कोणतंच पुस्तक ट्यून होईना Sad

Little Fires Everywhere थोडंस वाचलं आणि बाजूला ठेवलं. Clockwork Orange तर एकदोन परिच्छेद वाचले आणि भाषाच झेपेना. सध्या सगळेजण वाचताय्त म्हणून परत The Mister वाचायला घेतलं तिथेही कंटाळा आला....

१. क्लॉकवर्क ओरंज, कसला भयानक चित्रपट होता, लहानपणी बघितला होता, पण मला बघवला नाही. तेव्हा माझ्या बाल मनावर फारच लाल परिणाम झाले होते. मी नंतर बघितलाच नाही.

२. ऑल युअर परफ़ेक्टस वाचत आहे, यात सेक्स सीन्स बरेच आहेत. हे पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की, सेक्स पोएटिक केला तर तो रोमान्स होतो, रोमान्स पोएटिक केला तर ते प्रेम होतं, प्रेम पोएटिक केलं तर ते अमर प्रेम होत, अमर प्रेमाला पोएटिक करावं लागत नाही कारण अमर प्रेमचं हीच एक काव्यात्मक संकल्पना आहे..

१. एलिस फिनेचं नवीन पुस्तक, मला माहितेय तू कोण ए..... हे बेकार पडलं. सगळ्या मोठ्या, चांगल्या बूकट्युबर्स ने एक दोन स्टार देऊन, वाचू नका असं म्हटलं आहे.

२. इ एल जेम्सचं मिस्टर का? पण गुडरीड्स त्याला फारच निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळाल्या आहेत

@ॲमी
तुम्ही माय लव्हली वाईफ वाचा, पहिला चॅप्टर खूपच भारी होता, माझं अर्ध वाचून झालं होतं, चांगलं आहे

अविका,
मी पुस्तकं इंटरनेटवरून फुकट मिळवून वाचते.
===

चैतन्य,
१. हो तो सिनेमा पहायचा आहे म्हणून आधी पुस्तक वाचायचं ठरवलेलं.
२. हा हा :D. सेक्स सीन लिहताना स्त्रि आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने लिहतात हे लक्षात आलेलं पण ते प्रेम, अमर प्रेम वगैरे कळण्याइतका तो जॉन्र वाचला नाहीय.
३. एलिस फिने वगैरे - या गॉन गर्लनंतरच्या लाटेतल्या नवलेखिका दरवर्षी एक पुस्तक लिहायचेच असे का ठरवतात काय माहीत. सावकाश वेळ घेऊन कमीतकमी बरे वाटेलसे लिहावे असे त्यांना का वाटत नाही. बाजारातील मागणीपुढे एवढं का झुकायच...
४. हो तेच ते The Mister. बोअर आहेच.
५. My Lovely Wife वाचायलादेखील सुरवात केली होती मी. आणि Game of Thrones पण ५० पानं वाचलेलं Sad Sad Lol Lol
===

एनिवे,
Big Little Lies 2चे ट्रेलर आले आहे. ९ जूनला पहिला भाग प्रक्षेपित होईल.
मला अतिशय आवडलेले Eleanor & Park हे YA पुस्तक, याचा सिनेमा बनतोय.
आणि You पुस्तकमाळेत अजून दोन पुस्तकं लिहली जाणार आहेत.

१. हो.. मी बिग लिटल लाईजच्या दुसऱ्या सीजनचं ट्रेलर बघितलं, चांगलं वाटलं, स्टार कास्ट लईच भारी झालीय.

२. फ्लीबॅग चा दुसरा सीजन फायनली येतोय, पहिला सीजन खूपच भारी होता, ते आधी नाटक होतं, पण ते इतकं भारी होतं की त्याची टीव्ही सिरीज झाली, शेवटचा प्लॉट ट्विस्ट इतका भयंकर होता की मी रडलो होतो, उशीने अश्रू पुसले होते.

३. एलिनॉर अँड पार्क वाचाल नव्हतं कारण मला वाटलं की, हे ऑल द ब्राईट प्लेसेस सारखं आहे, ऑल द ब्राईट प्लेसेस आवडलं नव्हतं, म्हणून मी याला पास दिला

४. यू चं दुसरं पुस्तक हिडन बॉडीज होतं ना, पण बहुतेक ते चाललं नाही

२. फ्लिबॅग बघेन.
३. All the Bright Places च्या गुडरीड्स वर्णनात हे सापडलं -
The Fault in Our Stars meets Eleanor and Park in this exhilarating and heart-wrenching love story about a girl who learns to live from a boy who intends to die.
मला The Fault... आवडलं नव्हतं.
४. हो Hidden Bodies नंतरची अजून दोन पुस्तकं येणारेत.

फॉल्ट इन अवर स्टार्स, न्यू यॉर्क बेस्टसेलरच्या यादीत अंदाजे दीड दोन वर्ष होतं, जेव्हा कधी बघायचो तेव्हा ते टॉप टेन पुस्तकांमध्ये असायचे, म्हणून वाचायला घेतलं, आवडलं होतं. कारण विषय गंभीर असला तरी त्यात मेलोड्रामा नव्हता, सवांद फार छान होते. चित्रपट पण भारी होता. कारण असं कमी वेळा होतं की, चित्रपट आणि पुस्तक दोन्ही चांगलं आहे. पण इथे दोन्ही कलाकृती चांगल्या होत्या.

म्हणून मी जॉन ग्रीनचं टर्टल आलं द वे डाउन वाचलं, भंगार होतं, जॉन ग्रीनचं स्टाईल ओव्हर सबस्टन्स असं होतं, जे की पेपर टाउन पुस्तकात पण झालं. कथानक फार कमी असतं, सवांद, वन लायनर, चाईल्ड हूड फँटसी, असं सगळं वापरून कथानक फुलवलं जातं. तिकडच्या लोकांना या गोष्टी रिलेट होतात, त्यामुळे जॉन ग्रीन तिकडं फार प्रसिद्ध आहे

मला लूकिंग फॉर अलास्का वाचायचं होतं, कारण फॉल्ट इन अवर स्टार्स नंतर ते पुस्तक भारी आहे असं म्हणतात. त्याच्यावर आता सिनेमा पण येत आहे

१. काल सर्चिंग नावाचा चित्रपट नेफ्लीवर बघितला, हा चित्रपट जेव्हा भारतात प्रदर्शित झाला होता, तेव्हा याला चांगले रिव्हयुज मिळाले होते, त्यामुळे माझ्या वॉचलिस्ट मध्ये होता. मी अर्धाच बघणार होतो, पुढचा भाग नंतर बघणार होतो, पण चित्रपट इतका चांगला आहे की, एका बैठकीत पूर्ण बघितला.

२. संपूर्ण चित्रपट लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल स्क्रीनद्वारे दाखवला आहे, त्यामुळे बघायला मजा आली. चित्रपटाचे कथानक वेगवान आहे, चांगले ट्विस्ट आहेत, कुटूंबासोबत बघावा असा चित्रपट आहे.

३. मुलं, त्यांचे पालक, तंत्रज्ञान असा विषय आहे, चांगली गोष्ट म्हणजे चित्रपट कोणाला दोष देत नाही, हे लेखकांचं यश आहे, बऱ्याचवेळा आजची तरुण पिढी किती वाईट !! असं ठरवून आपण मोकळे होतो, पण चित्रपट असं काही करत नाही.

जरूर बघावा..

१. जॉन ग्रीनच्या लोकप्रियतेबद्दल कल्पना आहे. बिल गेट्ससारखा माणूस त्याला भेटण्याबद्दल, त्याच्या पुस्तकांबद्दल फेसबुक पोस्ट टाकत असतो "माझ्या मुलीचा आवडता लेखक वगैरे"....
२. सर्चिंग बऱ्यापैकी आवडलेला. सबटायटल्स नीट सिंक होतायत की नाही चेक करताना दुर्दैवाने मला गुन्हेगार कोणेय ते आधीच कळलं होतं Lol त्यामुळे थोडा कमी आवडला.

चित्रपट बघताना एकदम गुंतून गेलो होतो, त्यामुळे काय अंदाज आला नाही, आपल्या इथे याचा रिमेक करायला पाहिजे, लोकांना लय आवडेल, रिमेकमध्ये दोन अर्जितची गाणी टाकायची, गाणी दुःखीच पाहिजे,एक सुरुवातीला आणि एक मध्ये. कोणाचेही रडण्याचे दोन मोठे सीन्स पाहिजेतच..फील वाढेल. ती लहान मुलगी म्हणून आलियाला घ्यायचं, पण मग तिचे वडील म्हणून कोणाला घेणार? हम्म.. असं असेल तर आधी वडील ठरवावे लागतील.

Que Sera Sera, whatever will be will be......
हाॅलिवूडचं अजरामर गाणं ! 'लिजंड ' शब्द चपखलपणे लागू होतो , अशा दुर्मिळ प्रतिभावान अभिनेत्रीची जणूं ओळखच असलेलं, ' द मॅन हू न्यू टू मच ' ( 1950 - 60 ) मधलं हें गाणं !! वयाच्या 97व्या वर्षी डाॅरिस डेचं आताच झालेलं निधन तिच्या दिमाखदार करिअरला सलाम करणं भाग पाडतं !! RIP !

Pages