इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००९ चा पुलित्झर पुरस्कार मिळालेलं Olive Kitteridge हे पुस्तक वाचलं.

यात एकमेकांत गुंतलेल्या, वेगवेगळे निवेदक असलेल्या १३ लघुकथा आहेत, ज्या सॉर्ट-ऑफ कादंबरी बनवतात. प्रत्येक निवेदक आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आहे (love-loss-grief-loneliness). ऑलिव्हच्या व्यक्तीमत्वाच्या वेगवेगळ्या बाजू ते आपल्यासमोर आणतात आणि हळूहळू आपल्याला ऑलिव्ह (थोडीफार) उमजत जाते. थोडीफार यासाठी लिहलं कारण There are so many things left unsaid, and to readers imagination. Isn't that how we see and speculate about other people? आणि पुस्तकाचा हाच मुद्दा काहीजणांसाठी टर्नऑफ ठरू शकतो Proud

१३ पैकी काही गोष्टी मला खूप आवडल्या
• The Piano Player बेस्ट आहे.
• Tulips मधला Louise Larkin चा भाग चांगला आहे.
• Security चांगली गोष्ट आहे.
• Criminal
• A Different Road
• Ship in a Bottle
रोचक् आहेत.
• Starving ही गोष्ट मात्र मला अजिबात आवडली नाही.
बाकी ठीकठाक.
===

आता यावर्षात अजून कोणते पुस्तकं वाचून पूर्ण होईल असे वाटत नाही त्यामुळे here is my year in books

• ३० पुस्तकं वाचायचं चॅलेंज घेतलेलं ३१ पुस्तकं वाचली (२ लघुकथा आहेत Wink )
• महिन्याला साधारण एक हजार पानं वाचेन असं ठरवलं होतं. म्हणजे वर्षाला बारा हजार होतात. पण मी दहा हजारच पानं वाचली आहेत Sad
• मी यावर्षी वाचलेल्यापैकी टॉप तीन पुस्तकं ही आहेत
- Beloved
- Nickel Boys
- Verity
• माझ्या आवडत्या रहस्य थरार प्रकारातली टॉप तीन
- The Dry
- I am Thinking of Ending Things
- Whisper Man
• इतर साहित्य प्रकार मधले
- Daisy Jones & the Six

एकंदर हे वर्ष बर्यापैकी चांगले गेले असे म्हणायला हरकत नाही.

अ‍ॅमी, तुझ्याकडून प्रेरणा घेऊन पुस्तक-वाचन वाढवायचं ठरवलं आहे.
इतके दिवस रँडमली वाचन होत होतं; आता सुरूवात म्हणून दर महिन्याला किमान एक पुस्तक तरी वाचणार आहे. Happy

अर्रे वाह!! छानच संकल्प Happy शुभेच्छा!!!

तू गुडरीड्सवर चॅलेंज घेऊन ट्रॅक ठेऊ शकतेस.
Read More Books in 2020 with the Goodreads Reading Challenge!

किंवा मी हा जसा धागा काढलाय तसाच तुझा स्वतःचा ट्रॅकर धागा काढू शकतेस माबोवर.

जास्त पुस्तकं वाचण्यासाठी काही टिप्स
Super Readers Share Their Best Tips to Read More in 2020
===

मी यावर्षीदेखील ३० पुस्तकं वाचायचं ठरवलं आहे.
सुरवात Olive Again पुस्तकाने केली आहे. वाचून झालं की लिहीन याच्याबद्दल.

अॅमी
तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी हा प्रतिसाद. २०१९ च्या उन्हाळयात मी तुमचा हा धागा वाचायला सुरूवात क़ेली. इथली चैतन्य आणि तुमची चर्चा वाचुन बरीच वर्ष काही ना काही कारणाने बंद पडलेली माझी वाचनाची गाडी सुरू झाली.
बरीच नवीन पुस्तके कळाली.
गेल्या ६ महिन्यात मी उत्साहाने साधारण ३५-३६ पुस्तके वाचुन स्वतःलाच आश्चर्याचा धक्का दिला.
माझी वाचनाची गाडी परत सुरू केल्याबद्दल या धाग्यावरच्या सगळयांचे आभार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

रुनी, सहा महिन्यात ३५-३६ पुस्तकं :-O तू तर फारच तेझ् आहेस की!! _/\_

ललिता, रुनी तुम्ही दोघींनी वाचू आनंदे ग्रुपमधे २०२० वाचनाचा वैयक्तिक ट्रॅकर धागा काढावा असे परत सुचवते.

सामो, ती इमेज फारच मस्त आहे. भाग २ जेव्हा काढेन तेव्हा त्यात वापरणार ही Lol

कौतुक केल्याबद्दल सगळ्यांचे आभार Happy _/\_

डोमेस्टिक फिक्शन हा प्रकार मला शक्यतो आवडत नाही. पण Olive Again सारखं काहीतरी लिहलं असेल तर ते मी आनंदाने वाचू शकते Wink

सगळ्या म्हातार्याकोताऱ्यांच्या गोष्टी आहेत. अगदी सर्वसामान्य, कोणाच्याही आयुष्यात घडू शकतील अशा घटना. पण सगळ्यामध्ये एक वेगळाच अंडरकरंट आहे. जो वाचकांपर्यंत अगदी व्यवस्थीत पोचतो. खरं सांगायच तर मला OK फारसं आवडलं नव्हतं. पण हे दुसरं पुस्तक चांगलं आहे. यातदेखील तेरा लघुकथा आहेत.
• पहिल्या पुस्तकात भेटलेले Louise Larkin चे कुटुंब परत इथेदेखील भेटते, Helped या गोष्टीमधून. आणि
OMG! OMG!! OMG!!! Here is the story worth telling!!! वेगळं पुस्तक यायला हवं यांच्यावर.
• The Poet कथेत भेटणाऱ्या Andrea L'Rieux वरतीदेखील वेगळे पुस्तक लिहता येईल.
• Cleaning ही रोचक् गोष्ट आहे I don't know what to make of it....
• Motherless Child
• Exiles
या दोन्ही रोचक गोष्टी आहेत. Exilesमधे The Burgess Boys भेटले, ज्यांच्यावर आधीच वेगळे पुस्तक आलेले आहे.
• Friend कथेतल्या Isabelle चीदेखील वेगळी सांगण्यासारखी कथा आहे. ती बहुतेक Amy and Isabelle मधे सांगीतली असेल.
• The End of the Civil War Days वाचताना तर मी खुदुखुदू हसत होते Lol Lol

चांगले डोमेस्टिक फिक्शन वाचायचे असेल तर ही दोन्ही पुस्तकं नक्की वाचा असे सांगेन.

धन्यवाद रॉनी Happy
नाही 700mb साठी घरात फारशी जागा लागत नाही Wink

रुपॉ, ६ महिन्यांत ३०-३५ पुस्तकं?__/\__ ग्रेट!!

अ‍ॅमी, ट्रॅकर धागा काढण्याची कल्पना आवडली, पण मग त्या धाग्यावरच जास्त टाइमपास होईल Proud
त्यापेक्षा प्रत्येक पुस्तक वाचून झालं आणि आवडलं तर त्याबद्दल परिचयात्मक काहीतरी लिहीन, असं म्हणते आहे.

ललिता
या वेळी परत वाचन सुरू केले तेव्हा लक्षात आले की पुस्तक वाचन सुरू ठेवायचे असेल तर मला फिक्शन जास्त आणि नॉन फ़िक्शन कमी असा रेशो ठेवला पाहिजे. तर माझे वाचन असेच जोरात सुरू राहील अन्यथा परत गाडी बंद पडेल

ब्रेकिंग बॅड संपवून जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. त्यानंतर कोणतीही सिरीज बघावीशी वाटत नाहीये, ते void का काय म्हणतात तो आलाय बहुधा. तर आता, कोणीतरी ब्रेकिंग बॅड च्या आसपास जाणारी एखादी सिरीज सुचवा. बेटर कॉल सॉल सध्या राखून ठेवलीय त्यामुळे तो पर्याय बाद झाला आहे. माझ्याकडे नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि झी फाईव्ह चे सब्स्क्रिप्शन आहे.

६ की ७ नोव्हेंबरला ब्रेकींग बॅड बघून झाल्यानंतर कित्येक दिवस काहीम्हणजेकाही बघितल नव्हतं!
मग हळूहळू विकांताला एकेक हॅरी पॉटर सिनेमा पहायला चालू केलं. जे आता परवा संपले. दुसऱ्यांदाच बघितले मी सगळे सिनेमे. लय मजा आली Lol
छोटा ड्रॅको कसला भारी दिसतो :डोळ्यात बदाम:

आता तीस-बत्तीस वयात किती ड्रेन्ड दिसायला लागलाय Sad काय झालंय त्याला काळजी वाटू लागली...

बिकमिंग वाचून झालं. मिशेल ओबामाचा अती सामान्य, निम्न मध्यम वर्गीय पार्श्वभूमीपासून फर्स्ट लेडीपर्यंतचा प्रवास मस्त मांडलाय.

जबाबदार मुलगी, आयव्ही लिग स्कूलमध्ये शिकणारी black student, corporate lawyer असं भक्कम पैसा देणारं करीअर करणारी तरूणी, आत्मचिंतन करून स्वत:ला आवडतं त्यात झोकून देऊन, कमी पैसा मिळणारं करीअर निवडणे, मुलींना जाणीवपूर्वक वाढवणारी आई, पॉलिटिक्स/निवडणूका यापासून फटकून राहू पहाणारी पण बराकची झेप पाहून शेवटी नवऱ्याला सहकार्य देणारी, निवडणूकीकरीता campaigning करत देशभर फिरणारी बायको...असे तिच्या जीवनातले सगळेच कंगोरे अगदी at length वाचताना मजा येते. लहानपणीचा काळ थोडा succinct करता आला असता असं वाटलं पण तरी तिच्या जडणघडणीतला तो महत्वाचा भाग आहे.

मला तरी त्यांची निवडणूकांची धामधूम, त्याकरीता लागणारी मेहनत, sacrifices , प्रचंड tentions, लोकांच्या नजरा आणि criticism on the smallest things - ते झेलणं..यात सगळ्यात स्वत:चा जॉब, मुलींची काळजी हा सगळा प्रवास वाचायला अतिशय रोमांचकारी वाटला.

सर्वात मज्जा आली ती व्हाईट हाऊसमधले तिचे अनुभव वाचताना. white houseचे कधी कुठे न ऐकलेले वर्णन, white house मध्ये मुलींना वाढवताना त्यांना त्यांचं बालपण सर्वसामान्यांसारखं मिळावं म्हणून धडपड करणारी आई..तिला पडणारे प्रश्न - हे सगळं वाचताना. White house मध्ये प्ले डेट कश्या organize करायच्या असा तिला पडलेला प्रश्न amusing आहे.

बराक ओबामा जेव्हा प्रेसाडेंट झाले तेव्हा साशा आणि मलिया या अनुक्रमे ७ आणि १० वर्षांच्या होत्या. त्यांच्या शाळेतल्या कुठल्याश्या कार्यक्रमाला बरकासाहेब जाणार म्हणजे ३७० गाड्यांचा ताफा, शाळेच्या रूफवर तैनात होणारे snipers - आणि ते बघून वैतागलेली/embarrasse झालेली साशा बराकना विचारते, "dad, seriously??" smile
असे छोटे-मोठे अनुभव वाचताना मजा आणतात. तिचे फर्स्ट लेडी म्हणून राबवलेले उपक्रम पण वाचायला आवडले.

थोडं lengthy पण तरीही engaging पुस्तक आहे.

रोचक वाटतं आहे.वाचेन.
13 रिझन्स व्हाय पूर्ण पाहिली.टीनेजर्स वर असली तरी ड्रग आणि न्यूडीटी भरपूर आहे. काही भाग फार पटले नाहीत.सिरीज 3 चा शेवटचा तर अजिबातच नाही.सगळी मुलं मुली दिसायला गोड आहेत.ब्राईस वॉकर चं काम करणारा मुलगा क्युट आहे.मोन्टेगोमेरी अतिशय क्रश योग्य आहे.
यात सुरुवातीला एकमेकांना वाईट वागवणारे, कसेही वागणारे टिनएजर्स दुःखी प्रसंगानंतर एकत्र कसे येतात हे बघण्या सारखं आहे.

मी पण बिकमिंग वाचलं तेव्हा असंच वाटल. फक्त ओबामा दुसरी टर्मवर लिहिणं टाळलं आहे असं वाटतं.

मात्र ती स्वत: प्रेसिडेन्ट पदाच्या शर्यतीत कधीही उतरणार नाही हे स्पष्ठ लिहिलेलं आहे सो ले्ट सी Wink

साॅरी हा धागा पूर्ण वाचला नाही. शिर्षक वाचून आले. कृपया प्राईम वरील हाॅलीवूड चे बघण्या सारखे मुवीज सांगा. Comedy, romantic..
हॉलीवूड च्या मूवीज बद्दल जास्त काही माहिती नाही.. आणि action, sci fi प्रकार जास्त आवडत नाही.
धन्यवाद.

What if - chhan aahe
Julia Roberts chya baryach hits aahet
How to lose a guy ....
Catch me if you can

haunting of bly manor पाहून हॉररची भुक शमली नसेल तर to the lake ही रशियन सिरीज पाहू शकता. मला ही सिरीज फारच आवडली. बहुदा नॉन-इंग्रजी सिरीज जास्त पाहत नाहीत लोकं त्यामुळे बऱ्याच चांगल्या कलाकृती दुर्लक्षित राहतात.
https://www.netflix.com/title/81302258
https://www.imdb.com/title/tt9151230
बाहेर डिस्नी+ वर mulan नावाचा एक नंबर ऍक्शनपट आहे पण हा भारतात हॉटस्टारवर उपलब्ध नसल्याने टॉरेन्टवरून मिळवावा लागेल. मोठ्या स्क्रिनवर 4k hdr क्वालिटीमध्ये पाहायला फार मजा येते.
https://youtu.be/KK8FHdFluOQ

अ‍ॅमी
Black Leopard, Red Wolf खुपच ग्राफिक आहे असे वाटते.
निकेल बोय्झ कसे आहे? खुप ग्रफिक वर्णन आहे का?

निलिमा,

The End of the Civil War Days >> हे Olive Again पुस्तकातील एका प्रकरणाच नाव आहे.

Black Leopard and Red Wolf वाचलं नाही अजून.

Nickel Boys खूप ग्राफिक नाहीय.

Pages