इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण...
सव्वा चारशे पानाचं आहे.
>>>

हे पृष्ठसंख्येचे ओब्सेशन का आहे या धाग्यावर? Happy

मार्केझ वाचायचा असेल तर एकदम हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड वाचू नका. क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड आधी वाचा. ते तुम्हाला आवडणार्‍या जाडीचे आहे. ते आवडले तर मग हंड्रेड इयर्स वाचा.

जाई,

One Hundred Years of Solitude आणि Chronicles of Death Foretold दोन्ही पुस्तकं वाचायच्या यादीत आहेत पण अद्याप मी वाचली नाहीत.
===

चैतन्य,
१. बरीच वर्ष एखाद्या व्यक्तींसोबत राहुनदेखील ती व्यक्ती तुम्हाला कळेलच असे नाही (फॉलमधली पॉलची बायको) किंवा
आपला नवरा झोल आहे हे इंटयूटीवली/ अगदी नात्याच्या सुरवातीपासून माहीत असूनही डिक्लाईन मोडमधे जाणाऱ्या, आपल्यावरील प्रेमापोटीच त्याने असे केले असेल हे स्वतःला समजावत राहणार्या बाईसारखी असते मीरा.
पॅसिव्ह लोकं असतातच कि जगात, थ्रिलर पुस्तकांतदेखील ती येणारच, कथानकासाठी फार काही करत नसली तरी...
===

The Shining आणि क्युब्रिकच्या चित्रपटातील सिम्बॉलिझ्म एक्सप्लेन करणारा
http://www.collativelearning.com/the%20shining%20-%20chap%208.html हा ब्लॉग वाचतेय.

ही लिंक छान आहे, शायनिंग माझ्याकडे प्रिंट स्वरूपात आहे.
मजेशीर गोष्ट म्हणजे किंग काकांना शायनिंग चित्रपट आवडला नव्हता, त्यांनी क्यूब्रिक काकांना फार नावं ठेवली. किंग काकांना या सिनेमा मधील कलावंतांचे अभिनय सुद्धा आवडले नाहीत. ते म्हणाले की क्यूब्रिक यांना पुस्तकं नीट कळालंच नाही, बऱ्याच मुलाखती मधून त्यांनी हे म्हणून दाखवलं.

त्यामुळे किंग काकांना शायनिंग पुस्तकावर त्यांच्या मनाप्रमाणे टीव्ही सिरीज काढायची होती. पण तेव्हा क्यूब्रिक काकांकडे या पुस्तकाच्या ऍडप्टेशनचे अधिकार होते, क्यूब्रिक काका किंग काकांना म्हणाले, की तू माझ्या पिक्चरला नाव ठेवून राहिला, मग मी का म्हणून तुला टीव्ही सिरीज काढायची परवानगी देऊ? वाद झाले, तात्विक चर्चा झाली.

माझ्या पिक्चरला पब्लिक मध्ये शिव्या द्यायच्या नाहीत असं क्यूब्रिक काकांनी रीतसर किंग काकांकडून लिहून घेतलं. मगच टीव्ही ऍडप्टेशनचे अधिकार किंग काकांना दिले, यानंतर द शायनिंग टीव्ही सिरीज आली.

किंग काका हा वाद अजून काही विसरले नाहीत, काकांचं आऊटसायडर नावाचं पुस्तक गेल्या वर्षी आलं, त्या पुस्तकातलं पात्रं शायनिंगपेक्षा बरा सिनेमा म्हणून पाथ ऑफ ग्लोरी हा सिनेमा बघत असतं.

इथे या बद्दल अजून वाचता येईल

लहानपणी जेरी मॅकगॉयर चित्रपट बघितला होता, पण तेव्हा आवडला नव्हता, तीच ती रटाळ लव्हस्टोरी असं वाटलं होतं, एवढा काय हा सिनेमा गाजला? असा तेव्हा प्रश्न पडला होता.

काल रात्री हा चित्रपट टीव्हीवर परत बघितला, या चित्रपटातील एक सवांद Shut up. Just shut up. You had me at "hello." खूप गाजला होता, काही वेबसाईट्स याला बेस्ट डायलॉग एव्हर म्हणायचे, मला कळायचं नाही की, असा कसा एकच सवांद गाजला? आणि त्यात एवढं काय भारी आहे ? परत सिनेमा बघताना, कळालं की यातले सगळेच सवांद इतके मजेशीर, पाकातून काढल्यासारखे गोड, अप्रतिम आहेत. सगळेच सवांद प्रसिद्ध होऊ शकतात. या वेबसाईटवर सगळेच सवांद परत वाचले, खूप आवडले, काही सवांद इथे देत आहे.

1. Don't cry at the start of a date,
just cry at the end, like I do.

2. You know I don't do contracts,
but what you do have ls my word And it's stronger than oak.

3. In this age, optimism like that is a revolutionary act.

4. - Do you have to tell me everything?

- That's what intimacy is.

5.Maybe, love shouldn't be such hard work.

6. Single parents can't be frivolous.

7.Don't leave my little boy alone with your divorced women's group

8. Women are taught not to see each other as good people.

9. - I was trying to sleep with you.

- Well, it worked.

10. I'm not really a hugger, I can't let go.

An Anonymous Girl वाचलं. आवडलं!
Part 3 भारी सिसॉ आहे दोघी निवेदकामधला. मजा आली. मलातरी शेवटपर्यंत अंदाज करता आला नाही नक्की कोण वाईट आहे, काय होणार पुढे वगैरेबद्दल.
सुरवात स्लो आहे मात्र. मला वाटतं सुरवातीपासून एक धडा जेस निवेदिका, दुसरा धडा डॉक्टर शिल्ड निवेदिका असे करण्याऐवजी Part 1 पूर्ण जेस निवेदिका आणि 2 पूर्ण डॉक्टर शिल्ड निवेदिका असे केले असते तर अधिक चांगले झाले असते.
गुडरीड्सवर एका रिव्यूत हे वाचले
Their blockbuster debut, The Wife Between Us , is a soon to be feature film and this currently unreleased An Anonymous Girl is already in development for a television series by the same people that slayed HBO's
Sharp Objects .

> मजेशीर गोष्ट म्हणजे किंग काकांना शायनिंग चित्रपट आवडला नव्हता, ......... बऱ्याच मुलाखती मधून त्यांनी हे म्हणून दाखवलं. > हे माहित होतं. पण त्यापुढचा सगळा प्रकार माहित नव्हता.
कसला खडूस आहे क्युब्रिक :D. त्या वेन्डी आणि हलोरनलापण भरपूर त्रास दिला शूटिंगच्यावेळी. ४०,८५, १४५ वगैरे रिटेक करायला लावायचा Uhoh
===

जेरी मॅकग्वायरमधली प्रेमकथा सोडून बाकीचा भाग चांगला आहे.
कोवळा टॉम क्रूझ <3.
आणि बेस्ट डायलॉग एकच You complete me! (Batman 2 चित्रपटातला :D)

मी सहसागुप्तहेर/रहस्यकथा फारश्या वाचत नाही. मागे एकदा The shadow district by Arnaldur Indridason वाचले होते.

त्यानंतर एका मित्राला खालील इ-मेल पाठवली.

It is set in Iceland. There are 2 story arcs, one is an unsolved murder during second world war when American and British troops were stationed in Reykjavik. Another is a murder of a 90 year old man in present day Reykjavik.

I read a crime/thriller after dont know how many years. It is not greatest thriller I have read. Rather after I finished it, I thought "hell, I should have read something else". But the book is gripping. And it stuck me that it can be converted into a very earthy Indian story. Iceland got its independence in 1944, India became independent in 1947. The story can be converted into a tight screenplay on the background of world war 2, British navy presence in Mumbai, some powerful politicians and common people.

सहजच मनात विचार आला. क्लासिक म्हणून जी समजली जातात त्या किंवा फिलॉसॉफिकल फिक्शन पुस्तकांपैकी कोणती पुस्तकं खालीलपैकी कमीतकमी ३ क्रायटेरियात येतात?

१. स्त्रियांनी लिहली आहेत
२. मुख्य निवेदक स्त्री आहे
३. प्रेमकथा नाही
४. कथेतील स्त्रिया चुलमुलखेरीज इतर काही करताना दिसतायत

Gone with the Wind एकच आठवतंय.
===

भरपूर पुस्तकं लिहणारी, प्रसिद्ध असलेली आणि कदाचित क्लासिकमधे येऊ शकेल अशी बाई एकच अगाथा ख्रिस्ती आणि साहित्यप्रकार रहस्य, गुप्तहेर Lol

Ayn rand ची पुस्तके यात बसतात की
पर्ल बकचे गुड अर्थ
डोरिस लेसिंगची पुस्तके उदा द ग्रास इज सिंगिंग
आउट ऑफ आफ्रिका करेन ब्लिकसेन(जर आत्मचरित्रे चालत असतील तर) - नितांत सुंदर पुस्तक

> Ayn rand ची पुस्तके यात बसतात की > नाव?
Fountainhead बद्दल बोलत नसाल अशी आशा आहे
> आउट ऑफ आफ्रिका करेन ब्लिकसेन(जर आत्मचरित्रे चालत असतील तर) - नितांत सुंदर पुस्तक > क्लासिक किंवा फिलॉसॉफिकल फिक्शन

का फाउंटन हेड का नाही? Atlas shrugged घ्या मग. अर्थात या दोन्ही पुस्तकात इतर निवेदक आहेत.
गुड अर्थ क्लासिक्स आहे. त्या शेतकर्याची बायको प्रमुख पात्र आहे
To kill a mocking bird - लहान मुलगी निवेदक आहे
The bell jar by Sylvia Plath
जेन आयर सुद्धा बसेल या मापदंडात बहुतेक

अनेक नावाजलेली स्त्री लेखकांची पुस्तके या मापदंडात बसतील.

क्लासिक्सची तुमची काय व्याख्या आहे माहिती नाही. या धाग्यावरली पुस्तके जर क्लासिक मध्ये मोडत असतील तर मात्र माहिती नाही तुमच्या मापदंडात काय बसेल ते.

> क्लासिक्सची तुमची काय व्याख्या आहे माहिती नाही. या धाग्यावरली पुस्तके जर क्लासिक मध्ये मोडत असतील तर मात्र माहिती नाही तुमच्या मापदंडात काय बसेल ते. > क्लासिकची माझी स्वतःची 'खास वेगळी' अशी व्याख्या नाही. या धाग्यावरील पुस्तकं क्लासिक आहेत असे मी कुठेही म्हणले नाही.
रादर तुम्हीच सतत इथे येऊन क्लासिक, फिलॉसॉफिकल पुस्तकांबद्दल टिपं गाळून जाताय. The Stranger हेच कसे 'खरे' पुस्तक आहे, अरेरे कुंदेरा आणि ऑर्वेलला इथे कुठे गावकूसाबाहेरच्या उकिरडयावर आणला; आता त्यावर गोमुत्र टाकून पवित्र करून घ्यावं लागेल, One Hundred Years कडे लगेच जाऊ नका ; तुमच्या पहोचच्या बाहेर आहे ते... You were better than this ten years back. असो.
===

मी वरती लिहलेल्या ४ पैकी कमितकमी ३ क्रायटेरियात बसणारे क्लासिक, फिलॉसॉफिकल पुस्तक सांगा म्हणले तर तुम्हाला सगळ्यात आधी आयन रँड आठवावी हे विनोदी आहे. या धाग्यावरच्या पुस्तकातल्या बायका भरपूर बऱ्या आहेत ओ त्या फाउंटनहेडमधल्या डॉमिनिकपेक्षा Uhoh

> डोरिस लेसिंगची पुस्तके उदा द ग्रास इज सिंगिंग > Rating 3.8 (9,228) इतकी कमी वाचकसंख्या Sad

> पर्ल बकचे गुड अर्थ क्लासिक्स आहे. त्या शेतकर्याची बायको प्रमुख पात्र आहे
To kill a mocking bird - लहान मुलगी निवेदक आहे > वाचेन.

> The bell jar by Sylvia Plath > सेमीऑटोबायोग्राफी

> जेन आयर सुद्धा बसेल या मापदंडात बहुतेक > नाही

> अनेक नावाजलेली स्त्री लेखकांची पुस्तके या मापदंडात बसतील. > नावे देत रहा आठवेल तशी/ द्यावीशी वाटली तर.

डॅनियल(काकू) स्टील यांच्या बऱ्याच कादंबऱ्या स्त्री
प्रधान आहेत.मला मॅलिस आणि झोया आता आठवतायत.मॅलिस ही थोडी डिप्रेसिंग पण उत्कंठावर्धक कादंबरी आहे.त्यात नायिकेवर येणारी संकटं बघून आपल्यालाच 'आता पुरे देवा' होते.

<<< One Hundred Years कडे लगेच जाऊ नका ; तुमच्या पहोचच्या बाहेर आहे ते... >>> अछ्या, त्या सल्ल्यामागे हा अर्थ होता तर . असो..

एनिवेज 100 years of solitude वाचायला घेतलंय

एमीने मागील पानावर सांगितलेला रोज 10 पानांचा फॉर्म्युला कामी येतोय. Happy

<<< मूळ भाषा स्पॅनिश आहे, स्पेन देशाचे बरेच संदर्भ, नावं येतील.
त्यामुळे कदाचित कळायला/वाचायला जड जाईल.
पहिले काही चॅप्टर वाचून ठरवता येईल, पुढे वाचायचं की ते नाही>>> चैतन्य , अजून तरी असे काही आढळले नाहीये जितकं वाचलं आहे तितकं .

आले तरी मी स्पॅनिश भाषा शिकलेय त्यामुळे मजा येईल वाचायला Happy

रादर तुम्हीच सतत इथे येऊन क्लासिक, फिलॉसॉफिकल पुस्तकांबद्दल टिपं गाळून जाताय. The Stranger हेच कसे 'खरे' पुस्तक आहे, अरेरे कुंदेरा आणि ऑर्वेलला इथे कुठे गावकूसाबाहेरच्या उकिरडयावर आणला; आता त्यावर गोमुत्र टाकून पवित्र करून घ्यावं लागेल, One Hundred Years कडे लगेच जाऊ नका ; तुमच्या पहोचच्या बाहेर आहे ते... You were better than this ten years back. असो.
>>>>

बाकी सगळीकडे फटकळ प्रतिक्रिया देणार्‍या तुम्हाला स्वतःच्या धाग्यावर गुडीगुडी समर्थनार्थ प्रतिक्रिया हव्या आहेत हे पाहून अंमळ गंमत वाटली.

क्लासिक्सची एक अशी व्याख्या नाही. त्याबद्दल खूप वादविवाद आहेत. आउट ऑफ आफ्रिका मला क्लासिक वाटते. द बेल जार मीच नाही अनेकांना फिलॉसॉफिकल पिक्शन वाटते. म्हणूनच तुम्हाला विचारले तुमची व्याख्या काय.

स्ट्रेंजर इथे वाचून मला खरेच धक्का बसला होता.

कुंदेरा/ऑरवेलः जिद्दु नवीन होते व ते या पुस्तकांबद्दल चर्चा करायची आहे वा झाली आहे का याबद्दल विचारत होते. त्यांना वाचू आनंदे ग्रुपचा रस्ता दाखवला.

हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युडः चैतन्य यांनी विचारले या पुस्तकाबद्दल माहिती आहे का. म्हणून त्याबद्दल लिहिले. एखादे पुस्तक दुसर्‍याच्या लायकीचे आहे का नाही वगैरे विचार मी करत नाही. चैतन्य वा तुम्हाला मी वैयक्तिक ओळखतही नाही. त्यांनी लिहिलेल्या माहितीवरून (स्पेन वगैरे) त्यांना लेखकाबद्दल फारशी माहिती नाही असे दिसले. ४०० पानाचे पुस्तक वाचून लेखका/शैलीबाबत मनात कायमची अढी बसण्यापेक्षा त्या लेखकाची/शैलीतली सोपी लहान पुस्तकांपासून सुरुवात करणे ही सर्वसामान्य पद्धत आहे. स्टाइनबेक वाचायला मला त्याच्या ट्रॅवल्स वुइथ चार्ली व टॉर्टिया फ्लॅटने मदत झाली. एकदम ग्रेप्स ऑफ रॅथ घेतले तर ती शैली झेपत नव्हती. जेम्स जॉइस, तलस्तॉय हे अजूनही वाचता आलेले नाहीत. मला स्वतःला अनेक लेखक/पुस्तकांबद्दल इथल्या मेंबरांमुळे समजले. चैतन्य यांच्यामुळे बूकट्युबर्स बद्दल समजले.

प्रत्येकालाच प्रत्येक प्रकारचे साहित्य आवडेल हे शक्य नाही. एकानेच जगातली सर्व पुस्तके वाचणेही अशक्य आहे. वाचत आहात यातच आनंद आहे. मागे एकदा तुम्ही वाचन संकल्पाबद्दल लिहिले होते. तेव्हाही मी प्रामाणिकपणे तुमचे कौतुक केले होते असा संकल्प केल्याबद्दल.

गुडरिड्स व त्यावरचे रेटिंग वाचकसंख्या हे पुस्तकाच्या प्रतिचे (क्वालिटिचे) द्योतक नसावे. नदिन गॉर्डिनरच्या ज्युलीज पीपलला देखील ३.८ रेटींग आहे तिथे (हे अजून एक तुमच्या यादीत घालू शकता). डिसग्रेसला देखील ३.८च्या आसपास. दोन्ही पुस्तकांना ५०००च्या आसपास लोकांनी रेट केले आहे. याचा अर्थ खूप कमी लोकांनी हे पुस्तक वाचले आहे असा घेऊ शकता. किंवा ही पुस्तके वाचणार्‍या अनेकांनी गुडरिड्सवर रेट केले नाही असा लावू शकता. किंवा ही पुस्तके वाचणार्‍यांची कलाकृतीकडून असलेली अपेक्षा अधिक आहे वा सढळपणे ५ रेटिंग देणारे हे वाचक नाहीत असाही निश्कर्ष काढू शकता.

१. असम्ब्रोसो जाई ताई, पुस्तक वाचून झाल्यावर, त्याबद्दल नक्की सांगा.

@ॲमी
२. याबद्दल बरेच संशोधन करत होतो, पण तशी पुस्तकं मिळाली नाहीत. पण गुडरीड्सवर ही एक लिस्ट सापडली.

३. आय अडोर आत्या अगास्था. अँड देन देअर वेअर नन, माझं ऑल टाइम फेव्हरेट पुस्तकं आहे.

> बाकी सगळीकडे फटकळ प्रतिक्रिया देणार्या तुम्हाला स्वतःच्या धाग्यावर गुडीगुडी समर्थनार्थ प्रतिक्रिया हव्या आहेत हे पाहून अंमळ गंमत वाटली. > माझ्या धाग्यावर सगळ्यानी गुडीगुडी समर्थनार्थ प्रतिसाद द्यावेत असे मी कुठंही म्हणले नाही. पण आता परवाच मी वर काढलेल्या हर्ट आणि मेघना भुस्कुटे यांच्या धाग्यावरील तुमचे प्रतिसाद वाचून 'तुम्ही इथे सतत एवढी टिपं का गाळताय' हा प्रश्न पडला. उत्तर अपेक्षित नाही. दहा वर्षात माणूस बदलतो for better or worse. पण तुमच्या इथल्या प्रतिसादांनी तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं प्रमोट करताय असे काही वाटत नाही. असो. लिहित रहा.
===

> क्लासिक्सची एक अशी व्याख्या नाही. त्याबद्दल खूप वादविवाद आहेत. आउट ऑफ आफ्रिका मला क्लासिक वाटते. द बेल जार मीच नाही अनेकांना फिलॉसॉफिकल पिक्शन वाटते. म्हणूनच तुम्हाला विचारले तुमची व्याख्या काय. > सगळ्या जॉनरची डिफॉल्ट, सर्वसामान्य लोकांकडून मान्य केलेली व्याख्या मला मान्य आहे. Top 100 classic books गुगल केलं तर जी यादी येईल ती माझ्यासाठी पुरेशी आहे.

> स्ट्रेंजर इथे वाचून मला खरेच धक्का बसला होता. > ठीक.

> कुंदेरा/ऑरवेलः जिद्दु नवीन होते व ते या पुस्तकांबद्दल चर्चा करायची आहे वा झाली आहे का याबद्दल विचारत होते. त्यांना वाचू आनंदे ग्रुपचा रस्ता दाखवला.> तुम्ही मार्ग दाखवल्याने मीदेखील तो ग्रुप चाळून पाहिला. काही धागे वरदेखील काढले. कुंदेरा/ओरवेलसारख्या खास लेखकांवर चर्चेसाठी सेपरेट धागा मलातरी सापडला नाही. ऍनिमाल फार्मवर आहे धागा.

> हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युडः चैतन्य यांनी विचारले या पुस्तकाबद्दल माहिती आहे का. म्हणून त्याबद्दल लिहिले. एखादे पुस्तक दुसर्याच्या लायकीचे आहे का नाही वगैरे विचार मी करत नाही. चैतन्य वा तुम्हाला मी वैयक्तिक ओळखतही नाही. त्यांनी लिहिलेल्या माहितीवरून (स्पेन वगैरे) त्यांना लेखकाबद्दल फारशी माहिती नाही असे दिसले. ४०० पानाचे पुस्तक वाचून लेखका/शैलीबाबत मनात कायमची अढी बसण्यापेक्षा त्या लेखकाची/शैलीतली सोपी लहान पुस्तकांपासून सुरुवात करणे ही सर्वसामान्य पद्धत आहे. स्टाइनबेक वाचायला मला त्याच्या ट्रॅवल्स वुइथ चार्ली व टॉर्टिया फ्लॅटने मदत झाली. एकदम ग्रेप्स ऑफ रॅथ घेतले तर ती शैली झेपत नव्हती. जेम्स जॉइस, तलस्तॉय हे अजूनही वाचता आलेले नाहीत. मला स्वतःला अनेक लेखक/पुस्तकांबद्दल इथल्या मेंबरांमुळे समजले. चैतन्य यांच्यामुळे बूकट्युबर्स बद्दल समजले. > ठीक. मला तुमचा टोन जरा अढ्यातखोर वाटला.

> प्रत्येकालाच प्रत्येक प्रकारचे साहित्य आवडेल हे शक्य नाही. एकानेच जगातली सर्व पुस्तके वाचणेही अशक्य आहे. वाचत आहात यातच आनंद आहे. मागे एकदा तुम्ही वाचन संकल्पाबद्दल लिहिले होते. तेव्हाही मी प्रामाणिकपणे तुमचे कौतुक केले होते असा संकल्प केल्याबद्दल. > _/\_

> गुडरिड्स व त्यावरचे रेटिंग वाचकसंख्या हे पुस्तकाच्या प्रतिचे (क्वालिटिचे) द्योतक नसावे. नदिन गॉर्डिनरच्या ज्युलीज पीपलला देखील ३.८ रेटींग आहे तिथे (हे अजून एक तुमच्या यादीत घालू शकता). डिसग्रेसला देखील ३.८च्या आसपास. दोन्ही पुस्तकांना ५०००च्या आसपास लोकांनी रेट केले आहे. याचा अर्थ खूप कमी लोकांनी हे पुस्तक वाचले आहे असा घेऊ शकता. किंवा ही पुस्तके वाचणार्या अनेकांनी गुडरिड्सवर रेट केले नाही असा लावू शकता. किंवा ही पुस्तके वाचणार्यांची कलाकृतीकडून असलेली अपेक्षा अधिक आहे वा सढळपणे ५ रेटिंग देणारे हे वाचक नाहीत असाही निश्कर्ष काढू शकता. > मी शक्यतो गुडरीड्स वाचकसंख्या आणि रेटिंगवर विश्वास ठेवते. बाकीच्या सगळ्या क्लासिक्सना लाख+ लोकांनी रेट केलंय
Pride and Prejudice Rating 4.2 (25,33,946)
Jane Eyre Rating 4.1 (14,20,843)
Wuthering Heights Rating 3.8 (11,55,105)
Gone with the Wind 4.3 (9,86,154)

जाई,
पुस्तक कसे वाटले ते सांग वाचून झाले की Happy
===

चैतन्य,
२. ती यादी ठीक आहे. मी Top 100 classic books गुगल करून येणाऱ्या लिंक पहात होते. त्यातल्या स्त्रियानी लिहलेल्या किती याची चाळणी लावायची, मग पुढे जायचे. या दोन लिंक चांगल्या वाटल्या
https://thegreatestbooks.org/
https://www.penguin.co.uk/articles/2018/100-must-read-classic-books/
३. अगाथाआत्या भारी आहेच. तिचं मला सगळयात आवडलेलं पुस्तक The Murder of Roger Ackroyd.

१. आत्ताच, मोबाईलचा स्क्रीन गार्ड बदलला, कारण डार्क मॅटर वाचताना आधीच्या स्क्रीनला तडाच गेला. यातले ट्विस्ट स्क्रीन तोड आहेत, पुस्तकाला तोड नाही. हे पुस्तकं वाचताना तहान भूक काय तर स्वतःला विसरून जालं, या वर्षी वाचलेलं सर्वात भारी, भन्नाट, खत्राड पुस्तकं.

२. एक ट्विस्ट तर इतका भारी होता की, तो वाचल्यावर, मी असा आनंदाने धावत उड्या मारत, घर भर फिरलो, असंच धावताना पाठीला काहीतरी लागलं, तसा पटकन थांबलो, मागे वळून बघितलं, तेव्हा लक्षात आलं की, आईने मला उलथनी फेकून मारली होती.

३. कथानक इतकं वेगवान आहे की, जर चुकून एखादं पान वाचायचं राहून गेलं, तर पुढे काय होतं आहे हे कळणार सुद्धा नाही. माईंड फकरी ॲट इट्स फायनेस्ट.

४. हे पुस्तकं वाचताना ॲशटन कुचरच्या बटरफ्लाय इफेक्ट चित्रपटाची आठवण झाली. कारण या दोन्ही कथानकाची संकल्पना सारखीच आहे, पण डार्क मॅटर खूप वेगळं आहे.

५. लेखक ब्लेक क्रूच यांचा शब्दसंग्रह खूप आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा नवीन शब्दांचे अर्थ बघायला लागत होते. पहिल्यांदा काहीच कळत नाही, साधारण पहिले तीन चार चॅप्टर वाचताना काय सुरु आहे? याचा अंदाज करता येत नाही, मी तर फुल कन्फयुज झालो होतो, पण जेव्हा कथानक विकसित होतं आणि मेन प्लॉट ट्विस्ट येतो, त्यानंतर पुस्तकं खाली ठेवताच आलं नाही.

६. पुस्तकं वाचत रात्री झोपलो, सकाळी उठून परत हे पुस्तकं वाचत होतो, यावर दहा पार्टची चांगली सिरीज यायला हवी, सिनेमा आला तर कथानकाला न्याय देता येणार नाही.

मी क्लासिक्स फारसे वाचलेच नाहीयेत त्यामुळे ही चर्चा डोक्यावरून गेली. Atlas shrugged वाचलं आहेस का एमी? त्यातली नायिका लग्न संसार मध्ये interested नसते तिला फक्त रेलरोड बांधायचे असतात असं आठवतं आहे.
मला ठरवून मूल होऊ न देणाऱ्या नायिका खूप कमी आढळल्या आहेत, मला तो फायनल फ्रंटियर वाटतो (opting out of motherhood). Shonda च्या grays anatomy मध्ये ती एशियन डॉक्टर तशी दाखवली आहे व त्याबद्दल shonda ने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

चैतन्य,
एवढं आवडलं हे पुस्तक तुला! Lol

पुंबा,
वाचून झालं कि सांग कसं आहे ते. मी सायफाय जास्त वाचत नाही. पण तुम्हा दोघांनाही खूप आवडलं तर हे वाचेन.
===

सनव,
एटलास श्रग्ड वाचलं नाही.
तू Verity वाच आणि कसे वाटले सांग.

> मला ठरवून मूल होऊ न देणाऱ्या नायिका खूप कमी आढळल्या आहेत, मला तो फायनल फ्रंटियर वाटतो (opting out of motherhood). Shonda च्या grays anatomy मध्ये ती एशियन डॉक्टर तशी दाखवली आहे व त्याबद्दल shonda ने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. > खऱ्या आयुष्यात भेटतात असे काहीजण. मराठी आंजावरच अशा तीन जोड्या भेटल्या आहेत ज्यांनी ठरवून मूल जन्माला घातली नाहीत. त्यापैकी दोनमधे पुरुषाला मूल नको होतं आणि त्याने ती कंडिशन ठेऊन मगच लग्न केलं. तिसर्यांच माहित नाही.
लग्न संसार नको म्हणून बाय चॉईस सिंगल राहणाऱ्या मुलीदेखील भेटतात. किंवा आपल्या टर्म्स अँड कण्डिशन्स मधे बसणारं कोणी भेटलं तरच लग्न करेन नाहीतर एकटच राहिलेले बरे असा विचार असणारेदेखील भेटतात.े

वरती मी जी लिंक दिली आहे https://thegreatestbooks.org/ त्यापैकी मी वाचलेले क्लासिक्स:

15. Lolita by Vladimir Nabokov
17. Alice's Adventures in Wonderland by Lewis Carroll
18. Wuthering Heights by Emily Brontë
19. Pride and Prejudice by Jane Austen
20. The Catcher in the Rye by J. D. Salinger
24. Anna Karenina by Leo Tolstoy
29. Catch-22 by Joseph Heller (Not complete)
34. Jane Eyre by Charlotte Bronte
35. The Trial by Franz Kafka
42. The Stranger by Albert Camus
54. Midnight's Children by Salman Rushdie
62. Emma by Jane Austen
67. The Idiot by Fyodor Dostoyevsky
68. The Lord of the Rings by J. R. R. Tolkien ( Not complete)
92. Gone With the Wind by Margaret Mitchell
131. Rebecca by Daphne du Maurier
137. Atonement by Ian McEwan
160. The Complete Sherlock Holmes by Arthur Conan Doyle
180 . The Lion, The Witch and the Wardrobe by C. S. Lewis
195. The Picture of Dorian Gray by Oscar Wilde
200. Harry Potter And The Philosophers Stone by J. K. Rowling
231. The Fountainhead by Ayn Rand

Top 250 पैकी 22 किंवा Top 50 पैकी 10.
बादवे त्या यादीत
किंगकाका 173वर आहेत आणि रँड 231वर.

तिमाही संपत आली आहे आणि वर चैतन्यने विषयदेखील काढलाच आहे म्हणून गुडरीड्सची हि फेसबुक पोस्ट:
What’s the best book you’ve read so far this year?
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157263806387028&id=5342756...

मी आतापर्यंत वाचलेल्या 9 पुस्तकांपैकी Verity सगळयात भारी होतं.

१. डार्क मॅटर सायन्स फिक्शन असल्यामुळे मी पण साशंक होतो, पण मला काहीतरी वेगळं वाचायचं होतं. म्हणून वाचायला घेतलं. पहिले चार-पाच चॅप्टर काहीच कळत नाही, कारण लेखकाने आधी ट्विस्ट दिले मग ते सविस्तर सांगितले आहेत, कथानकाची मूळ संकल्पना लक्षात आली की मग वाचायला मजा येते.

२. मूळ संकल्पना इमॅजिन करणं अवघड आहे, कारण आपल्या अवती भवती असं काही घडत नाही, त्यामुळे सुद्धा कथानक किचकट वाटू शकतं. कथानक इतकं वेगवान आहे की, वर्णनं जास्त काही होतं नाही, काही पात्र व्यवस्थित विकसित होतं नाही बट इट्स ओके नो वरीज.

३. यातला पहिला व्हिलन चांगला वाटतो. व्हिलन जे करतो ते बरोबर आहे असं वाटतं, हिरो जे वागतोय ते चुकीचं आहे असं वाटतं. त्यामुळे वाचायला फार मजा येते.

४. यावर इन्सेप्शन चित्रपटाचा प्रभाव आहे असं ही वाटतं. पण याची इन्सेप्शनशी तुलना करणं योग्य वाटतं नाही

या वर्षी, ही पुस्तकं वाचून झाली, या क्रमाने आवडली
१. Dark matter
२. Verity
३. Silent patient
४. Before she knew him
५. The Cheerleaders
६. Close to the bone

ही पुस्तकं अर्धी वाचून झाली, चांगली वाटली, पण नंतर परत पूर्ण करेल
१. The Life we bury
२. Killer's mind

ही पुस्तकं अर्धी वाचून झाली, पण कंटाळा आला. आता नाय वाचणार
१. An Anonymous girl
२. The Rosie Project

काल रात्री आठ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत, नवीन पुस्तकं शोधत बसलो, एवढा विचार रिलेशनशिप मध्ये जाण्याआधी पण करत नाही, पण फायनली, आय लेट यू गो हे पुस्तकं फायनल केलं आहे.

Pages