इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी रेडी प्लेयर वन लगेच सोडून दिलं. व्हिडियो गेममधील मला काही कळत नाही पबजी फक्त ऐकून माहीत आहे. त्यामुळे मला भयंकर बोअर झालं.
अमेरिकन मॅरेज पण नाही आवडलं तेपण अर्धं सोडलं पण ते नंतर पूर्ण करेन.
द हेट यू गिव्ह वाचलं. काही काही पार्ट खूप आवडले काही नाही आवडले. YA वाचताना आपण ओल्ड आहोत असं वाटत राहातं ते वेगळं. पण लिसाचं कॅरेक्टर आवडलं.

प्रसिद्ध लेखक बनण्यासाठी धडपडणारा ४५ वर्षांचा नोआह सॉल्लोवे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मोंटॉक या समुद्रकाठच्या गावात राहणारी ३१ वर्षांची वेट्रेस ऍलिसन बेय्ली. एका उन्हाळी सुट्टीत नोआह मोंटॉकला येतो. आणि तो आणि ऍली एकमेकांच्या प्रेमात पडतात. अगदी वाईल्डली, पॅशनेटली वगैरे.
पण नोआह विवाहित, ४ मुलांचा बाप आहे. ऍलिसनदेखील विवाहित आहे. + दोघांनाही भूतकाळातले काही बॅगेज आहे...
तर या 'प्रकरण'चा दोघांच्या आयुष्यावर, त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्याची गोष्ट 'The Affair' ही मालिका.

पहिला सीझन अगदी जबरदस्त आहे. कोणाचातरी खून झाला आहे आणि चौकशीसाठी पोलिस नोआह आणि ऍलीला बोलावताय्त. आणि मग फ्लॅशबॅक (हे बघताना Big little lies ची आठवण होते). प्रत्येक भागात एकच घटना एकदा नोआह आणि दुसऱ्यांदा ऍलीच्या दृष्टिकोनातून दाखवली आहे. आपण स्वतःला, इतरांना, घडलेल्या घटनेला किती वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतो. सत्य काय असते, सत्य असे काही खरंच असतं का, कि सगळा आपापल्या मनाचा, दृष्टीचा खेळ? आपल्या आठवणी कशा टेंटेड असतात...

दुसऱ्या सिझनमधे नोआहची बायको हेलन आणि ऍलीचा नवरा कोल हेदेखील निवेदक म्हणून येतात. त्यामुळे अजून जास्त दृष्टीकोन, अजून जास्त गोंधळ. हा सिझनदेखील चांगला आहे फक्त एक ड्रॅमॅटिक सिन सोडून ;). याच्या अखेरीस तो मृत्यू/खून कसा झाला होता ते कळते.
अभिनय, दिग्दर्शन वगैरे सगळे भारी आहे. गोल्डन ग्लोब्ज मिळाले आहेत.फक्त टायटल सॉन्ग तेवढे मला आवडले नाही.

तिसरा सिझनमात्र गंडलाय. चौथा नुकताच चालू केला, पण फारशा अपेक्षा नाहीत.

एकंदर मत: पहिले दोन सीझन नक्की बघा.

कुणी नवीन पुस्तक सुचवता का रे? नवीन पुस्तक?
या वाचकाला.. नवीन पुस्तक सुचवाल का?
हा वाचक, कामावाचून, अंघोळीवाचून,
इमेल्स वाचून, व्हाट्सएप्प वाचून,
गुडरीड्स वर सदानकदा हिंडत आहे,
चार दिवसात वाचून होईल, असं नवीन पुस्तक ढूंढत आहे,
कुणी, नवीन पुस्तक सुचवता का रे?
नवीन पुस्तक?

हा हा Lol नवीन पुस्तक नाही सध्या कुठलेही. गेल्या शुक्रवारीदेखील
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157138646347028&id=5342756... इथे कोणी नवीन सुचवणी केली नाही.

मी The Nightingale वाचायला घेईन बहुतेक.

व्हेरिटीबद्दलच्या पोस्टला उत्तर (स्पॉइलर्स आहेत):

१. मी हे पुस्तक दोन दिवसात वाचून संपवलेलं त्यामुळे 'अर्ध्या पुस्तकानंतर कथानक पुढे सरकेना.' असे मलातरी वाटले नाही.
२. प्लॉट ट्विस्टचा अंदाज आला होता तुला? मलातर तो नवराच झोल असेल वाटत होतं. त्यामानाने हा शेवट फारच सरळधोपट वाटला.
३. सिनेमा किंवा सिरीज आली तर पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जादू करतील अशी अशा करूयात.

४. > यातले काही प्रसंग मोठ्या लोकांना सुद्धा वाचता येणार नाहीत असे प्रचंड भयानक, त्रासदायक असे आहेत. मला त्या प्रसंगा बद्दल नमूद पण करता येत नाही. हे प्रसंग वाचताना पुस्तक फेकून द्यावे असं वाटेल, पण लेखिकेला वाचकांची ही प्रतिक्रिया अपेक्षित असावी. >
प्रसंग भयानक, त्रासदायक का वाटले?
• तसे विचार करणारे, कृती करणारे पात्र स्त्री आहे म्हणून?
• लहान मुलं टार्गेट आहेत म्हणून?
• वरील दोन्हीचे कॉम्बिनेशन? (तसे असेल तर दोन्हीपैकी कोणता मुद्दा जास्त वरचढ होता?)

५. हम्म
६. मला वाटतं अशी पुस्तकं, व्हेरिटीसारखी पात्रं अजून जास्त प्रमाणात लिहली जावीत.

सनव,

रेडी प्लेयर वाचायच्या यादीत आहे पण अरे बापरे मलातर हे पबजी म्हणजे काय तेदेखील माहित नाही :-O

अमेरिकन मॅरेज मलादेखील ठीकच वाटलं होतं. आता परवाच If Beale Street Could Talk हे नाव माहित झालं. त्याचं कथानकपण सेमच वाटतंय.

The Hate देखील मला ठीक वाटलं होतं. ते कुटुंब फारच गुडीगुडी दाखवलं आहे. त्यामुळे जरा phony वाटतं :-|

१. वाईट विचार करणारे, कृती करणारे पात्र?<<<<
चांगले- वाईट विचार मनात येत जात राहतात, वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे एवढं आपल्या हातात आहे, त्यामुळे मी त्या पात्राला दोष देत नाही.
लहान मुलं टार्गेट आहेत म्हणून?<<<<
हो, मला ते फार भयंकर वाटलं, त्यात मी रात्री वाचत होतो, त्यामुळे अजून त्रासदायक होतं.
किंग काकांच्या मिस्टर मर्सिडीज मध्ये सुद्धा असा प्लॉट पॉईंट आहे, ज्यात लहान मुलाला लक्ष्य केलं जातं, ते वाचायला सुद्धा जड गेलं होतं.

२. मलातर तो नवराच झोल असेल वाटत होता<<<<
हो मला पण ते वाटत होतं , कथानकामध्ये जर तीनच मुख्य पात्र असतील आणि कथा एका बंगल्यातच घडत असेल तर पुढे काय होणार? ट्विस्ट काय असेल? किंवा शेवट काय होणार? याचा अंदाज करणं सोपं जातं, व्हेरिटीची केअर टेकर किंवा तिचं कोणी नातलग किंवा कोणी एक्स, यांच्या बद्दल अजून काही सांगता आलं असतं, तर कथानक अजून फुललं असतं, "अ गर्ल ऑन द ट्रेन", ज्यामध्ये पाच ते सहा मुख्य पात्र आहेत, त्यामुळे रहस्य अजून गडद होतं

३. मला वाटतं होतं जेरेमी म्हणजे नवऱ्यानेच ती डायरी लिहीली आहे, कारण डायरीध्ये व्हेरिटी जेरेमीची सारखी स्तुती करताना दाखवली आहे. मला वाटलं सुपर नॅचरल एलिमेंट पण असेल पण मग ते बाळबोध झालं असतं

४. सिनेमा तर नक्कीच येईल किंवा पाच एपिसोडची सिरीज सुद्धा होऊ शकते.

५. पुस्तकाच्या शेवटी, कॉलीन हुव्हरने अकनॉलेजमेंट मध्ये एकूण सदोतीस लोकांचे आभार मानले आहेत. त्यात कॅरोलाईन केपणस पण आहे, त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत

नेटफ्लिक्सच्या भांगेत kim convenience ची तुळस

दचकू नका . नेटफ्लिक्स म्हणजे मारधाड , हिंसा , सेक्स वगैरेची रेलचेल असा समज काही लोकांचा असतो . त्या समजाला छेद देणारी किम कनविनियन।नावाची कोरियन मालिका बघतेय.

या मालिकेत अप्पा , उन्मा (कोरियन भाषेत आई वडिलांना अनुक्रमे उन्मा , अप्पा म्हणतात ) , जेनेट (मुलगी) चँग (मुलगा) अस कोरियन चौकोनी कुटुंब आहे . मानवी स्वभावाचे या सगळ्यांचे असे काही खास पैलू आहेत . अप्पा टिपिकल पुरुषी स्वभाव असणारा , मुलावर काही कारणाने रागावून असणारा, जेनेटने आपल्या मागे स्टोर्सची धुरा सांभाळावी म्हणून कटकट करणारा , बायकोमुलांवर प्रेम असूनही काहीसा फटकळ , विक्षिप्त , अजब शिस्तबद्ध प्राणी आहे . या स्वभावामुळे त्याचे ग्राहकांबरोबर प्लस कुटुंबात अनेकदा खटके उडतात . बायकोमुलांनी कुटुंबप्रमुख म्हणून मला मान दिला पाहिजे ही त्याची अपेक्षा आहे.
उम्मा ही एक टिपिकल कुटुंबवत्सल गृहिणी आहे. मुलीने लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हावं , मुलाने मागचं सगळं विसरून परत कुटुंबात यावं ही तिची धडपड चालू आहे .
तर जेनेट ही एक स्वतंत्र बाण्याची , अमेरिकन जीवन पद्धतीत वाढलेली कोरियन मुलगी आहे. एकिकडे मुक्त जीवनपद्धती तर दुसरीकडे कोरियन पारंपरिक जीवनशैली यात समतोल साधताना तिची तारांबळ उडते. त्याची परिणीती अपप्पाबरोबरच्या वादात होत असते .
चँग भूतकाळातील काही चुकांमुळे घर सोडून गेलेला आहे . एका कार रेंटल स्टोरमध्ये नोकरीस असून चुका विसरायचा प्रयत्न करतोय .पण वडिलांच्या काहीश्या हट्टी आणि विक्षिप्त स्वभावामुळे घरी परतायला तयार नाही. सगळ्या वादाचे कारण अप्पा आहेत हे त्याचे ठाम मत आहे .

किम convenience ही या चौघांची कहाणी आहे . रोजच्या जगण्यातले हलके फुलके प्रसंग तसेच इश्यूज , त्याचवेळी आदर्शवाद की प्रॅक्टिकल अप्रोच या द्विधावस्थेत अडकलेले , संसारातील काही गहन प्रश्न याने ही मालिका पुढे जाते . टिपिकल कौटुंबिक वातावरण असूनही कुठेही बोर न होणं हा यूएसपी . मालिका बघताना जुन्या दूरदर्शन मालिकांची (उदाहरण :- वागळे की दुनिया ) आठवण होते.
नेटफ्लिक्स कुटुंबातील व्यक्तीसोबत पाहायचं असेल तर ही मालिका उत्तम पर्याय आहे .जरूर बघा

१. भांगेत तुळस Proud Proud
धन्यवाद जाई, अशा सिरीज सापडणं आता अवघड होतं चाललं आहे.

२. @अज्ञातवासी
मी ते तीन स्वीडिश सिनेमे बघितले आहेत, मग आता पुस्तक वाचणार नाही.

३. कॉल माय एजेंट नावाची फ्रेंच सिरीज बघतोय, सिनेमातले अक्टर्स आणि त्यांचे एजेंट यावर सिरीज आहे. लेखन सशक्त, विनोद नैसर्गिक, अभिनय उत्तम आहे, मजा येतेय, तीन एपिसोड बघतील, आवडले.

गेल्या शुक्रवारची गुडरीड्स 'या विकांताला काय वाचणार' पोस्ट:
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157157610742028&id=5342756...

कोणाकडे The Great Alone आणि The Orphan Train आहे का? मला मिळत नाहीय भरपूर शोधूनही.
आणि 11/22/63 कोणी वाचलंय का?

रोमान्स जॉन्रमधे रुची असल्यास व्हॅलेंटाइन आठ्वड्यानिमित्त आलेल्या ब्लॉगपोस्ट:
https://www.goodreads.com/blog/show/1506

मी नुकतंच One of Us is Lying वाचलं. ठीक आहे.

===
The Affair चा चौथा सीझन झाला बघून. नसता बघितला तरी चाललं असतं!

आणि गेल्या विकांताला तुंबाड, Searching आणि Die Hard बघितले. सगळेच बऱ्यापैकी आवडले.

१. 11/22/ 63पुस्तकावर हुलू वाल्यांनी सिरीज काढली होती, खूप भारी आहे, आवडली होती, मस्ट वॉच.
हे पुस्तक आठशे पन्नास पानाचं आहे, त्यामुळे या जन्मी त्याचं वाचन जमणार नाही.
कुठला डायहार्ड बघितला..

२. कॉल माय एजेंट नावाच्या फ्रेंच सिरीजचे तीनही सीजन बघितले, सिरीज छान आहे, आवडली. आता मी घरी दारी बोन्जोर, सावा, एंशांते असं म्हणत, फिरतोय. त्यामुळे शेजाऱ्यांनी बोलणं कमी केलंय, पण काही हरकत नाही.

३. द सायलेंट पेशंट वाचायला घेतलं आणि काय योगायोग!! न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर च्या हार्डकॉव्हर यादीत हे पुस्तक पहिल्याच क्रमांकावर आहे

Verity बद्दलची चर्चा मागील प्रतिसादपासून पुढे (स्पॉइलर्स आहेत):

१. Mr Mercedes आणि Verity या दोन्ही पुस्तकात ज्यांना लक्ष केलंय त्या दोन्ही मुलांत एक साम्य आहे. ती 'कधीच' सर्वसामान्य माणसासारखी आयुष्य जगणार नव्हती.

२. The Girl on the Train अर्ध्यापर्यंतच आवडलेलं.

३. हो मलापण वाटलं होत नवऱ्यानेच ती डायरी लिहीली असेल. "तुझ्या रूमला आणि वेरीटीच्या रुमलादेखील बाहेरून लॉक करून टाकू का?" विचारतो तेव्हातर "कसला क्रिपी आहे हा :-O"म्हणलं.

४. Let's wait and watch.

५. अकनॉलेजमेंट शक्यतो ओझरतीच वाचत असते मी. पण इथे पहिलंच नाव E.L. James च पाहिलं आणि मग पुढेदेखील वाचत गेले. Caroline Kepnisचे नाव पाहिले.

===
:-O ऑ तू Millennium सिरीज वाचली नाहीय??? पहिले पुस्तक वाच असे सुचवेन. आणि डॅनियल क्रेगचा सिनेमादेखील पहा. स्वीडिशचे सगलेजण कौतुक करतात पण मला अमेरिकन जास्त आवडला.

१. 11/22/63 मालिका आहे माझ्याकडे. पण आधी पुस्तक वाचून मग ती पहावी असा विचार करत होते. अबब ८५० पानं आणि किंगकाकांचे लेखन! जाऊदेत मग मालिकाच बघून घेते.

Die Hard 1 पाहिला.

३. Silent Patient शोधते

. कॉल माय एजेंट नावाच्या फ्रेंच सिरीजचे तीनही सीजन बघितले, सिरीज छान आहे, आवडली. आता मी घरी दारी बोन्जोर, सावा, एंशांते असं म्हणत, फिरतोय. त्यामुळे शेजाऱ्यांनी बोलणं कमी केलंय, पण काही हरकत नाही>>>>> Lol Lol

कॉल माय एजेंट बघणारे .

सध्या मार्जोरी लिननच The yearling वाचतेय . मराठीतील खूप वेळा वाचलेय .
आता इंग्रजीतील वाचतेय.
जुन्या काळातील इंग्लिश वाचून मजा येतेय
उदाहरण - give ला git वगैरे .

Searching बद्दल ऐकलंय । बघायचा आहे. नेटफ्लिक्सवर दिसत नाहीये. यू ट्यूबवर पण दिसत नाहीये .

१. ड्रॅगन टॅटूवालीचे पिक्चर आधी बघितले होते, म्हणून पुस्तकं वाचली नाहीत.

२. सर्चिंग ऍमेझॉन प्राईम वर आहे

३. गर्ल ऑन द ट्रेन पुस्तकं छान होतं, पण सिनेमाने भरपूर निराशा केली, पुस्तक वाचताना मला ट्विस्ट ओळखता आला नव्हता. पॉला हॉकिंग्सच दुसरं पुस्तकं "इंटू द वॉटर" मी दोन चॅप्टर वाचून सोडून दिलं, कारण त्या पुस्तकात बऱ्याच पात्रांच्या दृष्टिकोनातून कथा सांगितली गेली आहे, त्या मुळे वाचताना गोंधळ होतो, नीट कळत नाही

११/२२/६३ भयंकर बोअर व संथ आहे. मी थोडं वाचून सोडून दिलं होतं. फुल ऑफ अनावश्यक डिटेल्स. थीम ओके पण लय बोअर केलं किंग अंकलनी.
अमेरिकन मॅरेज संपवलं.

स्पॉयलर-

मला ती celestial आवडली व ती त्या मित्रासोबत राहावी हेच वाटत होतं त्यामुळे निदान शेवट मला आवडला.

The Silent Patient वाचलं. बऱ्यापैकी आवडलं. मला आवडतात त्या पुस्तकांच्या वेगापेक्षा संथ आहे. आणि शेवटच्या ट्विस्टचा आधी अंदाज करता आला होता.
यात सायकोलॉजीबद्दल जेकाही लिहलं आहे ते कितपत खरं असेल विचार करतेय...

@ चैतन्य
पुस्तक खूपच सुंदर आहे. मात्र शांत बसून वाचायला हवं.

अरे बाप रे..
मी शांत बसलो की, अगदी नकळत आडवा होतो..
पण हे पुस्तक वाचायचा प्रयत्न नक्की करेन

मी नुकतीच ‘द फॉल‘ ही आयरीश मालिका पाहून संपवली (नेफ्लिवर). सायको थ्रिलर टाईप आहे. बेलफास्टमध्ये दोन बायकांचे खून झाले आहेत आणि त्या केसेस सॉल्व करायला स्टेला गिब्सन (जिलीयन अँडरसन- एक्स फाईल्समधली डेना स्कली) लंडनहून बेलफास्टला आली आहे.
पॉल स्पेक्टर हा बिरिव्हमेंट कौन्सेलर आहे. त्याची बायको निक्युमध्ये नर्स आहे. त्यांना ऑलिव्हिया आणि लियम अशी दोन लहान मुलं आहेत. हळूहळू पॉलचं सिक्रेट लाईफ उलगडत जातं. आणि शेवटी काय होतं ये जानने के लिए देखिये ‘द फॉल‘.

१. द फॉल खूप भारी सिरीज होती, दोन सीजन बघितले होते, पहिला सीजन फारच दर्जेदार होता, पहिल्या सीजन मध्ये जवळपास सगळे सीन्स "मॅच कट" ने जोडले होते, त्यामुळे बघायला मजा येत होती. स्लो बर्न थ्रिलर आहे.

२. यातला एक सवांद ऐकताक्षणी पाठ झाला होता,
मॅन फक्स वूमन, सबजेक्ट मॅन, व्हर्ब् फक , ऑब्जेक्ट वूमन अँड दॅट्स ओके विद यू
वूमन फक्स मॅन, सब्जेक्ट वूमन, व्हर्ब् फक, ऑब्जेक्ट मॅन.. दॅट्स नॉट कम्फर्टेबल विथ यू?

३. पॉलला, या सिरीज मुळे, फिफ्टी शेडस ऑफ ग्रे मध्ये नायकाची भूमिका करायला मिळाली.

Pages