इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथं कृपया मायबोलीकरांनी त्याना आवडलेल्या इंग्रजी/अनुवादित लघुकथा संग्रहांच्या शिफारसी द्या

जिद्दु,

भारतीय इंग्रजी लेखकांची पुस्तकं चालणार असतील, तर Tales from Firozsha Baag (रोहिंटन मिस्त्री) - हे छान आहे.

जरा जुनं पुस्तक आहे; कथासंग्रह आहे; मात्र माझ्या मते त्याला लघुकथासंग्रह म्हणता येणार नाही.

@ललिता-प्रीति हो चालेल कोणतेही ... फक्त इंग्रजी/मराठी/हिंदीमध्ये हवे (तेवढ्याच भाषा कळतात म्हणून ) .. इतर कोणत्याही भारतीय भाषांमधील अनुवादित साहित्यपण आवडेल वाचायला .. एकदा शिफारशींची यादी बनली मग ऑर्डर देईल एकदम

जिद्दू,

मी ऍनिमेशन चित्रपट फारसे बघत नाही. जपानीज ऍनिमेशनबद्दल तर काहीही माहित नाही. तुम्ही जर वेगळा धागा काढून त्याबद्दल ओळख करून द्यायला चालू केली तर आवडेल वाचायला.

लघुकथा संग्रहदेखील फारसे वाचले नाहीत Sad

गुडरीड्स चॉईस अवॉर्ड्सचे विजेते जाहीर झाले आहे.

काल्पनिक: Still Me
रहस्य आणि थरार: The Outsider
Best of Best: The Hate You Give

संपूर्ण यादी इथे मिळेल
https://www.goodreads.com/choiceawards/best-books-2018

आणि निकालानंतरची लेखकांची प्रतिक्रिया इथे
https://www.goodreads.com/blog/show/1413-announcing-the-winners-of-the-2...

जिद्दु,
१. आय जस्ट अडोर "डेथ नोट " खूपच भारी आहे.. एका दिवसात मी पाच सहा एपिसोड बघायचो. मी तर त्याच ग्राफिक बुक पण घेणार होतो, पण महाग होतं म्हणून नाही घेतलं
२. "वन पंच मॅन " बघत होतो, विनोदी आहे, पण काहीच एपिसोड बघितले.
३. मग मी "इरेज्ड" बघितलं... टाईम ट्रॅव्हलवर आहे, कथानक मस्त आहे

ऍमेझॉन प्राईमवर " द मार्व्हलस मिसेस मेझल" चा दुसरा सीजन आला आहे, पहिला सीजन दोन दिवसात संपवला होता, खूपच भारी होता, दुसरा सीजन बघायला सुरुवात केली आहे.
कथानक वेगळं आहे, लेखन सुंदर आहे, जुन्या काळातली सिरीज असली तरी विनोदात नावीन्य आहे, बॅकग्राऊंडला फिफ्टीज अप्रतिम संगीत आहे, मस्त मस्ट वॉच

हो Happy बरोबर निघाला तुझा अंदाज.
पण तू एक नोटीस केलं का? The Outsider आणि Lethal White (आणि बहुतेक The Witch Elm देखील) या पुस्तकांना जितक्याजणांनी रेटिंग दिलं आहे त्यापेक्षा जास्तजणांनी मत दिलं आहे. पुढच्यावर्षी मत नोंदवून घेण्याआधी पुस्तकाला Read, rate करा असा क्रायटेरिया लावला तर चांगले होईल.

https://variety.com/2018/tv/news/ben-mendelsohn-hbo-series-stephen-king-...

===
बुक ऑन टोस्तबद्दल माहित नव्हतं.

===
यादी वाढतच चालली आहे! किती सिरीज आणि सिनेमे पाहायचे माणसाने Uhoh

१. मला माहित असलेले, भारतात फक्त दोनच बुकट्युबर्स आहेत, बुक्स ऑन टोस्ट आणि हेली , यूएस, कॅनडा मध्ये खूप आहेत, युट्युबवर हजारो व्हिडिओज बघितल्यावर मला हे परदेशी बुकट्युबर्स चांगले वाटले, चांगली पुस्तकं सुचवतात.
गॅबीरीड्स
द शेड्स ऑफ ऑरेंज
ब्रॅंडन द बुक अडिक्ट

२. गुडरीड्स अवॉर्ड्स बऱ्याच वेळा चांगली प्रसिद्धी मिळालेल्या पुस्तकाला मिळतो, ते पुस्तक उत्तम कलाकृती आहे का नाही हा प्रश्न उरतोच. बूकट्युबर्सची गुडरीड्सबद्दल हीच तक्रार आहे. पण ज्या पुस्तकांना नॉमिनेशन्स मिळतात ज्यामुळे नवीन चांगली पुस्तके कळतात, त्यामुळे चांगले पुस्तक शोधायचा वेळ कमी होतो.

३. किंग काकांचं सगळंच लेखन टीव्ही आणि सिनेमावर आलं आहे, द आऊटसायडर नंतर एलेव्हेशन नावाचं नवीन पुस्तक आलं सुद्धा.

या धाग्यावर नजर फिरवताना गेले काही दिवस मी इथे काम्युकाकांच्या outsider बद्दल बोलणे चालू आहे असेच समजत होतो. इथली इतर पुस्तके व औटसाईडर तसे फटकून वाटत होते, आत्ता उलगडले की हे तुमचे औटसाईडर किंग काकांचे आहे ते!

@चैतन्य, बुकट्युबर्स या नवीन जातभाईंची ओळख करून दिल्याबद्दल अनकोनेक धन्यवाद

भारतात सुटीवर निघालो आहे. दुबई मार्गे. प्रवासात वाचयला सेपिअन्स मागवले आहे. आणखी काही इंग्रजी नॉन फिक्शन?
येताना रा चिं ढेरेंची एकदोन पुस्तके मिळाली तर आणेन. नवी मराठी नॉन फिक्शनही सुचवाल ?
राहुल सांस्कृतायन यांचे व्होल्गा ते गंगा बहुदा आउट ऑफ प्रिंट आहे.

@ टवणे सर
हे तिघे फक्त रहस्य, भय, थरार या शैलीतील पुस्तके वाचतात, चांगली पुस्तके सुचवतात.. बाकी बुकट्युबर्स भरपूर आहेत, काही बुकट्यु त्यांच्या आवडीनुसार फक्त नॉन फिक्शन पुस्तकं वाचून परीक्षण देतात

@vijaykulkarni
१. रघुराम रंजन यांचं पुस्तक "आय डू व्हॉट आय डू" चांगलं वाटलं, मी क्रॉसवर्डस मध्ये वाचत होतो, पहिले तीन चार चॅप्टर्स वाचले, २०१३ ला भारतीय रुपयाची घसरण सुरु होती, आरबीआय मध्ये बिकट परिस्थिती होती, तेव्हा रघुराम रंजन आरबीआयचे संचालक झाले, त्यांनी रुपयाची घसरण थांबावी म्हणून काय केलं? ती परिस्थिती कशी हाताळली, हे छान सांगितलं आहे. पुस्तकाची भाषा सोपी आहे, अवघड टर्म्स व्यवस्थित समजतील अशा रीतीने सांगितल्या आहेत, नर्म विनोदी आहे, त्यामुळे कंटाळा येत नाही, एकंदरीत आरबीआयचे कामकाज, भारतीय बँक व्यवस्था, राष्ट्रीय स्तरावरील पॉलिसी मेकिंग याबद्दल पुष्कळ माहिती मिळाली.
२. "फ्रॉम वोल्गा टू गंगा" (इंग्रजी)
"फ्रॉम वोल्गा टू गंगा"(हिंदी)
स्टॉक मध्ये आहे

विकु, अतुल गवांदे यांचं. मॉर्टल म्हणून पुस्तक आहे. ते वाचा.
सिद्धार्थ मुखर्जी यांचं जीन अ‍ॅन इंटिमेट हिस्टरी वाचा.
मिशेल ओबामा यांचं बिकमिंग वाचा

हे सर्व संपलं की फ्लाइटमधे असतील नसतील ते सिनेमे पाहून परीक्षण लिहा परत आल्यावर

२. उत्तम कलाकृती कशाला म्हणायचं? नोबेल, बुकर, पुलित्झर मिळालेली? समीक्षकांनी वाखाणलेली? काळाच्या कसोटीवर टिकणारी?
गुडरीड्स अवॉर्ड्समधे उत्तम कलाकृती निवडून यावी अशी माझी अपेक्षा नाही. गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी 'सर्वसामान्य' लोकांनी कोणती पुस्तकं वाचली आणि त्यांना ती आवडली एवढं कळलं तरी पुरेसं आहे.

३. किंग काकांची पाचच पुस्तक वाचली आहेत The Shining, Dr Sleep आणि Mr Mercedes सिरीज. सहावे It अर्धवट वाचून सोडून दिलं. Dr Sleep आणि It चा अनुभव पाहता किंगच्या भयकथांच्या वाटेला परत जाईन असे वाटत नाही. याखेरीज Rita Hayworth and Shawshank Redemption नोवेला वाचली आहे.

Elevation हॉरर गटात विजेता आहे की! त्याबद्दलपण लोकं तक्रार करताहेत. ते हॉरर पुस्तकच नाही, मतदान चालू झालं तेव्हा ते अजून प्रकाशित झालंच नव्हतं वगैरे..

===
टवणे सर, तुमच्यामुळे कामुचं The Stranger वाचायला चालू केलं आहे. अर्ध वाचल्यावर काफ्का The Trial आठवला.ं

विकांताला Divergent सिनेमालिका बघितली. मजा आली. तिसरा चित्रपटमात्र गंडल्यासारखा वाटला. तिसऱ्या पुस्तकाबद्दलदेखील हेच मत झालं होतं का आता आठवत नाहीय....

टवणे सर, तुमच्यामुळे कामुचं The Stranger वाचायला चालू केलं आहे. अर्ध वाचल्यावर काफ्का The Trial आठवला
>>>
यु आर नॉट द फर्स्ट वन. वेलकम टू द क्लब ऑफ रिअल बूक्स Light 1

@अॅमी
उत्तम कलाकृती कशाला म्हणायचं?
१. काळाच्या कसोटीवर टिकणारी? हो.. मला तरी हा एक निकष योग्य वाटतो. ऑथर कॉनन डायल, अगाथा ख्रिस्ती, यांची पुस्तकं अजून वाचली जातात, त्यांच्यावर सिनेमे सुद्धा येत आहेत.
२. बुकर प्राईझ किंवा नॉमिनेशन मिळालेली काही पुस्तकं छान होती, व्हाईट टायगर, गॉड ऑफ स्माल थिंग्स वाचली आहेत, आवडली होती.
३. मला वाटतं एखादी कलाकृती आवडणं, हे प्रत्येकाच्या व्यक्त्तिमत्तावर अवलंबून आहे, ज्याला "फॉल्ट इन अवर स्टार्स" आवडलं त्याला "गॉन गर्ल" आवडेलच असं नाही. पण एखाद्याला जर ही दोन्ही पुस्तकं आवडली असेल तर असा मनुष्य भाग्यवान आहे, कारण त्या मनुष्यासाठी या दोन्ही उत्तम कलाकृती आहेत.
४. व्यक्ती तितक्या प्रकृती!! त्यामुळेच वेगवेगळे शैली/जॉनर आले.
एखाद्याला भय कथा वाचायला आवडत असतील आणि त्याने चुकून विनोदी कथेचे पुस्तकं वाचायला घेतलं, ते विनोदी पुस्तकं किती ही विनोदी असलं तरी तो मनुष्य त्या पुस्तकाला कदाचित नावं ठेवणार.
५. उत्तम का आनंददायक? हा प्रश्न उरतो.
उत्तम असलं तरी आनंददायक नसू शकतं आणि जे आनंददायक आहे ते कदाचित उत्तम नसू शकतं.
६. पण उत्तम टिकतं.. किती ही काळ झाला, त्यावर आघात झाले तरी ते टिकणारं, लोकं ती कलाकृती वाचणार, संत तुकारामांच्या पोथ्यांचे तर विसर्जन झालं होतं.

विकु, राहुल गांधी किंवा सोनिया गांधींनी काही पुस्तके लिहीली असतील तर तीहि वाचनीय होतील - लोक त्यांच्या बद्दल काहीच्या बाही बोलतात. खरे काय ते तुम्हाला त्या पुस्तकांत कळेल, मग आम्हाला सांगा!

२. व्हाईट टायगर, गॉड ऑफ स्माल थिंग्स वाचली आहेत, आवडली होती. > भारतीय लेखक वाचत नाही. खरंतर भारतीय वाचकांकडून नवीन शिफारसदेखील शक्यतो घेत नाही (आधीच ते पुस्तक वाचण्याच्या यादीत नसेल तर) कारण आवड जुळत नाही असा पूर्वानुभव आहे Wink

३. मला वाटतं एखादी कलाकृती आवडणं, हे प्रत्येकाच्या व्यक्त्तिमत्तावर अवलंबून आहे > सहमत.

Fault in Our Stars आणि My Sisters Keeper बद्दल काय मत आहे?

४. व्यक्ती तितक्या प्रकृती!! त्यामुळेच वेगवेगळे शैली/जॉनर आले. > बरोबर आहे
एखाद्याला भय कथा वाचायला आवडत असतील आणि त्याने चुकून विनोदी कथेचे पुस्तकं वाचायला घेतलं, ते विनोदी पुस्तकं किती ही विनोदी असलं तरी तो मनुष्य त्या पुस्तकाला कदाचित नावं ठेवणार. > खरंय. 'मला आवडलं नाही पण इतरांना आवडू शकते' म्हणून सोडून देता येणे फार अवघड असणार बहुतेक, त्यामुळे पुस्तकाला नावं ठेवायलाच हवीत Lol

५. उत्तम का आनंददायक? हा प्रश्न उरतो.
उत्तम असलं तरी आनंददायक नसू शकतं आणि जे आनंददायक आहे ते कदाचित उत्तम नसू शकतं. > आनंद ही एकच भावना झाली. मला वाटत नाही आनंददायक, Feel good कलाकृती काळाच्या कसोटीवर फारशा टिकतात किंवा समीक्षकांकडून नावाजल्या जातात.

भारतीय लेखक वाचत नाही...>> अरेरे वाईट वाटलं हो,
असो आवड आप आपली
पण भारतीय वंशाचे सलमान रश्दी, एम नाईट श्यामलन वगैरे तरी निदान आवडत असावीत?

गॉड ऑफ स्माल थिंग्स >> खूप आवडलेलं पुस्तक, मराठी अनुवादहि उत्तम
मराठीत भाषांतर झालेली उत्तम इंग्रजी पुस्तकं कृपया सुचवावी

एखादी पोस्ट चिर चिर किंवा पिर पिर करीत टाकलेली असेल तर त्याखाली नंद्या ४३ हे नाव हमखास का सापडावे बरे ?

> अरेरे वाईट वाटलं हो > वाईट वाटण्यासारखं काही नाही त्यात. कल्पनिक पुस्तकं वाचण्याचा मूळ उद्देश जर escapism असेल तर आपल्या आजूबाजूला, उघड्या डोळ्यांना जे दिसू शकेल तेच वाचण्यात काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय लेखकात कल्पनाशक्तीचा अभाव आहे असा माझा अंदाज आहे (जवळपास शून्य वाचन असल्याने खात्री नाही ;)) चूभूद्याघ्या.

> पण भारतीय वंशाचे सलमान रश्दी, एम नाईट श्यामलन वगैरे तरी निदान आवडत असावीत? > का? मी भारतीय आहे म्हणून भारतीय वंशाचे कोणीनाकोणीतरी आवडायलाच पाहिजे असेकाही कम्पलशन आहे का Wink

एनिवे मिडनाईट चिल्ड्रन खूप पूर्वी वाचलं तेव्हा ठीकच वाटलं. बहुतेक मला ते पुस्तक फारसं झेपलं नव्हतं. इथे परत वरचाच प्रश्न पडतो 'उत्तम कलाकृती कशाला म्हणायचं? मिडनाईटला बुकर मिळालेलं आहे, बहुतेक मॅन बुकरदेखील मिळालं आहे, समीक्षक नेहमी याचं कौतुक करतात, १०० सर्वोत्तम पुस्तक यादीत बर्याचदा समावेश होतो. पण गुडरीड्सवर फक्त ९२ हजार वाचकांनी याला रेटिंग दिलय. बर ठिकय तिकडचे गोरे वाचक भारतीयांचे पुस्तक वाचत नसतील समजू पण मग भारतातले लोक ते वाचतायत का? चर्चा होतेय का त्याच्याबद्दल?
कोणी वाचतच नसेल तर त्याला उत्तम पुस्तक का म्हणायचं? कि कोणीच वाचत नाही म्हणूनच ते उत्तम पुस्तक आहे Lol

सिक्सथ सेन्समात्र चांगला चित्रपट होता. मला वाटत भय/भूतपटांत मला खरोखरच आवडलेले द शायनिंग आणि सिक्सथ सेन्स हे दोनच चित्रपट असतील.

भारतीय लेखक आवडायलाच पाहिजे असं काही नाही म्हणा,
पण आपल्याकडे प्रतिभाशक्तीची काही कमी नाहीये अस मला म्हणायचंय
मी पण फँटसि जॉनरचा प्रचंड चाहता आहे, अगदी हॅन्स अँडरसन्सच्या लिटल मरमेड पासून तर आताच्या डॅन ब्राऊनच्या द वींची कोड पर्यंत, लॉर्ड ऑफ द रिंग्ज सारखी एपिक फँटसि तर अतिप्रिय.
पण आपल्या मातीतल लेखन वाचायची सुद्धा मजा काही औरच आहे,
अर्थात हा प्रत्येकाच्या जाणिवेचा प्रश्न आहे, त्यामुळे आवड बदलते
म्हणूनच उत्तम कलाकृती प्रत्येकाची वेगळीच असू शकते
मला तर द शायनिंग पण विशेष नाही वाटला .. Happy

प्रतिभा असणे आणि कल्पनाशक्ती असणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे वाटते.
आणि काल्पनिक म्हणजे Fiction म्हणायचं होतं Fantasy नाही.

===
एनिवे माबोवर रश्दी या शब्दाचा शोध घेतला तर https://www.maayboli.com/node/4408 हा धागा मिळाला. चर्चा रोचक आहे तिथली. खासकरून
> भारतातलं दारिद्र्य, जातियता, रुढी, अंधश्रध्दा याचं भडक वर्णन, बाहेरच्या वाचकांना आकर्षित करण्यासाठी वापरले जाते. > हा मुद्दा. मग यांना काय केवळ माझ्या पणजीची पैठणी, माझ्या काकीचं रेसिपी बुक, आमच्या घरातला चौरंग आणि आमची शिकणारी-आयटीत जाणारी- मॅनेजरच्या प्रेमात पडणारी गोडगुणी बाळं याबद्दलच बोलायचं आहे का Wink
एनिवे तो २००८ सालचा धागा आहे. स्लमडॉग वगैरे चर्चा त्याकाळातलीच होती बहुतेक... त्यामुळे जानदेव...

===
कारण जाणून घेण्याबाबत कोणी उत्सुकता दाखवली नाहीय तरीही भारतीय वाचकांकडून इंग्रजी पुस्तकांची शिफारस शक्यतो न घेण्यामागची कारणे नोंदवून ठेवते

१. ते शक्यतो क्लासिक सुचवतात - जी आधीच माहित असतात, काही वाचलेली असतात, काही वाचण्याच्या यादीत असतात, काही वाचणार नाहीच याची खात्री असते... बेसिकली या सुचवण्यात नवीन काही नसतं.
२. ते शक्यतो भारतीय लेखक सुचवतात - जे मी वाचत नाही, कारणे वर दिली आहेत.
३. अजूनेक तिसरा रोचक गट आहे जो खून-थरार-रहस्य वगैरेला नाकं मुरडत नाही पण त्यांची सुचवणी फारच जुनीपानी असते. म्हणजे या जॉन्रच्या गोल्डन एज मधले पण कधीच न ऐकलेले लेखक ते सुचवतात. त्यांना यांची नावं कुठून कळतात, पुस्तक कुठून मिळतात याची मला उत्सुकता आहे पण ती पुस्तक मी वाचणार नाहीच, कारण गुडरीड्सवर चार आकडी लोकांनीपण त्याला रेटिंग दिलेलं नसत Lol

अरे वा!
आम्ही तिकिटं बूक केली होती, पण ऐनवेळी टूरवर जावे लागल्याने तिकिटं वाया गेली, आणि आता भलत्याच थिएटर्स मध्ये सुरू आहे, जिथे जाणे म्हणजे एक दिव्य.
नेटफ्लिक्सवर बघतो आता.

BTW: पूढच्या महिन्यापासून नेटफलिक्स बंद करणार, फारसं पाहणं काही होत नाही, आणि शेअर करणारेही कुणी नाहीय आता.

हा हिंदी चित्रपटांचा धागा नसल्याने पोस्ट संपादीत.

गॉन गर्ल माझं आवडतं फिक्शन आहे. मला ते ओरिजिनल वाटत होतं, पण सत्यघटनेवरून प्रेरित आहे हे हल्लीच कळलं.
बऱ्याच दिवसात या जॉनरमध्ये वाचन झालं नाहीये. आता एमींच्या लिस्टमधून काहीतरी वाचनीय सापडेल.
अलीकडे वाचलेल्यापैकी - ट्रूली मॅडली गिल्टी भारी आहे. थर्टीन रिझन्स व्हाय पण आवडलं. ही दोन्ही पुस्तकं एक आई म्हणून फार अस्वस्थ करून गेली. बाकी जुन्या फेवरिटमध्ये लकिएस्ट गर्ल अलाईव्ह, वुमन ऑन द ट्रेन , हजबंडस सिक्रेट हे सर्वानी वाचलेच असतील. सेव्हन हजबंडस ऑफ इव्हलीन ह्युगो हे LGBT इश्यूज + old hollywood वर आहे. एकदा वाचू शकतो.
अजून एक नॉन फिक्शन वाचलं त्याचा आजउद्याकडे शेपरेट धागा लिहून रिव्ह्यू देईन.

Pages