इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. नेटफ्लिक्स सारखं नाहीये.. पण प्रयत्न करता येईल. एक स्वतंत्र ई-मेल आय डी काढून, कॉस्ट शेअर करून, तीन चार लोकं ऑडिबलचं एक अकाउंट शेअर करू शकतील. हो. पण एकच पुस्तक महिन्याला फ्री मिळेल आणि तेच चौघांना वाचावे लागेल.
आधी एका अकाउंटला किती मल्टीपल डिव्हायसेस सपोर्ट करते ऍप ते बघावे लागेल.

मानव,

बघितला का परत इन्सेप्शन!
मी पहिल्यांदा बघितला तेव्हा माझंमला असं वाटलं होतं कि मॅल एकटीच आत्महत्या करते तेव्हा बरोबर सांगत असते. कॉबचा दृष्टिकोन आणि सगळा चित्रपट हे एक स्वप्नच आहे. पण मग जालावर वेगवेगळ्या चर्चा वाचल्या, मायकल केनची मुलाखत वाचली आणि मग मत बदललं.
बादवे ते कॉब म्हणजे ख्वाब् चे इंग्रजी रूप आहे असे Imdb Trivia मधे वाचले Lol

ग्रीर हेंद्रीक्स आणि सारा पेककानेन या दोघींनी मिळून लिहिलेले The Wife Between Us वाचून झालं. वाचताना सतत देजावू वाटत राहतं कारण The Girl on the Train + Behind Closed Doors + थोडेसे Gone Girl असे साधारण कॉकटेल आहे. पण ट्विस्ट आणि टर्नस् चांगले जमलेत. खूप नाही पण बऱ्यापैकी आवडलं.

आजच Sometimes I Lie वाचायला चालू केलं आहे.

@मानव,
The long walk हे पुस्तक लेखकाच्या खऱ्या अनुभवांवर आधारित नाही हे आता बर्यापैकी निश्चित झाले आहे. त्यामुळेच the way back च्या निर्मात्यांनी पुस्तकाला वा लेखकाला क्रेडिट दिलेले नाही. Looking for Mr. smith नावाचे एक पुस्तक लॉंग वॉक मध्ये उल्लेख असलेल्या अमेरिकन स्मिथचा शोध घेण्याच्या प्रयत्नांवर आहे.

Operation finale बघितला . आईकमानच्या मोसादने केलेल्या धरपकडीवर आधारित आहे . बरा आहे . सर बेन किंजले आईकमानच्या भूमिकेत आहे .
>>
आइकमन च्या अपहरणावर द हाउस ऑन गॅरिबाल्डी स्ट्रीट नावाचा चित्रपट आला होता. त्यात मोसाद प्रमुक इली वॅलेक होता. साधारणच होर्ता टोरेण्ट वरून अत्यन्त फिकट प्रत मिळाली होती. त्यावर मराठीत पारध नावाचे भाषांतरीत पुस्तक आलेले आहे. त्यात थरार चांगला टिपला आहे.

हा लेकाचा इन्सेप्शन मला अजूनही कळालेला नाही. पूर्न इन्सेप्शन न कळालेले बरेच बुद्धिमान येरू या जगात असल्याचे पाहून बरे वाटले आणि धीर आला...

कामदेवबाबा Lol
एकदाच बघितला का इन्सेप्शन? परत एकदा बघा सबटायटल्स लावून. २०१० मधेच जर मी पाहिला असता तर काहीच कळला नसता याची खात्री आहे. पण आता या वयात, सबटायटल वाचत पाहिल्याने कळतोय बऱ्यापैकी.

===
अवांतर वगैरे काही नाही रे पुंबा. पण मला या पुस्तकाबद्दल काही माहित नाही.

===
My name is Amber Reynolds. There are three things you should know about me:
1. I’m in a coma.
2. My husband doesn’t love me any more.
3. Sometimes I lie.

अतिचशय आवडलं पुस्तक. फुलटू रोलर कोस्टर राईड. Kind Worth Killing ची आठवण झाली.
गुडरीड्स चॉईस अवार्डमधे यालाच मत देणारय आता.

चैतन्य, नक्की वाच हे!

टवणे सर, बरोबर आहे, लेखक स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो, पण तो त्याचा अनुभव नाहीच. मी विकीवर वाचले होते. Looking for Mr. Smith बद्दल माहित नव्हते.

१. इन्सेप्शन ना त्या एक्स गर्लफ्रेंड सारखा ए, परत बघितल्यावर.. मी गुंतत जातो...

२. अॅमी तुम्ही पुस्तकाची हमी दिली म्हणजे आमी वाचणारच ना.. Proud

ऑडिबल डॉट इन वर "समटाईम्स आय लाय" नाहीये पण ऑडिबल डॉट कॉम वर आहे. का? का? का?

Sometimes I Lie >>> फुलटू रोलर कोस्टर राईड >> +११११

स्पॉयलर ...
अॅमी तुम्हाला शेवटला ब्रेसलेट तिथे कसे आले ते लक्षात आलं का? मला कळालं नाही ते. तिला एम पी डी असते अस वाटतं पण क्लेर अस्तित्वात आहे ते ही जाणवतं

चैत्रगंधा,

कधी वाचलं तू पुस्तक? आणि कुठून मिळालं?
आपण स्पॉयलर वर चर्चा नंतर करू; चैतन्यच वाचून झालं की Happy

काल रात्री नेटफ्लिक्स वर बीबीसीची बॉडीगार्ड सिरीज पूर्ण बघितली, आवडली. या सिरीज कडून एवढ्या अपेक्षा नव्हत्या, पण खरंच चांगली सिरीज आहे. ट्विस्ट चांगले आहेत, विषय सुद्धा छान आहे, आय वॉज हॅप्पी. लोकशाही मध्ये, सर्वात महत्त्वाचं काय? राष्ट्रीय सुरक्षा का वैयक्तिक पातळीवर गोपनीयता? एडवर्ड स्नोडेन नंतर हा विषय चव्हाट्यावर आला. या विषयावर कोणीतरी धागा काढायला हवा.

<< संपादित>>

मी नुकतच अ‍ॅमेझॉन किंडलवर वाचलं. जबरी प्लॉट आहे एकदम. पण बाकी पुस्तक काय कमी आहे म्हणून लेखिकेने शेवटचा ट्विस्ट टाकला :वैतागलेली बाहुली : तो नसता तर वाचून झाल्यावर जीवाला शांती मिळाली असती जरा Proud

एकदाच बघितला का इन्सेप्शन? परत एकदा बघा सबटायटल्स लावून.
>>
ह्या: , सब टायटल लावून लई त्रेधा तिरपिट उडते. सब्टायटल वाचावेत तर दृष्याकडे दुर्लक्श होते आणि दृष्य बघावे तर टायटल वाचता येत नाहीत. यात पुन्हा स्टोरीचा फ्लो लक्षात ठेवा . पुन्हा काहीतरी कळीचा महत्वाचा डायलॉग असला किण्वा व्हिज्युअल असले ते मिस झाले की लिण्क लागत नाही. लै हाल जीवाचे. अन डायलॉगचे उच्चार कळत नाहीत. पुन्हा बोलीभाषेतले स्लँग डाय्लॉग असले की बोंबला. उदा: किन्डा, वान्ना . काही फ्रेजेसचे भयंकर आणि हास्यास्पद भाषांतर हा आणखी वेगळाच प्रकार..... असो..

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे कामदेवबाबा. मी आता गेल्या दीडेक वर्षापासूनच इंग्रजी चित्रपट पाहायला चालू केलं आहे. आणि बऱ्याचदा फक्त सबटायटलच वाचत असते, दृश्य नीटसे पाहिले जात नाही Lol

===
चैतन्य, पुस्तक वाचून झाले का नाही?

===
सलग दोन सायको-थरार पुस्तकं वाचल्याने आता मी Charlie and Chocolate Factory वाचतेय. मजेशीर आहे.

The Art of seducing Young, Virginal Girl : Guide for Elder Men (married to madwoman in attic and father of illegitimate child)

∆ म्हणजेच Jane Eyre या पुस्तकावर बनलेले तीन सिनेमे पाहिले.

===
१९४३ - जेन एयर ही दिसायला फार खास नसणारी प्लेन मुलगी आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी जोअन फौंटन तशी दिसणं शक्य नाही. पण यातला मिस्टर रोचस्टरमात्र एकदम भयानक आणि रिप्लसीव वाटला. तो तसाच असणे अपेक्षित आहे म्हणा. या दोघांचे एकत्र सीन पाहताना डॉम-सब वगैरे खूप जाणवत होते. एनिवे तर पुस्तकाचा एकंदर डार्क-गॉथिक टोन, अंडरकरन्ट ऑफ सेक्शुऍलिटी व्यवस्थित आला आहे चित्रपटात. सहज मिळाला तर बघायला हरकत नाही.
छोट्या जेनचा रोल करणारी मुलगी एमा वॉटसनसारखी दिसते. सहबालकलाकार म्हणून एलिझाबेथ टेलर आहे. आणि विकीवरून कळले की
Houseman later claimed Welles "conceived a violent, almost criminal passion" for Elizabeth Taylor on set. "He used to hang around her dressing room ogling her, at the age of eleven. He was frightening enough with grown women...!"

===
१९९६ - फार उजेडात केलेले चित्रण, रंगबिरंगी झाडं- हिरवळ, थॉर्नफिल्ड म्हणून घराचे जे इंटेरिअर दाखवले आहे ते. काहीतरी गंडलय या चित्रपटात त्यामुळे नाही बघितला तरी चालेल. पण यातले जेन आणि एडवर्ड दोघे बऱ्यापैकी प्लेन आहेत. आणि यातली छोटी जेनदेखील एमा वॉटसोनसारखी दिसते.

===
२०११ - तिन्ही चित्रपटांपैकी हा सगळ्यात चांगला आहे. डार्क, गॉथिक, सेक्शुअलिटी अगदी परफेक्ट. जेन आणि एडवर्ड म्हणून निवडलेले कलाकार योग्य वयाचे आहेत, जेन प्लेन दिसू शकेल अशी आहे, एडवर्डमात्र एकदम हँडसम आहे. तो जेव्हा विचारतो 'Do you think me handsome?' तेव्हा 'Yessss. Totally smitten!' न म्हणणाऱ्या मुलीने डोळे तपासून घ्यायला हवेत ;). एनिवे तर Jane Eyre बघायचंच असेल ते हा चित्रपट बघा.
याला वेशभूषेसाठी ऑस्कर नामांकन मिळाल होतं.
Although they estimated the setting was the late 1830s, they settled on four to five years later in 1843. Fukunaga commented that " the clothing style of the '30s was just awful. Every woman looked like a wedding cake." However, they decided to allow a few characters in older fashions to reflect that some would not have updated their style."

अजून वाचतोय.. फारच वाचन अंगावर पडलंय. कालच लायब्ररीतून फोन आला होता, "पुस्तकं परत दया हो" असे म्हणाले, त्या लायब्ररी मधली दोन पुस्तकं वाचायची आहेत, दुसऱ्या लायब्ररीतून चंद्रकांत आणलंय, त्यात तीन कादंबऱ्या आहेत..कसं होणार ए.. काय माहीत..

इथं जापनीज ऍनिमेटेड चित्रपटांचा चाहता आहे कोणी ? .. फार काळजाला भिडणारे सिनेमे असतात यांचे .. जसे कि स्पिरिटेड अवे (२००१) आणि द रेड टर्टल (२०१६)... विशेषतः टोकियो येथील स्टुडिओ घिब्ली फार दर्जेदार कलाकृती तयार करतात

इथं जापनीज ऍनिमेटेड चित्रपटांचा चाहता आहे कोणी ? >> मी बघते.. प्रचंड आवडतात ते सिनेमे.. नावाला अ‍ॅनिमी पण काय पावरफुल स्टोरीज आणि इमोशन्स असतात त्यात वाह..

@टीना तेच तर ... बरेच लोकांना मी ते सुचवतो तेव्हा त्यांच्या डोक्यात म्यांगा आणि शिनचॅन सारखे कार्टून्स येतात आणि ते चांगल्या चित्रपटांना मुकतात

बरेच लोकांना मी ते सुचवतो तेव्हा त्यांच्या डोक्यात म्यांगा आणि शिनचॅन सारखे कार्टून्स येतात आणि ते चांगल्या चित्रपटांना मुकतात>> हं..
मीपन मंगापन एन्जॉय करए आणि.. खुप सुंदर सुंदर मंगा सिरीज आहे जपानच्या..
तुम्ही त्यापन बघा..आवडतील तुम्हालापन..

Milk and honey - rupi karu.
Beautifully depressing and elegant.
अर्थात पूर्ण पुस्तक तसं depressing नाहीये, पण प्रेम, ते अपूर्ण राहणं, आणि त्यातून बाहेर येणं... आजच्या काळातल्या बोल्ड तरुणीच्या मनातून कागदावर उतरलं आहे, एखाद्या ठिकाणी पान पान भरून लिहिलंय तर बऱ्याच पानांवर केवळ 2 किंवा 4 ओळी आणि सोबत समर्पक रेखाटने.. आवडलंय

@टीना अरेरे म्हणजे मी पण त्यांच्यातच आलो शेवटी ... कॉलेजमध्ये एकदोन वेळा वाचलि होती पण एवढी काय आवडली नाहीत .. आता परत एकदा पाहतो ... बाकी रिक अँड मॉर्टी हि सिरीज पण भारी आहे पण काहीशी अनरेटेड आहे ..

Pages