इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पण मेरी चे डोळे बटाट्यासारखे आणि नजर दौंड मनमाड आहे. ते तुम्हाला विनोदी वाटून त्यात सौंदर्य दिसत असेल तर काय बोलणार. असते एखाद्याची सौंदर्यदृष्टी Proud
हे बघा.
https://images.app.goo.gl/PfSSmBs7HcnioX3e9

मी फॅनबॉय आहे ... दुसरं काही स्पष्टीकरण नसतय याला.. रेडिट वर माग कोन भारी यावर एक धागा होता... हिच्या बाजूने मी कडाकडा भांडायचो. मला वाटलं तुमीबी असाल म्हणून इचारलं Proud

अरेरे... सौंदर्य असे कोणाला पटवून देता येत नाही हो... हा गोल्डन रुल आहे. नाही तर त्याची एक जागतिक व्याख्या झाली असती की.
सौंदर्य बघणार्‍याच्या नजरेत, ऐकणार्‍याच्या कानात, फील करणार्‍याच्या स्पर्शात असते. सौंदर्याचा आस्वाद घ्यावा दुसर्‍याला पटवण्याच्या भानगडीत पडू नये.
सौंदर्य म्हणजे केक... मस्त डिझाईन केलेला, स्वादिष्ट आणि जीभेवर विरघळणारा... तो ऊगीच दुसर्‍याच्या तोंडात कोंबून 'सांग किती मस्त आहे' वदवण्याच्या भानगडीत पडू नये. आपण हवा तेवढा खावा ऊरलेला पुढच्यावेळे साठी झाकून सुरक्षित ठेऊन द्यावा. संपला की नवा केक शोधून घरी घेऊन यावा. बाय-अ‍ॅडमायर-ईट-रिपिट. Proud

हाब, you have made me extremely jealous! A huge fan of marvelous Mrs. Maisel! माझ्या आजूबाजूच्या अनेकांना या फॅन क्लबमध्ये ओढून घेण्यात यशस्वी झाले आहे. माबोवर या सिरीजचा धागा असायला हवा खरं तर!

ड्रागनटाटु, आमच्याकडे दिसंना. त्याचा हालीवुड नाव काय?
गेमोवर पाहिला, आवडला.
गॉडलेस - मालिका दिसते. सध्या मालिका पहाण्याचा संयमच उरला नाहीये. चांगल्या असल्या तरी. अगदी ते ब्रेकिंग बॅड, वरची ‘मेजल’ सुद्धा ३ भाग पाहुन संयम संपला व बंद केले पहाणे.
हायझेनबर्ग फोटो नाही का काढला? मस्त वाटतं आपले आवडते कलाकार दिसले की.

खरं सांगायचं तर फोटो काढायला सुचलं नाही. ईनमीन दीड दोन मिनिटांचा मामला. Flatiron building समोरच असल्याने सिनेमे आणि मालिकांची शूटिंग नेहमीच चालू असते. थांबून बघण्याची उत्सुकता सुद्धा नसते कारण बहूतेक वेळा त्यांची फक्त तयारीच चालू असते. दोन मिनिटांच्या सीन साठी चार तास आधी पासून तयारी करतात जेव्हा काहीच बघण्यासारखे नसते. पण ह्यावेळी नेमक्या त्या दोन मिनिटाच्या सीन शूटच्या वेळेलाच तिथे हजर होतो. अचानक रेचेलला बघून एकदम Awestruck झाल्यासारखे झाले आणि दुसरे काही सुचले नाही. Proud फोटोचे लक्षात येईपर्यंत सगळे लोक वॅन मध्ये जाऊन बसले सुद्धा.

> Beloved ला इथ रिव्हु दिलाय का कोणी. > Beloved, Toni Morrison, बिलव्हेड, बिलव्हड, टोनी मॉरिसन असे वेगवेगळे शोध घेऊन पाहिले. समीक्षा सापडली नाही पण काही ठिकाणी उल्लेख सापडले: कोणती पुस्तके वाचू? कोठे मिळतील? , मी वाचलेले पुस्तक आणि मी वाचलेले पुस्तक - २

> पुस्तक तर नाही, पण तुम्ही गॉडलेस नक्की बघा! > शोधते.

> ऑलिव्ह कित्तरेज पुस्तकं पण चांगलं असेल, या पुस्तकावरची सिरीज बघितली होती, ती चांगली आहे > नाव यादीत नोंदवल आहे.

Marvelous Mrs Maisel बद्दल भरपूर चांगलं ऐकलंय. मी शक्यतो चालू असलेल्या मालिका बघत नाही. पूर्ण संपल्या की मगच बिन्ज करायचं.
पण हायझेनबर्गला शूटिंग बघायला मिळालं हे भारी. ५०च्या दशकातल्या गाड्या, कपडे वगैरेवरून इतर पिरियड फिल्म, मालिका आठवल्या Outlander, Mildred Pierce, The Hours, आणि मग वेगवेगळी शतकं आठवली परत Outlander, Pride and Prejudice, Gone with the Wind, Sherlock Holmes. स्त्रियांचा कपडेपट कसला जबरदस्त बदलत गेलाय, पुरुषांचादेखील थोडाफार बदलला Wink

बाकी रेचल, मेरी एलिझाबेथ विनस्टेड चर्चा वाचून दोघींचे फोटो पाहिले. रेचल गोडगोडुली नाजूक आहे, सगळ्यांना आवडेल अशी. मेरीमात्र अपारंपारिक निवड वाटतेय, या अशा निवडीमागे बालपणीच्या क्रशशी साम्य असण्याची शक्यता असते असे माझे निरिक्षण आहे Wink
आणि हो दोघीही 'माझ्या टायपच्या' नाहीत :D.

> ड्रागनटाटु, आमच्याकडे दिसंना. त्याचा हालीवुड नाव काय? > The Girl with Dragon Tattoo असंच नाव आहे.

अ‍ॅमी,
Please note that I am a fan of Mrs. Midge Maisel not Rachel Brosnahan and there is a huge difference between the two.
मिसेस मेझल ची व्यक्तीरेखा सुंदर आहेच पण त्याचबरोबर तिचा ह्युमर, हुशारी, हजरजबाबीपणा, पॅशन, अपर वेस्ट साईडची स्टायलिश लाईफस्टाईल, नवर्‍याप्रती पहिले डीवोशन आणि नंतर रिबेल, मग प्रेमात पडणे, कनफ्यूज असणे ... वेगवेगळ्या कंगोर्‍यातून ती जशी दिसते तशी मला आवडते.

आणि दुसरीकडे Rachel Brosnahan हा फक्त एक चेहरा आहे, त्या पाठीमागच्या व्यक्तीबद्दल मला ईतर काहीच माहिती नाही. आजची Rachel Brosnahan मला आवडते किंवा आवडत नाही म्हणण्याईतकेही मला ती महत्वाची वाटत नाही. Proud

मिझेल चे दोन्ही सिझन पाहिले, आवडले. आता तिसऱ्या साठी वाट पहावी लागेल. रच्याकने, आपल्या तापसी पन्नू वर तिची छाप वाटली का? हिंदी वर्जनमध्ये तापसी शोभून दिसेल. Happy

हाब, अच्छा. पण यावरून काही प्रश्न पडले...

जेव्हा आपण सिनेमा-मालिका 'बघत' असतो तेव्हा लेखकाने लिहलेल्या व्यक्तिरेखेइतकच, ती साकारणाऱ्या अभिनेत्याचे महत्व असते ना? दिसणे, व्यक्तीमत्व, अभिनयक्षमता!
म्हणजे जेव्हा आपण मिजला पहिल्यादा पाहतो तेव्हा आपण कोणाला बघत असतो?
• मिजबद्दल आपल्याला थोडिफार माहिती असेल (मालिकेतच पार्श्वभूमी तयार केली असेल किंवा पुस्तक वाचले असेल) तर आपण आपल्या मनातल्या प्रतिमेत हा अभिनेता फिट बसतोय का विचार करतो. कधीकधी सुरवातीला तो फिट बसणार नाही, पण पुढे बघत जाऊ तसा आवडायला लागेल, नंतरनंतर तर त्याच्या जागी अजून इतर कोणी असणे कल्पनेबाहेर जाईल, सहन होणार नाही.
• जर मिजबद्दल आधी फारशी काही माहिती नसेल तर आपण कोणाला बघत असतो?
• मिजची भूमिका जर रेचलएवजी मेरी विनस्टेडने साकारली असती (चांगला अभिनय करून) तरी तुम्हाला मिज तेवढीच आवडली असती का जितकी आता आवडतेय?

मिराज नावाचा स्पॅनिश चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला-> कसला भारी आहे ...मस्त . पण मला एक प्रश्न पडला...ती नायिका दोन समान्तर आयुश्य जगत असते का?

फक्त नायिका नाही तर, नायिकेच्या आजूबाजूचे सर्व जण, म्हणजे त्या सिनेमातले सर्व जण,दुहेरी नाही तर त्या पेक्षा जास्त आयुष्य जगत असतात. अल्टरनेट रिऍलिटी दोन नाही तर खूप असू शकतात.

मिसेस मेझलचा पहिला सिझन मस्तच होता. दुसरा सिझन पहिल्याच्या मानाने कंटाळवाणा आणि ड्रॅग वाटला. तिसरा सिझन येणार असल्यास काय कंटेंट घेऊन येतात हे बघायला हवं.
मिज एकदम मस्त फीट झाली आहे त्या कॅरेक्टरमध्ये. तिचे कपडे, स्टाईल, अ‍ॅटिट्युड सगळंच. कुठेच नावं ठेवायला जागा नाही.

"डॉक्युमेंटरी नाऊ!" नावाची सिरीज पाहतोय. डॉक्युमेंटरी कलचर्ची चांगली पॅरोडी करतायेत. नेहमीच्या पठडीतल्या सिरीज पाहून बोअर झाल्याने यातील विनोद फारच रिफ्रेशिंग वाटले. विनोदाची स्टाइलबी ड्राय कोल्ड ब्रिटिश आहे. ओरिजनल डॉक्युमेंट्रीज पेक्षा ह्या पॅरोडी व्हर्जन धमाल आहेत पाहायला. काही एपिसोड हिट अँड मिस आहेत पण ओव्हरऑल मजा येतीय पाहायला. बिल हेडर, फ्रेड आर्मीसेन पासून मायकल किटन पर्यंत तगडी कास्ट आहे त्यामुळे ह्या लोकांना पाहताना दुसरं कोणी याना रिप्लेस करू शकेल असं वाटत नाही करायचं ठरलं तरी. हा थोडा वेगळा प्रकार असल्याने रेटिंग्स-रिव्युज ची संख्या कमी आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशी खात्री नाही देऊ शकत. काहींना क्लिशेही वाटू शकते पण दर्दी प्रेक्षकांना आवडेल कदाचित. भारतात पाहायची सोय नसल्याने जुगाड करावा लागेल पाहायला.

जेव्हा आपण सिनेमा-मालिका 'बघत' असतो तेव्हा लेखकाने लिहलेल्या व्यक्तिरेखेइतकच, ती साकारणाऱ्या अभिनेत्याचे महत्व असते ना? दिसणे, व्यक्तीमत्व, अभिनयक्षमता! म्हणजे जेव्हा आपण मिजला पहिल्यादा पाहतो तेव्हा आपण कोणाला बघत असतो? >> दिसताक्षणी चेहरा आवडला तरी त्याचा ईंपॅक्ट 'सुंदरा मनामध्ये भरली" असा होत नाही. माझ्यासाठी मनामध्ये भरायला सुंदरेने दिसण्यापेक्षा बरेच काही करणे जरूरी आहे Proud

• मिजबद्दल आपल्याला थोडिफार माहिती असेल (मालिकेतच पार्श्वभूमी तयार केली असेल किंवा पुस्तक वाचले असेल) तर आपण आपल्या मनातल्या प्रतिमेत हा अभिनेता फिट बसतोय का विचार करतो. कधीकधी सुरवातीला तो फिट बसणार नाही, पण पुढे बघत जाऊ तसा आवडायला लागेल, नंतरनंतर तर त्याच्या जागी अजून इतर कोणी असणे कल्पनेबाहेर जाईल, सहन होणार नाही. >> ही मालिका कादंबरीवर बेतलेली नाही तर १९५० च्या न्यूयॉर्कमधल्या कॉमेडी क्लब सर्कलमधल्या खर्‍या विनोदवीरांचा कथेतले पात्र म्हणून आधार घेतूभ्या केलेल्या एका फिक्शनल व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे. मी शक्यतो कादंबरीच्या लेखकाने/दिग्दर्शकाने ह्या अभिनेत्याला ह्या रोल मध्ये काय बघून घेतले हे कोडे ऊलगडते का बघतो. पहाताक्षणीच एखाद्याला आपल्या कल्पनेत बसला नाही म्हणून राईटऑफ केले असे होत नाही. म्हणजे लेखकाने/दिग्दर्शकाने केलेली कुठलीही निवड डोळे झाकून आवडून घेतो असे नाही.. तर जमलं/ नाही जमलं/ किती % जमलं हे ठरवायला वेळ घेतो एवढेच.

• जर मिजबद्दल आधी फारशी काही माहिती नसेल तर आपण कोणाला बघत असतो? > अगेन, माझ्यासाठी वेट अँड वॉच असते.

• मिजची भूमिका जर रेचलएवजी मेरी विनस्टेडने साकारली असती (चांगला अभिनय करून) तरी तुम्हाला मिज तेवढीच आवडली असती का जितकी आता आवडतेय? >> ही मानसिक कवायत फ्युटाईल आहे त्यामुळे असे विचार खरच डोक्यात येत नाही. Proud
१० क्लोवर्फिल्ड लेन मध्ये मेरी आवडली , फायनल डेस्टिनेशनमध्ये नव्हती आवडली. आधी आलेल्या फा.डे. ती आवडली नव्हती म्हणून १० क्लो.ले. ती दिसली तेव्हा हिला कशाला घेतले, ही आपल्याला आवडत नाही असा विचार डोक्यात आला नाही.

हिला कशाला घेतले >> मला असे होते Happy सँड्रा बुलॉकबद्दल असे वाटायचे पण एकदा निश्चय करुन हा विचार बाजुला ठेऊन सिनेमा पाहिला तिचा आणि मग आवडायला लागली.

जिद्दु, कुठे पहाता ते लिहीत जा बरे.

नेटफ्लिक्सच्या प्लॅनेट अर्थ, ब्ल्यु प्लॅनेट अशा प्राणी, जलचर, निसर्गावर बनवलेल्या मालिका मात्र अफलातुन, आहेत. कधी वेळ झाल्यास नक्की पहा. सलग पहायची गरज नसते हा एक फायदा.

बाहेरच्या ज्या मित्राने सजेस्ट केली होती त्याच्या नेफी/हुलु अकौंटवर व्हीपीएन च्या साहाय्याने पाहतो असल्या बऱ्याच सिरीज. तो पर्याय नसेल तर टोरेंट असतचं मदतीला.
अलर्ट - या सिरीज साठी मुळच्या बऱ्याच डॉक्युमेंट्रीज पाहिल्या नसल्या तरी त्यातील व्यक्ती, घटना आणि विविध कल्चरल रेफरन्स माहित असल्याने अडचण येत नाही. तसं नसेल तर ती पॅरोडी पाहण्यात काहीच मजा येणार नाही. भारतात बहुतेक त्यामुळेच हि सिरीज दाखवत नसतील आणि कमी प्रेक्षकवर्ग असायचं हे एक कारण असावं.

इथे कोणी stranger things चे फॅन नाहीत का?? तीनही सीजन जबरी भन्नाट आहेत. नेटफ्लिक्स वर आहेत.

इथे कोणी stranger things चे फॅन नाहीत का? >>> मी आहे! Proud पण आता तिसरा सीझन पाहूनपण बरेच दिवस झाल्याने तो विषय मागे पडला. मी तर डार्क ची पण फॅन आहे.

तूर्त एच्बीओ वर The Righteous Gemstones ही मालिका बघायला घेतली आहे. अजून पहिलाच भाग पाहिला असल्याने त्याबद्दल काही लिहित नाही. इतकंच सांगू शकते की पहिला भाग जाम इंटरेस्टिंग आहे.

स्ट्रेंजर थिंग्ज्स पहिले दोन सीझन चांगले होते. तिसर्‍यात पोरं टीनेजर झाली, आणि सगळी मजाच गेली असं वाटू लागलं. पहिले ३ -४ एपिसोड डफ्फर ब्रदर्सच्या ऐवजी कोणी केलेत असं फीलिंग येत होतं, मग सावरले थोडेफार. पण बळंच करायचं म्हणून केलंय वाटून मजा आली नाही.
लहानपणचे संदर्भ बघून नॉस्टॅल्जिक व्हायला इतके एपिसोड का बघावे? असं वाटून गेलं (सगळे एपिसोड बघितल्यावर). Happy

मी पहिल्या सीझननंतरच सोडून दिली स्त्रेंजर थिंग्ज..
त्यातली रॉबिन ऊमा थरमन आणि ईथन हॉकची मुलगी आहे. ऊमा थरमची मुलगी एवढी मोठी असेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.

अरे त्या रॉबिनला लेस्बिअन केलं तेव्हा मला एकदम टिकमार्क फिचरचा फील आला. ब्लॅक नर्ड गर्ल आणली आणि एलजीबीटीक्यूला रेप दिलं. वेड्याचा बाजार!

Akku,
13 Reasons Why पुस्तक वाचले आहे, मालिका पूर्ण संपली नसल्याने अजून पाहिली नाही.
===

> Submitted by हायझेनबर्ग on 26 August, 2019 - 22:23 > हम्म समजलं Happy
===

अमर,
तुम्ही मागील पानावर जी ब्लॉगलेखाची लिंक दिली आहे त्याच्यामुळे Carson McCullers ही लेखिका कळाली, तिची बरीच पुस्तकं डाउनलोड केली.
===

Chief Inspector Armand Gamache चे नावदेखील बरेच दिवस ऐकत होते, त्याची सगळी पुस्तकं डाऊनलोड केली.
===

याआधी Sharp Objects आणि The Act च्या एमी नामांकनाबद्दल लिहायचं राहून गेलं होतं.
Emmys: Nominated Series Inspired by Books

The Most Read Books on Goodreads in August
Where the Crawdads Sing अजूनही एक नंबरवर आहे. Educated आणि Becoming मी वाचणार नाही. Silent Patient आणि Harry Potter 1, Eleanor Oliphant, Normal People, Daisy Jones इ वाचून झाली आहेत.

म्हणजे सध्याची दोन पुस्तकं वाचून झाली की The Tattooist of Auschwitz कडे जावं लागणार बहुतेक.
देवा, काहीतरी हलकेफुलके शोधत असताना Its Kind of Funny Story वाटेत आलं आणि मग Beloved.आणि पुढे भविष्यात Auschwitz दिसतंय!!

धन्यवाद अॅमी जी. येथील सर्वांचे वाचन, मालिका बघणे हे पाहून द़िघ्मुड होतो मी. काय अफाट वाचन आहे तुम्हा सर्वांचे.

मर्डर हाउस वाचून झालं. दमलो, एकशे तेवीस चॅप्टर्स होते, साडे पाचशे पानाचं होतं. मी नेहमी साडे तीनशे ते चारशे पानाचं पुस्तकं वाचायला घेतो, पण या वेळेस काहीतरी वेगवान वाचायचं होतं, म्हणून मग हे पुस्तकं वाचायला घेतलं, सुरवातीचे चॅप्टर्स मस्त होते, म्हणून मग पूर्ण वाचलं.

यात कथानक वेगवान आहे, त्यात बरीच उपकथानकं आहेत, बरीच पात्र आहेत, बऱ्याच गोष्टी घडत राहतात, काही घटनात भूतकाळात घडतात, त्याचा भविष्यकाळाची सुद्धा संबंध आहे, प्रत्येक पात्राची बॅकस्टोरी आहे, पण एवढं सगळं वाचताना गोंधळ उडत होता, मग उत्तरार्धात सगळं सविस्तर सांगितलं आहे.

ट्विस्ट चांगले आहेत, काही भाग क्लिशे आहे त्यामुळे ट्विस्ट आधीच ओळखता येतात, शेवटी काही धक्कादायक ट्विस्ट पण आहेत, तिथे वाचायला मजा आली.

समुद्र किनाऱ्या भोवती मॅन्शन आहे, त्यालाच मर्डर हाउस म्हणतात तिथे बरेच खून झाले आहेत, त्यात एक टीपीकल सीरिअल किलर आहे, त्याला शोधणारे पोलीस, एक प्राईम सस्पेक्ट आहे, मग कोर्ट रूम ड्रॅमा, मग सीरिअल किलर एक नसून बरेच असणं, मग परत एकच सीरिअल किलर असणं, सिरीयल किलरचे नातेवाईक, त्याची मुले, बाप रे भंजाळलो, पण वेगवान लिहलं आहे, शेवटी कथानक सोपं होतं, तीनच सस्पेक्ट असतात पण मग चौथाचं किलर निघतो. तेव्हा मग मजा आली.

शेवटी कथा खूप घुमवली आहे, मला मधली पानं सोडून, शेवट वाचण्याचा मोह खूप वेळा होतं होता, त्यातच दोन्ही लेखकांचं यश आहे. सिडने शेल्डन यांच्या पुस्तकासारखं पण झिरो सेक्स कथानक आहे, वेगवान काही वाचावंसं वाटलं तर वाचावं

गेम ओव्हर नाही आवडला.

Stranger things चा तिसरा सीजन आधीच्या दोन सीजन इतका चांगला नाही पण तरीही चौथा सीजन लवकर येवो आणि हॉपर जित्ता असो .

Pages