इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्स वर In the tall grass पाहिला. कन्सेप्ट चांगली आहे आणि सादरीकरणसुद्धा. खूप जास्त भीतीदायक नाही वाटली (मलातरी Proud ). तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यातला तुम्ही कुठला निवडता त्यावर तुमचं काय होणार हे ठरतं अशी काहीशी थीम आहे. हॉरर एलिमेंट अर्थातच ते उंचच उंच गवत आहे. पॅट्रिक विल्सनचं काम मस्त. आणि त्यातल्या छोट्या मुलाचंही. अजून काही लिहीलं तर स्पॉयलर होईल म्हणून लिहीत नाही. पिक्चर एकदा पहायला चांगला आहे.

अज्ञातवासी,
सॉरीची गरज नव्हती. उलट मीच तुझे आभार मानायला हवेत, मी धागा नक्की कशासाठी काढला होता याची आठवण मलाच करून दिल्याबद्दल Proud
===

बब्बन,
हो फार आवडेल असाच आहे तो सिनेमा.
===

Angelica आणि पुंबा,
शिफारसबद्दल आभार. रोचक वाटताहेत दोन्ही.
===

चैतन्य,
२. आताच्या नावामुळे धागा नक्की कशासाठी आहे याबद्दल गोंधळ होतोय.ॲमीची हमी - छानए. सांगितलं ऍडमीनना बदल करून द्या म्हणून.
३. आणि ४. >पुस्तकांवर जास्त चर्चा व्हायला हवी, एखादं कोणी पुस्तकं वाचलं तर स्वतंत्र धागा त्या पुस्तकासाठी यायला हवा त्यावर चर्चा व्हायला हवी, पुस्तकांचे इतके जॉनर आहेत प्रत्येक जॉनरवर एक स्वतंत्र धागा यायला हवा. > पटतंय. पण कोणत्या भाषेतली आणि जॉनरमधली पुस्तकं? इंग्रजी-नवीनप्रकाशित-थराररहस्य वगैरे वाचणारे तू, मी आणि सनवअसे तिघेच आहोत असं मला वाटतंय. जाई, मॅगी आणि टीनादेखील असाव्यात. अजून कोण? सहा लोकं कायकाय करणार?

१. हो नाटकच आहे ते. मला मिळत नाहीय म्हणून वाचलं नाही Sad
२. > नैराश्य खूप छान रंगवलं आहे, पुस्तकं वाचून, असं एकदम लग्नच करू नये, जीव दयावा असं वाटलं होतं. छान ट्विस्ट पण आहेत, मुळात एका घरात घडणाऱ्या किंबहुना एका रात्रीत घडलेलं कथानक, त्यामुळे कथानकाला वेग आहे. > हो पण मला नैराश्याच ते कारणच आवडत नाही. जेव्हा नाटक आलं तेव्हा ग्राऊंडब्रेकिंग होतं बहुतेक. विकीवर हे छान लिहलंय
Christopher Bigsby asserts that this play stands as an opponent of the idea of a perfect American family and societal expectations as it "attacks the false optimism and myopic confidence of modern society". Albee takes a heavy-handed approach to the display of this contrast, making examples out of every character and their own expectations for the people around them. Societal norms of the 1950s consisted of a nuclear family, two parents and two (or more) children. This conception was picturesque in the idea that the father was the breadwinner, the mother was a housewife, and the children were well behaved.
३. ऑस्करच्या ज्या/जितक्या काही कॅटेगरी आहेत त्या सगळ्यात नामांकन मिळवणार्या केवळ दोन चित्रपटांपैकी एक आहे हा. दुसरा कोणता माहीत नाही.
===

rmd,
तुम्ही स्टीफन किंगच्या खूप चाहत्या आहात का? त्याची भरपूर पुस्तकं वाचली आहेत का? मला डॉक्टर स्लिप आणि इट वाचताना खूपखूप बोअर झालं पण एवढी ७०-८० पुस्तकं लिहणं म्हणजे काय खायचं काम नाही. तो कितपत रिपिटेटिव्ह होतो सांगू शकाल का?

पुस्तकांचे धागे कोणीही काढावेत, मी फुल्ल सपोर्ट देतो.
अनुवादित पुस्तके असा एक स्वतंत्र धागा यायला हवा.
हिंदी पुस्तके असा ही एक स्वतंत्र धागा येऊ शकतो.

ग्राफिक नोव्हेल पासून कवितांची पुस्तकं अशा कितीतरी जॉनरवर नवीन धागे यायला हवेत, ज्याला जे वाचायला आवडतं, त्याने त्या बद्दल लिहिलं की आपोआप त्यावर चर्चा घडते, धागे निघतात..

"भंगार पुस्तके" असा ही एक धागा असायला हवा, मी जे वाचलं ते भंगार वाटलं, वेळ वाया गेला, असं कोणीच इथे म्हणताना दिसत नाही.

पण कसं आहे ना, आपण सगळे असामान्य काहीतरी वाचायचं किंवा बघायचं आहे यातच अडकलो आहे, त्यामुळे सरळ साधं सोपं काही बघायचं राहून जातं

एखादया कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर, त्या बद्दल व्यक्त होताना आपण सगळे मागे पडतो. एखादी कलाकृती आवडली किंवा आवडली नाही यापेक्षा त्या कलाकृती मुळे माझ्या विचारांमध्ये फरक पडला का? याचा विचार होताना दिसत नाही.

दोन तासाचा सिनेमा बघितल्यावर किंवा चास पाच दिवस एखादं पुस्तकं वाचल्यावर हे भंगार आहे, हे चांगलं आहे, एवढंच होत. बरं का चांगलं आहे किंवा भंगार आहे, यावर लिहायला हवं.

आपण जर फक्त टाईमपास म्हणून काही वाचत किंवा बघत असू त्यापेक्षा असा दुसरा कुठलातरी टाईमपास शोधावा, जो स्वतःला माणूस म्हणून अधिक संवेदनशील करेल.

स्टीव्हन किंग ची प्रसिद्ध पुस्तकं पेट सीमेटरी, कॅरी, सालेम्स लॉट,निडफुल थिंग्स ,शायनिंग,ईट,12 पास्ट मिडनाईट चांगली आहेत.
शक्यतो हीच आधी वाचा.स्टीव्हन किंग अत्यंत पाल्हाळ लावतो अशी पुस्तकं बरीच आहेत(बॅग ऑफ बोन्स, टॉमीनॉकर्स ,ग्रीन माईल, डॉक्टर स्लीप वगैरे).प्रसिद्ध लेखक सुध्दा अत्यंत रटाळ पुस्तकं लिहितात.हॉरर वर मनापासून प्रेम नसेल तर अशी पुस्तकं आधी वाचून त्या लेखकाबद्दल तिडीक बसण्याची शक्यता जास्त.

अ‍ॅमी, मी किंग ची चाहती आहेच. पण त्याला 'नारायण धारप' कारणीभूत आहेत Proud धारप मी ऑलमोस्ट सगळे वाचले आहेत. पण त्यांची बरीच पुस्तकं किंगच्या पुस्तकांवर बेस्ड आहेत. हे समजल्यावर मी किंग वाचायला घेतले. अजून किंगची खूप पुस्तकं वाचली नाहीयेत पण. त्याच्या स्टोरीजवर असलेले पिक्चर्स पाहिले आहेत. काही चांगले आहेत काही नाहीत. त्यामुळे मी बहुधा १००% चाहती नाहीये Proud वर मी_अनु ने लिहीलंय ते एकदम परफेक्ट आहे. माझं तसंच मत आहे.
मी तरी किंगपेक्षा धारपांची सुपरडुपर फॅन आहे Happy

एखादया कलाकृतीचा आस्वाद घेतल्यावर, त्या बद्दल व्यक्त होताना आपण सगळे मागे पडतो. एखादी कलाकृती आवडली किंवा आवडली नाही यापेक्षा त्या कलाकृती मुळे माझ्या विचारांमध्ये फरक पडला का? याचा विचार होताना दिसत नाही. >>> हे एकदम पटलं. मला अजूनतरी हे साधलं नाहीये Sad

एल कमीनो चित्रपट नेटफ्लिक्सवर बघितला. छान आहे. अपेक्षा पूर्ण करतो, त्यामुळे आवडला. ब्रेकिंग बॅड ज्यांना आवडलं होतं, त्यांनी जरूर बघावा. कारण जेसीचं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर मिळतं.

विन्स ज़िलिअन यांचं कौतुक करावंसं वाटतं कारण, या चित्रपटात ठेहराव आहे. जो आता दिसत नाही, चित्रपटात कुठेच स्लो मो नाही, जड पार्श्वसंगीत नाही, सुपर फास्ट कट्स नाहीत, डायलॉगबाजी नाही मेलोड्रामा ही नाही. तरीही कथानकात नावीन्य आहे.

शॉक ट्रीटमेंट साठी सेक्स, हिंसा, असं काही नाही, यातले गँगस्टर शिव्याचं देत नाहीत, ब्रेकिंग बॅड मध्ये एखादं पात्र पुढे काय करणार आहे किंवा त्याच्या बरोबर काय होणार आहे हेच कळत नाही, मग हळूहळू गोष्टी उलगडत जातात, जे या चित्रपटात सुद्धा होतं.

प्रत्येक फ्रेम किंवा सिक्वेन्स हा विचार करून मांडला आहे, ते दिसून येतं, जेसी जरी पोलिसांपासून लपून पळून जात आहे, तरीही एकही चेस सिकव्हेन्स नाही. जेसीवर बरेच अत्याचार झाले आहेत, म्हणून तो "हो मला जगायचं परत एकदा.. " असं काहीतरी आरशासमोर येऊन ओरडत नाही.

डायलॉग्ज खूप कमी आहेत, "आता मी हे करणार, मग हे करणार, बस्स हा माझा प्लॅन आहे" असं कोणी सांगत फिरत नाही, त्यामुळे पुढे काय होणार? याचे फक्त अंदाज बांधले जातात ते अंदाज फोल सुद्धा ठरतात. हा माणूस गोळी मारेल किंवा मारणार नाही? मग त्याचं उत्तर संवादामधून बाहेर येतं, त्यामुळे एखादं पात्रं स्थिर करायला वेळ लागत नाही.

चित्रपटाला नॉमिनेशन नक्कीच मिळेल. लेखन नाहीतर दिग्दर्शनासाठी तर मिळेलच. स्किनी पिटला, नाहीतर जेसीला सुद्धा अभिनयासाठी नॉमिनेशन मिळेलच.

चैतन्य,
पुस्तक कोणतं वाचतोयस सध्या?

> "भंगार पुस्तके" असा ही एक धागा असायला हवा, मी जे वाचलं ते भंगार वाटलं, वेळ वाया गेला, असं कोणीच इथे म्हणताना दिसत नाही. > मी After -2 वाचतेय सध्या, wattpad सेन्सेशन. लय भंगार आहे. वेळ वायाच जातोय. पण सध्या महिनाअखेरपर्यंत इतर काही चांगलं (म्हणजे थराररहस्य!! :-P) वाचू शकेन वाटत नाही.
===

अनु,
Shining फार आवडलेल, Doctor Sleep बोअर झालं पण पूर्ण केलं, It तर अर्धवट वाचून सोडून दिलं- फार पाल्हाळ लावलीय. एकंदर किंगच्या भयकथांचा मी जरा धसकाच घेतलाय. हॉररवर फार प्रेम असे नाहीच. त्यापेक्षा Mr Mercedes तिन्ही पुस्तकं चांगली वाटलेली. Rita Hayworth and Shawshank Redemption पण मस्तय.
===

rmd,
हम्म धारप आणि किंग! नवीन धागा आलाय नुकताच Lol
The best Stephen King movies … ranked!
७०+ पुस्तकं, ५०+ चित्रपट/मालिका किंगची किंगडम लय मोठीय
The Best and Worst Stephen King Adaptations Ranked

डॉक्टर स्लीप मी शाइनिंग पार्ट 2 म्हणून विकत घेतलं पण पहिल्या 20 पानातच नाव सार्थ झालं.
कॅरी, थिनर आणि निडफुल थिंग्स नक्की वाचावी अशी पुस्तकं आहेत.कोणतेही घाबरवणारे चेहरे न आणता अंगात शिरशिरी आणणारी भीती.
(आणि माझ्या धाग्याची रिक्षा)
https://www.maayboli.com/node/58018

फार म्हणजे फार म्हणजे फारच भारी पुस्तकं वाचतोय, मार्क करून ठेवा माझे वर्ड्स. या पुस्तकावर चित्रपट येईल,

कथानक असं आहे की, सहा ड्रायव्हर लेस कार आहेत, त्यात सहा प्रवासी आहेत, तर या सहा ड्रायव्हर लेस गाड्या एक हॅकर हॅक करतो. म्हणजे तो हॅकर या गाड्या त्यातल्या प्रवाश्यांसकट पाहिजे तिथे पाहिजे तशा पळवतो.

त्याचा प्लॅन असतो की या सहा गाड्यांचा एकाच ठिकाणी एक्सिडेंट घडवून आणणे. पण मग का? तर हॅकर साधा सुधा नाही तर त्याच्याकडे लॉजिक पण आहे. तो म्हणतो,लोकं टेक्नॉलॉजीच्या अधीन होतं आहेत, हे किती धोकादायक हे लोकांना दाखवून देणे.

पण मग हॅकर ठरवतो की जाऊ दे.. आपण पब्लिक पोल घेऊ. या सहा गाड्यांपैकी कोणत्या एका गाडीला वाचवायचं हे पब्लिकला सोशल मीडियावर ठरवू देत. मग तो पब्लिकला या सहा प्रवाशांबद्दल त्यांच्या वैयक्तिक गोष्टी सांगू लागतो... इथे कथानक सुरू होतं

सगळ्यांनी हे पुस्तकं शोधून काढून, मग वाचावं, म्हणून मी या पुस्तकाचं नावं सांगणारं नाही.

The Passengers by John Marrs
Rating 4.2 (4,533)

When someone hacks into the systems of eight self-drive cars, their passengers are set on a fatal collision course.
The passengers are: a TV star, a pregnant young woman, a disabled war hero, an abused wife fleeing her husband, an illegal immigrant, a husband and wife - and parents of two - who are travelling in separate vehicles and a suicidal man. Now the public have to judge who should survive but are the passengers all that they first seem?

चांगली वाटतीय कथा!

येस्स हेच ते.
एवढ्या टेक्नॉलॉजी गरज आहे का? याचे परिणाम काय होतील? चांगला माणूस, वाईट माणूस यात फरक कसा करावा? अशा कित्येक गोष्टी मांडत कथानक सुपरफास्ट पुढे सरकतं, अर्ध वाचून झालं आहे, लवकरच पूर्ण करेल.

Romancing with Life - Autobiography of Dev Anand. एकदम भंगार. फुकट मिळाले तरी वाचू नका. खूप टुकार इग्लिश...

My Girlfriend is an Alien (China Drama) - कोण बघत का ? on youtube
- फुल टू टी पी आहे.....chinese language काय बोलतात काही कळत नाही तरीही मी बघते Chai Xiao Qi साठी . Lol Lol Lol
खाली english मध्ये translate केलेल आहे.

ॲमीसाठी- बिग लिटल लाईज

बाकीच्यांनी स्पॉयलर अलर्ट घ्या/

तर मी दुसरा सीझन लावला होता. त्यात Bonnie ब्लॅक दाखवलेली पाहून मला धक्काच बसला. पुस्तकात ती व्हाईट दाखवली आहे. आणि मग पुढे ती जे काही करते त्याचा संबंध तिच्या ब्लॅकनेसशी जोडला जाणार ना. मला रेसिस्ट वाटला तो प्रकार. सासूच्या भूमिकेत Meryl streep आहे मला कळलंच नव्हतं. अफाट आहे बाई ती. इतकं काम पाहिलंय तिचं पण त्या भूमिकेत अशी शिरली होती की मी ओळखलंच नाही.
सध्यातरी मी एक एपिसोड बघून सोडून दिलंय.

सनव,
पण तू पहिला सिझन न बघताच दुसरा का चालू केला? पहिला खूप चांगला आहे, दुसरा ठिकठिक आहे.
> आणि मग पुढे ती जे काही करते त्याचा संबंध तिच्या ब्लॅकनेसशी जोडला जाणार ना. मला रेसिस्ट वाटला तो प्रकार. > नाही. ती जे काही करते त्याचं कारण पुस्तकापेक्षा वेगळंच दाखवलं आहे (मला ते आवडलं नाही) आणि त्याचा रेसशी काही संबंध मला जाणवला नव्हता.
पण आता तू म्हणल्यावर Big Little Lies racism गुगल केलं. काही लेख दिसतायत. वाचून झाले की लिहते इथे.

संगीतासाठी ज्यांचा कान अन ज्यांना जाण आहे त्यांनी मोझार्ट इन द जंगल ही सिरीज बघावी. छान आहे. तीन चार वर्षांपूर्वी माझे दोन सीजन बघून पूर्ण झाले होते. कालच प्राईमवर तिसरा सीजन बघायला सुरुवात केली.

कथानक वेगळंच आहे, न्यूयॉर्क सिंफनी ऑर्केस्ट्रासाठी एक नवीन कंडक्टर येतो, मग तिथे जुना कंडक्टर काड्या करू लागतो, ऑर्केस्ट्रा मधले सगळे वादक त्यांचं जीवन, जगणं यात पॉलिटिक्स सुरु होतं. पण इथे सगळं नर्म विनोदी आहे. हे सगळं संगीताच्या अवतीभवती सुरु आहे. मला खरं तर संगीतात करियर करायचं होतं, पण शेजाऱ्यांनी पहाटेचा रियाज करू दिला नाही. आता मला चेलो शिकायचा आहे. पुण्यात चेलो शिकवणारं कोणी भेटलं, मिळालं, दिसलं, गवसलं, सापडलं नाही.

ज्यांना व्हीप्लॅश, वन्स, बिगिन अगेन, हे चित्रपट ज्यांना आवडले होते त्यांनीच फक्त त्यांनीच या सिरीजच्या वाटेला जावे.

पण तू पहिला सिझन न बघताच दुसरा का चालू केला? पहिला खूप चांगला आहे, दुसरा ठिकठिक आहे.
मी पुस्तक वाचलंय त्यामुळे म्हटलं दुसरा आधी बघू.

> आणि मग पुढे ती जे काही करते त्याचा संबंध तिच्या ब्लॅकनेसशी जोडला जाणार ना. मला रेसिस्ट वाटला तो प्रकार. > नाही. ती जे काही करते त्याचं कारण पुस्तकापेक्षा वेगळंच दाखवलं आहे (मला ते आवडलं नाही) आणि त्याचा रेसशी काही संबंध मला जाणवला नव्हता.
पण आता तू म्हणल्यावर Big Little Lies racism गुगल केलं. काही लेख दिसतायत. वाचून झाले की लिहते इथे.

ह्ह्म्म मला असं वाटलं की पुस्तकात ती व्हाईट होती तर इथे कशाला रेस बदलायची? शेवटी ती जे काही करते तो गुन्हाच असतो. मला गुन्हा वाटत नाही पण लीगल दृष्टीने गुन्हाच असतो ना. मग एक 'ब्लॅक' व्यक्ती तो गुन्हा करते असं दाखवून काय साधलं?

संगीतासाठी ज्यांचा कान अन ज्यांना जाण आहे त्यांनी मोझार्ट इन द जंगल ही सिरीज बघावी. छान आहे. तीन चार वर्षांपूर्वी माझे दोन सीजन बघून पूर्ण झाले होते. कालच प्राईमवर तिसरा सीजन बघायला सुरुवात केली.>>बघायला हवी. तू 'अमादीअस' बघितला आहे का? मोझ्झार्त वरती आहे. छान आहे.

> मी पुस्तक वाचलंय त्यामुळे म्हटलं दुसरा आधी बघू. > खरंतर दुसरा बघितला नाही तरी चालेल. पण पहिला बघ.

> ह्ह्म्म मला असं वाटलं की पुस्तकात ती व्हाईट होती तर इथे कशाला रेस बदलायची? > 'सगळा व्हाईट उच्चवर्गातल्या लोकांचा मामला' असा आरोप होऊ नये म्हणून??

> शेवटी ती जे काही करते तो गुन्हाच असतो. मला गुन्हा वाटत नाही पण लीगल दृष्टीने गुन्हाच असतो ना. > नाही. पुस्तकातदेखील त्याला कायद्याने गुन्हा समजत नाहीत.
Bonnie did not have to do jail time. She was found guilty of involuntary manslaughter by an unlawful and dangerous act and sentenced to two hundred hours of community service.

> मग एक 'ब्लॅक' व्यक्ती तो गुन्हा करते असं दाखवून काय साधलं? > गुन्हा करणारी व्हाईट व्यक्तीदेखील आहे कि मालिकेत. मी वरवर जेवढं वाचलं त्यावरून सिझन २ रेसिस्ट नसून रेसब्लाईंड झाला आहे. स्पॉइलर आहेत त्यामुळे मालिका बघून झाली कि वाच Big Little Lies: Why Bonnie’s Big Moment Was Both Wrenching and Disappointing

चैतन्य,
बापरे फारच पटपट आणि भरपूर मालिका बघत असता तुम्ही लोक! माझं मालिका, चित्रपट बघणं एवढं होत नाही. फक्त विकांताला ७-८ तास एवढच मीडिया कन्झम्पशन आहे माझं. कधीकधी तेपण करत नाही. आणि सहाएक महिन्यातून एकदा मोठ्या मालिकेचं बिन्ज.

द पॅसेंजर झालं वाचून.. असं जेनेरिक नाव का देऊन राहिले काय माहित.

दोन व्यक्तीं मधील जास्त महत्त्वाचा व्यक्तीं कोण? हे कसं ठरवणार? एखाद्यावेळी या दोन व्यक्तीं मधील एकाच व्यक्तीचे जीव वाचवायचे असतील तर कोणाला प्राधान्य देणार? त्यासाठी काय मापदंड लावणार? आर्थिक परिस्थिती? शैक्षिणक स्थिती? समाजातील स्थान? वय? का त्याचा भूतकाळ? का त्याचा भविष्यकाळ? का आणखी काही? आणीबाणीच्या वेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती पेक्षा चांगली आहे, हे कसं ठरवणार? या पुस्तकात हाच प्रश्न मांडला आहे.

पुस्तकं फक्त सुपर फास्ट थ्रिलर न राहता, आजच्या समजावर भाष्य करतं, पण यावेळी हे बरोबर ते चूक असं काही करतं नाही. हे असं घडतय किंवा घडेल आता तुम्ही काय करणार? असा प्रश्न हे पुस्तकं विचारतं.

कथानकाचा मुख्य कॉन्फ्लिक्ट संपल्यानंतर पुस्तकं थांबत नाही, तर ते त्या पुढे जातं. बऱ्याच वेळा व्हीलन वेडसर आहे, तो काहीही करू शकतो एवढ्यावरच कलाकृती थांबते. इथे तसे होतं नाही. खलनायकाचा विस्तार मोठा आहे, पुस्तकं वाचताना त्याबद्दल आपुलकी सुद्धा वाटू शकते आणि इथेच लेखन खोलवर रुजतं.

जेव्हा वाटतं कथानक संपेल तेव्हाच कथानक कलाटणी घेतं, त्यात पूर्णपणे गुंतून गेलो होतो, म्हणजे मी चिरोटे तळत होतो, ते असे मस्त करपले, ते करपलेले कधी पोटात गेले ते पण कळलं नाही. थोडक्यात काय तर हे पुस्तक वाचताना घरातलं शिळं पाक, करपलेलं सगळं पटकन खाऊन संपवता येईल

धन्यवाद लंपन. अमादीअस चित्रपट अजून बघितला नाही, पण मी नक्की बघेन.

ॲमी,
मला वाटतं, कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा वेग या खालील गोष्टींवर अवलंबून आहे.
आपली मानसिक स्थिती
आपल्या आजूबाजूचं वातावरण
कलाकृतीची शैली
घरात लाईट नसणे

थ्रिलर शैलीतली पुस्तके वाचकाने एकाच दिवसात वाचून पूर्ण करावीत अशी असतात. पण आता जर खलील जिब्रानच्या कवितांचं पुस्तकं वाचायला घेतलं तर एखादी ओळ मनात घर करून बसते, मग ती कविताच पाठ करावीशी वाटते.

आता टर्न ऑफ द की या पुस्तकाचे चौदा चॅप्टर वाचायला चार दिवस लावले, पण पॅसेन्जर चार दिवसात संपलं. तसंच सिरीजचं आहे, काही सिरीज इतक्या भारी असतात की बिन्ज केल्याशिवाय राहवत नाही. आता एक सिरीज बघत होतो, अनडन नावाची. या सिरीजचं एनिमेशन छान आज, विषय, गहन वेगळा आहे, ज्यांना किचकट काही बघायला आवडतं असेल त्यांना आवडेल. या सिरीजचे भाग सुद्धा पंचवीस तीस मिनिटाचे आहेत. पण अजून मी चार पाच एपिसोडच्या पुढे सरकलो नाही. त्यात घरात लाईट नसणे आणि वाचन याचा गाढा संबंध आहे. लोकांच्या घरातल्या लायटा गेल्या ना, लोकं लयं वाचतील.

साहित्यातील नोबेल पुरस्कार आणि बोंबाबोंब
For more than a century, the Nobel Prize in Literature has often been a polarizing spectacle, with critics denouncing the winners as too obscure, too Eurocentric, too male, too experimental, or simply unworthy of literature’s highest honor.
===

आणि बुकर जजांचे बंड
This year’s Booker Prize is shared by Bernardine Evaristo for 'Girl, Woman, Other,' and Margaret Atwood for 'The Testaments'.

एका बुकर जजचा अनुभव
Haruki Murakami once said that if you only read the books that everyone else is reading, you can only think what everyone else is thinking. What I found is that if you only read the kind of novel you have always read, you can only think the kind of things you usually think.

एवढ्यात the quiet place, Veronica आणि lights out असे 3 हॉरर चित्रपट पाहिले अमेझॉन वर. The quiet place मस्त आहे इतर दोन पण चांगले आहेत.

क्वायट प्लेस मस्त आहे, बाकीचे दोन बघितले नाहीत. या शैलीतले चित्रपट आवडले असतील तर अजून एक डोन्ट ब्रिथ नावाचा चित्रपट आहे, तो पण आवडू शकतो

फ्रॅक्चरेड सिनेमा नेटफ्लिक्सवर बघितला, शैली रहस्य थरार आहे, यामध्ये रेग्युलर ट्विस्ट आहे, पण छान फुलवला आहे. या सारखे चित्रपट आधी खूप आले आहेत, पण बाकी फार छान चित्रित केला आहे. आपण चित्रपट बघत असताना, शेवट काय होईल याचे दोन अंदाज बांधतो, त्यातला एक अंदाज बरोबर ठरतो. त्यामुळे कथानकाचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. चित्रपटाचा पहिलाच लॉन्ग शॉट खूप सुंदर आहे, त्यामुळे त्यात गुंतून गेलो.

हुलुवर, दे केम नॉकिंग असा हॉरर सिनेमा पाहिला होता. आवडला होता. काये आता इतके हॉरर सिनेमे तयार झालेत की काय वेगळेपणा दाखवणार? त्यामुळे जरा काही वेगळी कल्पना पाहिल्यास बरं वाटतं.
क्वायट प्लेस, बर्डबॉक्स, भारी होते. लाईट्स आऊट म्हणे फक्त तो सीन बनवला होता शॉर्ट फिल्म म्हणुन आणि ते पाहुन त्याला पुर्ण सिनेमाच बनवायची ऑफर मिळाली. चांगला होता.
डोन्ट ब्रीद ऐकल्यासारखा वाटतोय. नेटफ्लिक्स्वर शोधावा लागेल.
फ्र्याकचर्ड ची चर्चा तिकडे झाली पहा.

Pages