मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काईट रनर आवडलं नाही. भाषा छान आहे, पण फारच बॉलीवुडीश आहे असं वाटतं. विशेषतः तो दुसरा मुलगाच सैन्यातला अधिकारी असणं वगैरे. पाश्चात्य मार्केट डोळ्यापुढे ठेवून बेतलेलं लिखाण आहे हे स्पष्ट दिसत रहातं. त्यामुळे थाउजंड स्प्लेन्डिड सन्स हातातच धरलं नाही...

त्यामुळे थाउजंड स्प्लेन्डिड सन्स हातातच धरलं नाही. >> त्याचा बाज थोडा वेगळा आहे. काइट हे हॉलीवुड साठी किंवा जसे अनेक देशी पुस्तकं वेगळा भारत पोट्रे करण्यासाठी तसे हे वेगळा अफगाण पोट्रे करण्यासाठी लिहिंल गेलं असे वाटतं. हॅविंग सेड दॅट - काही "योगायोग" सोडले तर ते तसे अफगाण मध्ये घडले नाही असे म्हणता येत नाही. बरेचसे लिखाण हे सत्याच्या नक्कीच थोडेफार जवळ जाणारे आहे असे वाटते.

पण मला थाउंजड आवडले. अगदीच हातातून ठेवून द्यावे असे वाचताना जाणवले नाही. कदाचित माझ्यासाठी तो अफगाण दर्शन पाठ असल्यामुळे.

बरेचसे लिखाण हे सत्याच्या नक्कीच थोडेफार जवळ जाणारे आहे >>हो मी तर वाचायला घेतल्यावर मला ते खाली ठेवूच नये असे वाटत होते.

सत्यापासून फटकून आहे असं नाहीच म्हणायचंय रे मला. शैलीही चांगली आहे. पण आतपर्यंत नाही पोचू शकलं. कुठेतरी फार बेतशुद्ध वाटलं - मार्केट ओरिएन्टेड. ते नसावं असं मत नाही पण मुळात कुठेतरी पूर्णपणे आंतरिक गरजेतून लिहिलं गेलेलं लिखाण आहे असं वाटलं नाही...

सत्यापासून फटकून आहे असं नाहीच म्हणायचंय रे मला. >> हो मला कळलं ते आणि तुझा मुद्दाही कळला होता. मार्केट ओरिएन्टेड आहे ते.

पंकज कुरुलकरांचे 'चिरंतर दु:खाचा स्रोत" वाचले. काही कथा खुप छान आणि अगदी वेगळ्या आहेत. एखाददुसरी नेहमीसारखी. पण वाचताना कंटाळा आला नाही. एकुण पुस्तक एकदा वाचनीय आहे.

आर्या, तू दा विन्सी कोड सुरू तर कर. एकदा गोष्टीच्या वेगात अडकलीस की ढेपाळणार नाहीस

मलाही सुरवातीला कंटाळा आलेला. हळूहळू गुंतत गेले. नंतर नंतर खुपच प्रेडिक्टेबल वाटत गेले सगळे. पण एक वेगळा विषय म्हणुन मला आवडले.

काईट रनर जेवढा गाजावाजा झालेला तेवढे आवडले नाही. त्यापेक्षा थाउजंड.. जास्त चांगले वाटले.

'नॅशनल बुक ट्रस्ट'ने प्रकाशित केलेले 'मिर्झा गालिब'चे इंग्रजीतील छोटेखानी चरित्र वाचायला मिळाले.
इतक्या परिचयवजा पुस्तकात त्याच्या लेखनाची प्रेरणा, साहित्यिक मूल्यमापन इत्यादी अपेक्षीत नव्हते पण त्याबद्दलही लिहीले आहे. त्याचे क्लासिकल पर्शिअन लेखकांशी झालेले वाद, सततची आर्थिक ओढाताण आणि कोर्ट-कज्जे, हे सगळे वाचताना इतक्या प्रतिभावान व्यक्तीच्या वाट्याला किती तापदायक आयुष्य आले असे नक्कीच वाटते.

इथे गाथाचित्रशती स्पर्धेच्या निमित्ताने 'सिंहासन' चित्रपटाची चर्चा सुरू असताना अरूण साधू लिखित मूळ कादंबर्‍या 'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक'बद्दल वाचले. दोन्ही त्याच क्रमाने वाचल्या. 'सिंहासन' मस्त लिहीली आहे. इतकी पात्र असूनदेखील प्रत्येकाचं वैशिष्ट्य खुलून येतं. मात्र क्लायमॅक्स इतका सनसनाटी वाटला नाही. एकूणात चांगले. 'मुंबई दिनांक'ने मात्र साफ निराशा झाली Sad अतिशय संथ आणि व्हर्बोज वाटलं. अनिल वझेचं पात्र किती ताणलंय!!

शेवटी एकदाचे शिखरावरून पुस्तक वाचून पूर्ण केले...
नेटाने वाचल्याबद्दल पाठ थोपटून घेतली...
एडमंड हिलरी या व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख झाली...काय अनुभवसंपन्न आयुष्य जगला आहे हा माणूस..अगदी हेवा वाटावा असा..
सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवल्यानंतर हिलरीने ट्रॅक्टरवर बसून ३५०० मैल अंतर पार करत दक्षिण धृव गाठला, नंतर विमानाने उत्तर धृव, अतिउंचावरील वातावरणाचा मनुष्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला, रहस्यमय येतीवर संशोधन केले, दिल्लीत हाय कमिशनर म्हणून काम पाहिले, गंगा नदीच्या मुखापासून उगमापर्यंत बोटीने प्रवास केला. शेर्पा लोक तर त्याला देवासारखा मानत...त्यांच्यासाठी हिलरीने असंख्य शाळा सुरु केल्या, कित्येक सुधारणा केल्या, अतिउंचीवरचा लुकला विमानतळ बांधला...काय एक ना अनेक...
या दरम्यान तीन वेळेस मरणाच्या दाढेतून वाचला, त्यामुळे अतिउंचीवरचे गिर्यारोहण बंद करावे लागले पण त्याचा कुठेही बाऊ न करता आपले सामाजिक कार्य चालूच ठेवले...सलाम या माणसाच्या कार्याला....
या आत्मचरित्रात काही ठिकाणी आत्मस्तृती झाल्याचा संशय येतो खरा पण त्याकडे दुर्लक्ष करता येईल इतका किरकोळ आहे...अनुवादकाने जरा थोडे कष्ट घेतले असते तर निर्विवादपणे हे मस्ट रीड पुस्तक झाले असते...
पण मराठीतून वाचण्यापेक्षा मूळ इंग्रजी पुस्तक वाचणे नक्कीच चांगले...

सध्या इमॉर्टल्स ऑफ मेलुहा वाचून संपवले..एक वेगळेच पुस्तक आहे..शेवटी शेवटी फारच रेंगाळले...आता त्याच्या पुढचे सिक्रेट्स ऑफ नागा वाचायला घेतले आहे...बघुया कसे वाटते आहे ते

रच्याकने, पुण्यात टिळक स्मारकसमोर पुस्तकांचे प्रदर्शन सुरु आहे त्यात ५० रु पुस्तके मिळत आहेत...त्यात चांगली वाटलेली म्हणजे..सावरकाराची काळे पाणी, १८५७चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतीचित्रे, नाथमाधवांच्या ऐतिहासिक कादंबर्या, सोनेरी टोळी
ही सगळी पुस्तके प्रत्येकी ५० रु उपलब्ध आहेत...प्रिंट फार चांगली नाहीये पण ५० रुच्या मानानी नक्कीच चांगली आहेत.

इथे वाचुन मी मागच्या आठव्ड्यात जुम्पा लेहेरी चं अनकस्ट्म एर्थ, आणि काईट रनर वाचलं खूप आवड्ली दोन्ही पुस्तकं. काल पसुन thousand splendid सन्स वाचतीये....ग्रीपिंग आहे खुप......

पण काइट मधील डिटेल्स अनेक दिवस परेशान करतात.>>>> अगदी अगदी.....

टोनी मॉरिसन ह्यांचे अनुवादित [आशा दामले] बिल्व्हेड beloved) वाचायला घेतल आहे ... थोड डोक्यावरुनच जात आहे ...
आपण कुणी वाचल आहे का ?? आपल्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया वाचायला आवडतील ..

कोथरुड डीपी रोड पौड रोडच्या आसपास मराठी व इंग्रजी चांगली पुस्तके मिळणारी "चांगली"लायब्ररी माहीत आहे का कोणाला?

‘काईट रनर’ बद्दल पूर्ण अनुमोदन. पुढे-मागे सिनेमा निघाला तर..... अश्या बेताने लिहिलेलं पुस्तक वाटत. अफगाणिस्तान विषयावरचे पुस्तक वाचायचे असेल तर प्रतिभा रानडेंनी लिहिलेलं ‘अफगाण डायरी’ आणि फिरोज रानडेंनी लिहिलेलं ‘कबूलनामा’ ही फार छान पुस्तक आहेत. (त्याबद्दल लिहायचं झालं तर कुठे लिहावं बर?)

न. पुढे-मागे सिनेमा निघाला तर..... अश्या बेताने लिहिलेलं पुस्तक वाटत. >> असा सिनेमा आहे. तो आला अन लगेच गेला.

२००८ च्या अमेरिकेच्या निवडणुकीबद्दलचे 'गेम चेन्ज' वाचले. पहिला भाग ओबामा आणि हिलरी च्या नॉमिनेशनसाठी चाललेल्या 'लढाई' बद्दल आहे. तो भाग प्रचंड माहितीपूर्ण आहे, पण लेखन सतत खिळवून ठेवणारे नाही. त्यात अमेरिकन पुस्तकांत क्वचित आढळणारी गोष्ट म्हणजे क्लिष्ट शब्दांचा भरपूर वापर. तरीही मूळ माहितीच इंटरेस्टिंग असल्याने - व एकदम नजीकच्या काळातली असल्याने- आपण वाचत राहतो.

दुसरा भाग पेलिन व मॅकेन व नंतर मॅकेन वि ओबामा यांचे डावपेच वगैरे बद्दल आहे. तो मात्र प्रचंड वाचनीय आहे. आधी मला वाटले होते पेलिन बद्दलचा भाग धमाल असेल (पेलिनची निवड कशी झाली वगैरे तो भाग आहेच इंटरेस्टिंग) पण मॅकेन ची कॅम्पेन किती विनोदी होती हे तो भाग वाचून लक्षात येते. तोच भाग जास्त धमाल आहे प्रत्यक्षात. बुशला सांगून डीसीमधली ती मीटिंग ठरवणे, प्रत्यक्षात काहीच तयारी न करता तेथे जाणे (आणि मुळात विषयाची काहीच माहिती नाही व करून घेण्यात इंटरेस्ट नाही), आणि शेवटी काहीच साध्य न करता परत जाणे वगैरे भाग जबरी वाचनीय आहे Happy

या सर्वांच्या कॅम्पेन टीम्स मधल्या लोकांच्या मुलाखतींतून हे पुस्तक तयार झाले आहे, त्यामुळे यातील गोष्टी बहुतांश खर्‍या असतील.

अजून एक लक्षात येते की ओबामाची हिलरीविरूद्धची निवडणूक ही जास्त अवघड होती व जास्त जोरदार लढली गेली. त्यातुलनेत मॅकेन व पेलिन विरूद्ध फार श्रम पडले नसावेत त्याला, विशेषत: सप्टेंबर-ऑक्टोबर मधे लीह्मन ब्रदर्स वगैरे कंपन्या दिवाळखोरीत गेल्या व एकूणच अर्थव्यवस्था गोत्यात आली तेव्हा.

तुम्हाला अमेरिकन राजकारणात इंटरेस्ट असेल तर जरूर वाचा. याची २०१२ व्हर्जन सुद्धा येणार आहे असे ऐकले.

प्रत्यक्षात काहीच तयारी न करता तेथे जाणे ( >>> अरे असं कसं म्हणतोस अमोल. Happy पेलिन बाईंनी नाही का केटीला सांगीतले की फॉरेन पॉलिसी म्हणजे काय? तर अलास्काचा शेजारी कोण? रशियाना? मग मीच नाही का ठरवणार? वगैरे. एक मात्र नक्की पेलीनतै मुळे इलेक्शन काळात खूप करमणूक झाली.

आपले लालू अन राबडी परवडले त्या जोकर बाई पेक्षा. थोडी करमणूक म्हणून ह्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवलेल्या बाईचा. रेडिओ इंटरव्हू. नक्की पहा. http://www.youtube.com/watch?v=QbEwKcs-7Hc

जो द प्लंबर वर काही आहे का त्यात. करमणूक म्हणून नक्कीच वाचणार. Happy

आशु, इकडे नाशिकलाही भरलेलं ते अजब पुस्तकालयाचं प्रदर्शन.. त्यात गिरीजा किरांचं दिपस्तंभही चांगलं आहे.
सध्या मायकेल क्रायटनचं टाईमलाईन चालू आहे. नेक्स्ट आणि प्रे वाचली.. नेक्स्ट्पेक्षा बाकी दोन उजवी वाटली. Happy

टोनी मॉरिसन ह्यांचे अनुवादित [आशा दामले] बिल्व्हेड beloved) वाचायला घेतल आहे ... थोड डोक्यावरुनच जात आहे ...
आपण कुणी वाचल आहे का ?? आपल्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया वाचायला आवडतील ..
>>>> मी वाचल आहे हे पुस्तक.... तुम्ही म्हणता तसं सुरवातीला तशी पकड घेत नाही ते पुस्तक पण पुर्ण वाचून झालं की झोप उडवतं..... खूपच अंगावर आल होतं हे पुस्तक.... त्या छळाच्या गोष्टी तर थरकाप उडवतात.

विनार्च धन्यवाद प्रतिसादाबद्दल ...
परंतु ते भुत वगैरे ..... नक्कि काय आहे ..त्यांना तो भास होत अस्तो का ?? ते काहि कळत नाहि आहे ...
वाचायला घेत्ल्यावर इंटरनेट वर माहिति घेतल्यावर ते पुस्तक इतके फेमस आहे हे कळल .. व त्या वरुन एक पिक्चर देखिल आला होता .. ओप्रा ने त्यात काम केले होते ...

हेम अरे अगदी डिट्टो मी पण आत्ताच टाईमलाईन वाचून संपवले...खूप आधी अनुवाद वाचला होता त्यामुळे फ्लिपकार्टवरून ओरिजनल मागवले होते....फारच सही पुस्तक..
विशेषत ते तिकडे गेल्यानंतरचा भाग फार सहीये....
नेक्स्ट बाबत अनुमोदन..पण प्रे आवडले मला...थोडे फिल्मी वाटते पण घेतलेय मस्त...मायक्रोबद्दलही तेच
माझी आता पायरेटस ऑफ लँजिटूड सोडून क्रायटनची जवळपास सगळी पुस्तके वाचून झालीयेत....त्याच्यावरच एक लेख लिहीण्याच्या विचारात आहे...

फा, पुस्तक वाचलेले नाही. सिनेमा पाहिलाय. 'एचबीओ'चा आहे.
(बाकी अनुभव, तयारी नसताना एकदम प्रकाशझोतात आलं की होतं असं. Wink घासून तयारी केली मी सगळं ठीक होतं. कधी कधी ती करुनही आणि ४ वर्षं स्वतःची धोरणं पॉलिसीज माहीत असूनही डिबेटमध्ये तारांबळ उडते. Proud असो. तो धाग्याचा विषय नाही.)

लोला, ओबामाला मुद्दे पोहोचतील यातले :). हो तो चित्रपटही चांगला आहे असे ऐकले आहे - पण येथे आल्यापासून अजून मिळाला नाही (नेटफ्लिक्स, लायब्ररी ई). बघणार आहेच.

मला कोणीतरी पहिल्या/दुसर्‍या महायुद्धाबद्दलची वा त्या काळातली काही इंग्रजी पुस्तके सुचवाल का? फिक्शनही चालेल.. फक्त मी किंडलवर वाचणार असल्याने ई-बुक्स उपलब्ध असायला हवीत.
किंवा केनेडी/ चर्चिल अशा कोणातरी की लीडरच्या आयुष्याबद्द्ल वाचायला आवडेल.

पॅलेस ऑफ इल्यसन - इथे लेखीकेला महाभारतातल्या काळातला फेमिनीसम दाखवायचा होता, पण तिला ते जमल नाही. द्रोपदी सारख पात्र, जिच्या आयुष्यात अख्या आर्यावर्तात कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात घडले नसेल असे प्रसंग घडले, असे पात्र. द्रोपदीला एकाच वेळेस ५ पुरुषांची पत्नी होताना नेमकी कसे वाटले केवळ ह्याच विषयावर लेखीकेला बरेच काही लिहीता आले आसते. तिला वाचकांना कुनालाही माहिती नसलेली द्रोपदी दाखवता आली असती - तिचे आचार, विचार, आशा, अपेक्शा, निराशा अशा कितीतरी गोष्टींवर लिहिता आला असत. पन लेखीकेने तशी रिस्क घेतली नाही. मला तर तिने फक्त महाभारतातल्या १० गोष्टींचा संग्रह केला असे वाटले. माझ्या मुलीला मोठेपणि 'संक्शीप्त महाभारत' वाचायचे असेल तर तिला हे पुस्तक देईल.

नॉट विदाऊट माय डॉटर (बेट्टी महमूदी) लिखीत पुस्तक अफाट आहे. नुकतच वाचून संपवलं. मन सुन्न झालं. एक अमेरीकन बाई इराणी डोक्टराशी (जो अमेरीक्त प्रक्टीस करतो) लग्न करते. दोघाना एक गोडशी मुलगी होते, त्या मुलीचं नाव ठेवतात 'माहतोब' (आपल्याकडचं माहताब?). मुलगी पाच वर्षाची झाल्यावर त्या इ-याण्याका देशात जायची हुक्की येते. बायको व मुलीला घेऊन इराणात दाखल होतो. अमेरिका सोडताना बायकोला सांगतो की आपण आठ दहा दिवसात परत येणार पण देशात आल्यावर मात्र आपण कायमचे ईकडेच राहणार असं जाहिर करतो.
त्या नंतर सुरु होते तीची करुन कहानी. एका अमेरिकन बाईला बुरखा घालून वावरताना होणारा त्रास. या देशातून बाहेर पडण्यासाठीचे बंद झालेले मार्ग. नव-याकडुन होणारी मारझोड. अमेरिकितील स्वातंत्र्य अनुभवणा-या स्त्रीला मुस्लीम स्त्रीचं चिकटलेलं दुय्यम स्टेटस हे सगळ वाचताना शरीराचा थरकाप उडतो.
नव-या शिवाय घराबाहेर पडायची सोय नसते...
आणि बेट्टीबाई एक निर्णय घेतात... इराण सोडायचाय... ते ही मुली सोबत. आणि पुढे सुरु होतो तीचा लढा..

टीपः या पुस्तकावर सिनेमा आलाय खरा पण पुस्तक ते पुस्तकच.
(वन डे इन सप्टेबर नावाचं Simon Reeve लिखीत पुस्तक वाचायला घेतला आहे. जर्मनीत भरलेल्या ऑलंपीकमधे झालेल्या १३ इज्रायली खेळाडुंची हत्या व पुढे २० वर्षे इस्राईलनी घेतलेला बदला. बापरे... टेरीबल आहे सगळं. वाचून झालं की पुस्तक परिचय लिहीन)

Lal shah , we had a bollywood movie on same book. (not without my daughter). Of course bollywood ppl ruined that story by stuffing Hindi masala in that. can anybody help for name of Hindi movie?

लाल शहा, म्युनिक ऑलिंपिकमधल्या ह्या घटनेवर पुस्तक आहे हे माहिती नव्हतं, ती मूव्ही पाहिली होती.

'नॉट विदाउट माय डॉटर' अत्यंत एकांगी, रेसिस्ट आणि आक्रस्ताळे पुस्तक आहे. केवळ 'सत्य घटनेवर आधारित' असे शीर्षक दिल्याने इतके आत्यंतिक स्टिरिओटीपिकल लेखन समर्थनीय ठरत नाही.
अमेरिकन लोकांच्या मनातील इराण्/मुस्लिम/पौर्वात्य संस्कॄतीबद्दल असलेले सर्व पूर्वग्रह या एकाच पुस्तकात कोंबलेले आहेत.

Pages