इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहितेय, कोणाला अजिबात खरं वाटणार नाही, पण एक माणूस म्हणून मी फार सवेंदनशील आहे, त्यामुळे माईन्ड हंटरचे पहिले चारच एपिसोड बघू शकलो, ही सिरीज नकारात्मक परिणाम माझ्यावर करते असं जाणवलं. एवढं ग्राफिक, डार्क मला बघता येत नाही, पुढचे भाग बघायचे राहून गेले, पण ही सिरीज खूप चांगली आहे.

फार डार्क, ग्राफीक असेल तर मलादेखील बघताना त्रास होतो. The Fall बघताना मी हादरले होते.
पण आधी पुस्तक वाचलं असेल आणि मग मालिका बघत असेन (उदा गर्ल विथ ड्रॅगन टॅटू, यू) तर एवढा त्रास होत नाही कारण मानसिक तयारी झाली असते.

द चेन एवढं वाचावंस वाटतंय तर वाचून टाक एकदाच, जास्त विचार नाय करायचा.

@ॲमी
अमेरिकेन हॉरर स्टोरी, हॅनिबल, पेनी ड्रेडफूल, या सिरीज चांगल्या होत्या पण मी मधूनच सोडून दिल्या.
कोणाला डार्क, ग्राफिक, असं काही चांगलं बघायचं असेल तर स्पॉटलेस नावाची एक सिरीज आहे, नेटफ्लिक्स वर, सिरीज चांगली आहे, पण फारच अंगावर आली, त्यामुळे अर्धेच भाग बघितले आहेत

@सुपु
सॉन्ग ऑफ आईस अँड फायर सिरीज मध्ये सात पुस्तकं आहेत, दोन पुस्तकं अजून यायची आहेत.
आपण कुठलं वाचत आहात?

मेमरी गेम्स बघितलं. छान आहे. धन्यवाद. त्यातल्या एकाला muscular dystrophy आहे. तरीही धैर्य, चिकाटी जबरदस्त आहे. मेमरी competitions एकदम असाधारण आहेत. Commendable feats.

येस्स, ते जर्मन जे आहेत, त्यांनी जी मेमरी टेक्निक सांगितली, ती भारी आहे, म्हणजे प्रत्येक अंकाला एक चित्र दिलं आहे, क्रमांक/आकडे लक्षात ठेवायचे असतील, तर त्या आकड्यांची चित्रं लक्षात ठेवायची, दोन चित्रांमध्ये एखादं कथानक बनवायचं, मेंदू कथानक पटकन विसरत नाही, त्यामुळे ते अंक लक्षात राहतात.

तापसी पन्नू यांचा गेम ओव्हर नावाचा सिनेमा नेटफ्लिक्स वर बघितला, चांगला आहे, आवडला, कथानक वेगळं होतं, ट्विस्ट मस्त होते, फापट पसारा नव्हता, त्यामुळे कधी सिनेमा संपला कळलंच नाही

कथानकात काय लॉजिक नाही असं वाटू शकतं, पण मांडणी आवडली, आधी असं कधी बघायला मिळालं नव्हतं. अंधाधून नंतर हा चित्रपट आवडला.

मी अजून रामायणच वाचतेय. Lol
देवाधर्माचं वाचावसं तर वाटतं पण पारंपरिक पद्धतीने वाचायला बोअर होतं म्हणून आमच्यासारख्याना हा फॉरमॅट ठीक आहे.
Beloved मला कधीपासून वाचायचं आहे आणि परवा Toni Morrison गेल्या त्यानंतर परत वाचावसं वाटलं पण क्लासिक किंवा critically acclaimed बुक्स मला जरा डोक्यावरून जातात व त्यामुळे बोअर होतात. पण एमीचे सगळे recco मला आवडलेले आहेत त्यामुळे आता beloved वाचायचं मनावर घ्यावं लागेल. तू पूर्ण केलं का एमी?
अमेरिकन ब्लॅक experience / history बद्दल मी आत्ता अलीकडेच अनेक दर्जेदार पुस्तकं वाचली- द हेल्प आणि अमेरिकन मॅरेज हे फिक्शन. evicted, warmth of other Suns, hidden figures हे नॉन फिक्शन. न्यू जिम क्रो वाचायच्या यादीत आहेच. आणि हो, the hate u give पण वाचलं पण ते इतकं नाही आवडलं.

आसा,खतरनाक सिनेमा हाय, आग ए, ट्विस्ट इतका भारी की, लॅपटॉप च्या स्क्रीनला तडा गेला होता, फक्त स्वीडन वाला ओरिजिनल सिनेमा बघा, मग वाटलंस तर डेव्हीड दादांचा हॉलिवूड रिमेक बघा

जिद्दु, नेटफ्लिक्स वाल्यानंकडं टेरर नाय ना, प्राईम कडं हाय, प्राईम घ्यावं म्हणतोय, तिकडे ते मले द बॉईज सिरीज पण बघून बघायचीय

द बॉईज सुरूवातीला ईंट्रेस्टिंग वाटली प्रत्येक एपिसोडगणिक सुपरचं सुपर असणं कमी महत्वाचं होत जातं आणि त्यांची ह्यूमन साईड जासत वल्नरेबल असल्याचं थसत जातं. क्लायमॅक्स एपिसोड जरा खोदा पहाड ..., कापाळावर हात.. टाईप्स आहे.
होमलँडर सोडून एकही सुपर कॅरॅक्टर नीटसं ऊभं रहात नाही. पण विषय नक्कीच ईंट्रेस्टिंग आहे.

द बॉईजला आयएमडीबी ८.९ रेटिंग आहे, पण आयएमडीबी रेटिंगची आता शंका येते, कारण प्राईमची सिरीज आहे, दोन्हीची मालकी ऍमेझॉनकडे आहे.

चैतन्य,
हॉररच्या वाटेला फारसे जात नसल्यामुळे अमेरिकेन हॉरर स्टोरी, पेनी ड्रेडफूल वगैरे मी स्वतःहून बघायची शक्यता नव्हतीच. पण हनिबल मालिका आहे माझ्याकडे, अजून बघितली नाही.
===

सनव,
टोनी मॉरिसन हे नावच मला ती गेल्यानंतर, स्टिफन किंगच्या फेसबुक पोस्टमधून कळलं. क्लासिक, समीक्षकाकडून नावाजलेले, नोबेल-बुकर विजेती पुस्तकं मलादेखील बोअर होतात, समजत नाहीत वगैरे. The Trial, Catcher in the Rye, Outsider वगैरे न आवडण्याचं कारण 'पूर्ण पुरुषी जग, विचार, दृष्टिकोन आणि मागे भिंतीवर लटकवलेल्या चित्रासारख्या स्त्रिया' हे असेल अशी शंका होती. म्हणून मी या धाग्यावर मागे कुठेतरी ४ अटी दिल्या होत्या आणि त्यापैकी कमीतकमी ३ अटींमधे बसणारे क्लासिक सुचवा, मी वाचेन म्हणलेलं. अटी साधारण अशा होत्या:
१. पुस्तक स्त्रीने लिहलेले असावे
२. मुख्य निवेदक स्त्री असावी
३. प्रेमकथा नको
४. कथेतील स्त्रिया चूलमूल खेरीज इतर काहीतरी करताना दिसायला हव्या.

तर Beloved हे या सगळ्या अटीत बसतंय.
+ एकदम तळातून आलेले, कच्चे नग्न विचार-भावना-घटना, यासगळ्याच प्रभावी शैलीत केलेलं चित्रण!
अतिशय आवडतंय पुस्तक. अजून पूर्ण नाही झालं. पण सगळ्यांनी वाचाच असे सांगेन. इंग्रजी वाचत नसाल तर कोणीतरी आशा दामलेनी मराठीत बिलव्हेड या नावाने भाषांतर केले आहे, ते मिळवून वाचा.
चैतन्य, तूदेखील वाच आणि कसं वाटलं सांग.
हाबनी वाचलं असेल आधीच.

The Hate U Give आणि American Marriage मला फारसे आवडले नव्हते. The Help चांगलं होतं पण हे Beloved बेस्ट आहे. Must Read!
===

आसा,
मी चैतन्यच्या अगदी उलटा सल्ला देईन, डॅनियल क्रेग आणि रुनी माराचा सिनेमा मला जास्त आवडला होता स्विडीश सिनेमाऐवजी.

आसा,खतरनाक सिनेमा हाय, आग ए, ट्विस्ट इतका भारी की, लॅपटॉप च्या स्क्रीनला तडा गेला होता, फक्त स्वीडन वाला ओरिजिनल सिनेमा बघा, मग वाटलंस तर डेव्हीड दादांचा हॉलिवूड रिमेक बघा

>>>> धन्यवाद चैतन्य
मला हॉलिवूड रिमेक च मिळालाय.

>>१. पुस्तक स्त्रीने लिहलेले असावे
२. मुख्य निवेदक स्त्री असावी
३. प्रेमकथा नको
४. कथेतील स्त्रिया चूलमूल खेरीज इतर काहीतरी करताना दिसायला हव्या.<<

पुस्तक तर नाही, पण तुम्ही गॉडलेस नक्की बघा!

@ सुनिधी
गेम ओव्हर, टॅटू वाला सिनेमा, नेटफ्लिक्सवर आहे

@ॲमी
ऑलिव्ह कित्तरेज पुस्तकं पण चांगलं असेल, या पुस्तकावरची सिरीज बघितली होती, ती चांगली आहे
बिलव्हड, बद्दल वाचलं, चांगलं वाटतेय, पुस्तकाचे पहिले काही चॅप्टर्स वाचतो

आसा,
मी चैतन्यच्या अगदी उलटा सल्ला देईन, डॅनियल क्रेग आणि रुनी माराचा सिनेमा मला जास्त आवडला होता स्विडीश सिनेमाऐवजी.

>>> अ‍ॅमी Happy

मी मार्व्हलस मिसेस मेझल बद्दल आधी ईथे की बेकरी बाफ वर लिहिले होते माहित नाही.
अगदी अहमेअहझिंग आणि हिहलिहरिहस आहेत दोन्ही सीझन्स. आयुष्यात मोठ्या काळासाठी एखाद्या मालिकेने आणि त्यातील कॅरॅक्टर्सने पछाडून टाकावे अशी ब्रेकिंग बॅड नंतर ही दुसरीच मालिका. तिसर्या सीझनची आतुअरतेने वाट बघत आहे.
आज ह्याबद्दल लिहायचे कारण असे की काल अचानक अलभ्य लाभ योग जुळून आला. काल मिसेस मेझल 'मिज' ला अगदी दोन फुटांवरून प्रत्यक्ष पाहिले आणि ते ही अगदी मिसेस मेझल अवतारात. मिडटाऊनमध्ये आमच्या ऑफिसच्या खालीच मालिकेचे दिवसभर शुटिंग चालू होते. त्यामुळे तिसर्‍या मजल्यावरून अगदी बालकनीतून लाइव शुटिंग पहायचा योग आला.
पण हे शुटींग नुसतेच मिसेस मेझल आधी गाडीतून आणि नंतर रस्त्यावरून चालते असा संवादविरहित रूटीन सीनचे होते त्यामुळे अ‍ॅक्शन म्हणावे असे काही दिसले नाही. पण रस्त्यावर जुन्या गाड्या, मोठा करड्या रंगाचा ओवरकोट घालून चालणारे पुरूष, १९५० च्या वेषभुषेतल्या स्त्रिया.. असा सगळा ४०-५० माण्सांचा देखावा होता.
सीझन आल्यावर नेमके कोणते दृष्य होते ते पुन्हा ईथे येऊन सांगेन. Happy
काय अ‍ॅमेझिंग सुंदर आहे रेचेल... म्हणजे सुंदर बर्‍याच असतात पण त्या १९५० च्या वेषभुषेत जरा जास्तच सुंदर दिसतात. Wink Proud

सिरीज आणि रेचेल दोन्ही ठिकठाकच वाटले मला. तुम्ही फॅनबॉय तर नाही? Wink
रेचेल आणि तिची सिरीज खूप छान आहे Happy

विनोदात सौंदर्य असते असे म्हणतात.
आपल्याला विनोद कळला की त्यातले सौंदर्य दिसते मग विनोदी मालिका आणि त्यातले पात्र पण सुंदर दिसू लागतात आणि मग आपण त्यांच्या प्रेमात पडतो. Proud

Pages