इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एव्हिडन्स ऑफ अफेअर वाचून झालं, छान आहे, आवडलं.
कथानक जुन्या काळातलं आहे, जेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा पत्र लिहून सवांद साधला जायचा, एका महिलेला स्वतःच्या पतीच्या अफेअर बद्दल समजतं मग ती महिला, ज्या स्त्री बरोबर हे अफेअर चालू आहे, त्या स्त्रीच्या पतीला पत्र लिहून कळवते. मग त्या दोघांमध्ये पत्रांद्वारे सवांद घडतो, असं कथानक आहे.
हे पुस्तक वाचताना, इन द मूड ऑफ लव्ह या चित्रपटाची आठवण झाली, त्या सिनेमाचं कथानक सुद्धा बऱ्यापैकी असंच होतं.
यातले प्रोज छान आहेत, काव्यात्मक नसून, त्यात साधेपणा आहे, जो भावतो, शेवट खरंच अप्रतिम आहे, असा काहीसा शेवट होईल असा अंदाज केला नव्हता.

हे पण Taylor Jenkins Reid चं आहे ना? लिस्टमध्ये घेतलं.
मला आवडायला लागलीय ही लेखिका. मी daisy jones संपवलं. मला बराच वेळ कळलंच नाही की हा काल्पनिक बँड आहे. मला वाटत होतं की रियल हिस्ट्री आहे. मी युट्युबवर जाऊन हनिकोम्ब गाणं शोधायचा प्लॅन केलेला. पण त्याआधीच कळलं की फिक्शन आहे. आता याला माझा मंदपणा म्हणता येईल किंवा लेखिकेचं कसब म्हणता येईल.

चैतन्य,
Evidence of Affair डाउनलोड केलं आहे.
सहज कुतूहल म्हणून: Jane Doe आणि हे यांची नावं/शिफारस कुठून कळाली तुला?
===

सनव,
मग ओव्हरऑल कसं वाटलं Daisy Jones? मधे काही भाग बोअर झाला म्हणलेली ना?
मला आठवतंय त्यानुसार Seven Husbands of Evelyn Hugo पण ठीकच वाटलं होतं ना तुला?
===

मी अजून कोणतं नवीन पुस्तक चालू केलं नाही.
विकांताला Being Cyrus बघितला. मस्तच आहे. रिलीज झाला तेव्हादेखील पाहिला होता.

मध्ये बोअर झालेलं पण ओव्हरऑल आवडलं. Evelyn Hugo पेक्षा हे जास्ती आवडलं. डेझी फारशी नाही आवडली. कमिला आवडण्यासारखीच आहेच. शेवटी कॅरेनची सिच्युएशन आणि त्याच्या resolution मधून दिलेला मेसेज यामुळे पुस्तक elevate झालं माझ्यासाठी. त्यात कमिलाचं तिला साथ देणं-as women, let's be there for each other without judging - हे आवडलं.
ओल्ड बॉलिवूड आणि ७० च्या दशकातील रॉक अँड रोल चं वर्णन किंवा ते वातावरण वाचायला आवडलं. द सिक्सची वेगवेगळी गाणी, त्याचा प्रोसेस किंवा इव्हलीनचे वेगवेगळे मुव्हीज, त्याचं मेकिंग हे ती इतकं अमेझिंग लिहिते की ही गाणी , हे मुव्हीज खरंच आहेत असं वाटावं.

मला आठवतंय, जेन डो बद्दल इथे बोलणं झालं होतं, हे पुस्तकं माझ्या रडारवर होतंच.
जेन डोचे पहिले काही चॅप्टर मजेशीर, छोटे आहेत, पटकन वाचून झाले म्हणून मग पूर्ण पुस्तक वाचलं. त्या दिवशी मला काहीतरी साधं, सरळ, सोपं वाचायचं होतं, म्हणून किंडल बुक्सवर शोधत होतो, तर एव्हिडन्स ऑफ अफेयर मिळालं, याला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, कथेचा सारांश वाचला, चांगला वाटला म्हणून वाचायला घेतलं.

एव्हिडन्स ऑफ अफेयर आणि डेजी जोन्सची लेखिका एकच आहे.

सनव,
मलादेखील सुरवातीला हा खरंच बँड आहे वाटलं होतं.लेखिकेचं कसबच आहे असे म्हणता येईल.

बाकी कमिल मला 'अजिबात न आवडणाऱ्या बायका' गटातली आहे, पण ती अगदी डोक्यात गेली नाही याचे श्रेयदेखील लेखिकेकडे जाते Lol
मला डेझी बऱ्यापैकी आवडली. कॅरेन तिच्यापेक्षा किंचित जास्त आवडली.
> त्यात कमिलाचं तिला साथ देणं-as women, let's be there for each other without judging - हे आवडलं. > कमिलच कॅरेनला साथ देणं वगैरे ठीकच आहे. जज करायचा काही प्रश्न येत नाही. It was really none of her business. And Karen hadn't gone to Camille to ask about her opinion/advice.
आणि खरंतर कमिलचे डेझीसोबतचे वागणे (तो शेवटचा सीन-ज्याच्यामुळे बँड तुटला) ते ऋण/राखाडी म्हणता येईल असे होते.
===

चैतन्य,
हो जेन डोबद्दल इथे काहीतरी बोलल्याचे आठवत होते, पण नक्की काय बोललो ते आठवत नव्हते. शोधून बघितलं. आणि हे तुझ्या दोन प्रतिसादमधून कॉपीपेस्ट ->

"जेन डो" हे पुस्तकं "यू" सारखं आहे, मला रीव्हयूज वाचून तसं वाटलं.

जेन डो 267 पानाचं आहे, लगेच वाचून होईल, माझ्या आवडत्या बुकट्युबरने साडे तीन स्टार दिले आहेत, ऑडिबल वर पण चांगलं रेटिंग ए.

पॅरामाऊंट नेटवर्क ची "यलोस्टोन" ही सिरीज अगदी हिडन-जेम आहे. थेट "द सोप्राणोस" या मॅग्नमओपस ची आठवण करून देते क्षणोक्षणी... सध्या दुसरा सीजन चालू आहे.
नेटफ्लिक्स च्या "मनी हाईस्ट" चा तिसरा सीजन एवढा खास नाही वाटला. सध्या "माईंडहंटर" च्या दुसऱ्या सीजनच्या प्रतीक्षेत.

चला म्हणजे आपल्याला कॅरेन आवडली यावर एकमत झालं Biggrin

आणि खरंतर कमिलचे डेझीसोबतचे वागणे (तो शेवटचा सीन-ज्याच्यामुळे बँड तुटला) ते ऋण/राखाडी म्हणता येईल असे होते.
आय सी युअर पॉईंट. पण मुळात डेझी अशी गरीब गाय टाईप व्यक्तीच नव्हती की कमिला काही सांगेल आणि ती मुकाट्याने ऐकेल. तिने आधीच ठरवलं होतं की rehab ला जायचं. (बिलीने डेझिला आधीच रिजेक्ट केलेलं हे कमीलाला माहीत नसतं पण देझिला अर्थातच माहीत असतं.)
बँड तिच्या जाण्यामुळे तुटला असंही नाही. सगळ्यांचेच इश्यू असतात. एक जण आधीच ठरवतो की बँड सोडायचा. एकाला बिलिबद्दल प्रॉब्लेम असतो. कॅरेन आणि ग्रॅम एकत्र काम करणं शक्यच नसतं. बिलीला त्याच्या कुटूंबासोबत राहायचं असतं. डेझी थांबली असती तरी द सिक्स चा ब्रेक अप होणारच होता.

Searching बघितला की पूर्वीच. बहुतेक याच धाग्यावर लिहलेदेखील आहे त्याबद्दल. चांगला आहे. सबटायटल सिंक होत आहेत ना हे चेक करताना, गुन्हेगार कोण असतो हे आधीच समजले होते त्यामुळे थोडा पोपट झाला Lol
===

वॉर्निंग: यापुढे डेझी जॉन्सबद्दल बरेच स्पॉयलर आहेत.

मुळात कमिलाने डेझीशी काही बोलण्याऐवजी बिलीशीच बोलायला हवं होतं.

रिहॅबला जायचं असं डेझी बऱ्याचदा ठरवत असते ना?

> बिलीने डेझिला आधीच रिजेक्ट केलेलं हे कमीलाला माहीत नसतं पण देझिला अर्थातच माहीत असतं. > आता पुस्तक वाचून बरेच दिवस झालेत पण शेकी असतो ना बिलीचा निर्णय? एनिवे बिली आणि डेझीने प्रेमात पडायला हवं होत, मग त्यांनी हैप्पीली एवर आफ्टर रहायला हवं होत असेकाही माझे म्हणणे नाही. Its just that, when people are denied choices or their decisions are not made because of their own mind/thought but because someone else is manipulating situation behind their back तेव्हा मला अनइझी वाटायला लागतं.
डेझी आणि बिली हे कॉम्बो कलेच्या दृष्टिकोनातून टिकायला हवे होते.

डेझी गरीबगाय नसते मान्य. त्यामुळेच तिचे पुढचे जीवन अगदीच सपक वाटले आणि कॅरेन काकणभर सरस ठरली.
खरंतर पुस्तकाचा शेवट अगदीच बॉलिवूडी चिजी टाईपचा आहे Proud

The Six जेकाही असतात ते केवळ बिलीमुळेच असतात त्यामुळे बाकीच्यांचे इश्यू हे नॉनइश्यू आहेत. या साईड व्यक्तिरेखांमधे मला तो ड्रमर रोचक वाटला होता.
===

Its Kind of a Funny Story हे नावच इतकं छान वाटलं. हलकंफुलकं असेल म्हणून पुस्तक वाचायला घेतलं पण गंभीर विषय आहे. पौगंड वय, नैराश्य, आत्महत्या वगैरे. Normal People सारखंच झालं की हे तर असं वाटलं पण ५०एक पानं वाचल्यानंतर गुडरीड्स रिव्यू स्क्रोल करताना कळलं की लेखकाने आत्महत्या केली आहे. आणि मी हादरले. पुस्तक अर्धवट सोडून द्यावे असा विचार आलेला मनात, पण वाचणं चालू ठेवलंय....

क्वायट प्लेस गर्लफ्रेंड बरोबर बघितला होता, मला खूप आवडला होता, थिएटर मध्ये बघायला मजा येते, त्यात साऊंड इफेक्टस भारी होते, संकल्पना पण भारी होती, आवडला होता म्हणून टीव्हीवर पण परत बघितला, गर्लफ्रेंडला चित्रपट स्लो वाटला होता.
हे ऐकून, आमच्यातलं नातंच क्वायट झालं, कायमच....

हे तर काहीच नाही, माझ्या गुलाबी काळात एकीला मी दुसऱ्याच डेटमधे "क्लाउड ऍटलास" ह्या सिनेमाला घेऊन गेल्तो. तगडी स्टारकास्ट पाहून फार काही विचार नाही केला आणि सिनेमा तीन तासांचा होता, मला परत कॉल नाय आला. मी त्या भिकार सिनेमालाच दोषी मानतो यासाठी.

गर्लफ्रेंडला चित्रपट स्लो वाटला होता. हे ऐकून, आमच्यातलं नातंच क्वायट झालं, Lol Lol Lol

- Quiet Place माझा नेहमीच आवडता चित्रपट. या बरोबरच Hachi: A Dog's Tale, gravity, Shutter Island, moana, The Lord of the Rings ऑल पार्ट, Avatar १-२, The Revenant, Gladiator, Slumdog Millionaire ई.ई.
हे आणि अजुन काही लॅपी मध्ये सेव्ह आहेत. मुड आला की केव्हाही बघते.

नुकतीच एक तुर्किश सिरीयल पहिली. फॅमिली drama प्लस लव्ह ट्रँगल आहे, इंग्लिश सबटायटल आहेत . Kara Sevda (Endless Love)
मस्त आहे. त्यांची कुटुंब पध्दती आणि आपली भारतीय कुटुंब पद्धती अगदी सारखी वाटली.आपली आई असते सगळ्यांची काळजी करणारी अगदी तशीच आई ... दोन भाऊ ..एक लहान बहीण...शेंडेंफळ म्हणून सगळ्यांची लाडकी ...काळजी घेणारे भाऊ ...घरात आल्यावर बाहेरच्या चपला काढून ठेवणं.... सुंदर अभिनय , संयत दिग्दर्शन ...
मला नीट सांगता येत नाहीये पण छान आहे सिरीयल... you tube वर आहे..
मायबोलीकरांबरोबर शेअर करावस वाटलं म्हणूंन लिहिलं..

एमी,

मला तुझा मुद्दा कळला पण मुळात कमिलाने manipulation केलं असंच माझं मत झालं नाही. डेझिने आधीच शोमध्ये हनिकोम्बचं ओरिजिनल व्हर्जन गाऊन एकप्रकारे कबुली दिली होती की बिल कमिलाला धोका देणं शक्य नाही. बिलचा बँड सोडायचा निर्णय डेझीच्या असण्या नसण्यामुळे नव्हता तर त्याला त्याच्या मुलांसोबत राहायचं होतं. थोडक्यात जे करायला ग्रॅमने करेनला नकार दिला तेच बिलने केलं- मुलांच्या संगोपनासाठी करियर बदलणं, इझी जॉब घेणं.

स्पॉयलर अलर्ट

> मला तुझा मुद्दा कळला पण मुळात कमिलाने manipulation केलं असंच माझं मत झालं नाही. > ठीक.

> डेझिने आधीच शोमध्ये हनिकोम्बचं ओरिजिनल व्हर्जन गाऊन एकप्रकारे कबुली दिली होती की बिल कमिलाला धोका देणं शक्य नाही. > बिल कमिलाला सोडू शकत नाही कारण ते सामाजिक आणि नैतिक दृष्टया अयोग्य असतं. आणि हे डेझीलादेखील माहित आहे. दोघेही मोडक्या घरातून आलेत.

> बिलचा बँड सोडायचा निर्णय डेझीच्या असण्या नसण्यामुळे नव्हता > हे मात्र खोलीतला हत्ती नाकारणे होईल. डेझी हे सगळ्यात मोठं कारण आहे बँड सोडण्याच. तो बारमधला सीन आणि शेवटची कमिलाने लिहलेली चिठ्ठी कशासाठी आहे मग?

> तर त्याला त्याच्या मुलांसोबत राहायचं होतं. थोडक्यात जे करायला ग्रॅमने करेनला नकार दिला तेच बिलने केलं- मुलांच्या संगोपनासाठी करियर बदलणं, इझी जॉब घेणं. > हे म्हणजे कलाकार बिलला मराठी मध्यमवर्गीय चष्म्यातून बघितल्यासारखं झालं.

व्यसनी पण टॅलेंटेड डेझीकडे बिल सुरवातीपासूनच आकर्षित झालेला असतो (इतर सगळे लोक होतात तसाच). एकत्र काम केल्यावर आपण समजत होतो तितकी उथळ ही नाहीय हे त्याला कळतं. तिच्याकडूनपन रिस्पॉन्स मिळाल्यावर तो पळ काढतो. डेझी हे खड्ड्यात घेऊन जाणारं व्यसन आहे, कमिला ही संसार-मुलं स्थैर्य देणारी बाई आहे. पण बिलची क्रिएटीविटी, कला डेझीसोबत बहरणार आहे, कमिलासोबत तो सामान्य माणूस बनून जगणार आहे, कला मेली. कमिलावर त्याचं खूप प्रेम आहे म्हणून तो तिच्यासोबत राहिला नाहीय, त्यांचं लग्नदेखील प्रेम या कारणामुळे झालेलं नाही. अपघाताने गरोदर झाली की करा लग्न आणि वाढवा मुलं असा प्रकार आहे तो.

तू करेक्ट लिहिलंय Happy
मुक्त व्यसनी सेक्सी लाइफस्टाइल - जे डेझी रिप्रेझेंट करते- ते जीवन बिलने दोनदा जगून पाहिलं आहे. एकदा तो कमिलाशी ब्रेक अप करून हॉलिवुडला राहायला येतो तेव्हा आणि एकदा ज्युलियाच्या जन्माआधी. पण त्यात तो सुखी राहू शकला नाही. म्हणून त्याने शेवटी सामान्य मध्यमवर्गीय जीवन स्वीकारलं कारण त्यात तो दीर्घकाळ सुखी राहू शकतो.
कलेचं नुकसान होतं का , तर नक्कीच होतं. पण नाहीतर बिलचं आणि त्याच्या कुटूंबाचं नुकसान झालं असतं.

'त्या' दोन्ही वेळी डेझी सोबत नव्हती.

आणि कमिलासोबत बिल सुखी आहे की नाही हा मॅटर ऑफ डिबेट होऊ शकतो. ये जीना भी कोई जीना है लल्लू Lol
+
डेझीसोबत राहिला असता तर दोघे खड्ड्यात गेले असते हेदेखील नक्की नाही. त्यांचा तो मॅनेजर असतो (बिलसाठी फादर फिगर असलेला), तो किंवा त्याच्यासारखा कोणीतरी दोघांना सावरू शकला असता. किंवा ते दोघेच एकमेकांना सावरु शकले असते.ू

हो ५०० प्रतिसाद झाले.
धाग्याची मुळ कल्पनाच शार्प ऑब्जेक्टस् धाग्यावरील तुझ्या प्रतिसादांमुळे सुचलेली आहे. त्यामुळे कल्पनेसाठी आणि २००+ प्रतिसादांसाठी खूप आभार चैतन्य Happy

बाकीच्या वाचक, प्रतिसादकानादेखील धन्यवाद. असाच लोभ असुद्या वगैरे वगैरे Lol

१. नेटफ्लिक्स वर टाईपरायटर नावाची सिरीज बघितली, चांगली आहे, आवडली, सामान्य प्रेक्षकांना आवडेल, असामान्य प्रेक्षकांनी वाटेला जाऊ नये.

२. मुळात आपल्या इथे भूतांना व्यवस्थित समजावून सांगितलं जातं नाही, पण या सिरीज मध्ये, भुतं कसं आलं, कुठून आलं, आता लोकांना का मारून राहिलंय, भुताचा मेन मुद्दा काय ए, या सर्व गोष्टी छान सांगितल्या आहेत, त्यामुळे हे भुतं कळतं, सिरीज बघताना या भुताचा विजय व्हावा असंच वाटतं राहतं

३. स्ट्रेनजर थिंग्ज बघून झालं असेल, आवडलं असेल, तर यातले भूत आवडतील.

४. काही ट्विस्ट खरंच खूप छान, मजेशीर आहेत, बघताना भारी वाटलं, मजा आली

५. निर्मिती मूल्य का काय ते, ती सुद्धा उत्तम आहेत, बी ग्रेड काही वाटतं नाही, जर कोणाला सिरीज बी ग्रेड वाटली तर आपण लय श्रीमंत आहोत हे समजावून घ्यावं

६. सिरिजचं लेखन छान आहे, भरपूर पात्रं आहेत, प्रत्येक पात्राला बॅक स्टोरी आहे, असंच टाईमपास म्हणून दोन तीन पात्र आहेत, पण ठिके तेवढं चालायचं

७. बाकी, लहान मुलांना खूप आवडेल, पण म्हणून त्यांना ही सिरीज दाखवू नका, पण फॅमिली ऑडीयन्ससाठी बनवली आहे

८. फिनाले तसा विनोदी आहे, दिग्दर्शकाने तसं ठरवून विनोद केला आहे, मजेशीर सवांद आहे, "काँजुरिंग गया तेल लेने" असा एक खोल सवांद आहे, तिथं मी खूप हसलो.

डेझी जोन्सबद्दल इतकी चर्चा केल्याने गेल्या विकांताला A Star is Born बघितला.
सुरवात भारी वाटली. प्रेक्षकांचा दंगा, गिटार ट्यून करणे, ड्रग्ज, दारू, स्टेजवर जाणे, ढणढण गिटार बडवायला चालू करणे. 'थिएटरमधे बघायला हवा होता, डॉल्बीमुळे मस्त वाटलं असतं' ही पहिली भावना.
गाणे चालू झाले की थोड्या वेळाने 'च्छे! आपण तिथे प्रेक्षकांतच असायला हवं होतं. गोथिक मेकअप आणि वीड वगैरे पित. म्हणजे अजूनच मस्त वाटलं असतं!' ही भावना.
आणि गाणे संपत आले की 'श्या! डोकं जड झालं. बरं झालं आपण तिथे नाहीय, नाहीतर गर्दीमधे चेंगरचेंगरी चालू होईल का या भीतीने हार्टअटॅक आला असता' ही भावना.
ड्रग्ज, दारू, सेक्स आणि रॉक&रोल यांच्या परिणामाचा क्रम हाच असतो Lol Lol

एनिवे लऊष्टुरी असल्याने आणि आशिकी २ बघितला असल्याने चित्रपट एवढा काही खास वाटला नाही. पहिल्या अर्ध्यातली गाणी चांगली आहेत. लेडी गागाचे चित्रविचित्र पोशाखातले फोटोच बघितले होते आतापर्यंत, गाणं कधी ऐकलं नव्हतं. तिचे नाक खरेच तसे असेल आणि प्लास्टिक सर्जरी न करता जर ती एवढी यशस्वी झाली असेल तर मानलं ब्वा तिला! ब्रॅडले कूपर मला एवढा रिप्लसीव का वाटतो याबद्दल विचार करायचा प्रयत्न थोडा वेळ केला, उत्तर मिळेना म्हणून नाद सोडून दिला.

युट्युबवर सहज सापडला म्हणून १९३७ सालचा A Star is Born देखील बघायला चालू केला. कंटाळा आल्याने एक तास बघून सोडून दिला...

Circe पुस्तकावर बेतलेली मालिका बनतेय.

20 Best True Crime Books of All Time ट्रू क्राईम पुस्तकात कोणाला रुची असल्यास.

The Dark History Behind the Year’s Bestselling Debut Novel Where the Crawdads Sing सुपरडुपर हिट झाले आहे त्याबद्दलचा लेख. पुस्तक आणि लेख दोन्ही मी वाचलं नाहीय.

Get Out of Your Reading Rut with Mystery's Rising Stars नवलेखकांच्या रहस्यकथा शिफारसी.
मी सध्या इथूनच मिळलेल The Last Mrs Parrish वाचतेय.
आणि Animal Farm आणि Its Kind of a Funny Story देखील वाचतेय.

मिस्ट्री रायजिंग स्टारच्या लिस्ट मधील रायली सेगरचं फायनल गर्ल्स वाचलं आहे, भारी होतं, दोन मोठे ट्विस्ट आहेत, मला एक ओळखता आला होता, पण दुसरा ट्विस्ट चांगला आहे, विषय चांगला आहे, पण मांडणी संथ होती, वाचताना बोअर झालं, एकतर जॉनर मिस्ट्री आहे, त्यात एवढी पानं, मी मध्येच सोडून देणार होतो, पण त्या दोन ट्विस्टसाठी पूर्ण पुस्तकं वाचलं. वाचून झाल्यावर वाटलं की मधली पन्नास साठ पानं सोडून दिली असती तरी पुस्तकं कळलं असतं.

मग लास्ट टाईम आय लाय वाचायला घेतलं, पन्नास एक पानं वाचालं, पण कंटाळा आला, हा लेखक चांगला आहे, पण एवढी पानं का घेतो?

त्याचं तिसरं पुस्तकं लॉक एव्हरी डोअर गाजत आहेत, चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, पण लहान बहिणीचं लग्न आहे त्यामुळे, मला हे पुस्तकं विकत घेता आलं नाही, तरी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, त्या दानशूर लोकांना बहिणीच्या लग्नाला नक्की बोलवेन.

आज लय कंटाळा येऊन राहिला होता, असाच बसलो होतो, तेवढ्यात नोलन यांच्या टेनंटचं टीजर बाहेर आलं, ते बघून उडालोच, ते काय म्हणतात ते, आय जास्त लॉस्ट माय शीट!! अरे आत्ताच तर शूटिंग सुरु झालं होतं, टिझर कसं काय आलं? ते पण एवढं भारी आहे, टीजरचं म्युजिक ऐकून शहारे अन गुजबम्प्स एकत्र आले, आय एम सोल्ड ऑलरेडी.

ट्विटरवर टीजर बघायला मिळेल, इन्स्टावर अजून आलं नाही.

हो Final Girls बद्दल पूर्वी बोलणं झालंय आपलं, मी Last Time I Lied वाचलं होतं तेव्हा.
Lock Every Door बद्दल मीपण चांगलच ऐकतेय.

सध्या चर्चेत असलेली इतर पुस्तकं म्हणजे Summer of 69, City of Girls आणि Mrs Everything ( या शेवटच्या दोन्हीचा उल्लेख मी केलाय पूर्वी).

> पण लहान बहिणीचं लग्न आहे त्यामुळे, मला हे पुस्तकं विकत घेता आलं नाही, तरी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, त्या दानशूर लोकांना बहिणीच्या लग्नाला नक्की बोलवेन. > चुक्चुक लहान भावाचे शिक्षण, लहान बहिणीचं लग्न, कित्तीकित्ती जबाबदाऱ्या असतात ना मोठ्या भावाच्या खांद्यावर Lol Lol
(एकुलताएक आहेस वाटतं तू :-P)
===

Animal Farm वाचून झालं. जबरा आहे पुस्तक. अगदी भारतातली वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली असेल जाणवत होतं आणि पुढेपुढेतर नेपोलियच्या सत्तेत आणि मोदुकाकामधेच साम्य दिसायला लागलं!
आता गुडरीड्सवरचे रिव्ह्यू वाचतेय. या अशा क्लासिक पुस्तकांचे चांगले अनालिसिस करणारी कुठली साईट माहित आहे का?
===

विकांताला Big Little Lies 2 बघायचा विचार आहे.

Animal Farm वाचून झालं. जबरा आहे पुस्तक. अगदी भारतातली वर्णव्यवस्था कशी निर्माण झाली असेल जाणवत होतं आणि पुढेपुढेतर नेपोलियच्या सत्तेत आणि मोदुकाकामधेच साम्य दिसायला लागलं!
>>>>> १९८४ वाचा मग सगळंच स्पष्ट होईल

कित्तीकित्ती जबाबदाऱ्या असतात ना मोठ्या भावाच्या खांद्यावर<<<<<<
त्यामुळेच या वयात खांदे दुखी झालीय, काय करणार. आम्हाला वाटलं बहीण पळून जाऊन लग्न करेल, तीन चार वेळा तिला सैराट पण दाखवला होता, कुठून तिने तो दि वेडिंग काय तो पिक्चर बघितला, काय माहित? अन आता मोठं लग्न हवंय असं म्हणतेय.
असो

बझ बझ करणारी पुस्तकं
सासू
टर्न ऑफ द की

मी अफवा वाचून राहिलोय, अर्ध वाचून झालंय, एवढं काय भारी नाहीये पण स्वस्त होतं म्हणून वाचायला घेतलं, अर्ध झालंय तर पूर्ण वाचून टाकेन

नेटफ्लिक्स वर गुरिंदर चढाच्या 'बिचम हाऊस' सिरीजचा सीझन 1 पाहिला आणि आवडला. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सोडून एक ब्रिटिशमन दिल्लीमध्ये हवेली खरेदी करतो आणि आपलं छोटं बाळ आणि नोकरांचा ताफा घेऊन रहायला येतो. त्याने ईस्ट इंडिया कंपनीचे स्थानिकांवर होणारे अत्याचार सहन न होऊन नोकरी सोडलेली असते. थोडक्यात तो संवेदनशील भावनाशील व्यक्ती दाखवला आहे. आपल्या हिंदी नोकरांना respectfully वागवतो. त्या बीचम हाऊस मधली प्रेम, निष्ठा, बहादुरी, विश्वासघात, रहस्य, यांच्याबरोबरच त्या काळातील इंग्रज आणि हिंदुस्थानी नातेसंबंध छान दाखवला आहे. इंग्लिश वेब सिरीज असल्यामुळे सगळे स्वयंपाकी, नोकर, आया, सुरक्षा रक्षक सुद्धा इंग्लिश बोलतात हे जरा (मला) पहाताना विचित्र वाटलं. पण एकुणात सिरियल ठिकठिक आहे. रहस्य फार भारी नाही आणि फार ताणलं पण नाहीए. कथा चांगली आहे. ब्रिटीश आणि NRI मिळून अभिनेत्यांचा संच चांगला आहे. पिळगावकरांच्या श्रेयाला लांबीचा रोल मिळाला आहे आणि तिने तो चांगला निभावला आहे. फक्त भारतीय स्त्रियांचे कॉस्च्युम्स थोडे गडबड वाटले. फक्त नोकर नाही तर उच्च राजघराण्यातील स्त्रिया पण घागरा पोलका घातल्यावर पुढचा भाग झाकत नाहीत हे पटलं नाही. म्हणजे डोक्यावर ओढणी पण पुढे ब्लाउज कव्हर केला नाही. राजघराण्यातील स्त्रीचे पण पोट आणि मुख्य ब्लाउज दिसतो.

सिझन 1 एका ट्वीस्टला संपला. पण मला तरी पुढे काय अशी तगमग होत नाहीए. पुढचा सिझन बघणार मात्र नक्की.

ज्यांना (काल्पनिकच का होईना) इतिहास आणि तेव्हाचा समाज आणि आपसात संबंध पहायला आवडत असेल त्यांनी पहा.

Pages