इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक छानशी बायको हवी, दोन गोडगोड मुलं - एक मुलगा एक मुलगी हवेत, उपनगरात छोटेसे टुमदार घर आणि अंगणात मुलांसाठी खेळायला बेसबॉल हूप किंवा स्विमिंगपूल
∆ कित्ती गुई रोमँटिक विचारांचा पुरुष वाटतोय ना हा? पण रॉबिन-स्टेलासारख्या मुलीसाठी हा पूर्ण क्रिपी फ्रिक आहे
TOP 5 REASONS TED MOSBY IS THE WORST

This is a person who is in love with the idea of love and will attempt to fit you into a mold that they have already made for their life. In fact, Ted is CONSTANTLY re-imagining Robin as wanting to get married and have kids (see various fantasies), or pushing her into changing anything he’s not a big fan of (her career ambition, her guns, smoking etc).

This is not a journey of a hopeless romantic trying to find “the one”. This is the revenge fantasy of a man who got turned down by a woman and decided to devise a story where he found another woman who gave him everything he wanted, for long enough to make the first woman miserable and sad and jealous for years until he finally rescues her from her tower.

===
The Most Read Books on Goodreads in June

The 10 best books of 2019 so far, according to Amazon

गुदरीडसच्या लिस्ट मध्ये लिटल फायर एव्हरिव्हेअर परत सामील झालं, यावर सिरीज येणार कळल्यावर बऱ्याच लोकांनी वाचायला सुरवात केली असणार.

दोन पुस्तकं वाचत आहे, ऑल युअर परफेक्टस आणि रिकर्जन. यात, ऑल युअर परफेक्ट एवढं काय आवडलं नाही, माझ्या एकंदरीत आयुष्यात भरपूर रोमान्स असल्यामुळे या पुस्तकातला रोमान्स वाचायचा कंटाळा आला असावा, पण शंभर एक पान वाचायची राहून गेली आहेत, या पुस्तकात कोणी कोणाचा खून केलं, कोणी मेलं तर वाचायला मजा येईल.

रिकर्जन चांगलं आहे, अनेक ट्विस्ट आहेत, काही ट्विस्ट डोक्यावरून गेले, म्हणून परत नीट वाचत होतो, वाचून झालं नाही, पण पुस्तक आवडलं..

हो नेटफ्लिक्सवाले म्हणाले "व्हेन दे सी अस" सर्वात जास्त प्रेक्षक मिळाले, आधी बर्ड बॉक्स सिनेमाला मिळाले होते, त्याचं रेकॉर्ड या सिरीजने मोडले. आता या वर्षी एमी अवॉर्ड्स मध्ये लिमिटेड सिरीज विभागात या सिरीजला आणि एचबीओच्या चर्नोबिलला नॉमिनेशन मिळेल.

> अँमी च्या टेड खूपच डोक्यात गेलेला दिसतोय ☺️> हो Lol
===

जिद्दू, चैतन्य,
हो When they see us आणि Chernobyl बद्दल भरपूर चांगलं ऐकतेय. बघेन.
===

चैतन्य,
ते All your perfects सोडून दे वाचायचं. रोमान्सवर एवढा प्रयत्न, वेळ घालवण्यात अर्थ नाही.

मी Normal People डाउनलोड केलं.
City of Girls आणि Mrs Everything या नावांकडे लक्ष ठेऊन आहे.

नॉर्मल पीपल पुस्तकाची समीक्षा वाचत होतो, हे पण रोमान्स अँड ऑल, काव्यात्मक आहे असं वाटलं. मला आठवतंय की, कुठल्यातरी महिन्यात बुक ऑफ द मंथ होतं.

सिटी ऑफ गर्ल्स तर आत्ता मागच्या आठवड्यात आलंय, पुस्तकाचा सारांश वाचल्यावर, बर्डमॅन सिनेमाची आठवण झाली, कसला भारी पिक्चर होता यार, दोन तीन वेळा बघितला होता. बर्डमॅन सिनेमा सुद्धा थिएटर संबंधित होता, तो गाजला, पण या विषयावर म्हणावं तसं साहित्य, चित्रपट आले नाहीत. आता वाटतंय या पुस्तकावर टीव्ही सिरीज येऊ शकते.

Genres: Coming-of-Age Fiction and Psychological Fiction <- हे असं दिसल्याने मी डाउनलोड केलं.

विकीपीडिया सांगतंय
The novel was longlisted for the 2018 Man Booker Prize. It was voted as the 2018 Waterstones' Book of the Year, and won 'Best Novel' at the 2018 Costa Book Awards. In 2019, it was longlisted for the Women’s Prize for fiction.

TV Series
On May 30, 2019, it was announced that a TV series based on the novel will premiere in 2020.

काव्यात्मक वगैरे असेल तर झेपणार नाही बहुतेक. बघू...

आज, ऍमेझॉनवर किंडल अनलिमिटेड सर्व्हिस ५९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, या सर्व्हिसमध्ये बरीच मराठी व इंग्रजी चांगली पुस्तके मोफत वाचायला मिळतात.

मला ते काय जमेना करायला .
हा मेसेज दाखवतय Kindle Unlimited on Amazon.in is available only to Indian customers. Visit www.amazon.in/mycd on your browser to update your Country/Region setting ज्यासाठी amazon.com वर लॉगिन करा म्हणतंय पण आपण तर .in वर आहोत Uhoh

मला ही ऑफर किंडल ऍप मिळाली, तुम्ही मोबाईलवर किंडल ऍप इन्स्टॉल करा, त्यात लॉगिन करून ऑफर मिळवा

बहुतेक तुम्ही व्हीपीएन का काय ते वापरता का, त्यामुळे ब्राउजरच्या कंट्री सेटिंग्ज बदलतात, व्हीपीएन काढून बघा, ऍमेझॉन इंडियावरच ही ऑफर मिळेल,

मोबाइलला पण तोच प्रॉब्लेम येतोय. आता शॉपिंग आणि प्राईम व्हिडीओ तर बरोबर चालताहेत. आयपॅड ऍप् वर तर काहीच होत नाहीये .

आज मी डार्क वेब वर काम करतोय त्यामुळे संध्याकाळी कुकीस, रजिस्त्री आणि dns ऍड्रेस वगैरे सॉर्ट करून ट्राय करेल. पण मोबाईलवर व्हायला हवं होत.

Toy Story 4

आताच डार्कचा दुसरा सीजन संपवला. हि सिरीज एवढी क्लिष्ट आहे कि काल पहिला सीजन पाहावा लागला कारण दोन वर्षात सगळे दुवे विसरून गेलो. माझ्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम लिस्ट मध्ये हिला मी स्थान देणार.
संध्याकाळी नारायण धारप यांच्या पेशन्ट ३०२ या कथेवर आधारित रकखोश का रकहोश असा काहीतरी सिनेमा आलाय नेटफ्लिक्स वर ; तो पाहायचा विचार आहे. धारप यांना मृत्यूत्तोर चांगला काळ आलाय.

Normal People वाचून झालं. प्रेमकथा आहे, रोमान्स नाही. शेवटचा ३०% भाग चांगला आहे असे लिहणार होते पण शेवटच्या धड्याने मला चांगलंच गोंधळात पाडलंय. त्यामुळे
Five Months Later (DECEMBER 2013)
Three Months Later (MARCH 2014) हे दोन धडे वाचण्यासारखे आहेत एवढंच लिहते. या पुस्तकाला Psychological Fiction का म्हणलंय हे या दोन धड्यात कळतं.

आता गुडरीड्सवरचे रिव्ह्यू वाचते.
===

सहामाही होत आलीय तर गुडरीड्स चॅलेंजचा आढावा घ्यायला हवा.
जानेवारीत २४ च चॅलेंज घेतलेले. ते कधीतरी वाढवून ३० वर नेलेलं. एक काळ असा होता कि मी ४-५ पुस्तक पुढे होते पण नंतर वाचनस्लम्प आला आणि मी आता केवळ १ पुस्तक पुढे आहे.

महिन्याला १००० पानं वाचायची ठरवलेले त्यात ३५० पानं मागे पडलेय.
===

आणि हो HIMYM आता बहुतेक पाचव्यांदा बघतेय Lol

१. डार्कच्या पहिल्या सीजनचे तीन चार एपिसोड बघतिले होते, चांगले होते, आवडतं पण होतं, जर्मन जीवनशैली बघायला मिळत होती, त्यात तो मुलगा असा मस्त, मोकळ्या शांत रस्तावरुन, सायकलिंग करत जायचा, असे मस्त टॉप अँगलने घेतलेले शॉट्स बघायला भारी वाटायचे. सिरीजची संकल्पना पण छान आहे, पण.... ही सिरीज पूर्ण बघू शकलो नाही.. खंत वाटते.

२. वेस्टवर्ल्ड भारी आहे यार.. लेखन खूप प्रभावशाली, काळाच्या पलीकडे जाणारं आहे.
कातिल डायलॉग आहेत.
यू आर नॉट रिअल...
डज इट मॅटर?
असले अरारा सवांद आहेत
जर काही एपिसोड कळत नसतील तर त्या एपिसोडचं समीक्षण इंडिवायर.कॉम वर वाचावे. त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत.

३. मुळात माझ्या वाचनाचा वेग अफाट आहे, त्यामुळे गेले तीस दिवस साडेतीनशे पानाचं पुस्तक संपवण्याचा प्रयत्न करत आहे, आता फायनली माय लव्हली वाईफ वाचत आहे, पुस्तकं आवडलं आहे, लवकरच वाचून व्हावं, ही ईश्वरचरणी सदिच्छा

डीडी आणि जिप्सी रोज या आईमुलीच्या सत्यघटनेवर आधारित The Act ही मालिका बघतेय. ठिकठिक आहे. अभिनय चांगला केलाय दोघींनी.
Hulu’s The Act is hard to watch. That’s the point.
Patricia Arquette and Joey King Are a Gripping Double Act
===

The Best Movie Adaptations Of Stephen King Books, Ranked

What I Learned After Watching Eyes Wide Shut 100 Times हा लेख नक्की वाचा.

Frankenstein, Gender, and Mother Nature आणि हेपण नक्की वाचा.
===

The Most Read Books of the 2019 Reading Challenge २० पैकी मी ११ वाचलेत म्हणजे ठीक आहे.

बाकी आता सध्या मी The Hunting Party वाचायला चालू केलं आहे. आणि Normal Peopleला गुडरिड्सवर बऱ्याच सर्वसामान्य लोकांनी वाईट म्हणलं आहे त्यामुळे Lol

१. गुड रिड्सच्या यादीत मी वाचलेली तीनच पुस्तकं आहेत, अरे काय हे? कुठे नेऊन ठेवलं आहे माझं गुडरीडस?

२. जेन डो वाचतोय, सूड कथा आहे, पण कसलं मस्त विनोदी आहे, नायिका खूप सारकॅस्टिक आहे, वाचायला मजा येते, काल मध्यरात्री पुस्तक वाचताना एकटाच हसत बसलो होतो, त्यामुळे आईने देवासमोर जाऊन दिवा लावला, आता मोठ्याने हसता येत नाहीये..

ही दोन्ही पुस्तकं, अर्धीच वाचून झाली आहेत, आता मधूनच जेन डो वाचायला घेतलं, आता ते आवडतंय, बहुतेक एक दोन दिवसात पूर्ण वाचून होईल

मी डेझी जोन्स अँड द सिक्स वाचत आहे. सुरुवात चांगली होती पण आता बोअर होतंय, तरी पूर्ण करेन.
एमी तू लिटल फायर्स वाचलं की नाही अजून?
Netflix वर murder mystery बघितला. टाईमपास वन टाइम बघायला चांगला आहे. Jennifer aniston त्यात रेचेलच्याच बेअरिंग मध्ये वावरत होती असं वाटलं. पण ओव्हरऑल ठीक आहे मुव्ही.
मला अजून बुक्स सुचवा.

लिटल फायर्स नाही वाचलं अजून, पण मालिका यायच्या आधी नक्की वाचेन.

मी वाचलेल्यापैकी Verity वाचलंय का तू? ते वाचून झाले असेल तर मग The Dry वाच.
त्याखेरीज मी वाचले नाहीत पण सध्या इतर भरपूर लोकं वाचतायत अशी पुस्तकं म्हणजे Gentleman in Moscow, Great Alone, Nightingale आणि Where Crawdads sing.

बाकी Big Little Lies 2 बघतेयस का तू?कसं आहे?

१. 'लागिरं झालं जी' सीरिअल संपल्यावर मनात मोठी पोकळी निर्माण झाली होती, ही पोकळी काही केल्या भरत नव्हती, मग एका भर पहाटे, पाऊस पडत असताना मी जेन डो नावाचं पुस्तक वाचायला सुरुवात केली, या नॉव्हेलमुळे ही पोकळी काही अंश का होईना पण भरली असं म्हणता येईल.

२. लहानपणी माझ्या वाचनाचा वेग संथ होता, अजूनही संथच आहे, पण फायनली अडीशे पानांचं पुस्तक सहा सात दिवसात वाचून पूर्ण झालं. पुस्तकं मजेशीर आहे, सरळ साधं कथानक आहे, कुठे प्लॉट ट्विस्ट नाही, कथानक मध्ये पुढे काय होईल याचा अंदाज करता येतो, अंदाज खरा ही ठरतो.

३. विनोदी सूड कथा आहे, या कथेतील नायिकेला सूड घ्यायचा आहे, ज्याच्यावर सूड घ्यायचा आहे, त्याच्यावर बरेच विनोद केले आहेत. आधी असं काही वाचलं नव्हतं , मला यातल्या रूड, खडबडीत, अनपेक्षित विनोदामुळे हे पुस्तकं आवडलं. पण हा विनोद सूड भावनेला धरून आहे, सूड आणि विनोद या दोन्ही टोकाच्या भावना वाटतात, पण इथे दोन्ही भावना एकत्र येतात

४. हे पुस्तक वाचताना काईन्ड ऑफ वर्थ किलिंग आठवण झाली, दोन्ही पुस्तकांमधल्या नायिकांमध्ये साम्य आहे, पण इथे जेन डो विनोदी आहे.

५. या पुस्तकाचा पुढचा भाग पुढच्या वर्षी येईल, नाट्यमय असं काही नाहीये, कथानकाचा जीव कमी आहे, क्लीशे आहे, त्यामुळे यावर सिरीज येणार नाही.

Verity, Jane Doe, where crawdads sang घेते लिस्टमध्ये. The silent patient पण आहे माझ्या लिस्टमध्ये.
Big little lies मी पहिला सीझन पण बघितला नाहीये. पुस्तक वाचलं आहे ते पूर्वी.
पालक कर्तव्य म्हणून टॉयस्टोरी ४ बघितला. छान आहे.

The Act जर ६ भागांच असलं असतं तर 'नक्की बघा' म्हणाले असते, पण ८ भागांच असल्याने फक्त 'बघा' असे म्हणेन. मला १, २ आणि ५वा भाग फार आवडले. Patricia Arquette ने फारच चांगला अभिनय केला आहे. पहिल्यांदाच बघितलं हिला. आता अजून माहिती काढते.
या केसचा जोकाही निकाल लागला तो पटला नाही. मेलोड्रॅमॅटिक आहे असे ऐकले असूनही Mommy's Dead and Dearest (लगेच नाही पण) बघणार आहे.
===

The Hunting Party ठिकठिक आहे. यानंतर काय वाचू अजून ठरवले नाही.

Pages