फ्रेंड्सचे काही काही एपिसोड्स मलाही तोचतोचपणा आल्यामुळे बोअर होतात. काही काही मात्र भन्नाट.
त्यापेक्षा एव्हरिबडी लव्ह्ज रेमंड आवडलं होतं मला. फ्रेश वाटलं होतं आणि जरा विषयांमध्ये विविधता होती.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या डार्क या जर्मन सिरीजचा दुसरा भाग २१ जूनला येतोय . मला हि सिरीज फार आवडली. जुलै मध्ये स्ट्रेन्जर थिंग्स चा तिसरा सीजन येतोय . सर्वात जास्त उत्सुकता रिक अँड मॉर्टीची आहे पण त्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार
twin peaks सिरीज आवडली का इथं कुणाला ?
आय अडोर ओल्ड ट्विन पिक्स. फारच भारी सीरिज होती. या सिरीजची ब्लू रे डिस्क विकत घ्यावी असं वाटतं.
लहानपणी डेविड लिंचचा फॅन होतो, त्याचे जवळ जवळ सगळे चित्रपट बघून काढले होते, ही सिरीज सुद्धा चित्रपटा सारखी विचित्र असेल या आशेने बघायला सुरुवात केली, सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या. या सिरीज सारखं विचित्र, भन्नाट, अनपेक्षित काहीतरी लिहावं असं सारखं वाटतं.
विचित्र पण लॉजिकल काही बघायचं असेल तर ट्वीन पिक्स (जूनी) सिरीज बघावी.
चैतन्य रासकर आपल्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. आजपर्यंत पाहिलेल्या सर्वांत हा एकच शो शेवट्पर्यंत मनात घर करून राहील . तुम्ही या शो ला उलगडून दाखवणारा धागा काढा . मजा येईल वाचायला
चॉपस्टिक चित्रपट बघितला, नेटफ्लिक्सने केला आहे, पण मला डिज़्नीचा वाटला, कुटूंबासोबत बघता येईल पण बघू नये, कशाला उगाच. यात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाकचा उत्तराध. इथे आपली हीरॉईन व्हिलन समोर जाते अन म्हणते की असं नको करुस, मला त्रास झाला. व्हिलन म्हणतो ठीके ताई.. तू म्हणतेस तसं करू. अरे पण असं कसं? गब्बर म्हणाला असता, मी सगळ्यांना फार त्रास दिला आता परमार्थाच्या मार्गाला लागतो, तर चाललं असतं का?
चॉपस्टिक चित्रपटाची पुण्यात एवढी पोस्टर लावून ठेवली आहेत, पार चतु:शॄंगीच्या समोरचं मोठं पोस्टर लावलेलं आहे. पण एकाही पोस्टरवर चॉपस्टिक नसावं, का? मुळात नावाचा पोस्टरशी संबंध असावा का? किंवा किती असावा? यावर धागा निघायला हवा.
हा चित्रपट विनोदी असावा का? चित्रपट बघताना अधून मधून असा प्रश्न पडतो.
एक तो सिन आहे.. त्यात हिरो येतो, एका मिनिटात, दोन तास चालू असलेली राजकीय मिरवणूक थांबवतो. बाबो.. एवढे पावसाळे बघितले, असला काही चमत्कार बघितला नव्हता.
हिरो लय टीपीकल, कूल अँड ऑल. हिरोईन एकदम साधी अँड बावळट, असं किती दिवस चालणार? दोघेही बावळट दाखवता आले असते.
आशय रासकर
चैतन्यचा लहान भाऊ
(लाडाने अतिशय म्हणतात)
Submitted by चैतन्य रासकर on 10 June, 2019 - 03:33
हाऊ टू सेल ड्रग्ज ऑनलाईन (फास्ट) जर्मन सिरीज नेटफ्लिक्स बघत आहे, चार पाच एपिसोड बघून झाले. सिरीज चांगली आहे, स्क्रीन तोड ट्विस्ट नाहीत पण लेखन छान आहे, सिरीज बघताना ब्रेकिंग बॅडची आठवण होत होती.
यात गाय रिची शैलीचे फास्ट कट्स वापरलेले आहेत, कथानकाला साजेशे वाटतात, जर्मन तरुणाईचे आयुष्य बघायला मिळतं, ही पोरं आरामात राहतात, हे बघून आपलं आयुष्य फार कष्टात गेलं, असं वाटलं
तंत्रज्ञान आणि तरुणाई त्याचा वापर कसा करते याचं उत्तम चित्रीकरण दाखवलं आहे. पूर्ण सिरीज बघेन.
Submitted by चैतन्य रासकर on 11 June, 2019 - 09:41
सिरीज पाहिली आणि चांगली जमलीये
पण हाच तो चैतन्य रासकर असेल तर वरच कोण आहे मग ?
बायदवे चेर्नोबिल पाहिली का तुम्ही ? खरोखर अप्रतिम झालीय. या घटनेवरची जेवढी चांगली पुस्तके मी वाचली होती त्यातील सर्व बारकावे दाखवलेत त्यांनी
ब्लेक क्राउच यांचं "डार्क मॅटर" पुस्तकं मस्त होतं, ते पुस्तकं हार्डकव्हर एडिशन मध्ये विकत घेऊन, त्याच्यापुढे दिवा लावावा एवढं आवडलं होतं. काल परवा, ब्लेक क्राउच यांचं नवीन पुस्तकं "रिकर्जन" प्रकाशित झालं, या पुस्तकाचा विषय फाल्स मेमरी सिन्ड्रोम असा आहे. म्हणजे, आपल्या स्वतःच्या आठवणी या खोट्या आहेत, असं काही भूतकाळात घडलंच नाही, इतक्या अतर्क्य संकल्पनेवर हे नवीन पुस्तकं आधारित आहे. मी लगेच फ्रीवाले चॅप्टर वाचून काढले, नवीन पुस्तकाची शैली डार्क मॅटर पुस्तकासारखी वेगवान आहे. खरं तर या नवीन पुस्तकाचं पेपरबॅग एडिशन घ्यायचं होतं, पण ते हजार रुपयाला आहे, मी विकत घेणार होतो, पण लहान भावाच्या ऍडमिशनला खूप पैसे लागले, त्यामुळे आता शिवणकाम करून बाकीचे
पैसे कमवत आहे.
मनापासून विनंती करतो की कृपया दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अगदी पन्नास साथ रुपये पेटीएमवर पाठवावेत, कारण गूगलपे, फोनपे माझ्याकडे नाहीये. हे पैसे फक्त पुस्तक घेण्यासाठी वापरले जातील, तसं रीतसर बिल पाठवले जाईल. ज्यांना मदत करायची असेल त्यांनी संपर्क साधावा.
Submitted by चैतन्य रासकर on 13 June, 2019 - 07:54
चैतन्य
शिवणकामासोबतच तू वाती वळणे आणि पापड बनवून विकणे वगैरे काम का चालू करत नाहीस? पुस्तकासाठी पैसे मिळतीलच + तुझ्या नातवंडांना भविष्यात तुझ्याबद्दल निबंध लिहता येईल.
मी HIMYM परत सुरवातीपासून तुकड्यातुकड्यात बघायला चालू केलं. कंट्रोल राईट ऍरो दाबत एकेक मिनिट पुढे जायचं, बार्नी-रॉबिन दोघेही दिसले की थांबायच, तो सीन बघायचा, परत कंट्रोल रा ऍ.
नील पॅट्रिक हॅरिसच्या पूर्ण प्रेमात <3. याआधी मी त्याला फक्त Gone Girl मधे बघितलं होतं. क्रिपी~~ त्यामुळे गेल्यावेळी HIMYM चे पहिले एकदोन सिझन त्याच्याशी वॉर्मअप होण्यामधेच गेले होते.
फिनाले फारच भंगार होता, बार्नीला परत पहिल्या सारखा का करून टाकला? अरे तुम्ही आख्खा सीजन त्याला चांगला करण्यात घालवला, एका एपिसोड लगेच सगळं बदललं. बाकी शेवटी टेड परत रॉबिन कडेच जातो, अरे पण का? तुमचं ब्रेकअप झालं असेल तर मूव्ह ऑन, नवीन नाती जोडा, भूतकाळात राहून काय हशील? टेड शेवटी रॉबिनकडेच जाणं, डोक्यात गेलं. उलट "मास्टर ऑफ नन" च्या दुसऱ्या सीजन मध्ये नात्यातील गुंता हळुवारपणे दाखवला आहे. त्या सिरीजच लेखन अप्रतिम आहे. जाणकारांनी बघावी.
आजकालच्या तरुण पिढीचा हाच प्रॉब्लेम आहे, नाती जोडता येतात, पण नातं नाहीस झाल्यावर काय करावं हे माहित नाही. मुळात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या संकल्पना परदेशातून आपल्याकडे आल्या, आपल्याकडे असं काही नव्हतं आपल्याकडे थेट बालविवाह होता, नातं फुलल्यावर काय करायचं हे माहित होतं पण ते कोमजल्यावर काय करावं हे तिकडेही अन इकडेही माहित नाही. त्यामुळे खरा प्रॉब्लेम बेरोजगारी नसून, ब्रेकअप हा आहे. हे पडताळून पाहायचं असेल तर अर्जित सिंगने गायलेली किती आनंदी गाणी प्रसिद्ध झाली? हे बघायला हवं.
असो, मला उश्यांचे अभ्रे शिवून द्यायची ऑर्डर मिळाली आहे. आमच्याकडे उश्यांचे अभ्रे धुवून, वाळवून, शिवून मिळतात. उशी मागे २० ते ३० रुपये घेतो. फक्त थेट उश्या कुरियर करू नयेत, फक्त अभ्रे करावेत
Submitted by चैतन्य रासकर on 14 June, 2019 - 02:18
चैतन्य प्लिज विपु करा. कधीच कापड आणून पडलंय. २० तरी कव्हर्स होतील. डिस्काउंट द्याल ना?
इथे लिहावं का नाही त्या विचारात होते, पण शेवटी राहवलं नाही. Blue is the warmest color बघितला. मूळ फ़्रेंच आहे, ज्यांना सेक्स दृश्ये अथवा पॉर्नची ऍलर्जी आहे, त्यांनी बघू नये. सॉफ्ट नव्हे, तर हार्ड पॉर्न या कॅटेगरीत हा चित्रपट जाईल. NC17 आहे.
ज्या पद्धतीने या चित्रपटात LGBTQ समूहाच्या भावना मांडल्या आहेत, त्या जबरदस्त. एका व्यक्तीची स्वतःची लैंगिकता काय आहे, हे जाणताना होणारी घुसमट, त्यानंतर प्रेमात वाहवत जाणं आणि शेवटी सत्याने खाडकन चपराक मारणं, अप्रतिम दाखवलंय.
तीन तासाचा चित्रपट आहे, सगळ्यांसाठी नाही, चित्रपट एका लयीत चालतो. ती संथ वगैरे नाही, पण ती लय धीरगंभीर जरूर आहे.
कुणी इथे बघितलं असेल, तर लिहावं जरूर!
<<< शिवणकामासोबतच तू वाती वळणे आणि पापड बनवून विकणे वगैरे काम का चालू करत नाहीस? पुस्तकासाठी पैसे मिळतीलच + तुझ्या नातवंडांना भविष्यात तुझ्याबद्दल निबंध लिहता येईल. >>>
Is this supposed to be funny? The comment is in poor taste, IMO
नेफिवर आज एक नवीन सिरीज आली आहे लैला नावाची. १९८४ ची आठवण यावी इतपत साम्य दिसत आहे. डायरेक्शन, अक्टिंग इत्यादी बाबतीत बरीच मागास वाटली पण सध्याचा काळ पाहता कधीही उडवलीही जाऊ शकेल त्याआधी पाहून घ्या.
पेज १० वाचलं. पुस्तक चांगलं असावं असं एकंदरीत मालिका आणि स्क्रीन प्ले वरून तरी वाटत आहे. वाचायला हवं. मालिका आजच रिलीज झाली आहे. अजुन चांगली बनवता आली असती असं वाटत होतं पाहत असताना.
फिनाले भंगार होताच.
खरंतर बार्नी-रॉबिन घटस्फोट घेतात, बार्नी परत स्त्रीलंपट होतो, त्याला मुलगी होते हेसगळे ठीकच आहे. शेवट नेहमी Happily everafter असलाच पाहिजे असं काही नाही.
पण माझ्या डोक्यात सगळ्यात जास्त काय गेलं असेल तर ते टेड परत ब्लु फ्रेंच हॉर्न घेऊन नाचतनाचत रॉबिनकडे जातो हे. आणि ती त्याच्याकडे हसून बघते?? ड्युड रॉबिनसारखी मुलगी तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीय! २५ वर्षात एवढी अक्कलदेखील आली नाही का तुला . रॉबिनसाठी एकतर बार्नी किंवा मार्शल-डॉनसारखे १८ वर्षांचा असल्यापासून एकाच मुलीसोबत राहिलेले पुरुषच ठीक आहेत. त्यांच्यासाठी खरोखरच The One असतं. हा टेड म्हणजे स्वतःबद्दल फार गैरसमजूती असलेला डफ्फर मनुष्य आहे. इडियट
बादवे बार्नी सिझन ३ च्या शेवटपासूनच बदलायला लागला होता. १९९८ मधे २३ वर्षांचा व्हर्जिन बार्नी वर्डपीस साठी काम करायला जाणार होता. गर्लफ्रेंड शॅननने धोका दिला म्हणून तो बदलला. हे आणि सूट, स्त्रीलंपट, गॅजेटजन्की वगैरे जेम्स बॉण्डसारखं आहे. तो जी छोटी छोटी निरीक्षण करतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो ते शेरलॉक होम्ससारखं आहे
बाकी I just wonder जर सिझन ५ मधे लिलीने बार्नी-रॉबिनला रूममधे कोंडून ठेऊन define your relationship वगैरे केलं नसतं आणि टेडने रॉबिन-१०१ क्लास घेतले नसते, ie वैयक्तीक नात्यात लुडबुड करू नये ही साधी मर्यादा न कळणाऱ्या सोकॉल्ड मित्रांनी interfere केलं नसतं तर बार्नी-रॉबिन हे नातं कसं प्रोग्रेस झालं असतं....
> तिने छोट्या गिटारवर गायलेलं ला वी एन रोज का काय ते फ्रेंच गाणं खूप आवडलं होतं. डोळ्यात थेट पाणीच होतं. > च्यक् नॉट माय टाईप
===
बाकी माझं The Chalk Man पुस्तक वाचून झालं. ठिकठिक आहे.
ब्लॅक मिररचा नवीन सीजन नेफ्लीवर बघतोय, यातले तीन नवीन एपिसोड बघून झाले. हे एपिसोडस अपेक्षेप्रमाणे छान, उत्तम, अस्सल, विचित्र आहेतच. पण तंत्रज्ञान व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हा या सीजनचा मूळ गाभा आहे.
जमेची बाजू म्हणजे, या एपिसोडस मध्ये हिंसा अन नग्नता याचा अतिरेक टाळला आहे, नाहीतर धक्कातंत्र किंवा लेखनाचा तोकडा प्रयत्न लपवण्यासाठी हिंसा अन नग्नता सर्रास दाखवली जाते, पण इथे असं होतं नाही. कथानकाची गरज म्हणून काही भाग दाखवला आहे, पण हा भाग लांबवला नाही. लेखन सशक्त आणि आपल्या विचारांच्या मर्यादांना पुसट करणारं आहे
काही वेगळं, छान, विचार करायला लावणारं बघायचं असेल तर.. ब्लॅक मिररचा हा नवीन सीजन जरूर बघावा
Submitted by चैतन्य रासकर on 18 June, 2019 - 03:02
फ्रेंड्सचे काही काही एपिसोड्स
फ्रेंड्सचे काही काही एपिसोड्स मलाही तोचतोचपणा आल्यामुळे बोअर होतात. काही काही मात्र भन्नाट.
त्यापेक्षा एव्हरिबडी लव्ह्ज रेमंड आवडलं होतं मला. फ्रेश वाटलं होतं आणि जरा विषयांमध्ये विविधता होती.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या
दोन वर्षांपूर्वी आलेल्या डार्क या जर्मन सिरीजचा दुसरा भाग २१ जूनला येतोय . मला हि सिरीज फार आवडली. जुलै मध्ये स्ट्रेन्जर थिंग्स चा तिसरा सीजन येतोय . सर्वात जास्त उत्सुकता रिक अँड मॉर्टीची आहे पण त्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार
twin peaks सिरीज आवडली का इथं कुणाला ?
आय अडोर ओल्ड ट्विन पिक्स.
आय अडोर ओल्ड ट्विन पिक्स. फारच भारी सीरिज होती. या सिरीजची ब्लू रे डिस्क विकत घ्यावी असं वाटतं.
लहानपणी डेविड लिंचचा फॅन होतो, त्याचे जवळ जवळ सगळे चित्रपट बघून काढले होते, ही सिरीज सुद्धा चित्रपटा सारखी विचित्र असेल या आशेने बघायला सुरुवात केली, सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या. या सिरीज सारखं विचित्र, भन्नाट, अनपेक्षित काहीतरी लिहावं असं सारखं वाटतं.
विचित्र पण लॉजिकल काही बघायचं असेल तर ट्वीन पिक्स (जूनी) सिरीज बघावी.
चैतन्य रासकर आपल्याच
चैतन्य रासकर आपल्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. आजपर्यंत पाहिलेल्या सर्वांत हा एकच शो शेवट्पर्यंत मनात घर करून राहील . तुम्ही या शो ला उलगडून दाखवणारा धागा काढा . मजा येईल वाचायला
सध्या मी ब्लॅकलिस्ट बघतेय .
सध्या मी ब्लॅकलिस्ट बघतेय . मला आवडतेय. रेडिंगटन झालेल्या जेम्स स्पेडरचा अभिनय उत्तम
जेम्स स्पेडरच्या अभिनयापेक्षा
जेम्स स्पेडरच्या अभिनयापेक्षा त्याचा आवाज ऐकण्याची चीज आहे...
प्रचंड depth असलेला हिप्नोटायझिंग आवाज!
चॉपस्टिक चित्रपट बघितला,
चॉपस्टिक चित्रपट बघितला, नेटफ्लिक्सने केला आहे, पण मला डिज़्नीचा वाटला, कुटूंबासोबत बघता येईल पण बघू नये, कशाला उगाच. यात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे कथानकाकचा उत्तराध. इथे आपली हीरॉईन व्हिलन समोर जाते अन म्हणते की असं नको करुस, मला त्रास झाला. व्हिलन म्हणतो ठीके ताई.. तू म्हणतेस तसं करू. अरे पण असं कसं? गब्बर म्हणाला असता, मी सगळ्यांना फार त्रास दिला आता परमार्थाच्या मार्गाला लागतो, तर चाललं असतं का?
चॉपस्टिक चित्रपटाची पुण्यात एवढी पोस्टर लावून ठेवली आहेत, पार चतु:शॄंगीच्या समोरचं मोठं पोस्टर लावलेलं आहे. पण एकाही पोस्टरवर चॉपस्टिक नसावं, का? मुळात नावाचा पोस्टरशी संबंध असावा का? किंवा किती असावा? यावर धागा निघायला हवा.
हा चित्रपट विनोदी असावा का? चित्रपट बघताना अधून मधून असा प्रश्न पडतो.
एक तो सिन आहे.. त्यात हिरो येतो, एका मिनिटात, दोन तास चालू असलेली राजकीय मिरवणूक थांबवतो. बाबो.. एवढे पावसाळे बघितले, असला काही चमत्कार बघितला नव्हता.
हिरो लय टीपीकल, कूल अँड ऑल. हिरोईन एकदम साधी अँड बावळट, असं किती दिवस चालणार? दोघेही बावळट दाखवता आले असते.
आशय रासकर
चैतन्यचा लहान भाऊ
(लाडाने अतिशय म्हणतात)
हाऊ टू सेल ड्रग्ज ऑनलाईन
हाऊ टू सेल ड्रग्ज ऑनलाईन (फास्ट) जर्मन सिरीज नेटफ्लिक्स बघत आहे, चार पाच एपिसोड बघून झाले. सिरीज चांगली आहे, स्क्रीन तोड ट्विस्ट नाहीत पण लेखन छान आहे, सिरीज बघताना ब्रेकिंग बॅडची आठवण होत होती.
यात गाय रिची शैलीचे फास्ट कट्स वापरलेले आहेत, कथानकाला साजेशे वाटतात, जर्मन तरुणाईचे आयुष्य बघायला मिळतं, ही पोरं आरामात राहतात, हे बघून आपलं आयुष्य फार कष्टात गेलं, असं वाटलं
तंत्रज्ञान आणि तरुणाई त्याचा वापर कसा करते याचं उत्तम चित्रीकरण दाखवलं आहे. पूर्ण सिरीज बघेन.
सिरीज पाहिली आणि चांगली
सिरीज पाहिली आणि चांगली जमलीये
पण हाच तो चैतन्य रासकर असेल तर वरच कोण आहे मग ?
बायदवे चेर्नोबिल पाहिली का तुम्ही ? खरोखर अप्रतिम झालीय. या घटनेवरची जेवढी चांगली पुस्तके मी वाचली होती त्यातील सर्व बारकावे दाखवलेत त्यांनी
@जिद्दु
@जिद्दु
चेर्नोबिलचे रिव्हियूज वाचले, रेटिंग बी भारी आलंय, एचबीओची आहे, इथेच टीव्हीवर बघेन.
गुड न्यूज
गुड न्यूज
लिटिल फायर एव्हरिव्हेअर पुस्तकावर हुलूवाले सिरीज काढत आहेत.
HIMYM बघायला सुरुवात केलीये.
HIMYM बघायला सुरुवात केलीये.
बाप रे , एवढं सगळं पाहायला
बाप रे , एवढं सगळं पाहायला तुम्हाला सलग वेळ कसा मिळतो?
मला तर काही काम नसतं आणि या
मला तर काही काम नसतं आणि या वयात थोडा निवांतपणा हवाच की नाही.. त्यामुळे सलग वेळ मिळाला नाही तरी यासाठी वेळ अलग काढून ठेवतो
मी तर एक वर्षापासून घरात पडीक
मी तर एक वर्षापासून घरात पडीक आहे ; बऱ्याचवेळा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो .
ब्लेक क्राउच डार्क मॅटर
ब्लेक क्राउच यांचं "डार्क मॅटर" पुस्तकं मस्त होतं, ते पुस्तकं हार्डकव्हर एडिशन मध्ये विकत घेऊन, त्याच्यापुढे दिवा लावावा एवढं आवडलं होतं. काल परवा, ब्लेक क्राउच यांचं नवीन पुस्तकं "रिकर्जन" प्रकाशित झालं, या पुस्तकाचा विषय फाल्स मेमरी सिन्ड्रोम असा आहे. म्हणजे, आपल्या स्वतःच्या आठवणी या खोट्या आहेत, असं काही भूतकाळात घडलंच नाही, इतक्या अतर्क्य संकल्पनेवर हे नवीन पुस्तकं आधारित आहे. मी लगेच फ्रीवाले चॅप्टर वाचून काढले, नवीन पुस्तकाची शैली डार्क मॅटर पुस्तकासारखी वेगवान आहे. खरं तर या नवीन पुस्तकाचं पेपरबॅग एडिशन घ्यायचं होतं, पण ते हजार रुपयाला आहे, मी विकत घेणार होतो, पण लहान भावाच्या ऍडमिशनला खूप पैसे लागले, त्यामुळे आता शिवणकाम करून बाकीचे
पैसे कमवत आहे.
मनापासून विनंती करतो की कृपया दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अगदी पन्नास साथ रुपये पेटीएमवर पाठवावेत, कारण गूगलपे, फोनपे माझ्याकडे नाहीये. हे पैसे फक्त पुस्तक घेण्यासाठी वापरले जातील, तसं रीतसर बिल पाठवले जाईल. ज्यांना मदत करायची असेल त्यांनी संपर्क साधावा.
चैतन्य
चैतन्य

शिवणकामासोबतच तू वाती वळणे आणि पापड बनवून विकणे वगैरे काम का चालू करत नाहीस? पुस्तकासाठी पैसे मिळतीलच + तुझ्या नातवंडांना भविष्यात तुझ्याबद्दल निबंध लिहता येईल.
मी HIMYM परत सुरवातीपासून
मी HIMYM परत सुरवातीपासून तुकड्यातुकड्यात बघायला चालू केलं. कंट्रोल राईट ऍरो दाबत एकेक मिनिट पुढे जायचं, बार्नी-रॉबिन दोघेही दिसले की थांबायच, तो सीन बघायचा, परत कंट्रोल रा ऍ.
नील पॅट्रिक हॅरिसच्या पूर्ण प्रेमात <3. याआधी मी त्याला फक्त Gone Girl मधे बघितलं होतं. क्रिपी~~ त्यामुळे गेल्यावेळी HIMYM चे पहिले एकदोन सिझन त्याच्याशी वॉर्मअप होण्यामधेच गेले होते.
गाणीदेखील डाउनलोड करून रिपीटमोडवर ऐकतेय.
Pixies - Hey (Live in studio 1988) हे झिंग आणणारे गाणे सगळ्यांनाच आवडेल असे नाही.
The Walkmen - Heaven (Official Music Video) व्हिडिओ जब्राट आहे याचा.
Bloc Party - This Modern Love (Instrumental) गायलेल्या ऐवजी हे केवळ सांगितिक छान आहे.
The Robin रॉबिन काय दिसलीय त्या ड्रेसमधे <3
Last Forever Intro Theme फिनालेमधला थोडाफार नोस्टलजिया (वाट लावून टाकायच्या आधीचा ;))
ॲमी on 14 June, 2019 - 11:18>
ॲमी on 14 June, 2019 - 11:18>>
फिनाले फारच भंगार होता,
फिनाले फारच भंगार होता, बार्नीला परत पहिल्या सारखा का करून टाकला? अरे तुम्ही आख्खा सीजन त्याला चांगला करण्यात घालवला, एका एपिसोड लगेच सगळं बदललं. बाकी शेवटी टेड परत रॉबिन कडेच जातो, अरे पण का? तुमचं ब्रेकअप झालं असेल तर मूव्ह ऑन, नवीन नाती जोडा, भूतकाळात राहून काय हशील? टेड शेवटी रॉबिनकडेच जाणं, डोक्यात गेलं. उलट "मास्टर ऑफ नन" च्या दुसऱ्या सीजन मध्ये नात्यातील गुंता हळुवारपणे दाखवला आहे. त्या सिरीजच लेखन अप्रतिम आहे. जाणकारांनी बघावी.
आजकालच्या तरुण पिढीचा हाच प्रॉब्लेम आहे, नाती जोडता येतात, पण नातं नाहीस झाल्यावर काय करावं हे माहित नाही. मुळात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या संकल्पना परदेशातून आपल्याकडे आल्या, आपल्याकडे असं काही नव्हतं आपल्याकडे थेट बालविवाह होता, नातं फुलल्यावर काय करायचं हे माहित होतं पण ते कोमजल्यावर काय करावं हे तिकडेही अन इकडेही माहित नाही. त्यामुळे खरा प्रॉब्लेम बेरोजगारी नसून, ब्रेकअप हा आहे. हे पडताळून पाहायचं असेल तर अर्जित सिंगने गायलेली किती आनंदी गाणी प्रसिद्ध झाली? हे बघायला हवं.
असो, मला उश्यांचे अभ्रे शिवून द्यायची ऑर्डर मिळाली आहे. आमच्याकडे उश्यांचे अभ्रे धुवून, वाळवून, शिवून मिळतात. उशी मागे २० ते ३० रुपये घेतो. फक्त थेट उश्या कुरियर करू नयेत, फक्त अभ्रे करावेत
तिने छोट्या गिटारवर गायलेलं
तिने छोट्या गिटारवर गायलेलं ला वी एन रोज का काय ते फ्रेंच गाणं खूप आवडलं होतं. डोळ्यात थेट पाणीच होतं.
चैतन्य प्लिज विपु करा. कधीच
चैतन्य प्लिज विपु करा. कधीच कापड आणून पडलंय. २० तरी कव्हर्स होतील. डिस्काउंट द्याल ना?
इथे लिहावं का नाही त्या विचारात होते, पण शेवटी राहवलं नाही. Blue is the warmest color बघितला. मूळ फ़्रेंच आहे, ज्यांना सेक्स दृश्ये अथवा पॉर्नची ऍलर्जी आहे, त्यांनी बघू नये. सॉफ्ट नव्हे, तर हार्ड पॉर्न या कॅटेगरीत हा चित्रपट जाईल. NC17 आहे.
ज्या पद्धतीने या चित्रपटात LGBTQ समूहाच्या भावना मांडल्या आहेत, त्या जबरदस्त. एका व्यक्तीची स्वतःची लैंगिकता काय आहे, हे जाणताना होणारी घुसमट, त्यानंतर प्रेमात वाहवत जाणं आणि शेवटी सत्याने खाडकन चपराक मारणं, अप्रतिम दाखवलंय.
तीन तासाचा चित्रपट आहे, सगळ्यांसाठी नाही, चित्रपट एका लयीत चालतो. ती संथ वगैरे नाही, पण ती लय धीरगंभीर जरूर आहे.
कुणी इथे बघितलं असेल, तर लिहावं जरूर!
<<< शिवणकामासोबतच तू वाती
<<< शिवणकामासोबतच तू वाती वळणे आणि पापड बनवून विकणे वगैरे काम का चालू करत नाहीस? पुस्तकासाठी पैसे मिळतीलच + तुझ्या नातवंडांना भविष्यात तुझ्याबद्दल निबंध लिहता येईल. >>>
Is this supposed to be funny? The comment is in poor taste, IMO
नेफिवर आज एक नवीन सिरीज आली
नेफिवर आज एक नवीन सिरीज आली आहे लैला नावाची. १९८४ ची आठवण यावी इतपत साम्य दिसत आहे. डायरेक्शन, अक्टिंग इत्यादी बाबतीत बरीच मागास वाटली पण सध्याचा काळ पाहता कधीही उडवलीही जाऊ शकेल त्याआधी पाहून घ्या.
जै आर्यावत
@Filmy
@Filmy
एका सजग, हुशार, होतकरू प्रेक्षकाने लैला या पुस्तकाबद्दल अन सिरीज बद्दल या आधीच या धाग्यावर पोस्ट केली होती..
या आधीच या धाग्यावर पोस्ट
या आधीच या धाग्यावर पोस्ट केली होती..>>
Page number?
पेज नंबर १०
पेज नंबर १०
पेज १० वाचलं. पुस्तक चांगलं
पेज १० वाचलं. पुस्तक चांगलं असावं असं एकंदरीत मालिका आणि स्क्रीन प्ले वरून तरी वाटत आहे. वाचायला हवं. मालिका आजच रिलीज झाली आहे. अजुन चांगली बनवता आली असती असं वाटत होतं पाहत असताना.
तर, जै आर्यावत
फिनाले भंगार होताच.
फिनाले भंगार होताच.
. रॉबिनसाठी एकतर बार्नी किंवा मार्शल-डॉनसारखे १८ वर्षांचा असल्यापासून एकाच मुलीसोबत राहिलेले पुरुषच ठीक आहेत. त्यांच्यासाठी खरोखरच The One असतं. हा टेड म्हणजे स्वतःबद्दल फार गैरसमजूती असलेला डफ्फर मनुष्य आहे. इडियट 
खरंतर बार्नी-रॉबिन घटस्फोट घेतात, बार्नी परत स्त्रीलंपट होतो, त्याला मुलगी होते हेसगळे ठीकच आहे. शेवट नेहमी Happily everafter असलाच पाहिजे असं काही नाही.
पण माझ्या डोक्यात सगळ्यात जास्त काय गेलं असेल तर ते टेड परत ब्लु फ्रेंच हॉर्न घेऊन नाचतनाचत रॉबिनकडे जातो हे. आणि ती त्याच्याकडे हसून बघते?? ड्युड रॉबिनसारखी मुलगी तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीय! २५ वर्षात एवढी अक्कलदेखील आली नाही का तुला
बादवे बार्नी सिझन ३ च्या शेवटपासूनच बदलायला लागला होता. १९९८ मधे २३ वर्षांचा व्हर्जिन बार्नी वर्डपीस साठी काम करायला जाणार होता. गर्लफ्रेंड शॅननने धोका दिला म्हणून तो बदलला. हे आणि सूट, स्त्रीलंपट, गॅजेटजन्की वगैरे जेम्स बॉण्डसारखं आहे. तो जी छोटी छोटी निरीक्षण करतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो ते शेरलॉक होम्ससारखं आहे
बाकी I just wonder जर सिझन ५ मधे लिलीने बार्नी-रॉबिनला रूममधे कोंडून ठेऊन define your relationship वगैरे केलं नसतं आणि टेडने रॉबिन-१०१ क्लास घेतले नसते, ie वैयक्तीक नात्यात लुडबुड करू नये ही साधी मर्यादा न कळणाऱ्या सोकॉल्ड मित्रांनी interfere केलं नसतं तर बार्नी-रॉबिन हे नातं कसं प्रोग्रेस झालं असतं....
> तिने छोट्या गिटारवर गायलेलं ला वी एन रोज का काय ते फ्रेंच गाणं खूप आवडलं होतं. डोळ्यात थेट पाणीच होतं. > च्यक् नॉट माय टाईप
===
बाकी माझं The Chalk Man पुस्तक वाचून झालं. ठिकठिक आहे.
ब्लॅक मिररचा नवीन सीजन

Pages