इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मनी हाईस्ट बद्दल या ध्याग्यावर बोलणं झालं आहे. चांगली सिरीज आहे, मला आवडली होती, आता तिसरा सिजन येतोय, ट्रेलर आले आहे.

२. मास्टर ऑफ सेक्स, बघणार नाही, कारण आता वय झालंय, गात्र थकलीत....
हमीद अन्सारीची मास्टर ऑफ नन नावाची एक खूपच भारी सिरीज आहे, इतकी भारी आहे की त्याला तोड नाही.. ही सिरीज बघून माझ्या जीवनात कमालीचा बदल झाला होता, यातला एक एपिसोड वडील आणि मुलाच्या नात्यावर आहे, म्हणजे आजच्या या काळात एवढे असे तरल विषय कुठे बघायला मिळतात..

काल "लागीर झालं जी" बघून कंटाळा आला म्हणून नेफ्लिवर वोक्स वाल्यांची एक्सप्लेन्ड नावाची डॉकमेंटरी सिरीज बघायला लागलो, छान आहे, वेगळे विषय सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत, काल के पॉप, पॉलिटिकल करेक्टनेस बद्दल एपिसोड बघितले, आवडले, पूर्ण सिरीज आता बघेन

कारण आता वय झालंय>>
वयाचा संबंध नाही. मालिका संशोधनावर आहे. सेक्स हा केवळ विषय.
मांडणी, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, ५०-६० चा काळ सगळंच चांगलं आहे. तेव्हाची अमेरिका, भौतिकवाद, तिथलं समाजजीवन, टाबुज, पुरूषकेंद्रित व्यवस्था, गोऱ्यांचं वर्चस्व, स्त्रियांचं दुय्यम स्थान फार बारकाईने टिपलं आहे.

मास्टर ऑफ नन नावाची एक खूपच भारी सिरीज आहे>> +१११११
अजीझ अन्सारी मला पार्क्स आणि रिक्रीएशन्स (भारी सिरीज आहे )पासूनच खूप आवडतो . मध्ये त्याच्यावर लैगिंक शोषणाचा आरोप झाला होता . पुढं काय झालं कायनु ?

आरोप झाला आहे, अन्सारीवर काही कारवाई झालीं नाही, नेफ्लिने त्याच्याकडून तिसरा सिजन मागवला आहे, अन्सारीचा स्टॅन्ड अप कॉमेडी शो आता कधीतरी मुंबईत होणार आहे, मला जायचं होतं, पण..आता पूर्वी सारखा प्रवास होतं नाही

प्राइमवर मेड इन हेवन बघितली. आवडली. एकदम चकाचक आहे. भरपूर पैसा खर्च केला आहे. ताराचे कपडे, jewellery, सर्व घरं वगैरे आवडलं. नायिका तारा खूप मस्त काम करते. तिचा कॅमेरावाला कलीग सेम उपेंद्र लिमये दिसतो. श्रीमंत लोकांची अग्ली लाईव्हज चव्हाट्यावर मांडली आहेत! एकूणात काहीतरी गॉसिप लाइव्ह ऐकल्याचा फील येतो. जिम सर्भ मस्त. छोट्या छोट्या रोल्समध्ये नवे जुने सर्व कलाकार उत्तम काम करून जातात. नीना गुप्ता असो, मानिनी मिश्रा असो. सिद्धार्थ मेनन असो.
ताराच्या बिझनेस पार्टनरचं गे असणं , त्याची लफडी याला खूपच फुटेज दिलं आहे आणि फार बोअरिंग आहे. म्हणजे त्याचा ट्रॅक थोडक्यात दाखवता आला असता. प्रोडक्ट प्लेसमेंट टाईप दर थोड्या वेळाने गे राईट्स, गे असणं कसं नॉर्मल आहे हे हॅमर करण्याचा, प्रमोट करण्याचा आटोकाट प्रयत्न वाटतो. आता दुसऱ्या सीझनमधे बहुधा झोया गे असणंच नॉर्मल असून स्ट्रेट असणंच चूक वगैरे लेव्हलला जाईल.
हुंड्याबद्दलचा एपिसोड छान जमला आहे पण बाकीच्या भागात फेमिनिझमच्या बाबतीतही बराच गोंधळ घातला आहे.

बट ओव्हरऑल गुड टाईमपास.

जोसेफ हेलर ची कॅच-२२ शेवटी आली एकदाची टीव्ही सिरीज च्या रूपात. पहिला सीजन सहा एपिसोडचा आहे.
हुलू आपल्याकडे उपलब्ध नसल्याने टॉरेन्ट चा आधार घ्यावा लागला. उद्यापर्यंत संपवून टाकतो.

@जिद्दु
अरे वा, सविस्तर रिव्हू नक्की लिहा, हुलूच्या सिरीज एएक्सएन वर दाखवतात, "द हँडमेड टेल" एएक्सएनवर दाखवायचे. कॅच २२ पण दाखवतील, होप फॉर बेस्ट...

मला लिहणं वगैरे नाही जमत त्यामुळे तुमीच लिहा मस्तपैकी पाहिली तर ...टवणे सर मागे म्हणत होते काहीतरी यावर त्यांनी लिहलं तर मजा येईल वाचायला.
हॅन्डसमेड टेल आणि इतर AXN आणि हुलू वाले शो आपल्याकडे मिळतात SONY LIV च्या प्रीमियम ऍप वर पाहायला. मी gaana app च वार्षिक सब्स्क्रिप्शन घेतलं तेव्हा ,मला सोनी लिव्ह चा वार्षिक सब्स्क्रिप्शन फुकट मिळालंय फ्री कूपन च्या रूपात. हि सिरीज पण येईल त्यावर काही दिवसात पण तोपर्यंत कोण थांबणार ?

१. "मर्द को दर्द नहीं होता" बघितला, हा सिनेमा सिनेमागृहात बघायचा होता, पण जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी तत्वचिंतनचा अभ्यास करत होतो, त्यामुळे वेळ मिळाला नाही.

२. हा सिनेमा टायगर श्रॉफने केला असता ना, तुम्ही लिहून घ्या, चित्रपट लै चाल्ला असता, पण ही स्क्रिप्ट वाचून श्रॉफ फक ऑफ म्हणाला असेल, त्याने विचार केला असेल माह्याकडे स्टुडन्ट ऑफ द इयर ए, असलं मी का करू? कारण यातला हिरोचा रोल त्याच्यासाठीच लिहिला आहे असं वाटलं.

३. या सिनेमात सगळंच करण्याचा प्रयत्न केला आहे, पार आपलं मेलोड्रामा पासून, स्लो मो ऍक्शन, नॉन लिनिअर कथानक, विम्बल्डन का विडंबन काय ते, मधूनच म्यूजिकल होतो, मग विनोदी होतो, जुन्या चित्रपटाचे संदर्भ येतात, डायलॉग चालू असताना व्हॉइस ओव्हर सुरु असतो. असं सगळंच एकाचवेळेस होतं, मग अजीर्ण होतं. मग धड तो डेडपूल होतं नाही की, किकएस होतं नाही की काहीच होतं नाही.

४. एवढा वाईट नाहीये, एक ते उडे उडे गाणं मस्त आहे, राधिका मदन फारच रावस दिसते, असं मी काही म्हणणार नाही, चित्रपट बघताना, मी व्यक्तीचा फक्त अभिनय बघतो, सोंदर्यकडे माझं मुळी लक्षच जात नाही.

५. यातले सवांद चार पाच लोकांनी लिहिले आहेत असं वाटलं, पण या चार पाच लोकांमध्ये सुसंवाद नसावा, त्यामुळे सवांद काही ठिकाणी फारच अकलनीय झाले आहेत.

६. इंडिपेन्डन्ट सिनेमाला नावं ठेवली की लोकं लगेच "तुम्ही फक्त रेस थ्री बघा" असं बोलतात. लय अपमान करतात, हे होऊ नये म्हणून शेवटी मी हेच म्हणेन की हा सिनेमा बघा, यात काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात.

काल रात्री बहुतेक एचबीओ वर बॅटमॅन बिगिन्स लागला होता, परत बघितला, काय पिक्चर होता यार.. खतरनाक.. यातले सवांद ऐकून माह्या आयुष्यातले दोन तीन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. इतके भारी सवांद आहे ना.. ते ऐकून फिलॉसॉफीचे चार पाच क्लास घेतल्यासारखं वाटतं.

अगदी पार बॅट मॅन बॅट मॅनच का होतो?मग तो मास्क का लावतो? सगळं कसं व्यवस्थित पद्धतशीर दाखवलं आहे. सगळं कसं परिभाषित केलं आहे, हा सिनेमा एवढा भारी होता म्हणून डार्क नाईट भारी झाला.

मी आतापर्यंत फ्रेंड्स ही एकच सीटकॉम बघितली आहे. त्यालादेखील बराच काळ लोटला होता म्हणून दुसरी कोणतीतरी सीटकॉम पहावं म्हणलं (गॉटचे ४ सिझन पाहून अजीर्ण झालेलं त्यामुळे बदल हवा होताच).
साईनफेल्ड बघायची कि हाऊ आय मेट युअर मदर ठरवता येत नव्हतं. मग मी रॉबिनला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडले <3
आता सहावा सिझन चालूय. मजा येतेय.

युहूउउ~~मिस्टर मर्सिडीजचा तिसरा सिझन Finders Keepers वर बेतलेला आहे.

Cannes’s Argentine Abortion Doc Had Audience in Tears Before It Started

Our 15 Favorite Movies From Cannes Film Festival 2019
===

How I met your Mother चा आठवा सिझन अर्धा बघून झाला. खरंतर असं व्हायला नको पण मला Friends पेक्षा जास्त आवडली ही मालिका. रॉबिन आणि बार्नी मस्त आहेत. लिलीदेखील छान अभिनय करते. मुख्य निवेदक टेड मोस्बीमात्र येडा आहे...

ही मालिका संपली की मी Chalk Man वाचायला घेणार.

हाऊ आय मेट युअर मदर ठरवता येत नव्हतं. मग मी रॉबिनला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडले <3
आता सहावा सिझन चालूय. मजा येतेय.

>>>> माझा तिसरा सीजन चालू आहे. मस्त आहे एकदम.

अवांतर : चैतन्य चा आय डी हॅक झालाय का?
वय झालय काय? प्रवास होत नाही काय ? कैच्याकाय
Lol

How I met your Mother चा आठवा सिझन अर्धा बघून झाला. खरंतर असं व्हायला नको पण मला Friends पेक्षा जास्त आवडली ही मालिका.
>>> असे वाटते फक्त त्यावेळी, काही गॅप जाऊ द्या परत विचार कराल तर फ्रेंड्स च बेस्ट वाटते.

च्रप्स,
मला नाही वाटत तसे होईल. फ्रेंड्स धाग्यावरचा माझा प्रतिसाद:

मी गेल्या दिवाळीत १० दिवसात बिन्ज केलेलं फ्रेंड्स सिरियलच. पहिले चार सीझन फार आवडले.

मोनिका आणि चँडलर सगळ्यात जास्त प्रिय होते तेव्हा. पण पाचव्या सीझनपासून मात्र मोनिका डोक्यात जायला लागली. पुढचे सीझन चढत्या क्रमाने बोअर होऊ लागले.

रेचल कधीच आवडली नाही. तिची आणि रॉसची प्रेमकहाणीतर अगदीच बेकार आहे. फिबी आणि जोई grow on you. जितके जास्त बघू तेवढे जास्त आवडू लागतात ते. ९ आणि १० वा सीझन तर इतका बोअर झाला तेव्हा या दोघांचाच सहारा होता.
चँडलर आणि जोईचे नातेपण छान दाखवले आहे.

अजूनेक निरीक्षण म्हणजे या सहाजनांपेक्षा ते ज्यांना डेट करतात ते पाहुणे कलाकार नेहमीच जास्त हॉट दाखवले आहेत. आणि एक प्रकारचा पॅटर्न फिक्स झालेला याच्या कथानकाचा. नवीन कोणीतरी येतं, त्याची बाकीचे ५ जण टर उडवतात, आधी जोडीच सगळं छानछान चालू असतं मग अचानकच तो नविन व्यक्ती सायको/ whimsical निघतो....
Submitted by ॲमी on 14 June, 2018 - 21:02

याउलट HIMYM बद्दल मत मांडायचे तर:
• रॉबिन, बार्नी, लिली या व्यक्तीरेखा मला सुरवातीपासून शेवटपर्यँत आवडत राहिल्याआहेत, मार्शल ओकेओके आहे, टेड नेहमीच नावडता राहिलाय.
• फ्रेंड्ससारखा तोचतो डेटिंग पॅटर्न नाहीय इथे. अगदी बार्नीचे प्लेबुकमधले धडे डोक्यावरून जाणारे असले तरी त्यात काहीतरी कल्पकता आहे. आणि तो सगळाच प्रकार मी 'अविश्वसनीय निवेदक टेड'च्या माथी मारतेय Wink
• HIMYM चे एकंदर कथानकच FRIENDS पेक्षा चांगले आहे, काही ठिकाणीतर फॅन्टसी प्रकारदेखील येतो(याचे एक कारण फ्रेंड्स लाइव्ह प्रेक्षकांसमोर चित्रित केले होते आणि हिमयम आधी चित्रित करून मग प्रेक्षकांना दाखवले होते हे असू शकेल).
• हिमयमचे पार्श्वसंगीत खूप चांगले आहे.

हिमयम चा फिनाले खूप बकवास वाटला मला बाकी सिझन्स चांगले आहेत.
मला फ्रेंड्स स्ट्रेस बस्तर वाटते, कोणताही सिजन उघडा, कोणताही एपिसोड लावा.

मी तुम्हाला एक सिरीज सजेस्ट करतो जी मला फ्रेंड्स आणि HIMYM पेक्षा कितीतरी चांगली वाटते.

Rules of Engagement - एक married कपल, एक एंगेजेड कपल आणि एक बॅचलर. धमाल आहेत एपिसोडस.

हो शेवट बकवास आहेच. Top 10 worst finale ever म्हणून शोधलं तर त्यातदेखील 1/2 नंबर वर येण्याइतका बकवास Lol
How I Met Your Mother Finale Deleted Scenes हे बघितलं का?

Rules of Engagement सुचवणीसाठी आभार. भविष्यात कधीतरी बघेन. पण सध्या सीटकॉम पासून ब्रेक.

himym, got, dexter, breaking bad या सर्वांचे शेवट एकदम बकवास झालेत.

ऍमेझॉन स्टुडिओ एक बिलियन डॉलर घालून लॉर्ड ऑफ द रिंग्स ची प्रिक्वेल-सिरीज आणतोय. पुढच्या वर्षात आला तो शो तर बर होईल

सगळ्यात वाईट फिनाले असेल तर ती TWO AND HALF MEN ची.
चार्ली शिनचा बदला घेण्यासाठीच तो एपिसोड डायरेक्ट केला होता असं वाटलं मला.

TWO AND HALF MEN चार्ली शिन जाऊन ऍस्टन कुचर आला तेव्हाच बकवास झाला होता Lol
btw शिन ला एड्स झालाय. आहे का गेला ?

> himym, got, dexter
TWO AND HALF MEN >
Lost आणि Seinfeld राहिले यात.
breaking bad मात्र मी कुठल्याच worst finale यादीत पाहिल नाही, best finale यादीत आहे

ब्रेकिंग बॅड ही मालिकाच मी आजपर्यंत कुठेही वर्स्ट मध्ये बघितली नाही. तिचा व्हिलन सुद्धा जबरदस्त होता. पण ती मालिका माझ्यासाठी चौथ्या सिजनलाच संपली. पाचवा सिजन फिलर वाटायचा.
एक वादग्रस्त सिरीज फिनाले म्हणजे LOST ची. पूर्ण ओपन इंडेड!
THE ORDER आणि The Umbrella Academy ची ही फिनाले मनासारखी झाली नाही.
मात्र TITANS ची फिनाले एका जबरदस्त वळणावर आली. वेटिंग फॉर नेक्स्ट सिजन!!

breaking bad मात्र मी कुठल्याच worst finale यादीत पाहिल नाही>>>>जिद्दूच्या यादीत Lol

Pages