Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते हनीड नूडल्स च डोक्यात आले.
ते हनीड नूडल्स च डोक्यात आले. मस्त लागते. करायला ही सोपे आहे.
असली रेड व्हेलवेट केक फार लोक्स ना जमत नाही. बेस्ट एल्मा.ज देल्ही मधला नाहीतर स्टारबक्स चा
गावाकडच्या बेकर पब्लिकला नाही जमत. मी गोव्यात पण खाल्ला होता फारच वाइट. तो इन फ्लेवर आहे म्हणून लोक करायचा प्रयत्न करतात.
माझ्याकडे एकुण सहा लोक -एक
माझ्याकडे एकुण सहा लोक -एक ही भारतीय नाही ,सगळे अमेरिकन आहेंत-जेवायला येणार आहेंत. त्यांच्यासाठी ,त्याना आवडेल असा सुटसुटीत शाकाहारी मेनू स्टार्टर व गोड सहित सुचवा.
सुलेखा, समोसे - कचोरी- रगडा
सुलेखा, समोसे - कचोरी- रगडा पॅटीस - भजी - कॉकटेल इडल्या हे अॅपेटायझर
१. पुरी- भाजी; पुरी छोले , लेमन राइस / मसाले भात
२. मसाला डोसे - वडा सांबार, लेमन राइस, बिसी बेळे भात ( इम्डियन रिसोटॉ म्हणा)
३ कमी तिखट मिस़ळ पाव , राजमा चावल
४. इंडियन चायनीझ - कोबी मांचुरियन , हाका नूड्ल्स, फ्राईड राइस
गोडात जिलेबी, गुलाब जाम, छोट्या वड्या , देशी फ्लेवरचे आइसक्रीम
अल्पना मस्त आहेत या रेसिपीस.
अल्पना मस्त आहेत या रेसिपीस. शनिवार आहे त्यामुळे सकाळी वेळ नसेल मला. आधी तयारी करून संध्याकाळी जाताना नेता येतील धन्यवाद मैत्रिणिनो. करून बघते आधी आणि ठरवते.
अमेरिकन लोकांना भारतीय
अमेरिकन लोकांना भारतीय जेवणाची कितपत आवड/सवय आहे? एकदम लाइट चवीचा पुलाव, टोमॅटोचं सार, पालक-पनीर आणि साध्या पोळ्या किंवा लाछा पराठे. सोबत गाजर-काकडी-टोमॅटोच्या चकत्या. गोडात रस-मलई. अगदीच वाटलं तर आणखी एखादी कोरडी भाजी करू शकता.
शोनुनं सांगितलेला इंडियन चायनीज मेनु पण चालेल.
हा एकदम साधा मेनु वाटला तरी आपण करतो तसे ग्रँड मेनु बरेचदा ओव्हरवेल्मिंग होतात. खूप जास्त स्ट्राँग चवीचे पदार्थ पण.
कचोरी चाट बरोबर काय कराव
कचोरी चाट बरोबर काय कराव lunch ला??
suggest menu for saturday lunch
जिरा राईस दाल फ्राय आईसक्रिम
जिरा राईस दाल फ्राय आईसक्रिम
चा/च, सिंधी स्टाईल मेनू -
चा/च, सिंधी स्टाईल मेनू - सिंधी करी - चावल (वर्षूने दिलेली रेसिपी आहे इथे बहुतेक), रसमलाई.
किंवा गुजराथी कढी, प्लेन राईस. मिरची पकौडा. गुलाबजाम.
आज शेवभाजी, पोळ्या, शिरा,
आज शेवभाजी, पोळ्या, शिरा, भात, सॅलड्/कोशिंबीर असा मेन्यू आहे. दालफ्राय किंवा कढी करायचा प्लॅन आहे. त्याच्या ऐवजी काय करता येऊ शकेल?
छान आहे की मेनू! कढीत जरा बदल
छान आहे की मेनू! कढीत जरा बदल हवा असेल तर सांडगे, बेसनाचे गोळे किंवा पकौडे तळून / शिजवून / वाफवून वगैरे घालता येतील. किंवा गुजराथी कढी करता येईल.
दाल करायची असेल तर अशीही करता येईल.
http://www.maayboli.com/node/54169
थँक्यू अकु. मी टोमॅटोचे सार
थँक्यू अकु. मी टोमॅटोचे सार केले.
वन डे फॅमिली पिकनिकला न्यायला
वन डे फॅमिली पिकनिकला न्यायला मेनु सुचवा. १० मोठी माणसे आहोत. घरुन करुन नेता येइल असा पोटभर पण सुटसुटीत असा मेनु सुचवा.
इडली-चटणी
इडली-चटणी
नाश्ता/ जेवण काय काय न्यायचं
नाश्ता/ जेवण काय काय न्यायचं आहे?
सँडविच, ठेपले, पराठे, इडल्या, भेळेचं सामान, भाताचे प्रकार, पुरी-भाजी, फळं, मिठाई, बिस्किटं इत्यादी बरेच पर्याय आहेत, सुटसुटीत हा शब्द सापेक्ष आहे.
पिकनिक साठी माझ्या लहानपणीचे
पिकनिक साठी माझ्या लहानपणीचे मला लक्षात असलेले मेन्यु :
पातळ खुसखुशीत धपाटी, वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची , मटकीची कोरडी उसळं, दही-भात, सांज्याच्या वड्या, कोथींवीर वड्या.सोबत जास्तीचं दुध दही,
किंवा
भरलं वांगं दाटसर रस ठेवुन, पोळ्या, वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची,बटाटा कोरडी भाजी, दही-भात, शिरा, आळु वड्या, पापड कुरवड्या तळुन,
किंवा
लाल झुणका, पोळ्या, वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची, कांदा-काकड्या, दही भात, शिरा,
सगळ्या मेनुत दहीभात कॉमन...पित्ताचा त्रास प्रवासात होउ नये म्हणुन असेल कदाचित...
आई, आज्जी , मावशी हे सगळे पदार्थ आपापसात वाटुन घ्यायच्या आणि मस्त बनवुन आणायच्या.
एखाद्या शेताजवळं जिथे पाणी असेल तिथे एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत सतरंजी न चटया टाकुन मस्त गप्पा मारत जेवण...आहाहा...खुप गोड आठवणी आल्या....
आजकाल होटेल्स मद्धे च जेवण केलं जातं बरेचदा त्यामुळे हे सगळं मिस करतेय.
उसळ, ब्रेड ,(बटर,
उसळ, ब्रेड ,(बटर, काकडी-टोमॅटो-कांदा स्लाईस) द, जिरा-राईस/ दहीबुत्ती
स्मिता श्रीपाद, मस्त आठवणी!
स्मिता श्रीपाद, मस्त आठवणी!
लहानपणापासून सहलीला न्यायचा
लहानपणापासून सहलीला न्यायचा एक मेनू कायमचा लक्षात आहे तो म्हणजे नाश्त्यासाठी सॅण्डविचची तयारी. आणि जेवणासाठी रसाच्या पोळ्या(उसाच्या रसाच्या) + बटाट्याची काचर्या भाजी + शिरा + लोणच्याची फोड.
१. दडपे पोहे. वरून घालायला
१. दडपे पोहे. वरून घालायला कोथिंबीर व ओला नारळ वेगळा न्यायचा. सोबत पाटवड्या, भोपळ घारगे किंवा सांजाच्या पोळ्या, लिंबाचे लोणचे.
२. पुरी-भाजी. भाजी म्हणजे बटाट्याच्या काचर्या (आदर्श मेनू) किंवा पीठ पेरून केलेल्या भाज्या, शेंगदाण्याची चटणी / कैरीचं लोणचं, दहीभात. गोड म्हणून शिरा.
३. पोळी / भाकरी, वांग्याचं भरीत, झणझणीत झुणका, उकडून तळलेल्या हिरव्या मिरच्या किंवा सांडगी मिरच्या किंवा एखादी कोरडी चटणी (दोडक्याच्या शिरांची चटणी जमली तर लै ब्येस!), आयत्या वेळी चिरलेले कांदा - काकडी - टोमॅटो - मुळा, दहीभात.
भरलं वांगं दाटसर रस ठेवुन,
भरलं वांगं दाटसर रस ठेवुन, पोळ्या, वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची,बटाटा कोरडी भाजी, दही-भात, शिरा, आळु वड्या, पापड कुरवड्या तळुन, >>
स्मिता श्रीपाद, हे पिकनिक तर तुमच्यात लग्नात काय बेत असतो
हा मेन्यु भन्नाट!!
सीमंतिनी, अग दोन तीन
सीमंतिनी, अग दोन तीन फ्यामिल्या मिळून पिकनिक असली तर असं भरपूर खायला असतंच. आम्ही लहानपणी कुठे जात असू तर बाबा भडभुंज्याकडून किलो-किलो खारे दाणे, फुटाणे असलं ताजं भाजून आणायचे. यात दोन कामं व्हायची, भर प्रवासात पोट्टे भूक-भूक करत नाही अन जास्त बडबडही बंद राहाते. वर हे खाणं फार काही कॅलरीज वालं नाही उलट बर्यापैकी सकस.
ओळखीतले एक काका
ओळखीतले एक काका आठ-दहाजणांच्या पिकनिकला डझन - दोन डझन पेरू, किमान डझनभर तरी केळी, खजूर, रायआवळे - बोरं असला काय काय खाऊ घेऊन यायचे त्याचीच आठवण झाली योकुची पोस्ट वाचून. पोरांची खूपच चंगळ!!
पोट या अशा खाण्यानेच भरून जायचं.
मी सहसा अकुचा १,३ नंबर मेन्यु
सिंडरेला ,मेधा तुम्ही
सिंडरेला ,मेधा तुम्ही सुचवलेला मेनू छान होता.मेनू ठरवताना इथल्या लोकांच्या साधारण आव डी-निवडी ची कल्पना आली.पालक-पनीर.छोले गाजर हलवा.शिरा हे पदा र्थ त्यांनी आमच्या घरीच खाल्ले होते.[अर्थात तेव्हा मी इथे नव्हते,] बटाटे वडे ,बेसन बर्फी दोन प्रसंगांसाठी करुन दिली होती त्यामुळे काय करावे हा प्रश्न होता?
मी असा मेनू केला.
स्टार्टर मूगभजी -पुदिना चटणी व टोमॅटो सॉस.
उ.बटाट्याची चणाडाळ.उडिद डाळ,काजू इ. घालून दोसा भाजी
बटाटा,मिक्स भाज्या,पनीर वापरुन मलई कोफ्ता
लहान त्रिकोणी पराठे,
दाल फ्राय
मटर घालुन जिरा राईस
आणि गोड---- भरपूर रसमलई .
अर्थात सगळ्याना जेवण खूप आवडले.
एकदम मस्तच मेन्यू आहे हा.
एकदम मस्तच मेन्यू आहे हा.
छान आहे मेनु.
छान आहे मेनु.
योकु,तू लिहील्याप्रमाणे बदल
योकु,तू लिहील्याप्रमाणे बदल केला आहे.धन्यवाद.
>> स्मिता श्रीपाद, हे पिकनिक
>> स्मिता श्रीपाद, हे पिकनिक तर तुमच्यात लग्नात काय बेत असतो स्मित हा मेन्यु भन्नाट!! >>
सीमंतिनी , आम्ही कराडकर आणि आजोळ भिलवडी, त्यामुळे प्रसंग कुठलापण असो ....भरलं वांग मस्ट असायचं......
भिलवडीच्या घरी तर काही लग्न, मुंज असेल तर कृष्णेकाठच्या वांग्याचं पोतं येउन पडाय्चं...आणि चितळेचा चक्का....
त्या वांग्याची चवं आहाहा....( तोंडाला पाणी सुटलेली बाहुली )
वांग्याच्या उरलेल्या भाजीची थालीपीठ दुसर्या दिवशी झक्कास लागतात...
असो..बरचं विषयांतर झालं
शनिवारी एकांकडे बार्बेक्यूला
शनिवारी एकांकडे बार्बेक्यूला जायचे आहे. मी आणि आणखी कोणीतरी एकजण शाकाहारी. बाकी (१२/१५ माणसे) सगळे खाणारी. तर शेगडीवर भाजणेबल शाकाहारी असे काय नेता येईल सोबत? सध्या मक्याची कणसे, पनीर-कॅप्सिकम-कूर्जेट स्क्युअर्स, पापड (!) एव्हढे सुचले आहे.
कॉर्न आलू सीख कबाब (तरला
कॉर्न आलू सीख कबाब (तरला दलालच्या साईटवर सोपी कृती आहे.)
सिमला मिरच्या, मशरूम्स, झुकिनी, पनीर, अननसाचे तुकडे, बटाटे, कांदे ग्रिल करून.
वांगे भाजून त्याचे भरीत. (इतर तयारी व फोडणी घरून करून न्यायची)
पनीर टिक्काही बनवता येईल बहुतेक. तरला दलालांच्या साईटवर तीही कृती आहे.
Pages