बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रम बींकडे आणि बेत ठरवायला मजा आली आम्हाला.

बी, सुरेख बेत आणि प्लॅनिंग ही , कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेछा.

डेझर्ट म्हणुन तुम्ही मी केलेले स्वीट कर्ड करु शकता. एकुण मेनु बरोबर छान जाईल . कमी कटकटीचे आणि चवीला ही छान. ते करायचे ठरवलेत ट्रायल घ्या एकदा. मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून. ही लिन्क

http://www.maayboli.com/node/53855

पूनम, स्नॅक्सचे अजून नाही ठरले. जर पावसाळी बेत असेल तर ओवा घालून भजी करेन.

जूनपर्यंत आंबे मिळतात तेंव्हा कदाचित रस ठेवेन. पण रस आणि भाकरी मेळ जमत नाही. गुळाचा शिरा करता येईल. किंवा शेंगदाण्याचे लाडू करता येईल. इथे एका तमिळ मंदिरात छान बालूशाही मिळते. ती आणता येईल.

आईसक्रीमची कल्पना पण छान आहे. तेवढाच माझीही वेळ वाचेल.

त्यादिवशी चार तास एक हेल्पर बोलावेन. इथे तासानुसार हेल्पर्स मिळतात. तिची मदत होईल.

माझ्या डोक्यात पण खीरच आली. शेवयाची. जेवायचा मेन्यु मस्त आहे. टॉमॅटो च्या रसातले पिठले कसे करतात? रेसीपी टाका .

धन्यवाद. खीरीची कल्पना छान आहे. विचार करेन. फक्त आळायला नको.

अमा - टोमॅटो पिठले असे करः बेसन भाजून घ्यायचे. फक्त स्वतःसाठी पिठले करायचे असेल तर चार लालबुंद मोठे टोमॅटो घ्यायचे. प्रत्येकाच्या चार फोडी करायच्या. तेल कडक तापवून त्यात कढी पत्ता, लसून, आले, चटणी, कांदा घालायचा. मग शेवटी त्यात हे टोमॅटो घालून मंद आचेवर ते शिजवू दिलेत की ते गळतात आणि त्यातले पाणी न आटता पिठले होईल इतका त्यातून रस निघतो. मग त्यात कोरडे भाजलेले बेसन, मीठ वगैरे घालून घट्ट होईपर्यंत पण पातेल्याला चिकटणार नाही म्हणून पळीत हलवत रहायचे. पाणी घालायचे नाही. गरजच पडत नाही खरे तर. थोडे तिखट केले तर फार चवदार लागते. भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर दोन्ही बरोबर छानच लावते. शिवाय हिमोग्लोबीन मिळते टोमॅटोमधून. आणि रंग खूप छान येतो. कांदा जाड आणि लांब चिरुन घालायला खूप बारीक नको. तेलात योग्य प्रकारे शिजलेला कांदा पिठल्यात मिसळला की फारच झणझणीत दिसते पिठले.

धन्यवाद. रेसीपी बद्दल. करते. माझ्याकडे टोमाटू खूप आले चुकून. ऑन लाइन ऑर्डर करताना एक ऐवजी तीन पाकिटॅ टोमाटो, पाच पाकिटे कोथिंबीर मागव्ली गेली.

तुमच्य काव्यवाचन कार्यक्रम संयोजनाबद्दल अजून एक. बारक्या पोटल्या मिळतात नक्षीच्या. त्यात एक दोन वेलदोडे, ख्डीसाखरेचे चौकोनी बारीक तुकडे( किराणामालाच्या दुकानाद मिस्री का मिश्टी नावाने मिळतात ते} भाजलेले बडी शोप व डाळ ह्याचे मिश्रण चमचा दीड चमचा द्या ह्या पोटल्या बनवून ठेवता येतील. जेव्णे झाली की मेहमानांना द्या. कविता म्हणताना घसा कोरडा पडला तर ह्या खडीसाखरेचा उपयोग होतो. व मुखवासही आहे. ते येण्या अधी हरिप्रसाद नाहीतर रविशंकर ह्यांचे संगीत लावून ठेवा तेच आपले माहोऔल बनवण्या साठी.

जेवणाचा मेनू फक्कड आहे. अगोदरच्या नाश्त्यात भाकरीच्या मेनूला अनुरूप म्हणजे उकडलेले भुईमूग (दाणे किंवा शेंगा). शेंगा असतील तर किंचित हळद व मीठाच्या पाण्यात उकडून. तिखट-मीठ लावलेले कैरीचे काप. बोरं, रायआवळे, जांभळं असा रानमेवा मिळू शकत असल्यास तो. किंवा ओव्याची / पालकची भजी.

पुरणाची खीर (हयग्रीव) किंवा तांदळाची ओला नारळ, बदाम, काजू वगैरे घालून केलेली खीर (पायसम्) देखील गोड म्हणून मस्त वाटेल.

जांभळ इथे मिळतात पण बीया काढून टाकताना चांगल दिसत नाही सर्वांसमोर.

अमा, खडीसाखर, वेलदोडे आणि बडीशेफेची कल्पना मस्त आहे. नक्की ठेवेन.

मुगाच्या डाळीचा एक मिठानू नावाचा सोपा प्रकार आहे तो करता येईल.

अख्खे मुग तव्यावर खमंग भाजायचे. मग एका कपामधे अर्धा चमच मीठ घालून ते नीट ढवळायचे आणि हे पानी मुगावर पसरवायचे. हा प्रकार खायला फार छान वाटातो. मुग नीट भाजल्यामुळे दाताला जड जात नाही.

हे असे कुठल्याही डाळीबद्दल करता येते. ह्याला मिठानू म्हणतात.

प्राजक्ता हो पातीची कप्लना छान आहे.

पुरणपोळीच्या बेताबरोबर पुपो अजिबात न खाणार्यांसाठी साध्या पोळीसोबत खायला चटकदार रस्सा भाजी सुचवा. छोले, पनीर वगैरेशिवाय. तसंच, मसालेभाताऐवजी जरासा सोपा तत्सम कोणता तरी भातही सुचवा.

आशुडी, पुरणपोळी सोबत कटाची आमटी ( सार) करणार आहेस का? करणार असशील तर त्यात पातोडे - बेसनाच्या वाफावलेल्या तिखट वड्या( ओवा हवाच) टाक. म्हणजे साधी पोळी खाणारे पण वेगळ्या प्रकारे बेसन खातील.. Lol

पुलाव बनव... फोडणीत जितक्या अ..सतील तितक्या सगळ्या भाज्या (गाजर, फरसबी, बीट, मटार), कांदा, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला / बिर्याणी मसाला आणि दही घाल.

स्नू, पाटवड्या नुसत्याच संपतील. हे 'भाजी मंडळ' आहे. त्यामुळे भाजी हवीच. उकडून बटाट्याचीही भाजी आहे. बाकी सगळा पारंपारिक बेत आहे. साधं वरणभात,.चटणी कोशिंबीर. साधंवरण भात आणि पुलाव कॉम्बो जमता नही है!
अकुच्या रेसिपीने मसूरभात कसा वाटेल? हिरवं वाटण वाला? फार टेस्टी होतो तो http://www.maayboli.com/node/16103

पुरणपोळीच्या बेताबरोबर पुपो अजिबात न खाणार्यांसाठी साध्या पोळीसोबत खायला चटकदार रस्सा भाजी सुचवा. छोले, पनीर वगैरेशिवाय.>>> भरली वांगी

ओल्या वाटाण्याची उसळ, पालकाची पातळ भाजी(दही/दूध/मलई टाकून), आळूचे फतफते, आंबटचूका, मेथी मलाई मटर अशी कुठलीही पातळ पालेभाजी करु शकते.. रंगसंगती पण साधली जाईल.

बरं, फ्लॉवर, बटाटा, टोमाटो, कांदा, ढोबळी, फरसबी, गाजर अशा नेहमीच्या यशस्वींपैकीच निवडावी लागणार आहे. पण तीच ती फ्लॉ ब चा रस्सा किंवा मिक्स व्हेज सोडून काहीतरी नवीन हवी आहे. डुबकीवाले आलू वगैरे? मग ब ची उकडून भाजी भेंडीने रिप्लेस करू.

आशुडी, मसाला भेंडी खूप छान लागेल पोळीबरोबर. ओल खोबर + कांदा + टोमॅटो + तिखट + गरम मसाला भेंडीत भरून तेलात मस्त भाजी होते.

तसंच, मसालेभाताऐवजी जरासा सोपा तत्सम कोणता तरी भातही सुचवा.>>> बिशीबेळेअन्ना. टोमॅटो राईस. पालक राईस. लेमन राईस (कैरी मिळाल्यास) चित्रान्ना,छोलेराईस,/

भाजीसाठी: अवियल (अजिबात मसालेदार होत नाही), कोफ्ता ग्रेव्ही, स्टफ्ड कॅप्सिकम, पालक पनीर (पनीर नको असल्यास मटर), मेथी मलई, फ्लॉवरची तमिळ स्टाईलने भाजी.

पुरणपोळीच्या बेताबरोबर पुपो अजिबात न खाणार्यांसाठी साध्या पोळीसोबत खायला चटकदार रस्सा भाजी सुचवा. छोले, पनीर वगैरेशिवाय.>>> भरली वांगी + १०००००००

चिंच-गुळ घालून मस्त आंबट-गोड बनवायची . अंगासरशी रस्सा ठेवायचा

http://www.maayboli.com/node/27448

http://www.maayboli.com/node/35800

http://www.maayboli.com/node/48882

या भाज्याही बघ. खमंग आहेत.

बटाट्याची उत्तर भारतीय / पंजाबी / बंगाली पध्दतीने केलेली अंगासरशी रस असलेली भाजीही मस्त लागेल. दम आलू देखील चांगले लागतील.
आंबट बटाटा पण चालेल.

मसूरभात एनीटाईम मस्त रेसिपी आहे. त्याखेरीज http://www.maayboli.com/node/27455 हा प्रकारही ट्राय करू शकतेस. फॅन्सी नाही. गरम, मऊ भात कॅटेगरी.

वेगळा म्हणुन मेथि-कॉर्न पुलाव करता येइल
टॅमरीन्ड राइस पण मस्त वाटेल.
फ्लॉवर-बटाटा-मटार रस्सा रसोई मॅजिक(पनिर-मटर) मसाला वापरुन (मायनस दाण्याचा कूट) भारि आणी पटकन होतो "सेम का सेम चेन्ज का चेन्ज"

>> बेत आणि कार्यक्रम - दोन्ही भन्नाट

+१ .. बी लगे रहो ..

टोमॅटो चं पिठलं ट्राय करून बघायला हवं .. त्यात फोडणीत चटणी घालायला सांगितलं आहे .. म्हणजे काय घालायचं?

Pages