बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंजूडी!कटलेट व् मटर करंजी दोन्ही पर्याय केटररला सांगणार आहे. खांडवी म्हटल्यावर गुजरातीच डोक्यात येतं , मराठी प्रकार खाऊन बघायला हवा!

@अरुंधती- रात्रीच्या जेवणात अप्रतिम सांज्याच्या पोळ्या + वरुन भरपूर साजूक तूप, हिरव्या मिरचीची फोडणी घातलेली गाजर कोबी वगैरे मिक्स कोशिंबीर, व्यवस्थित तिखट पांढरा व्हेज पुलाव आणि टॉमेटो सार असा बेत एकदा माझ्या आत्याने केला होता तो अजून लक्षात राहिलाय. तिनी साध्या पोळ्या पुऱ्या काही ठेवलं नव्हतं पण त्याची उणीव भासली नाही कारण सांज्याच्या पोळ्या फारच सही होत्या.

सी एन डब्ल्यू - वा, हे कॉम्बोही छानच आहे सांजा पोळी, गा-को मिक्स कोशिंबीर, व्हेज पुलाव व टो साराचं!

फरसाण आयटेममध्ये - अळूवडी हा प्रकार काका हलवाई / चितळे / देसाई बंधू / जोशी स्वीट्स वगैरे ठिकाणी सहज मिळणारा आहे व अगोदर ऑर्डरही देता येऊ शकेल. (किंवा केटरर भरोसे)
किंवा एखादा चाट आयटेमही ठेवता येऊ शकेल.

मृण्मयी,
'दाल सूप' ची पा.कृ शोधते.
धन्यवाद.

पण माइल्ड रस्सम >> मी शेवटी टोमॅटोसारावरच आले होते. कारण माईल्ड करण्यावाचुन पर्याय नाही Happy

आहे तेवढा मेनु पुरेसा आहे असं माझं हेमटी मन सांगतय Proud रस्सम, सूप, सार काही करू नकोस. पार्टीत आणखी सांडलवंड होण्याची शक्यता. परत आधी प्यायचं की नंतर खायचं अशा भानगडी. एक आयटम वाढवायचाच असेल तर गाजर+काकडी+ लेट्युस असं सॅलड अ‍ॅड कर.

सिंडरेला Lol सांडलवंडीचा मुद्दा बरोबर आहे. मी सोलकढीचा एक पर्याय सुचवायला आले होते. आता कळफलकाला आवर घालते! Proud

सीमंतिनी, इथे बाकरवडीला तिच्या शुध्द, सात्विक रूपातच खाणे पसंत करणारे काही खवय्ये बाकरवडी चाटच्या कल्पनेने मूर्च्छित होऊन पडलेले डोळ्यांसमोर आले! Lol

अंजली, मागच्या ३२ पानावरच्या भाज्या शानच्या मसाल्यात साधारण किती वेळ मॅरिनेट केल्या होत्या? आणि शानचा मसाला प्लस आणखी काय वापरलं होतं मॅरिनेशनला? मला ह्या शनिवारकरता हवं आहे.

प्रसिद्ध शेफ जेवायला येणारेत. बेत काय करू? ४-५ जणं आहेत. २-३ जणांना जेवणानंतर लगेच प्रवास करायचा आहे. त्यामुळे जड काही नकोय.

मऊ भात, काच-या आणि सुधारसाची एक फर्माईश ऑलरेडी आलेली आहे. बाकीचा बेतही त्याला साजेसाच करावा का या विचारात आहे. डाळिंब्यांची उसळ, गाजराची कोशिंबीर, पु-या, साधं वरण. आंबोशीचं लोणचं आहे घरात. तुप-लिंबू, एखादी कोरडी चटणी असेलच. या सगळ्याची रंगसंगतीही चांगली होईल असं वाटतंय. आणखी काय करू? रस्समच्या धाग्यांमुळे आधी प्यायला तेही करायची सुरसूरी आलीये.

किंवा पूर्ण वेगळा बेत सुचवलात तरी चालेल.
स्वैपाकतज्ज्ञ असले तरी मला दडपण नाहीये Proud समोर येईल ते मापं न काढता आनंदानं ग्रहण करणारे आहेत.

रंगसंगती बघतेच आहेस तर डाळींब्या आणि काचर्‍या दोन्ही पिवळ्या होतील. त्यापेक्षा मटाराची किंवा मसुराची उसळ आवडेल का? पुर्‍यांबरोबर फ्लॉवरची रस्सा भाजी छान लागेल.

सुधारस बरोबर पोळी आणि तूप कॉम्बो आवडते (परत आलेच ते साजूक तूप) Wink Happy पुरीसोबत कधी खाल्ला नाही. बाकी मेन्यू मस्त आहे! रसम ह्या मराठी मेन्यूत जरा आउटलायर वाटेल.

मंजु, मटार / मसुर हिरवे रंग छान दिसतील Happy सगळे पर्याय चांगले आणि सोपे सुचवलेस. डाळिंब्या सोलायला वेळ बक्कळ असणारे म्हणुन त्यांचा विचार करत होते.
डाळिंब्यांची उसळ तिखट घालून करते त्यामुळे लालसर होते, बटाट्याच्या काच-या पिवळ्या बरोबर.

सीमंतिनी, रस्सम तासभर आधी द्यावं म्हणते. बाकी साजूक तुपाला मात्र पर्यायच नाही.

कुलू, मसालेभात.. जमू शकेल. अगदी टिपीकल बेत Happy रांगोळ्या, उद्बत्त्या लावते, केळीची पानं पण आणते मग Lol

बादवे, मलाही आहारातून मिळू शकणा-या प्रोबायोटिक्सबद्दल माहिती हवी आहे. थँक्स बी. पण इथे ते अवांतर आहे, योग्य जागी विचारावं लागेल.

आहे तेवढा मेनु पुरेसा आहे असं माझं हेमटी मन सांगतय फिदीफिदी >> ते लोकाग्रहास्तव अ‍ॅड केले होते. माझ्यामते कॉर्नराईसला रायते पुरेसे आहे Happy

पण आता तु म्हणते आहेस तर काढुनच टाकते Happy

सॅलड आहेच शिवाय शेव-बटाटा पुरी पण आहे. चिल्लरपार्टीचा मेनु स्वतंत्र आहे.

मृण्मयी, पार्टीमेनू ठरवताना पण प्रोटिन्स वगैरेचा विचार करतेस. ग्रेट Happy माझ्या अजिबातच हा मुद्दा लक्षात आला नव्हता.

आहारातून मिळू शकणा-या प्रोबायोटिक्सबद्दल >> दही उत्तम प्रोबायोटीक आहे ना? नेस्ले, अमुलचे प्रोबायोटीक दही पण मिळते ना?

हे बघायला उशीर झाला. पण ट्रीपला अजून वेळ आहे. उशिरा का होईना, सर्वांचे आभार. Happy

घरी विरजलेल्या दह्यात जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात असे वाचले आत्ताच. वर वर जमलेला पिवळा थर वा पाणी जे असते दह्यात ते फार महत्त्वाचे असते. मी आत्ताच्या माझ्या भारतभेटीत हे माझ्या ताईला सांगितले तर ती फार खट्टू झाली कारण ती हे पिवळे पाणी नेहमी काढून टाकायची.

माझ्यामते इडलीमधे सुद्धा मग प्रोबायोटिक्स असू शकतील कारण त्यातही आंबवण्याची क्रिया आहे.

अजून काही सोर्सेस माहिती आहेत का? नेट वर फार माहिती नाही मिळाली.

फायनली रसदार डाळिंब्या, वांगीभात, बटाट्याच्या काच-या, सुधारस आणि पोळ्या एवढेच आटोपशीर पदार्थ केले. स्वैपाक बरा झाला, चांगला नाही.
कार्यक्रमात, येणा-यांच्या संख्येत, भेटायच्या शहरात आणि वेळेतही ऐनवेळी बरेच बदल झाल्यामुळे ठरवलेल्या बेतामधेही बदल करावे लागले.

फडफडीत ( खरंतर मऊ नसलेल्या ) भातावर काय घेऊन खाता येईल ?तूप - मेतकुट भात आवडतो पण त्यासाठी मला भात मऊ लागतो. मी मेस मध्ये जेवते तिथे सध्या खूपच तिखट करताहेत सगळे पदार्थ अगदी आमटी सुद्धा.
आणि पुढचे ३ महिने तरी मला हॉस्टेलमध्ये स्वयंपाकाचा खटाटोप जमणार नाहीये.
धन्यवाद.

प्रसिद्ध शेफ जेवायला येणारेत.
>>
त्या शेफच्याच रेसीपी ट्राय करून बघ की Wink
ते लिहितातही सोप्प्या शब्दात Wink
(मला कळालेत तेच शेफ असतील तर Wink )

लिलावती ,
दही भात , दुध भात आवडत असेल तर
मी लोणचं भातही खाते
तिखटामधे दही टाकून खाल्लंस तर तिखटपना कमी होईल आणि चवही मस्त येईल
(इतकंच सुचलं Uhoh )

(खालील फंडे हॉस्टेलमध्ये दिवस काढतानाचे आहेत.)
लीलावती,

१. सोबत तूप असेल तर साऊथ इंडियन मुळगापोडी घालून भात कालवून खाता येतो. याचं व्हेरीएशन म्हणून सांबार मसाला किंवा बिशीबेळे मसाला कालवायचा.
२. दहीभात सोबत तिखट असली तरी थोडीशी भाजी अथवा आमटी अथवा उसळ.
३. तूप मेतकूट भात (मऊ भात नसेल तर तूप कॅन्सल कर आणी दही-मेतकूट कालवून खा. बरं लागतं) सोबत शक्य असेल तर कच्चा कांदा बारीक चिरून.
४. बाजारात मिळणारी परंपरा अथवा एम टी आरची रेडीमेड ग्रेव्ही आणायची. ते पाकिट गरम पाण्यात दोन तीन मिनिटं बुडवून रेडी करायचं आणी भातासोबत खायचं.
५. अतिशय तिखट भाजी आमटी असेल तर सोबत कच्चीकाकडी टोमॅटो गाजर वगैरे सॅलड घ्यायचं (हे मेसमध्ये मिळत नसेल तर विकत आपणच आणायचं. आमच्या हॉस्टेलजवळचा भाजीवाला दोन टोमॅटो, एक काकडी, एक गाजर अशा भाज्या द्यायचा.)
६. रूमवर आपलं आप्ण करायची थोडी सोय असेल तर फडफडीत भात घेऊन त्याला फोडणी घालून खायचा. वर लिंबू पिळला की लेमन राईस. टोमॅटो रेडीमेड पुरे घातली की टोमॅटो राईस!

Pages