Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप खूप आभार ! तिखट चालत नाही
खूप खूप आभार !
तिखट चालत नाही हा एकच प्रॉब्लेम होता आता हे सगळे उपाय ट्राय करते !
रिया येऊन गेले अगं मला जे
रिया
येऊन गेले अगं 
मला जे येतं ते मी करते.. उगाच ऐनवेळी निस्तरता आलं नाही तर त्यांनाच सुधारा आता हे असं सांगायची वेळ यायची! आले भेटीला न् धरलं वेठीला नको व्हायला ना?
जोक्स अपार्ट, कायम स्वतःच करून खाणा-या लोकांना अधेमधे असा बदल बरा वाटतो. असो.
लिलावती, नंदिनीनं मस्त उपाय सांगितलेत. शक्य असेल तर आमटी भातात दही घालून बोलमधे कालवून खा. म्हणजे तो सौम्यपणा शेवटच्या घासापर्यंत एकसारखा राहील. जरा पातळ करून खाल्लंस तर फडफडीत भाताचा घास सुसह्य होईल.
उगाच ऐनवेळी निस्तरता आलं नाही
उगाच ऐनवेळी निस्तरता आलं नाही तर त्यांनाच सुधारा आता हे असं सांगायची वेळ यायची! आले भेटीला न् धरलं वेठीला नको व्हायला ना?
ते बिचारे करून पण देतील 
>>
visualize केलं मी
आपल्याकडे जैन भाज्या किंवा
आपल्याकडे जैन भाज्या किंवा कांदा लसूण विरहीत भाज्या असा काही सेक्शन आहे का? आता सणवार नैवेद्य सुरू होतील. सारखं फ्लॉवर बटाटा रस्सा, मटकीची उसळ, उकडलेला बटाटा किंवा भेंडी,.कोबी या कॉम्बोचा कंटाळा आलाय. नैवेद्याला चालतील अशा कांल विरहीत एक कोरडी व एक रस्सा भाजीचे कॉम्बोची लिस्ट बनवायची का?
पुरणपोळीसोबत परवा उकडून बटाट्याऐवजी बटाट्याचे काप खाल्ले. मस्त वाटत होतं.
या आठवड्यात वन डे पिकनिकला
या आठवड्यात वन डे पिकनिकला जाय्चं आहे. सोबत असलेल्या मोठ्यांचा काही प्रश्न नाहीये, ते बाहेरचं खाऊन दिवस ढकलणार आहेत. पण सुनिधीसाठी सोबत काय ठेवू? तिला बाहेरचं तिखट काहीच चालत नाही. खोकला असल्यानं तेलकट तुपकट नकोय. दिवसभर बाहेर असल्यानं सँडविच आणि भाजीपोळी - खिचडीभात खराब व्हायची भिती आहे. (चेन्नईचं हॉरीबल वातावरण) बिस्कीटं वगैरे सुकंसुकं झालंतर फार खाणार नाही. दहीताक ती खात नाही.
इडली-आप्पे असा एक ऑप्शन डोक्यात आहे, अजून काही सुचत असेल् तर सांगा प्लीज.
इथे बर्याच पाकृ आल्यात धपाटे,
इथे बर्याच पाकृ आल्यात धपाटे, धिरड्यांच्या त्यातलं काही? पोहे, उपमा, शिरा यांपैकी तिला आावडेल ते. शिवाय बबल खिचडी ही.
तिची आवडती फळे, मफिन्स, तिला आवडत असेल तर उकडलेलं अंडं तिखटमीठ लावून जे खराब व्हायच्या आच सकाळीच दहा अकराला देता येईल. भाजणीची किंवा उपासाची थालिपीठं. ब्रेडचा चिवडा.
तांदूळ व्यवस्थित परतून भाताचा
तांदूळ व्यवस्थित परतून भाताचा काही प्रकार केला तर किमान बारा तास तरी कुठल्याही हवेत चांगला टिकतो. भातापेक्शा इडलीचं आयुष्य कमीच असतं. पोळीचा रोल हा पर्याय आहे. पराठेही टिकतील पण तू म्हणशील ते तिखट आहेत.
पोळीचा रोल परत सुका होइल.
पोळीचा रोल परत सुका होइल. जॅमचं पाकिट आणि साधी पो़ळी असं सोबत ठेवता येईल म्हणा. ते बरं पडेल.
बबल खिचडी खोकल्यामुळे नकोय.
पराठे खराब होतील म्हणूनच नकोत. अन्यथा बिनातिखटाचे पराठे एरवी होतातच.
मंजूडे, मी तुझ्याकडे आशेने
मंजूडे, मी तुझ्याकडे आशेने बघतेय. डोंट अनुल्लेख द मी.
आशू, इथे सुलेखाची बेडवी पुरी
आशू, इथे सुलेखाची बेडवी पुरी सागमधली बटाट्याची भाजी आहे ती भाजी मस्त चमचमीत होते. बटाटा चीप्स स्टाईल भाजी पण काजू बेदाणा घालून मस्त होते. खोबरं टोमॆटो खडा मसाला भाजून त्याचं वाटण लावलेल्या भाज्या/ उसळी छान लागतात.
नंदिनी, भोपळ्याचे किंवा
नंदिनी, भोपळ्याचे किंवा रताळ्याचे गोड पराठे.
लिहीतच होते मोबाईलवरून टाईप
लिहीतच होते
मोबाईलवरून टाईप करतेय गं.. वेळ लागतो.
पराठे खराब होतात??
पराठे खराब होतात??
हां हां, मग ठीके. सुलेखा का?
हां हां, मग ठीके. सुलेखा का? बघते. आणखी सुचेल त्यांनी लिहा गं\रे कांदा लसूण विरहीत भाज्या.
आशू त्या हरे कृष्णा रेसिप्या
आशू त्या हरे कृष्णा रेसिप्या गुगल कर. ते लोक्स सगळेच पदार्थ कांदा लसूण विरहित करतात.
मी एकदोनदा गंमत म्हणून प्रयत्न केला होता. छान लागतात.
http://www.harekrsna.com/practice/prasadam/recipes/recipes.htm
नाही होणार खराब. आमच्याकडच्या
नाही होणार खराब. आमच्याकडच्या हवेतही नाही होत खराब. फॉईलमधे गुंडाळून ने हवं तर. किंवा नाचणीचं सत्व असेल तर बरोबर थर्मासमधे उकळतं पाणी घेऊन जायचं. साखर घालून दोन मिनिट ठेवलं की तयार होईल. उकडलेलं अंडंही खराब होत नाही अजिबातच.
ओके रैना बघते करून.
ओके रैना बघते करून.
माझ्या क्वार्टर मधे शेजारच्या
माझ्या क्वार्टर मधे शेजारच्या २-३ कुटुंबांना चहा-खावु असे बोलवायचे आहे. सकाळ्/सायं ठरले नाही.
बहुधा सायं.
१५- १८ मोठे आणि १० लहान असतिल.
बाहेर ऑर्डर दिली तरी काय द्यावी.
नंदिनी, तिखटामीठाचा सांजा.
नंदिनी, तिखटामीठाचा सांजा. हवा तसा आसट करता येईल. किंवा सांज्याची (गोड) पोळी.
उपम्यात भाज्या न घालता तो केला तर उपमाही टिकेल बहुतेक.
आशूडी,
भिजवलेली मूगडाळ / हरभरा डाळ घालून केलेल्या भाज्या - पडवळ / दोडका / कोबी / दुधी / गाजर (किसून) / फ्लॉवर
पीठ पेरून केलेल्या भाज्या - सिमला मिरची, कोबी, दुधी, कोथिंबीर, काकडी, घोसाळी वगैरे.
पंचफोडण वापरून त्यावर परतलेल्या भाज्या - दुधी, लाल भोपळा, बटाटा उकडून.
कारल्याचे काप, वांग्याचे बेसन लावून काप.
तोंडली परतून / रस्साभाजी, भेंडी परतून / दही-भेंडी.
गवारीची मुठिये / सांडगे घालून भाजी
ऋषीपंचमीची भाजी
नारळाच्या दुधातल्या भाज्या
उपकरी स्टाईल भाज्या
व्हाईट सॉसमधील भाज्या
भाज्यांची लोणची
रताळ्याची सांबार मसाला शिवरून भाजी
अळूची भाजी
ताकातला पालक / चाकवत
कोहळ्याची (दुधीसारखीच मूगडाळ घालून) भाजी
तवाभाजी (स्टर फ्राय)
बटाटा काचऱ्या
नवलकोल किसून त्याच्या सुटलेल्या पाण्यात मूगडाळ भिजवून फोडणीला घालून केलेली भाजी
श्रावणघेवडा, वालपापडी वगैरे शेंगवर्गीय भाज्या - परतून, गोडा मसाला, दा कू, गूळ घालून केलेल्या भाज्या.
केळफूल भाजी, फणस भाजी, पेरूची पंचामृत स्टाईल परंतु पंचफोडण घालून केलेली भाजी, सुरणाची भाजी.
बेबी कॉर्न, गाजर, स्वीट कॉर्न, कोबी, घेवडा स्टर फ्राय. (हवे असल्यास चेरी टोमॅटो)
गाजर-मटाराची स्टर फ्राय भाजी
दाक्षिणात्य पध्दतीचा लाल सुकी मिरची, धणेपूड, डाळी वगैरे तेलात परतून केलेला मसाला लावून केलेल्या भाज्या
जिरे मिरे खोबऱ्याचे वाटण घालून केलेल्या भाज्या
अयाई! केवढे अॉप्शन्स अकु.
अयाई! केवढे अॉप्शन्स अकु. धन्य आहेस तू. मी चुकून 'उपकारी स्टाईल भाज्या' वाचलं आणि व्हायचा तोच परिणाम झाला.
पण आशू, रोजच्या भाजीत रोजच
पण आशू, रोजच्या भाजीत रोजच कांदा-लसूण कुठे असतं?
म्हणजे, ते सोडून भाज्या करायच्या तर प्रश्न पडावा इतक्या प्रमाणात आपण रोज कांल घालतो का? मी सहज आठवून पाहिलं, तर मी हार्डली कां-ल वापरते डब्याच्या भाज्यांमध्ये. त्यातल्यात्यात कांदा वापरला जातो, पण लसूण फारच क्वचित, म्हणून विचारलं तुला. नथिंग पर्सनल 
हरेक भाजीत लसूण घातली तर त्या-त्या भाजीचा स्वाद-वास-चव मरते असं मला वाटतं.
वैनीबाय, वैनीबाय थांबा.
वैनीबाय, वैनीबाय थांबा. पहिल्यांदा सेम पिंच. मी हे विचारले याचे कारण आता सणवार सुरू झाले की आमच्याकडे पंगती सुरू होतील. या निमित्तानेच सगळे एकत्र येतात. सगळ्यांना आवडतील अशा पण जिकडेतिकडे रिपीट होणार नाहीत अशा भाज्या शोधतेय मी. आणि शक्यतो जे नैवेद्याला करायचं तेच सर्वानी खायचं असा आई व साबांचा आग्रह असतो म्हणून हा पर्यायशोध.
आशूडी पूनम, येस. या वरच्या
आशूडी
पूनम, येस. या वरच्या यादीतल्या अनेक भाज्या रोजच्या जेवणात असतात व त्याही कांदा लसूण व फारसे मसाले न वापरता.
वरच्या यादीत सुरणाची भाजी, फणसाची भाजी, पेरूची पंचामृत स्टाईल परंतु पंचफोडण घालून केलेली भाजी, केळफुलाची भाजी याही घालते.
आशूडी, एकदा नेटवर तामिळ
आशूडी, एकदा नेटवर तामिळ ब्राह्मिण स्वयंपाक सर्च कर. अजिबात कांदालसूण न वापरता कायमच स्वयंपाक करतात. त्यांच्याकडे बरेच प्रकार आहेत. त्यातले कित्येक खास नैवेद्यासाठी आहेत. मला ते "जैन" प्रकार फारसे आवडत नाहीत पण तमिळ स्वयंपाकात कांदालसूण वापरलेला समजतसुद्धा नाही.
ओके नंदिनी, बघते. थँक्स.
ओके नंदिनी, बघते. थँक्स.
नंदिनी, इन्सुलेटेड लंच
नंदिनी, इन्सुलेटेड लंच बॅग्समधे असले पॅक घालून नेले तर इडली वगैरे दिवसभर खराब न होता राहील व्यवस्थित . अॅपल सॉस / योगर्ट चे पॅक्स पण फ्रीझ करुन तेच फ्रीझर पॅक सारखे ( एकदा) वापरता येतात.
http://www.amazon.com/Fit-Fresh-Coolers-Penguin-Multicolored/dp/B00LH10G...
अगदी हेच नाही मिळाले तरी मसल पेन करता वापरणारे जेल पॅक्स सुद्धा फ्रीझ करुन वापरु शकशील.
नंदिनी, प्रत्येकी १ चमचा
नंदिनी,
प्रत्येकी १ चमचा दही,दूध, मध, तूप आणि खडीसाखर/ साधी सखर यांच्या मिश्रणात कणीक भिजवायची आणि पोळ्या लाटायच्या.खसा/सा.सा.किंचित जास्त घ्यायची.मस्त मऊ गोडसर पोळ्या होतात.(चतुरंग मध्ये शुभांगी संगवई यांनी लिहिल्याप्रमाणे)
म्हणजे पंचामृतात भिजवेल्या
म्हणजे पंचामृतात भिजवेल्या कणकेच्या पोळ्या!! कल्पनाच किती मस्त आहे! चव किती छान लागत असेल....
पंचामृतात भिजवेल्या कणकेच्या
पंचामृतात भिजवेल्या कणकेच्या पोळ्या>> हे एकदा करून बघायला हवंय. इंटरेस्टिंग वाटतंय.
मेधा, इतकं सामान कोण वागवेल? आधीच दोन तीन ड्रेस वगैरे सामान आहे त्यामुळे लंच बॅग परत वेगळी नकोच आहे. तरी तू म्हटलीस तसं दोन तीन ज्युसचे आणि मिल्कशेकचे टेट्रापॅक जवळ ठेवते. योगर्ट मात्र चालत नाही.
सध्यातरी मी एकूणात पोळी-जॅम, पालकपराठे आणि बेसनाचे लाडू इतकं फायनल केलंय. शिवाय सोबत कोरडा खाऊ असेलच. दुपारच्या जेवणासाठी मी छोट्या डबीतून तूप मीठ नेलं तर तिला साधा भात तूप मीठ लिंबू असा कालवून देईन. इतर वेळचे स्नॅक्स एवढे पुरतील. पालकपराठे लवकर दहा वाजता वगैरे भरवेन. नंतर लंच होइलच. नंतर परत भूक लागली तर पोळी जॅम सोबत राहीलच. बेसनाचे लाडू डिमांडनुसार!
थँक्स ऑल फॉर द सजेशन्स !!!
खाकरा; कोरडी भेळ कालवून ठेवता
खाकरा; कोरडी भेळ कालवून ठेवता येईल, जाता येता फक्की मारायला बरी पडते.
खारवलेले दाणे, फुटाणेही ठेवता येतील. न सोललेले काजूही एक टाईमपास असतो (एक एक सोलायचा न मग खायचा).
काकडी, टोमॅटो, बाकी काही फळं; धुवून तसेच बरोबर घ्यायचे. खायच असेल तर न चिरता सोलता डायरेक्ट खायचा. नो लिकींग, पिलींग, कटिंग झिगझिग.
Pages