बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलवडी

नमकीन प्रकारात बटाट्याच्या किसाचा तळून चिवडाही नेता येईल. आदल्या दिवशी करून ठेवता येईल.

खारे शंकरपाळे (जिरे लावलेले) हेही मस्त क्रिस्पी स्नॅक होईल. हवं तर एखादं चटणी डिप सोबत नेता येईल. Wink

धन्यवाद! पण वेळे अभावी मी फक्त क्रॅन्बेरी भारतीय स्टाईल आणि क्रॅकर्स नेले, पण यजमानिण बाईने इतक्या प्रकारचे डिप्स आणि खाऊ बनवला होता कि काहीच नेले नसते तरी चालले असते. तिला रेसिप्या विचारल्या आहेत मिळाल्या कि शेअर करेन ( पमकीन डिप, स्वीट डिप विथ कुकिज वगैरे).

Mazya muli cha 5 th birthday Ahe ...total 35 Jan astil ....1.5 Varsha cha Mula la sambhalun Sagal karaycha Ahe ...cake Abel vikat...pan baki ch Kay karu...adhi Karun thevata yeil as Kay karu

डायबिटीस मेनू:
ओटस आणि उडदाचे डोसे(उडीद ७-८ तास भिजवून क्व्कर प्लेन ओट समप्रमाणात घालून अर्ध्या तासात वाटावे.ओट ची चव आणी टेक्चर लागत नाही.)
टॉमेटो कढिपत्ता तीळ जिरे खसखस मिरची चटणी(हे सर्व घटक ओले वेगळे आणी कोरडे वेगळे भाजून वाटून मिक्स)
गुळाचा माफक गोड शिरा किंवा कमी गोड घारगे
भेंडी/पालक पनीर भाजी पोळी

पूनम पाटिल, ३५ लोक्स खायला आहेत आणि दीड वर्षाच्या बाळाला सांभाळून सगळं करायचंय तर...

- पाहुणे आल्यावर गरमागरम पेप्पर रसम किंवा साधं रसम.
- स्नॅक्स मध्ये इडली - चटणी - सांबार (ईडल्या गारही चांगल्या लागतात, सांबार गरम करायला वेळ नाही लागणार. चटणी आधी करून ठेवता येते)

- पाव भाजी (भाजी आधी करून ठेवता येईल, पाव गरम करता येतील कुकरमध्ये. पावभाजीचा धागा पाहा)
- दही बुत्ती

- मिसळ/उसळ पाव
(उसळ पाव केला तरी वेगळा कट करून ठेवता येईल, ज्याला लागेल तसा घेता येईल तिखटपणानुसार)
- मसाला ताक

रगडा (छोले वापरून) किंवा साधा + आलू टिक्की
याची पूर्वतयारी करता येईल पण वेळेवर प्लेटींग करता कुणालातरी उभं राहायला लागेल.

@पूनम पाटिल

एक ऑप्शन आहे:
पापड-भाजी
- मैद्याचे पापड तळून ठेवायचे
- बटाटा भाजी (हि. मिरची घातलेली-थोडी रस्सा अस लेली) करून ठेवायची
- कान्दा चिरून
- हि. मिरची चा ठेचा
-चिन्च-गूळ चटणि (विकत मिळेल)
- पूदीना चटनी (विकत मिळेल)
- सर्व करताना, पापडावर भाजी पसरा, वर कान्दा, चटण्या, ठेचा पसरा, खाताना पापडाचा तुकडा मोडून खायचे

सोबत, मूग डाळीचे भजे देउ शकता, हवे तर एखादा पुलाव

बफे सिस्टीम ठेवा...

@ पूनम पाटील -
गोडात कस्टर्ड अगोदर करून फ्रीजमधे गार करता येईल. पपई, डाळिंब, चिक्कू, सफरचंद काप गार करून आयत्या वेळी मिक्स करायचे. किंवा सायंकाळी बोलावणार असाल तर दुपारी मिक्स करायचे व गार करून सर्व्ह करायचे.
फ्रूट कस्टर्ड मोठे लोक व मुलांना आवडेलच.
किंवा गुलाबजाम अगोदर करून ठेवता येतील.

मेनू साधा, सोपा व पोटभरीचा ठेवा. सायंकाळी ५ किंवा ६ दरम्यान पाहुणे येणार असतील तर स्नॅक्स.
छोले-पाव / मटार उसळ पाव / मिश्र कडधान्य उसळ पाव असे ठेवता येईल. छोले / उसळ अगोदर करून ठेवा. सोबत बटाटा वेफर्स / चिंटू पापड तळून, बाकरवडी असे ठेवता येईल.
रात्री बोलावले असेल तर त्यासोबत (उसळ पावासोबत) भाताचा एखादा प्रकार. मसालेभात. दुपारी असेल तर दहीभात.
सोबत एखादे रायते किंवा आंब्याचे लोणचे. पापड मिरगुंडं तळून.
या मेनूत हवं असेल तसं काही चटकमटक अॅड करता येईल.

ठेपल्यांबरोबर काय द्यावे? बाकिइचा बेत समोसे, व्हेज बिर्यानी आहे. चाट पण असेल. पापडी चाट कसे बनवावे ४० जणांसाठी ते पण सांगा. मदत करा प्लीज Happy

ठेपल्यांबरोबर लोणचे, साऊथ इंडीयन ठोक्कू लोणचे, आंबट - गोड - तिखट असा छुंदा किंवा मग दह्यातली चटणी / बुंदी रायता देता येईल. बुंदी रायता केले तर ते बिर्याणी बरोबर पण चांगले लागेल.

एवढा मेनु असताना आणखी काही मागितलं तर फटके द्यावेत Proud

जोक्स अपार्ट, तांबड्या भोपळ्याचं रायतं चांगलं लागतं ठेपल्यांबरोबर. तिखट करायचं मात्र.

ठेपल्या बरोबर छुंदा ( कच्चा किंवा शिजवलेला ) . बाकी काही मागितल्यास फटके द्यावेत Happy

पापडी चाट साठी लागणारं सर्व साहित्य तयार ठेवा आणि लागेल तसं थोडं थोडं मिक्स करुन सर्व्ह करा. ४० माणसांसाठी एकदम मिक्स करुन ठेवलं तर पापडी आणि इतर कुरकुरीत पदार्थ मऊ पडतील

सासरच्या पाहुण्यांसाठी जेवण बनवायचे आहे...साधारण ८-९ लोक आहेत..हे पदार्थ ठरवले आहेत...
पोळ्या
काजू उसळ
पुलाव
गाजर हलवा...

अजून एक भाजी आणि एक आमटी करायची आहे...एखादा स्टार्टर ही लागेल.. काजू उसळ बरोबर काय चांगले लागेल?
प्लीज जास्त घोळ नसलेले पदार्थ सांगा...

काजू उसळ थोडी पाणीदार होईल त्यामुळे थोडी कोरडी कोणतीही भाजी चालेल. मिक्स व्हेज, बटाटा, व्हेज तवा वगैरे, किंवा मग कांद्याची चटणी वगैरे

कोर्मा भाजी (रस्सा) किंवा बटाटा भाजी (सुकी)
कोर्मा भाजी केल्यास स्टार्टर म्हणुन बटाटेवडे करता येतील.
बटाटा भाजी केल्यास स्टार्टर म्हणुन मटार करंजी छान वाटेल.

कोकणातली असतील मंडळी तर सवय असेल त्यांनां.

>> कांद्याची चटणी

हो, काजूच्या उसळीबरोबर काही कोशींबीर करता आली तर थंडावा/काँट्रास्ट होईल जेवणात? कष्टही कमी लागतील? झंपीचा कन्सर्न ही अ‍ॅड्रेस होईल.

पण सासरच्या मंडळींनां इम्प्रेस करायचं असेल तर अजून एक सोपी भाजी वर सजेशन्स आहेत त्याप्रमाणे.

पुलाव बरोबर आमटी पेक्षा मग साधा भात/ जीरा राईस आणि आमटी बरे लागेल का? पुलाव बरोबर सहसा रायता, दही असे खाल्ले आहे.

माउ, मेनू वाचून तोंपासु!

सध्या थंडी आहे तर पुलावाबरोबर गरम टोमॅटो सूप/ सार मस्त वाटेल. मग अजून एक भाजी नाही केली तरी चालेल.
सोबत छोटे छोटे ब. वडे किंवा कोथिंबीर वडी वगैरेचा विचार करून ठेवा. मग कोशिंबीरीऐवजी चटणी चालेल.

स्टार्टर म्हणून खाष्ट असती तर जाऊ दिली असती! Wink स्टार्टरसाठी हवेच असेल तर मायक्रोवेव्ह पापडाचे प्रकार सोपे पडतात (टोपलेभर रंगीत पापड-कुरडई, पापड पापड कोन, मसाला पापड, टोकरी इ इ - वेळ, आवड, बजेट त्रैराशिकात बसेल ते).

Pages