बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, निम्मे पब्लिक परदेशी आहे. त्यामुळे 'झणझणीत' नाही करता येणार. पण रस्सम चालु शकेल.

अंजलीने सुचवलेले रायते पण छान आहे. त्यातुन कांदा वगळल्यास कसे लागेल ?

तुन कांदा वगळल्यास कसे लागेल ?>>> अगं कांदा वगळलास तरी चालेल. अगदी ताजी सिमला मिरची (लाल/पिवळी प्राधान्यानं) किंवा अजून काही अ‍ॅड केलेस तरी चालेल. तिकडे ग्रीक योगर्ट टाईप काही मिळत असेल तर ते घालता येईल. अजून बरेच व्हेरीएशन्स करता येतील.

मेघना, मधुमेही लोक आहेत असे म्हटले आहे म्हणून दही भातापेक्षा विकतच्या दह्याचे लहान डबे किंवा अमूल ताक व काकडीच्या फोडी असा विचार करु शकता.

मागच्या आठवड्यातल्या बार्बेक्यूला हालूमी, पेपर्स स्क्युअर्स केले - ते नको म्हणून सांगितल्याने नेले नाहीत. Wink घरीच भाजले आणि खाल्ले दुसर्‍या दिवशी. तिकडे अनेक व्हेज पदार्थ होते, पैकी मला आवडलेला म्हणजे पुइ लेंटिल सॅलड. मसुराची मीठ घालून उसळ (फोडणी नाही) त्यात ऑऑ, सन्ड्राइड टमॅटो बारीक चिरून, फेटा चीज कुस्करून. मस्त लागले एकदम.

दुपारच्या जेवणासाठी सांज्याच्या (माफक गोड) पोळ्यांसोबत इतर काय मेनू ठेवता येईल? मसालेभात ठीक वाटेल का? साईड डिश व भाजी कोणती करावी? पातळ पदार्थ कोणता ठेवता येईल? सुचवा प्लीज.

या वीकेंडला माझ्या घरी गावाला एक फ़ॅमिली आणि आम्ही असे जात आहोत.
घरी नेहमी ग्रोसरी स्टॉक एवढा नसतो. फ़क्त डाळ, तांदुळ, तेल, साखर, चहा पावडर एवढच असतं. पोहे आणि नारळ घरचेच.
मला सामान नेऊन करावं लागेल. आम्ही १२ जण आहोत,
यामध्ये आम्ही बाहेर फिरणार पण आहोत त्यामुळे जास्त वेळखाऊ पदार्थ नको.

खालील मेनु सुचवा.
१)शनिवार ब्रेकफास्ट:- दडपे पोहे/ कोळ पोहे असं म्हणतेय
२)शनिवारी लंच साठी- दोघं उपास असणारे सुद्धा येतील
३)शनिवारी संध्याकाळी उपास सोडायचा त्यामुळे साग्रसंगीत स्वयंपाक असेल.
४)रविवार ब्रेकफास्ट आणि लंच

सांज्याच्या पोळ्या
तोंडलीभात/ फ्लॉवर, मटार घालून मसालेभात; घरचा गोडा मसाला वापरून. मसालेदार पण तिखट नसलेला/ गोळा-भात
ताक/ कढी/ कढी-गोळे
थोडं तळण- काहीही हलकं, पापड/ कुरडया/ सांडगे/
एखादी अगदी साधी भाजी परतून केलेली अन थोडे फुलके

यात जर गोळा-भात केला तर कढी मस्ट + हिंगाचं पाणी + चरचरीत मोहोरी, सुक्या लाल मिरच्यांची फोडणी हवीच. या केसमध्ये तळण नाही केलं तरी चालेल. हा भात करून अगोदर कालवूनसुद्धा ठेवता येतो. गारही चांगला लागतो. गरमागरम वाफाळती कढी सोबत असेल तर पूर्ण जेवण. महत्त्वाची गोष्ट- भात + गोळे कालवल्यावर ढीग अनावर मोठा होतो, तर त्यामानानी किती तांदूळ वैरायचा हे ठरव.
पोळी अन साधी भाजी अश्याकरता सुचवली कारण काही लोकांना पोळीभाजी नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. पण त्याचा विचार तू का म्हणून करायचा? कर तू तुला हवं ते! Wink

अगदीच अवांतर -
अकू, तू इकडे बेत काय करू प्रश्न विचारणं म्हणजे गाईड ने टुरिस्ट्सना एखाद्या जागेची माहीती विचारण्यासारखे आहे याची नोंद घ्यावी Proud

मुग्धा,

शनिवार ब्रेफा करता - दडपे पोहे/ कोळाचे पोहे > ओके

शनिवार लंच > पराठे/ ठेपले/ धपाटे + दाण्याची किंवा कुठलीही चटणी + दही/ कोशिंबीर. यात उपासवाल्यांकरता उपासाच्या भाजणीचा उपमा/ थालीपीठ + दही + काही फळं असं करता येईल.

शनिवार डिनर > साधासा स्वयंपाक. सुकी भाजी, नारळ घालून केलेलं फोडणीच वरण, पोळी, भात, कोशिंबीर, हवं असेल तर एखादं गोड आणता येईल किंवा करता येईल. (उपास सोडायचा असल्यानी पूर्ण मेन्यू)

रविवार ब्रेफा > इडली/ दोसे/ आंबोळ्या + नारळाची कोथिंबीर, मिरची घालून चटणी

रविवार लंच > नॉनव्हेज चालणार असेल तर एखादी फिश करी + तांदळाची भाकरी + काहीतरी गोड. इथे काही तळण पण ठेवता येईल.

सध्या एवढं सुचलं Wink

थँक्स योकु. बघते हे पर्याय. साधी भाजी... हम्म. भरलं वांगं कसं वाटेल या मेनूत? (सांजा पोळी, मसालेभात, साध्या पोळ्या, भरलं वांगं, कढी, तळण - पापड वगैरे). किंवा मग आख्ख्या मसुराची अंगासरशी रस असलेली उसळ?

रीया, इतरांना सल्ले देणं लैच सोप्पं असतं! Lol

सांजा पोळी, मसालेभात, साध्या पोळ्या, भरलं वांगं, कढी, तळण - पापड वगैरे >> सरळसोट मेन्यू आहे की हा.
म्हणूनच मी गोळाभात + कढी असं सुचवलेलं. त्यातल्यात काही तरी वेगळं म्हणून.

अकु बेश्ट मेनू आहे! Happy

सांजापोळी आणि मसालेभातावर चांगले तूप आणून ठेवायला विसरू नकोस, मग बाकी पान रिक्कामं असलं तरी चालतं Wink . लोक सवाष्ण-कुमारिकेला डालडा तूप वाढतात इतकी महागाई झाली Sad

परिस्थिती नसेल असे लोक जाऊ दे, देवी त्यांना डालडाने पण पावेल.

पण हल्ली तूप खाणारे आणि प्रेमाने वाढणारे लोक्स माझ्या माहितीत कमी कमीच होत चालले आहेत Sad

सी, मला ती कल्पनाच कशीतरी वाटली. म्हणजे केवळ करायचं म्हणून केल्यासारखं. यजमानांनी जेवायला 'बोलावणं' करायचं अन पानावर बसलेल्याला डालडा तूप वाढायचं!!! किती तो विचित्रपणा. अन असं कितीसं साजूक तूप लागतं पानावर वाढायला!
असो. मनात आलं ते टाईपलं. अस्थानी आहेच पण नाहीच राहावलं म्हणून...

>>>>२५ ते ३० लोकांसाठी एखादे सार / पातळ पदार्थ आणि रायतं सुचवा.

बाकीचा मेनु कोफ्ता करी, व्हेज कुर्मा, कसुरी मेथी + कॉर्न पुलाव, प्लेन पराठा, गाजराचा हलवा असा आहे.

यातले फक्त गाजर हलवा, सार आणि रायते मी करणार आहे, बाकी ऑर्डर केले आहे. त्यामुळे वेळेचा काही प्रश्न नाही.

पायनॅपल रायते आणि टोमॅटो सार कसे वाटेल ?

आरती, ह्या सगळ्या मेनूत प्रोटिन्स नाहीत. तेव्हा दाल सूप चालेल का? रसम छान आयडिया आहे. पण माइल्ड रस्सममध्ये मजा येत नाही हा अनुभव नुकताच घेतला.

>>>पण हल्ली तूप खाणारे आणि प्रेमाने वाढणारे लोक्स माझ्या माहितीत कमी कमीच होत चालले आहेत <<

बहुतेक लोकं खावून नंतर नावच ठेवणार म्हणून डालडा देत असतील. Wink

ह. घ्या.

डालडा तुपाविषयी जरा जागरूकता वाढली असेल असं वाटलं होतं... पण डालडा तूप म्हणजे खरंच डालडा तुपाविषयी बोलतेयस का सीमंतिनी? की इन जनरल अमूल, चितळे, कृष्णा, सागर इत्यादी विकतच्या तुपांविषयी बोलतेयस?
पानावर वाढायला विकतचं तूप अशी कल्पनाही करणं अशक्य आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त दुपारचं जेवण आहे मोस्टली ज्ये. ना. क्राउड आहे. लोकेशन पुणे. साधं , कमी तिखट जेवण हवंय पण अगदीच रोजच्या जेवणा इतकं बोअर नको. एक घरगुती केटरिंग करणाऱ्या बाई सर्व करुन देणार आहेत. पुऱ्या बटाटा भाजी श्रीखंड काश्मीरी पुलाव व सार असं ठरतंय तर सोबत अजून एक भाजी, एक दोन फरसाण आयटम सुचवा. बर्थडे बॉय केकच्या विरोधात असल्यामुळे जास्तीचा गोड पदार्थ अजून काय ठेवावा ? मटकीची उसळ, गुलाबजाम, आणि स्टार्टरमध्ये ढोकळा / सुरळीच्या वडया? अजून पर्याय प्लीज सुचवा. स्वीट/ स्टार्टर केटररकडूनच घेतले पाहिजेत असं नाहीये चितळे काका हलवाई पैकीपण चालेल. बाकी कोशिंबीर पापड वगैरे असेलच. नॉन व्हेज नकोय पण कांदा चालेल श्रावण असला तरी. ज्ये.ना. कंपू असल्यामुळे त्याना काय आवडेल कळत नाहीये.

चितळे चालणार आहेत तर त्यांच्याकडच्या मटाराच्या करंज्या मागवा फरसाणात.. नाहीतर कटलेटही मस्त लागतील या मेनूत. पालक, कांदा, बटाटा भजी सुचत आहेत, पण पुर्‍या आहेत त्यामुळे तुम्ही ठरवा.

गोडात चितळ्यांकडच्या खव्याच्या साटोर्‍या किंवा खांडवी (मराठी गोड पदार्थ - तांदळाच्या रव्याच्या गूळ खोबरं घातलेल्या वड्या)

खांडवी (मराठी गोड पदार्थ - तांदळाच्या रव्याच्या गूळ खोबरं घातलेल्या वड्या) <<<
हे सांगावं लागतंय... Lol

(तुला हसत नाहीये मंजू!)

अगं खांडवी म्हणजे गुजरात्यांची सुरळी वडी असंही आहे. त्यामुळे मराठी खांडवी की गुजराती हा प्रश्न येऊ शकतो.
मलाही हे ज्ञान हल्लीच २-४ वर्षांत झालंय. एरवी खांडवी = तांदळच्या कण्यांची, वाढल्यावर वरून भ र पू र साजुक तूप आणि ताजं ओलं खोबरं घातलेलीच. Happy

योकु ग्रेट!
काय मेन्यु काँबिनेशन्स सुचतायत तुम्हाला.
यातल्या निम्म्या पदार्थांची नावेसुद्धा माझ्या नवर्‍याला एका वेळी सांगता येणार नाहीत.
काँबो तर दूरच.
Wink

Pages