बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक चाट पार्टीचा बेत केला होता तो लिहीते. :

स्टार्टर्सः फ्रूट चाट.( घरीच बनवले) आलू टोस्ट. ( हे बाहेरून आणले होते व वरचे कांदा शेव चटणी सेप रेट आणले) मग डिश मध्ये बनवून ठेवले.

एक साइडला पाणीपुरीचे काउंटर बनवले. तिथे स्वतः उभे राहून पाणि पुरीवाल्यासारख्या सर्व्ह केल्या.

सुकी भेळ, चपट्या पुर्‍या दही, कांदा टोमाटो चटण्या हे एकाटेबलावर ठेवले. व मेहमानांना स्वतः करून घ्यायला दिले. छोटे बोल्स व द्रोण ठेवले होते. दही वडे पण केले होते. एक एक पर पर्सन.

पावभाजी व तवा पुलाव/ फ्राइड राइस आधी बनवले. आयत्या वेळी पाव गरम करून दिले. कांदा लिंबू व्गैरे होतेच. दोन - तीन तासांचे कुकींग आहे.

कुल्फी डेझर्ट. डिस्पोझेबल प्लेट्स वापरल्या तर नंतर भांड्यंचा फार कुटाना पडणार नाही.

ह्या शिवाय सोफ्ट ड्रिंक्स व्हिस्की बीअर इत्यादी लोकांना हवे तसे होतेच. तुम्ही मेलन ज्यूस वगैरे देउ शकाल.

उन्हाळा आहे तेव्हा दही वडा हा ऑप्शनही आहे. सोबत मंजुडी म्हणतेय तसं कॅनपीजवर किंवा नेहमिच्या चपट्या पुर्‍यांची शेव बटाटा पुरी वगैरे. सोबत कोल्ड कॉफी विथ आईस्क्रिम. सगळ्याची तयारी आधी करुन ठेवता येईल.

पण तरीही चपट्या पुर्‍या, बारीक शेव, बुंदी इत्यादी बाहेरूनच आणावे लागेल.>>> तेवढं होणारच हो.... समोसा म्हणजे मेन वस्तुच बाहेरुन आणल्यासरखी होईल ना...

अमा.. बापरे.. वाचुनच दमायला झालं........ :p

वेलकम ड्रिंक म्हणुन पन्हं आणि डेझर्ट म्हणुन ब्राऊनी ठेवणार आहे.

कॅनपीजवर >> कॅनपीज म्हणजे काय सांगेल का कोणी प्लिज....

एस पी डी पी - शेवदहीबटाटापुरी
दहीभल्ले किंवा दहीवडे
स्प्राऊट चाट
पाव पॅटिस
भेळ
कैरीची डाळ
छोले चाट
ब्रेडची गोल्डन कॉईन्स

यांपैकी पदार्थ मेनूत ठेवता येतील.

हेलो, माझ्याघरी साधारण ३० एक मराठी मित्र येत आहे संध्याकाळी. मग आम्ही काव्यवाचन करणार आहोत. जेवण ठेवले आहेच पण संध्याकाळच्या उपहाराचे सुचत नाही. चवळीची उसळ त्यावर बारीक शेव आणि थोडे दही हा बेत कसा वाटतो? कारण, खूपदा संध्याकाळी समोसे, कचोरी, ढोकळा, उपमा, पोहे हे सवयीचे पदार्थ मिळतात खायला पण काहीतरी नवीन हवे होते. जे करायला सोपे जाईल. भजी करणर होतो पण तेलकट नको. जर नवीन काही सुचत असेल तर सांगा. धन्यवाद.

बी जेवण फार उशीरानी नसेल तर एक प्रकार आधी करून ठेवता येईल.
सेवरी क्रॅकर्स वर तर्हेतर्हेचे टॉपिंग्ज;
लहान लहान फ्रूट स्क्युअर्स.
थंडगार काकडी, टोमॅटो, अजून एखादी भाजी, फळ + एखादं डीप,
साल्सा-नाचोज,
गरम/ताजं काही हवं असेल तर आप्पे,
शेबपु, दपु हे चाट आयटेम्सही आहेतच जर चालणार अस्तील तर

हे प्रकार तोंड चालवायला होतील अन फार पोटभरीचे न होता नंतर च्या जेवणाला व्यवस्थित न्यायही मिळेल. आधीच उसळ-चाट असेल तर त्यानीच पोट भरेल अन नंतर च जेवण खूप उरण्याची रीस्क राहील.

अल्पोपहारा साठी:

वेलकम ड्रिंक. कोकम सर्बत/ पन्हे किंवा टँग
स्नॅक्सः सँडविचेस. पण फिंगर साइजचे. चीज स्प्रेड्+बटर, व्हेज चटणी काकडी टोमाटो. , रशियन सालड घालून कोलस्लॉ घालून. छोटे बोल मध्ये फ्रूट चाट. कट फ्रेश व्हेजिटेबल्स व योगर्ट डिप. पनीर्+पायनापल टूथपिक ला लावून. हराभरा कबाब, कॉर्न पॅटिस, बारक्या बोल्स मध्ये व्हर्मिसेली उपमा. व्हेजीज घालून. हा मस्त कुर कुरीत लागतो. व्हेज मोमो. ( हे बाहेरून आणता आले तर सोपे पडेल. दिल्लीत मिळतात तसे. )

छान माहिती पण मी हे पदार्थ कधीच करुन पाहिले नाहीत आणि ह्यातले काहीच खाल्ले आहेत. मला अजून थोडा सोपा आणि लाईट प्रकार. करायला आणि खायलाही. आप्प्याची आयडीया जॅम आवडली आहे. विचार करुन पाहीन ह्यावर.

आप्पे सोपे आहेत पण ३० लोक्स प्रत्येकी तीन किंवा चार खाणार म्हटले तर १२० करावे लागतील प्लस च टणी. एका पात्रात एका वेळी सहा किंवा मोठ्या पात्रात १२ होतात. तेही मंद गॅसवर करावे लाग्ते. करून ठेवले तर चिवट होतात. म्हणून मी हा पर्याय दिला नाही. सँडविच सर्वात सोपे आहे. आधी करून ठेवता येइल.

कच्चा चिवडा किंवा दडपे पोहे पण मस्त.

उकडलेल्या स्वीट कॉर्नवर टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, शेव, चाट मसाला, कोथिंबीर घालून छोट्या बोल्समध्ये सर्व्ह करणे.

किंवा स्वीट कॉर्नऐवजी उकडलेले छोलेही वापरू शकता. साऊथ इंडियन 'सुंदल' प्रकारही चालू शकेल.

उकडलेल्या रताळ्याचे काप करून त्यांवर मीठ, चाट मसाला भुरभुरून व लिंबू पिळून. कोथिंबीर ऐच्छिक.

मोड आलेले हिरवे मूग जरा वाफवून त्यांवर मीठ, मिरपूड, चाट मसाला, शेव, टोमॅटो, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून.

उकडलेल्या बटाट्याचे काप तेल/ लोण्यावर सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस परतून त्यांवर तिखट, मीठ, जिरेपूड (ऐच्छिक), चाट मसाला, कोथिंबीर घालून.

पापडाचा खुडा.

हे वरती दिलेल्यातले काहीही केलेस तरी सोबत यंदाच्या गणेशोत्सवात न शिजवता करायचे अनेक प्रकार आलेत त्यात काही छोटे छोटे लाडू, मोदक पण आहेत. ते झटपट होतील आणि तिखटाच्या जोडीला पटकन तोंडातही टाकता येतील. मनीमोहोर यांच्या काकडीच्या सेलर बोट्स , जागूची टोमाटो बास्केट गणेशोत्सवातच आल्यात त्याही करून सेंटरला ठेवू शकतोस.
नीरजाची हेतेढकल खाकराभेळही ऐनवेळेला करण्यासारखी आहे.

सॉरी, ३० माणसांना कमीत कमी तीस बोटी किंवा बास्केटस लागतील, त्यापेक्षा चकत्या करणे केव्हाही परवडले. पण ते चिंटू लाडू , मोदक बघून घे एकदा.

छान माहिती.

एक विचारु का - मिनी इडली पोडी पावडर मधे घोळवलेली कशी वाटेल? इडल्या झटपट होतात आणि दिसतातही खूप छान.

इथे चित्र बघा: https://www.google.com.sg/search?q=mini+idli+with+podi&espv=2&biw=1366&b...

बी, इकडे माबो वरच सुलेखा यांनी मसाला इडलीची पाकृ लिहिली आहे. खूप छान होतात या इडल्या. तोही एक पर्याय आहे.

व्हर्मिसेली उपमा - क्या बात अमा ! काव्यवाचन आहे तर असे नाजूक साजूक खाणे सोबत बरे Happy
अकु कॉर्न चाट/ सुंदलला प्लस वन!

जेवण तुच बनवणार आहेस का कि पॉटलॉक आहे?जेवणाचा मेनु काय आहे?

दडपे पोहे
काकडि पोहे
भेळ
कॉर्न चाट्/भेळ
छोले चाट
पापडि चाट
फोडणिची ईडली
टोस्टीटोज साल्सा क्विसो

(पोडि ईडलिचा तोठरा बसेल त्याबरोबर दही घातलेली एखादी चटणी ठेवावी लागेल)

कविता वाचन आहे ना , मग मेन्यु ठरवताना मीखालील गोष्टी लक्शात ठेवेन ,

फिंगरफूड सोयीच पडेल .
खाताना तोंडाचा आणि पदार्थाचा आणि भांड्याचा आवाज येता कामा नये ( उदा . पापड किन्वा आवाज करणारे काटे-चमचे निषिद्ध Wink )
पुस्तक वाचताना चणे शेंगदाणे जितके सहज तोंडात जातात , तसेच काहितारी खाण्यास सोपे पदार्थ हवे .
खाताना लोकांचे लक्श कार्यक्रमाकडे हवे , खाण्याकडे नको . मिरची लागली , सांडलं , सॉस हवाय असे प्रकार नको .
झंपीने सांगितल तस - उग्र वासाचे पदार्थ नको .
पुस्तकातून वाचन करणार ना मग खाता खाता पूस्तक खराब होणार नाही याची काळजी घ्यावी .

आता मेन्युच काय ते बघा Happy

तसेच कार्यक्रमाच्या जागी रसिकांचे स्वागत अत्तर गुलाब शिंपडून करा. जुनी अत्तरदाणी गुलाब्दाणी आता परत रिट्रो म्हनून फेमस झाली आहे. तसेच पांढरी मोगर्‍याची फुले, दवणा, मरवापाने घातलेले गजरे व गुलाबाची फुले टोकाला असे गजरे व्यासपीठा सारख्या जागेत मागे लावून सुशोभन करता येइल चांगला काव्यात्मक माहोल बनेल. तमीळ फूलवाला करून देइल पण ते कसली तरी बिनवासाची हिरवी पाने मध्येच घालतात ते चेक करून घ्या. जवळ पास् फ्रेंच बेकरी असेल तर अगदी बारक्या पेस्ट्रीज कप केक्स डोनट्स, मॅकरून्स आणता येतील. सुरेख दिसतात. इथेच व्हेज पफ वगैरे मिळाले तर मस्तच.

मी परवाच एका आइसक्रीम बरोबर चॉकोलेटा चे आयफेल टावर बनवले होते ते मोडून खाल्ले. मजा आली खाताना.

व्हेज पफ, पॅटिस, व्हेज सँडविच मुळीच नको. पफ/ पॅटिसचा भयंकर चुरा सांडतो. सँडविचमधले काकडी टमाटे मध्येच घास खाता खाता अर्धवट बाहेर येतात! Proud

काव्य वाचन करता करता खाणं करायचं असेल फिंगर फूडच पाहिजे.

खरंतर कविता वाचताना खाणं नकोच. वाचणारा कविता वाचतोय आणि त्या ऐकता ऐकता बाकीचे खात आहेत हे दृश्य अगदीच काहीतरी आहे Happy
लोक आल्या आल्या त्यांना स्नॅक देऊन मग कवितावाचनाला स्वतंत्र वेळ ठेव बी.

लोक आल्या आल्या त्यांना स्नॅक देऊन मग कवितावाचनाला स्वतंत्र वेळ ठेव बी.>> त्यांनी तसाच प्रश्न केला होता मला वाट्ते. खादाडी करून मग हॉल मध्ये बसायचे असे काही असावे. खात खात कविता म्हणजे रसभंगच

मग फ्रूट स्क्यूअर्सच बऱ्या पडतील का?
सर्वांनीच कांदा खाल्ला असेल तर कोणालाच कांद्याचा उग्र दर्प जाणवणार नाही! Wink

Happy वाह Happy मज्जा आली Happy

आमचा हा कविताचा ग्रुप ११ वर्ष जुना झाला आहे. आम्ही दर महिन्यातून एकदा कुणा ना कुणाच्या घरी भेटतो. ५ वाजल्यापासून तिथे जमतो. तिथेच मग चहा, नास्ता, कविता वाचन, उरलाच वेळ तर कुणी तर एखादा देश पाहून आला असेल तर त्याचे वर्णन, कुणी जर गाऊ पहात असेल तर गाणी आणि मग शेवटी जेवण असा फार सुरेख बेत असतो. कधीकधी एखाद्या पार्कात किंवा समुद्र किनारी सुद्धा हा कार्यक्रम होतो फक्त पावसाचे इथे काही खरे नसते.

जेवण मीच घरी करणार आहे. पाणी न घालता फक्त टोमॅटोच्या रसामधे केलेले पिठले, भाकरी, ठेचा, पिटुकले कांदे, नाचणीचे पापड तळलेले, आणि गोडा मसाला आणि गुळ घालून केलेले फोडणीचे वरण. भाकरी प्रत्येकाला एकेक. थोड्या घडीच्या पोळ्या ठेवीन. जर वेळ उरलाच तर तव्यावर मिरच्या भाजून घेईन. त्या पोकळ लांब कमी तिखट असलेल्या वर निंबू पिळलेले. ह्यासोबत गोड काय ठेवावे हे अजून सुचले नाही नीट. हे सगळ दुपारच्या दोन पर्यत करुन व्हायला हवे. मग थोडी विश्रांती आणि आवराआवर. सगळे पदार्थ इतके नीट ठेवीन की आयत्यावेळी फक्त एकदा काही सेकन्द माईक्रोवेव मधे ठेवले की खायला सुरवात. मग त्यानुसार त्यात बसणारे डबे घेऊन येईल. अशी खूप तयारी डोक्यात आहे आणि करायचा तसा अनुभव सुद्धा आहे. उत्साह तर नेमीच असतो.

आधी आल्याआल्या गवती चहा देईन. मग नास्ता देईन. तो खाऊन झाला की मगच कविता वाचन सुरु. जर चहा उरलाच तर तो मधे परत एक राऊन्ड सर्व करीन. थोडे केळीचे चिप्स आणि ड्राय फ्रुट्स वाडग्यात ठेवीन.

फक्त एकच गोष्ट मला पटत नाही ती म्हणजे डिस्पोजेबल वस्तूंचा वापर. पण त्याला पर्याय सापडत नाही. मधे एके ठिकाणी केळीच्या पानावर नास्ता दिला होता पण ते पान प्लास्टिकच्या ताटलीत ठेवले होते आणि सांगणारा म्हणत होता हे जास्त ईको फ्रेन्डली आहे Happy कमाल आहे Happy

कार्यक्रम २७ जूनला आहे. तोवर तुम्हाला जे सुचेल ते सांगा.

भाकरी गरम राहतील म्हणून मी त्या जाड कापडात ठेवणार आहे तरी पण अजून उत्तम कल्पना असेल तर कळवा. माझ्याकडे तीन तावे आहेत आणि चार बर्नर आहेत. तेंव्हा पटपट होतील. सकस च्या भाकरी नीटच होतात माझ्याच्याही.

बी, जेवणानंतर आईसक्रीम/ मिल्कशेक वगैरे देता येईल का? किंवा कोणतेही डेझर्ट. कारण भाकरीबरोबर कोणताच पारंपरिक गोड पदार्थ योग्य वाटत नाही. तू जो भाकरीबरोबर बेत केला आहेस तो फक्कड आहे! तोंपासु!

स्नॅक कोणता ठरवलास मग? बरेच ऑप्शन्स सुचवले गेलेत इथे.

Pages