Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येत्या रविवारी एक पक्की
येत्या रविवारी एक पक्की नागपुरी फ़ॅमिली जेवायला येणार आहे. नवर्याचा मित्र त्याची बायको आणि २ वर्षाचा मुलगा असे येणार आहेत.
आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो तेव्हा तिने अत्यंत बेचव स्वयंपाक केला होता-- विकतच्या पोळ्या, पनीरची टॉमेटो ग्रेवीतली भाजी, गच्च गोळा जीरा राइस, साधं वरण, बुन्दि रायता, आणि शेवटी स्वीट म्हणुन रबडी केली आहे असं ४ वेळा सांगुन मसाला दुधासारखा तत्सम बोल मधे दिलं.
त्यांच्याशी गप्पा मात्र छान रंगतात त्यामुळे अर्थातच ते यायच्या आधी सगळं रेडी असेल असं बघणार.
आता या लोकान्ची आवड-निवड काही अंदाज येत नाही. गोड म्हणुन मी श्रीखंड ठरवलयं. मित्राला गोड आवडत हे नक्की महितिये. माझा १ वर्षाचा मुलगा सांभाळुन आणि नवर्यची लुड्बुड कम मदत घेउन करण्यासारखा मेनु सुचवा.
तुम्हाला जशास तसे उत्तर
तुम्हाला जशास तसे उत्तर द्यायचेय का? की त्यांनी तुमचे कौतुक करायला हवे असे अपेक्षित आहे?
म्हणजे त्याप्रमाणे वेगळा मेनू सुचवतील लोक.
१) माबो वरचा: सायो मसाले भात,
१) माबो वरचा: सायो मसाले भात, पुरी, टोमाटो सार, अगो ची लो कॅल मेथी मलाई मटर भाजी. काकडीची कोशिंबीर. अजोन एक भाजी हवी असल्यास मटकी उसळ/ फ्लावर बटाटा मटार. सुकी भाजी अहोंना पुर्या लाटायला नक्की जमेल. स्टार्टर कोथिंबीर वडी सुरळी वडी.
२) ऑप्शन २ नॉन व्हेज आहे. : मालवणी काँबडी वडे, व्हेज पुलाव ? अंडे बिर्यानी. रायते. ह्याला स्वीट काय द्यावे? नंतर आइस्क्रीम देता येइल.
त्यांना मूल लहान असल्याने किंवा इतर काही कारणाने चांगले मेन्यू सर्व करता आला नसेल. सोडून द्या ते.
मी ते सोडुनचं दिले आहे पण ते
मी ते सोडुनचं दिले आहे पण ते दोघं त्यावेळी अगदी चवीने जेवत होते. मला फ़ार कौतुकाची अपेक्षा नाही पण त्यांना जेवण आवडावे असे नक्कीच वाटते.
नॉनवेज ते खात नाहीत.
मटकी भाजी, पुर्या, श्रीखंड हे आता नक्कि केलय. मेनु सुटसुटीत ठेवावा का? जोडीला मसालेभात - टॉमेटो सार किंवा सोलकढी , पापड, कोशींबीर ......अजुन काही करावं का?
पुदिन्याची किंवा कैरीची चटणी?
पुदिन्याची किंवा कैरीची चटणी? भोजनानंतर मस्तपैकी विडा? गुलकंद, सुकं खोबरं, बडिशेप, सुपारी, वेलची वगैरे घालून आणि लवंग खोचून. अगोदर करून फ्रीजमध्ये गार करून ठेवता येईल.
फळांचे काप गार करून जेवणानंतर खाण्यासाठी ठेवू शकता.
पिनुल, मी पण पक्की नागपुरी
पिनुल, मी पण पक्की नागपुरी आहे. आतिथ्य हातचे राखुन न करता चविचे जेउ घालण्यात मला तरी धन्यता वाट्ते.
तुम्हाला जशास तसे उत्तर द्यायचेय का? की त्यांनी तुमचे कौतुक करायला हवे असे अपेक्षित आहे?+१
मटकी भाजी/ बटाटा भाजी, पुर्या, श्रीखंड , मसालेभात -कढी( सोलकढी नाहि) , पापड, कोशींबीर हा मेनु छान आहे.
Girls I think त्यांना
Girls I think त्यांना म्हणायचंय की जे जेवण मला आवडलं नाही ते जेवण ते स्वत: मात्र चवीने खात होते त्यामुळे त्यांच्या आवडी निवडीचा यांना अंदाज येत नाहीये म्हणुन त्या इथे प्रश्न विचारतायेत
पिनुल, रिया! चविष्ट जेवण
पिनुल, रिया! चविष्ट जेवण कुणाला आवडणार नाही?, व्यक्ती तितक्या प्र्कुती , कदाचित ती (किन्वा तो) तेवढा सुगरण नसेल स्वयपाकात, मुलगा लहान असल्याने नसेल जमल खुप छान बनवायला...
त्यानी बोलावुन केलेला मेनु वेल राऊन्डेड होता भले चविष्ट नसेलही! ..पिनुल! तुम्ही मात्र जे काय बनवायच ते मनापासुन बनवा
आम्ही त्यांच्याकडे जेवायला
आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो तेव्हा तिने अत्यंत बेचव स्वयंपाक केला होता-- विकतच्या पोळ्या, पनीरची टॉमेटो ग्रेवीतली भाजी, गच्च गोळा जीरा राइस, साधं वरण, बुन्दि रायता, आणि शेवटी स्वीट म्हणुन रबडी केली आहे असं ४ वेळा सांगुन मसाला दुधासारखा तत्सम बोल मधे दिलं.... पण ते दोघं त्यावेळी अगदी चवीने जेवत होते. >>>
एक अवांतर किस्सा आठवला. एका नवीन लग्न होऊन आलेल्या नवरीला स्वयंपाक अजिबात जमत नसतो पण कुठलाही पदार्थ जमला नाही की ते कबूल करण्याऐवजी ती 'आमच्याकडे हा पदार्थ असाच करायची पद्धत आहे.' असं ऐकवत असते. एकदा तिच्या माहेरी तिच्या सासूसासर्यांसकट सगळ्यांना जेवायला बोलावतात तर सासरे हळूच सुनेला म्हणतात की तुझ्या आईला सांग की लोकांकडे करतात तसाच स्वयंपाक करा
का नवीन लग्न होऊन आलेल्या
का नवीन लग्न होऊन आलेल्या नवरीला स्वयंपाक अजिबात जमत नसतो पण कुठलाही पदार्थ जमला नाही की ते कबूल करण्याऐवजी ती 'आमच्याकडे हा पदार्थ असाच करायची पद्धत आहे.' असं ऐकवत असते.>>>> हे माझे पेटंट वाक्य आहे.
Girls I think त्यांना
Girls I think त्यांना म्हणायचंय की जे जेवण मला आवडलं नाही ते जेवण ते स्वत: मात्र चवीने खात होते त्यामुळे त्यांच्या आवडी निवडीचा यांना अंदाज येत नाहीये म्हणुन त्या इथे प्रश्न विचारतायेत स्मित>>>>>>> रिया हेच म्हणायचं होत मला....
पण बेत छान झाला. ते तिघहि छान जेवले, कौतुकही खुप झालं, जाताना श्रीखंड आणि मटकी उसळ डब्यात घेउन गेले. पानाचे विडे विकतच आणले.
मला स्वयंपाक करायलाही सोप्पं पडलं.
सगळ्यांचे मनापासुन आभार
तर सासरे हळूच सुनेला म्हणतात
तर सासरे हळूच सुनेला म्हणतात की तुझ्या आईला सांग की लोकांकडे करतात तसाच स्वयंपाक करा

>>
प्राजक्ता
बहिणीचा वादी येतोय (तसा बराच लांब आहे पण आमच्याकडे प्लॅनिंग एक महिना आधी सुरू होतं
) . बरेच व्याप सांभाळून वन डिश मिल बनवायचंय तिच्या मैत्रिणींसाठी.
इतके वर्ष पावभाजी बनवत आलो पण यावर्षी मला एकटीला तो सगळा व्याप शक्य नाही.
एकुण १२ मुली असतील. प्लिज मेन्यु सुचवा,
इडली डोसा तत्सम साऊथ इंडियन पदार्थांना बिग नो नो
मला पण वाढदिवसाच्या
मला पण वाढदिवसाच्या पार्टीसाठी बेत सुचवा. बहूतेक ५-७ मुलं आणि ३-४ आया असतिल. पास्ता, पावभाजी, नुडल्स नको.. मलाच या पदार्थांचा कंटाळा आलाय. आलटून पालटून प्रत्येक पार्टीत हेच पदार्थ असतात. इडल्या-दोसे पण शक्यतो नकोय.
रीया, मिपा नाहीतर
रीया, मिपा नाहीतर दिनेशदांची शेवभाजी विथ पाव सोबत ताक / लस्सी दे. आणि एखादा गोड पदार्थ.
अल्पना, मोमोज, छोटे पिझ्झा /
अल्पना, मोमोज, छोटे पिझ्झा / ओपन टोस्ट, दही वडा, कटलेट्स, स्प्रिंग रोल यापैकी काही करता येईल का?
मिपा बर्याचदा खाण्यात असतो
मिपा बर्याचदा खाण्यात असतो गं वरचेवर
त्यामुळे तो आमच्यासाठी पार्टी आयटम नाही.
पोटभर पदार्थ हवा असल्याने चाट आयटम्स असेच बाहेर पडतात
अल्पना, सँडविच ढोकळा, केक
अल्पना, सँडविच ढोकळा, केक पॉप्स
पार्टी आयटम नाही. <<< रीया
गंगाकिनारेवाले डुबकी वाले आलू आणि पुरी पण पुरी तुला जमेल का किंवा फुलका (थोड वेळ खाऊ काम आहे). दाबेली 
व्हेज बिर्याणी/ मसाले भात व
व्हेज बिर्याणी/ मसाले भात व जिलेबी, मठ्ठा. हा एक मेन्यु.
बर्थडे केक पिझ्हा व कोकाकोला, चिप्स हा एक मेन्यु. ( हेल्धी नाही पण. )
व्हेज नूडल्स, सूप. फ्राइड राइस. हा एक
तिखट मिठाच्या पुर्या, गोड शिरा एक मूद, उकडलेल्या बटाट्याची भाजी, व दही भात. हा एक.
पावभाजीच खरे तर सोपे आहे. तिला काय आवडते खायला?
अमा, मस्तच मेन्यू लिस्ट गोड
अमा, मस्तच मेन्यू लिस्ट
गोड शिरा एक मूद, उकडलेल्या बटाट्याची भाजी, व दही भात <<< माझा आवडता मेन्यू त्यात भात वरीच्या तांदूळाचा असेल तर मस्तच.
तिला काय आवडते खायला?<<<< + १ रीया, तिच्या आवडता पदार्थ बनव.
छोले + त्रिकोणी घडीचे पराठे +
छोले + त्रिकोणी घडीचे पराठे + जिरा राईस + मँगो शिरा/ गुलाबजाम + आईस्क्रीम
कोणी पोळ्यावाल्या बाई असतील तर त्यांच्याकडुन त्रिकोणी घडीचे पराठे करुन घ्यायचे...अर्धवट शेकवुन घ्यायचे आणि आयत्या वेळी तुप घालुन मस्त तव्यावर भाजुन घ्यायचे...
छोले ला जरा जास्त रस ठेवायचा. सोबत बारीक चिरलेला कांदा लिंबु.
पुर्या शक्य असतील तर पुर्या पण करु शकतेस.
अल्पना , फ्रेश फ्रुट स्क्युअर
अल्पना , फ्रेश फ्रुट स्क्युअर , ओपन सॅन्ड्विच , ब्रेड पिझ्झा , फ्रेन्च फ्राईज , फ्रॅन्की ,ढोकळा , मून्ग भजी ,बर्गर
इडली डोसा नको असेल तर त्याच पीठाचे आप्पे तिखट चटणी घालून .
स्नू ने सांगितल तस केक पॉप्स नाहीतर मग केक-आप्पे .
व्हेज/ शेजवान फ्राईड राईस +
व्हेज/ शेजवान फ्राईड राईस + कुठलंही चायनीज सूप
पाणीपुरी (मुली आपापली करून खाऊ शकतील - किंवा कोणा एकीला सांगायचं - मज्जा येते)
रिया, छोले कुलचे? अमृतसरी
रिया, छोले कुलचे? अमृतसरी छोले + कुलचे हा बेत खूप सोप्पा आहे. रेडीमेड कुलचे मिळतिल पुण्यात. तव्यावर बटर लावून पावाप्रमाणे भाजायचे.
केक पॉप्स करेनच. मोमोज,दहीवडे हे पण छान ऑप्शन्स आहेत. ढोकळा नाही आवडत. स्वैपाकघरात /गॅससमोर जास्त वेळ लागू नये ही पण एक अट आहे. (सध्या उकाडा अन चिकचिकीने त्रस्त झालेय) सॅंडवीच पण केले जातिल. तो एक आवडीचा पदार्थ आहे.
आप्पे पण चालतिल खरं तर. आप्प्यांचं माझ्या लक्षात आलं नव्हतं.
धन्यवाद.
दालढोकली (गुज्जू स्टाईल
दालढोकली (गुज्जू स्टाईल वरणफळं), अमीरी खमण, फाफडा / पापडी - सोबत उकडून तळलेल्या हिरव्या मिरच्या किंवा मिरची ठेचा, गोड म्हणून जिलबी किंवा इम्रती - हाही एक मेनू पर्याय आहे.
मसाला दूध / मसाला चाय / कॉफी / मसाला ताक / लस्सी (यांपैकी हवामानव आवडीनुसार जे सूट होईल ते!)
ऊँधियू, पुलाव / खिचडी, फुलके, कढी, गट्टे की सब्जी, पापड, अचार, सलाद. गोड म्हणून शाही टु(तु)कडा.
रीया, दडपे पोहे - भरपूर ओलं खोबरं कोथिंबीर घालून केलेले. सोबत हवे असतील तर जरा झणझणीत चवीचे पापड मिरगुंडं तळून. सांडगी मिरची तळून व चुरून. वाफाळती कॉफी. गोड म्हणून खरवस करू शकतेस किंवा दलिया / शेवयांची सुकामेवा घालून खीर.
इथले बरेच मेन्यु आवडले
इथले बरेच मेन्यु आवडले
घरगुती काही नकोय (बाहेरुन विकत आणल्या तरी पुर्या आणि बटाट्याची भाजी घरगुती असते म्हणे आणि घरात पावभाजी बनवली तरी ती घरगुती नसते म्हणे
टिनेजर्स :|
)
बर्थडे केक पिझ्हा व कोकाकोला, चिप्स हा एक मेन्यु
व्हेज नूडल्स, सूप. फ्राइड राइस.
व्हेज/ शेजवान फ्राईड राईस + कुठलंही चायनीज सूप
छ्होले कुलचे
हे मेन्यु आवडले. पण मला छोले नाही येत करता
यशस्वी रेसेपी आहे का एखादी?
पिझ्झा विकत आणता येईल पण महाग पडेल मला.त्यामुळे तो लास्ट ऑप्शन ठेवते .
पाणीपुरी, दहीवडे पण मस्त ऑप्शन पण ते पोटभर नाही होणार
तिला पावभाजी, चायनिज, पिझ्झा,छोले भटुरे हे सगळंच आवडेल
मला करायला नाही आवडणार 

एकतर स्वयंपाकात उजेड आणि त्यात १२ मैत्रिणी, आम्ही ४ जण, समोरच्या घरातले ४ जण, आजी आणि मामा असे २२ लोकं आहेत. एवढ्यांसाठी एकट्याने पावभाजी करणं जरा अवघड पडेल ना. पाव भाजायला पण मदत नाही होणार साधी कोणाची. आणि पावभाजीचा व्याप तसा बराच असतो
नूडल्स सोप्पे पडतील आणि नॉरचं सूप पाकिट आणुन त्यांचं सूप चालेल का?
गोडाला गुलाबजाम विथ आईसक्रिम आणि केक आहेच
पावभाजीपेक्षा सोपे काही नाही
पावभाजीपेक्षा सोपे काही नाही गं मुली.
तरी पण हे काही पर्याय
भाताचा कुठलातरी प्रकार भरपूर प्रमाणात, बरोबर एखादे सार किंवा तत्सम पातळ पदार्थ आणि कोशिंबीर/ बुंदी रायते वगैरे.
अरे मंजूच्या मेनूत हेच आहे की. मी आधी वाचलंच नाही.
अरु, या कन्येला सगळ्यात पहिला
अरु, या कन्येला सगळ्यात पहिला ऑप्शन मी दडपे पोहे सांगितलेला तेंव्हा तिने "हुं ते तर आपण रोजच करतो. बड्डे स्पेशल थोडीच आहे हे. आणि पार्टीसाठी दडपे पोहे? ईईई" असे उद्गार काढल्यावर मी मोठ्या मनाने तिला माफ करून टाकलं. येडपट आहेत आत्ताच्या मुली
नूडल्सला काय येणार दडपे पोह्यांची सर. आणि हे या पोरींना थोडीच कळणारेय ! हुं!
नी, मंजू : पुलाव/ मसाले भात वगैरे नकोय मॅडमला . काही तरी वेगळंsssss हवंय.
एकतर इतके दिवस तिने घरात जी काही मदत केलीये/सांभाळंलय त्याच्या बदल्यात 'किमान बड्डे पार्टी तरी छान होऊ द्या ना' म्हणून एवढंच मागितलंय . नाही तर दोन रट्टे देऊन वडापाव / सामोसा देऊन जा म्हणलं असतं बाहेर खेळायला
छोल्यासाठी चना मसालाचं पाकीट
छोल्यासाठी चना मसालाचं पाकीट आणशील त्यावरची कृती केलीस तरी परफेक्ट होईल.
पाभा साठी चिराचिरी करायला मदत
पाभा साठी चिराचिरी करायला मदत घेता येईल का कोणाची? किंवा आदल्या रात्री काही भाज्या चिरून फ्रीज करून ठेवल्या तर वगैरे?
एकतर इतके दिवस तिने घरात जी
एकतर इतके दिवस तिने घरात जी काही मदत केलीये/सांभाळंलय <<
सॉरी पण तिला स्पष्ट शब्दात ती मदत किंवा एक्स्ट्रॉ काही नाहीये. घरातली व्यक्ती म्हणून जबाबदारी आहे याची जाणीव दे.
स्वैपाकासाठी तिला मदतीला घे.
बाहेरून आणायचं तर खर्च किती परवडू शकतो याचा अंदाज तिला दे आणि त्यात मॅनेज होतंय का तिचं तिलाच बघायला लाव.
Pages