बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोल्यासाठी चना मसालाचं पाकीट आणशील त्यावरची कृती केलीस तरी परफेक्ट होईल.

>>>

अरे हो आणि मला अनुने पण एक सोप्पी रेसेपी सांगितलिये ती आठवली.
आधी एकदा घरात ट्राय करून बघते
जमलं तर हेच फायनल करते

सध्या
१) केक, आईसक्रिम विथ गुलाबजाम, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक
२) नूडल्स आणि सूप , केक, आईसक्रिम विथ गुलाबजाम
३) छोले कुल्चा, केक, आईसक्रिम विथ गुलाबजाम

एवढे ऑपशन ठिक ठाक वाटतायेत.
थँक्स गर्ल्स Happy

रीया, व्हेज चेट्टीनाड बिर्याणी कर. पोटभर होते आणि वन डिश मिल आहे. दम बिर्याणी इतका खटाटोप बिल्कुल नसतो. सोबत दही रायता आणि साईड डिश म्हणून छोले. अल्पनाची अमृतसरी छोल्यांचीरेसिईपी एकदम परफेक्ट आहे. अजिबात चुकत नाही.

अल्पनाची अमृतसरी छोल्यांचीरेसिईपी एकदम परफेक्ट आहे. अजिबात चुकत नाही.
>>
शोधुन बघते करुन बघते Happy
काहीच नाही जमलं तर भाताकडे बघते Wink
ते मात्रं नक्की जमेल

अल्पना, तुझ्या पुदिना घातलेल्या कांद्याच्या रायत्याची रेसिपी दे ना. आत्ताच शोधणार होते तर तू दिसलीस Happy

रिया, भेळ कर किंवा राजस्थानी दही कचोरी आण विकत. ह्या कचोर्‍या भल्या मोठ्या असतात व सोबत चटण्या पण मिळतील. अजून एक कॉमन डिशमध्ये काहितरी नमकिन ठेव. सोबत गोडाचं म्हणून आईसक्रिम आण.

सध्या एक मसबा केक फार पॉप्युलर आहे मुंबईत. चॉकोलेट आइसिंग व वरून नटीज ( गोळ्या ) कॅडबरीच्या लावलेल्या असतात ते. तसा केक ऑर्डर देता येइल तिला चॉकोलेट केक आवडत असेल तर.
नाहीतर रेड व्हेलवेट केक सध्या फेमस आहे. / चॉकोलेट सॉल्टेड कॅरमेल टार्ट्स / केक पण जबरी लागतात काही नवी टेस्ट हवी असेल तर. मला स्टारबक्स मध्ये फुकट दोन मिळालेले.

अल्पना धन्स Happy

नी, रोज करते ती मदत! बड्डेला कन्सेशन असू देत गं Happy

छोले करणं तसं अवघड नाही आणि कुल्चा बाहेरून मागवता येईल सो फारशी कटकट नाही Happy

केश्वे, राजस्थानी कचोरी काय आहे ते मलाही माहीत नाही.
कचोरी आणि भेळ चालेल तसही Happy
आता ४ ऑप्शन झाले Happy

अमा, पुण्यात मिळेल का रेड व्हेलवेट केक?
मला पण खावून पहायचाय तो

कचोरी साठी साईट ब्लॉक्ड आहे. मोबाईलवरून बघते नंतर

रीया, नेहमीच्या कचोरीचं राजस्थानी कचोरी हे जरा रॉयल भावंडं आहे!
व्हेज बिर्याणीची बाहेर ऑर्डर देता येईल. पठाणी बिर्याणी / तंदूर बिर्याणी किलोच्या किंवा अर्धा किलोच्या प्रमाणात मिळते. बरीच पुरते. कच्छी दाभेलीचाही ऑप्शन आहे. बहुतेक लाजोची कृती आहे इथे कुठेतरी. दाभेली मसालाही विकत मिळतो.

व्हेज कटलेट्सही आधी तयारी, चिराचिरी करून तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करून देता येतात. सोबत केचप व हिरवी चटणी. कटलेट्स आयत्या वेळी तव्यावर परत शेकता येतात. अगोदर जरा कमी शॅलो फ्राय करायची.

रिया आधी एक पेस्ट्री खाऊन बघ रेड व्हेल्वेटची मगच ठरव. मी इतक्या ठिकाणी वाचून कौतुकाने एका हायएण्ड बेकरीतला रेड व्हेल्वेट खाऊन बघितला आणि इतका भ्रमनिरास झाला की काय सांगू. त्यानंतर एक दोन ठिकाणीही ट्राय केला फुली मारण्यापूर्वी पण इतकी सिंथेटिक आणि अतिगोड चव अजिबातच आवडली नाही.

छोले - कचोरी पण भन्नाट लागते. कचोरी मागवायची, छोले घरी. पोटभर होते, नेहमीचे चाट मेन्यूपेक्षा वेगळ.

रेड व्हेल्वेट सिंथेटीक +१. एका मैत्रिणीने बीट घालून घरी केला होता. तो मात्र सुरेख होता.

छोले-कचोरी/समोसा चाट हा आमच्याकडे फार हिट्ट पार्टी मेनु आहे. पोटभर होते, कचोरी/समोसा तयार आणल्याने काम निम्मे होते. बरोबर केक, मिल्कशेक इ. द्यायचे.

ओह!
थँक्स नी, हो मी आधी टेस्ट करणार आणि मगच मागवणार.

छोले कचोरी आणि कच्छी दाबेली पण मस्त ऑप्शन. कटलेट मला अजिबात जमत नाहीत कधीच Sad
का काय माहीत.

भात आयटम्स लास्ट ऑप्शन आहे

छोले समोसा कसा करायचा? >> गरम समोसा मोडतोड करून प्लेट्मध्ये घ्यायचा. वर तयार छोले + बाकी चटण्या + कां-टो-हिमी-दही-शेव.

असाच नुसता दही-समोसाही मस्त लागतो.

रच्याकने रीया; एक प्लेट छोले-समोश्यात (२ नग समोसे) एकाचं पोट भरतं. तसा विचार करून पाहा.

ह्म्म्म!
चाट आयटम कर म्हणाली तर त्याचा विचार करता येईल पण त्यापेक्षा छोले कुल्चा बरा वाटतोय मला सध्या. कारण चटण्या करायला वेळ आणि स्किल हवं.

या शनिवारी छोले ट्राय करणार आहे. जमले तर ठिक नाही तर Proud

अल्पनाची अमृतसरी छोलेंची कृती मस्त व सोपी आहे. नो कुटाणा. छोले अगोदर करून ठेवायचे. जेवढे मुरतात तेवढा त्यांचा स्वाद खुलत जातो. सोबत कैरीचे लोणचे, कांदा, लिंबू.

रिया हक्का नूडल्स पण पटकन होतील जर चिराचारी आधीच करुन ठेवलीस तर. त्याचे सॉस, मसाले सगळे तयारच मिळतात. तव्यावर पिझ्झा पण करता येइन पिझ्झा बेस, चीज, सॉस बाहेरुन आणुन.

रीया,
समोसा-चाट साठी चटण्या आधी करुन ठेवता येतील. इथे माबोवर चटण्यांचा धागा आहे.
छोल्याबरोबर कुलचे देखील घरी करता येतील. नेहमीच्या कणकेचे कुलचे झटपट होतात. आधी करुन ठेवता येतात.

चाइनीस मेनु आहे पोट्लक साठी मला डेज़र्ट करायचे आहे. मी एग्लेस डेज़र्ट बनवू शकते . प्लीज़ सुचवा ना काहीतरी हातात वेळ आहे नवीन असला पदार्थ तर आधी करून बघू शकते. पंधरा मोठ्या लोकांसाठी बनवाव लागेल .

http://www.tarladalal.com/Honeyed-Noodles-with-Vanilla-Ice-cream-4171r
http://www.tarladalal.com/Date-and-Sesame-Wontons-292r
http://www.tarladalal.com/Goreng-Pisang-%28fried-Bananas%29-%28-Chinese-...
यातले पहिले दोन पदार्थ मी एका चायनीज फुड फेस्टिव्हल मध्ये खाल्ले आहेत. तिसरा पदार्थ एका रेसेपी बुक मध्ये वाचलाय.

Pages