बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखी पोर्णिमेसाठी हा मेनू कसा आहे -

मसालेभात
टोमॅटो सार / सूप
बटाट्याची भाजी
पुरणपोळी
काकडीची कोशिंबीर / चटणी

लहान मुलं आहेत ४-५ आणि मोठे १०-१२.

मी काही करणार नाहीये, एकांकडे आचार्‍याने खूप मस्त मसालेभात आणि पुरणपोळी केली होती ती आयडीया ढापत्ये Wink

मसालेभात आणि नारळीभात २ भात होतील ना, नारळीभात केला तर गोड + भात असं चालून जातं का ? पण मग पुरणपोळी ड्रॉप होईल.

आमच्याकडे दीड दिवसाचे गणपती असतात. साधारण 8-10 लोक दिवसभर असणार आणि 20-25 लोक फक्त संध्याकाळी दर्शनाला येणार.

जेवण आणि संध्याकाळ साठी बेत सुचवा.

कांदा लसूण वर्ज्य.

बाप्पांचा नैवेद्य पण सुचवा.

संध्याकाळी येणार्‍यांना पोटभरु स्नॅक्स असावं असा वाटतय. पावभाजी, पालक पुलाव बटाटा वडा मागील वर्षी करून झालेय.

संध्याकाळ साठी इडली चटणी ठेवावी का? पण इडली थंड होण्याचा धोका आहे. माझ्याकडे सध्या मा.वे. नाही आहे..

नारळीभात केला की पुपो आपोआपच ड्रॉप होणार की... दोन-दोन गोड पदार्थ जड होतात.. अर्थात बर्‍याच जणांना चालतातही पण मग दुसरा गोड पदार्थ करा.. पुपो नको..

नारळी भाता बरोबर साधा भात पण ठेवा थोडा..

मंजूडी,..
टोमॅटो चे सार (जिर्‍याची तुपातली फोडणी दिलेले, फक्त टोमॅटो वापरुन.. बाकी कुठलीही भाजी नको)
नारळी भात
साधा भात - गरजे पुरता
साधे वरण
पोळी
सुकी भाजी (बटाटा, कोबी, फ्लॉवर, तोंडली ह्यापैकी कुठलीही एक जी आवडत असेल ती) किंवा मटकीची उसळ (रस्सा एकदम कमी..)
काकडीचीच कोशिंबीर फोडणी दिलेली असल्यास पळेल (फोडणी नको असल्यास दही घालून पण करत येईल)
हिरव्या मिरचीची झणझणीत चटणी..
पोह्याचे तळलेले पापड, कुरडया

गणपतीत अनेकांचा उपास असतो म्हणून साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे ठेवतात आमच्याकडे. म्हणजे बाकी पण असतात पदार्थ पण या दोन पैकी एक असतोच. आणि उपास नसणारे पण खातात मस्त हेच पदार्थ!

वेदिका दी, साबूदाणे वडे वेळेवर टाळावे लागतील ना? संध्याकाळी माझी थोडी धांदल उडते. आरतीची तयारी, नैवेद्य, आलेल्यांचा पाहुणचार ...साबुदाणा खिचडी च ऑप्शन चांगला वाटतोय...आयत्यावेळी गरम करता येईल...पण जोडीला काय ठेऊ?

नाही होत... बराच वेळ नाही ठेवायच्या. एक दणदणीत वाफ आली की गॅस बंद करून कूकर लगेच उघडायचा. छान गरम होतात.

snoo, तिखटाचे आप्पे - चटणी / उडीद वडे - चटणी / पालक-पुरी व टोमॅटो चटणी असे काही पाहुण्यांसाठी ठेवता येऊ शकेल का? सोबत गोडाचा एखादा पदार्थ.
उत्तरेकडे करतात तसा कणकेचा / सोजीचा शिरा किंवा आपल्यासारखा सत्यनारायणाचा शिराही ठेवता येईल. सोबत मूग भजी.

जेवणासाठी तुमच्या सोयीचा व आवडीचा बेत असेल तर उत्तम!

उदा. वर दिले आहे त्याप्रमाणे मसालेभात, साधा भात - वरण, टोमॅटोचे सार / उसळ / रस्सा भाजी, उकडीचे / तळलेले मोदक, शेवयांची खीर, पोळ्या, बटाट्याची किंवा इतर कोणतीही एक सुकी भाजी, पापड्या-कुरड्या तळून, चटणी / लोणचे, गाजराची कोशिंबीर किंवा खमंग काकडी. तांबूल.

इडल्या कूकरमधे शिट्टी न लावता वाफवता येतील. ---नाहीतर सरळ उकळत्या पाण्यावर इडल्या चाळणीत घेवून ठेवायच्या. मस्त गरम गरम वाफे वरच्या होतात. सेम ट्रिक पावभाजीच्या ब्रेड ला पण उपयोगी पडते.

आतापर्यंत तरी हा विचार केला आहे. सूचना वेल्कम !!

नैवेद्य आणि दुपारचे जेवण

पुरी
पनीर,बटाटा, मटार,बीन्स, गाजर मिक्स भाजी
जीरा राईस
दाल तडका
खमंग काकडी
दही वडे
मोदक
पापड कुरडई

संध्याकाळचा नाश्ता

सोलकढी

दही वडे
साबुदाणा खिचडी
नारळाची चटणी
पापड कुरडई
खमंग काकडी

मोदक
बेसन लाडू

अरुंधति दी, मागच्या वर्षी सत्यनारायणाचा शिरा बनवला होता. सुपर डुपर हिट झाला होता. आलेल्यांना बांधून पण दिला Happy

1_0.jpg

मिसळ पाव ही मेन डिश असेल तर त्यासोबत अजुन काय बनवता येईल ?
स्टार्टर मध्ये पालकवडी/ अळुवडी कशी वाटेल सोबत ?
शिरा सोडुन कुठला दुसरा मराठी गोड पदार्थ मिसळीसोबत चांगला वाटेल. प्लीज सुचवा.

अळूवडी / कोथिंबीरवडी जाईल. चमचमीत मिसळीबरोबर थंडगार मसाला ताकही छान राहील. गोडात काही विशेष नाही सुचत...

अगदीच वाट्ल तर गुलाबजाम/गाजरहलवा विथ आईस्क्रव्ह (व्हेनिला)

गोडात काही विशेष नाही सुचत... <<< योकु Angry Happy
प्रिंसेस, गोडामध्ये जिलेबी + फाफडा + पपईची चटणी, खिर, गोड पोंगल, गु.जा., रसगुल्ला. पु.पो., मस्तानी, पियुष, मिल्कशेक विथ आईस्क्रिम, फालुदा.

मिसळ ऑलरेडी तर्रीवाली म्हणजे तेलकट असते. अळबवडी, पालकवडी ऐवजी सुरळीवडी, मसाला इडलीचे छोटे तुकडे असं काही ठेवता येईल का? मराठी गोड पदार्थ मिसळीसोबत आता फक्त ओल्या नारळाची करंजी सुचतोय किंवा मुगाचा शिरा (पण हाही तुपट होणार).

योकु, काशी, आरती, धनुकली - धन्यवाद !!!

मला मराठी गोड पदार्थ हवा आहे. हेसांगायचे विसर्ले Uhoh
पुरण पोळी एकदा मेन जेवणात बनवली आहे. (मला येत नाही. साबा असतांना पुपो खाउ घालुन झालीये सेम लोकांना)

शिरा , बहुदा एकदा करुन झालाय . आठवत नाहेये.

आईस्क्रीम सध्या लास्ट ऑप्शन ठेवतेय.

जिलेबी घरी बनवता येत नाही. Sad बाहेरुन आणणे शक्य नाही. Sad

गुलाबजामुन, रबडी किंवा गाजरहलवा यातले काय जास्त योग्य होईल मिसळीसोबत ?

धन्यवाद लोको.

Pages