बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटे कापुन त्यात मसाला भरून ते फॉईल मध्ये रॅप करून न्यायचे. मस्त ग्रील होतात आणि उकडलेले स्पाईसी बटाटे मिळतात. तसेच कांदा आणि रताळी पण करता येतील.

व्यापारी ज्यो (किंवा त्याच्यासारखे दुसरे परवडणारे इकोफ्रेंडली व्हिगनस्वर्ग दुकान) मध्ये ग्रील करायला व्हेज गरम कुत्रे नि पॅटीस असे काय काय मिळते. आवडत असेल तर ते ही नेता येईल.

आमच्या देशात नाही गं व्यापारी ज्यो. त्याचा कोणी दूरचा भाऊबंद सापडतो का पहाते. एक नवे व्हीगनस्वर्ग दुकान नुकतेच झाले आहे तिथे काय मिळते ते जाऊन पहाते.

अरुंधती, कॉर्न-बटाट्याची कृती सोपी वाटते आहे. धनि, कसला मसाला भरायचा बटाट्यात? रताळी मस्त आली आहेत सध्या, मी रताळ्याचे काप करून, मॅरिनेट करून न्यावे काय या विचारात होते, किंवा रोस्टी टाइप रताळ्याचे थालीपीठ.
टिक्का प्रकारांसाठी रेडिमेड टिक्कामसाला वापरायचा का?

जो आवडेल तो मसाला भरायचा. मला कधी कधी बार्बेक्यु स्टाईल्चा आवडतो तिखट मीठ आणि फ्लेवर. किंवा मग आले लसूण खोबरं आणि मिरची एकत्र करून. अजुन डोकं लावायचं आणि इथे येऊन काय केलं ते सांगायचं Lol

हाताला हात लावून म्हणतात तसं बटाट्यांना डोकं लावून मम् वगैरे पण म्हणायचं का? Wink नंतर बटाट्यांसोबत भाजायचं की कसं ते पण सांगा.

@मृदुला, कोणताही तंदूरी मसाला बटाट्यांत भरून चांगला लागेल असे वाटते. फक्त कोणत्या ब्रँडचा निवडायचा व कोणता मसाला उपलब्ध आहे हे बघायचे. Wink

१. बेल पेपर्स रोस्ट करुन , सालं काढून , लसूण + ऑऑ, मीठ, मिरपूड घालून बागेत किंवा इतालियन ब्रेड बरोबर
२. अस्परॅगस - ऑऑ, मीठ्, लसूण , मिरपूड घालून
३. झुकिनी, छोटे स्क्वाश . पातळ स्लाइसेस करुन थोडे स्रि रचा सॉस, ऑऑ, मीठ मधे मॅरिनेट करुन
४. इथल्या इंग्रोमधे कधी कधी ओले हरभरे मिळतात. ग्रिल वर ठेवायचे जाळीदार बास्केट मिळते. त्यात घालून ग्रिल करायचे . मस्त लागतात एकेक सोलून खायला

५. पनीर क्युब्स ना काजूची पेस्ट्, लसूण अन थोडीशी हिरवी मिरची असे वाटण लावून मॅरिनेट करायचे.
६. पायनॅपल च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस - ग्रिल करुन त्यावर एकेक स्कूप व्हनिला आइसक्रीम, थोडे कॅरमेल ड्रिझल करुन.
७. आवडत असल्यास पीचेस अर्धे करुन, बी काढून ग्रिल करणे , मग त्यात आइसक्रीम भरुन

८ बागेत चे स्लाइसेस - लाईटली ग्रिल करुन त्यावर ब्रुशेटा टॉपिंग

मस्त आयडिया.
पनीर मिळत नसल्याने हालूमी आणले आहे. त्याला लसूण मिरचीत बुडवता येईल.
पायनॅपल आणि पीचची आयडिया पण मस्त.
--
आत्ताच होस्टांची इमेल आली की काही आणू नका. व्हेज सोय मी करतो. ह्म्म.. काय करावे.
--

इथे मिळणारे टिक्का/ तंदूर मसाले (पेस्ट/ कोरडे) अतिशय लालबुंद आणि (मला) न-अ‍ॅपेटाइजिंग दिसतात, म्हणून विचारले कसला मसाला.

मृदुला माझ्याकडे एक हालापिनो रब आहे मी एकदा बटाट्याला तो वापरला तरी पण चांगलेच लागले. कुठलाही तुम्हाला चव आवडणारा मसाला वापरा. बटाट्याची सालं न काढता गोल गोल मध्यम जाडीच्या चकत्या करून ग्रील्वर टाकल्या होत्या.

व्हेज बार्बेक्यु पाॅटलक साठी पदार्थ सुचवा. भाज्या, पनीर झालय. कबाब एक डोक्यात आहे पण काही नविन कल्पना असेल तर उत्तम. पानगी वेरीएशन आहे का काही ?

अर्र, मी बघीतलच नाही. हालापिनो चीज पाॅपर्स आणि बागेत विथ मसाला पापड चा मसाला असा विचार करतेय. जमल तर फ्रुट स्टिक्स किंवा मार्शमेलो बनाना मुलांसाठी ! कस वाटेल?
सिंडरेला आणि योकु धन्स!

कृष्णेकाठच्या वांग्याचं पोतं येउन पडाय्चं...
त्या वांग्याची चवं आहाहा....( तोंडाला पाणी सुटलेली बाहुली ) <<

वाचून निव्वळ जळजळ झालेली आहे इथे. सांगलीस चक्कर मारावीच आता!

व्हेज बार्बेक्युचे प्रकारः

१. मश्रूम्स, बटाटा, सिमला मिरची, पनीर, टोमॅटो, कांदा या भाज्या शानच्या तंदूरी मसाल्यात किंवा इतर कुठल्याही तंदूर मसाल्यात पाकिटावर दिलेल्या कृतीनुसार मुरवून ग्रिल करणे. हे खालचे फोटो लालूकडच्या २०१३च्या वासंतिक कल्लोळामधले आहेत.

२. झुकीनी, यलो स्क्वॅश, अ‍ॅस्पॅरॅगस या भाज्यांना ऑलिव्ह ऑईल, मीठ, मीरपूड, इतर आवडीचे हर्ब्ज लावून ग्रिल करणे.
३. भरपूर लसूण पाकळ्या मीठ घालून फॉईलमधे गुंडाळून ग्रिल करायच्या. सोलून काट्यानं मॅश करून त्यात मीरपूड घालून ताज्या बागेत बरोबर खायचे.
४. सिमला मिरची, लसूण, कांदा, बिन बियांचं वांगं, एखादी हिरवी मिरची ग्रिल करून त्यात मीठ-मीरपूड व हवे असल्यास बाकी मसाले घालून काट्यानं मॅश करायचे, ताज्या फ्रेंच इटालियन ब्रेड बरोबर खायचे.
५. पनीर हिरव्या मसाल्यात (मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडासा पुदीना) मुरवून ठेवायचे. धारदार साल काढण्यानं झुकीनीच्या लांब चकत्या काढायच्या त्यावर मीठ मीरपूड शिंपडून ठेवायचं. पनीरचा तुकडा त्या चकत्यांमधे गुंडाळून ग्रिल करायचं. साधारण असं दिसतं -

फोटो आंतरजालावरून साभार.

६. पिंटरेस्टवर ही आयडीया मिळाली होती - फार्मर्स मार्केटमधे ताजे टोमॅटो मिळाल्यास चकत्या करून ऑलिव्ह ऑईल लावून ग्रिल करायचे. इटालियन मार्केटमधून ताजं मॉत्सरेल्ला आणून त्याच्या चकत्या करून घ्यायच्या. टोमॅटोची चकती, एक चीजची चकती असं असेंबल करून वरून ताजं बेसील हातानं तोडून टाकायचं. एज्ड बाल्सॅमिक व्हिनेगर ड्रिझल करायचं. एकदा बार्बेक्यू पार्टीला असं केलं होतं तेव्हा अतिशय आवडलं होतं. टोमॅटो ग्रिल केले नाहीत तरी चालतील.

फोटो आंतरजालावरून साभार.

७. ब्रोकोली, लाल-पिवळ्या सिमला मिरच्या, अ‍ॅसपॅरॅगस, झुकीनी वगेरे भाज्या मीठ मीरपूड, ऑऑ घालून ग्रिल करून घ्यायच्या. बोटाय पास्ता अलदान्ते शिजवून त्यात मिक्स करायच्या. वरून ताजी बेसील्/पार्स्ले घालायचं.

फोटो आंतरजालावरून साभार.

मी शाकाहारींसाठी एखादा ग्रिल्ड पदार्थ ठेवते. त्याच्या जोडीला व्हेज बिर्याणी, ताज्या काकड्या-पुदीना घालून केलेलं रायतं किंवा कोशिंबीर, कोथिंबीर-पुदिन्याची चटणी, कलिंगड-खरबूज, पीच वगैरे उन्हाळ्यातली फळं कापून, कणीस भाजून असा पोटभरीचा बेत होतो.

वर पिकनिकचे बरेच बेत वाचले. पण थोडी नेमकी शंका आहे.

रेल्वेतून दुपारी एकच्या सुमारास निघायचं आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी पोचू. रेल्वेत १०-१२ जणांच्या गटाला वाढप / वाटप करायला सोयीचं जाईल असा, फार गच्च नसलेला, सुटसुटीत दोन जेवणांसाठी निरनिराळा बेत हवा आहे. सगळे मधुमेही / वजन कमी करणारे लोक आहेत. त्यामुळे शक्यतो फार कुपथ्यकारक नको.

शिवाय सकाळी दोनेक तासांत उरकेलसे पदार्थ हवेत.

(फारच अटी! आय नो. :प)

मला सुचलेले पर्यायः

मेथीचे ठेपले / कोणत्याही पालेभाजीचे पराठे + दहीभात + दाण्याची चटणी
बटाट्याची सुकी झणझणीत भाजी + ब्राउन ब्रेड स्लाइसेस + कांद्याची / लसणीची चटणी
कोरडा झुणका + पोळ्या + दहीभात

कुणाला याहून निराळं काही सुचतंय का?

दुपारी १ ला निघताय ना? मग दोन जेवणं खूप होतील असं वाटतंय. त्यातून सगळेच मोठे लोक असतील तर बसून बसून भूकही लागत नाही. त्यापेक्षा असं केलं तर-
घरून निघतानाच दोन दोन प्लेट पोहे, उपमा किंवा उकड वगैरे भरपेट नाश्ता करायचा. किंवा मूगाची खिचडी वगैरे अकरा बारा ला खाऊन घ्यायची. मग ट्रेन मधे सगळे सेट झाले की तीन चार वाजता सँडविचेस वगैरे तिथल्या तिथे बनवायची. ब्रेड, चटणी, सॉस, काकडी टोमाटो वगैरे सोबत ठेवायचे. ते झाले की सहा सात ला भेळ करू शकता. सोबत ही चटणी, ठेचा असेलच. आणि एवढं सगळं खाल्यावर रात्री फारशी भूक नसली तरी आधार म्हणून पराठे,.दही (सॉस, चटणी,.ठेचा असेलच सोबत) आणि जमल्यास थोडासा फोडणीचा भात. शिरा लिहीणार होते पण मधुमेही आहेत म्हणून नियंत्रण. दहीभात आंबट्ट होऊ शकतो. किंवा मसालेभातही ठेवू शकता सोबत.

आणखी म्हणजे खाऊ म्हणून सोबत विकतचा ढोकळा, लांब पापडी,इडली किंवा पथ्यात बसणारे पदार्थ ठेवू शकता. उगाचच जास्त घरी उस्तवार करून आपण न्यायचे पण तेवढं जेवण रेल्वेत संपत नाही आणि खराब होऊन टाकून द्यावं लागतं. त्यापेक्षा सुटसुटीत मेनू करावा. घरच्यासारखंच सगळं केलं तर प्रवासाची मजा काय, नाही का? Happy

दुपारच्या जेवणाला इडली चटणी आणि दहीभात. भाजणीची थालिपिठंही नेता येतील.
रात्रीच्या जेवणासाठी सँडविचेस (खोबरं न घालता चटणी, गाडीत बसल्या बसल्या सँडविच तयार करता येईल, तेवढाच गप्पा मारता मारता टाईमपास) आणि मूगडाळ खिचडी - दही (विकतचं - डबाबंद). किंवा फळं.

दुपारी जेवण जरा उशीराच होईल. अंदाजे दीडच्या सुमारास. तर तेव्हा लोकांना कमी-जास्त गरजेप्रमाणे व आवडीप्रमाणे असे जेवण असावे. उदा. मेथीचे पराठे / ओवा - तीळ घालून केलेले पराठे, लोणचे, दही, सोबत एखादी कोरडी भाजी (हवी असल्यास) व दहीभात.

किंवा कोरडी उसळ, पोळ्या, सॅलड, दहीभात व लोणचे / चटणी असा सुटसुटीत मेनूही ठेवता येईल. उसळ जरा झणझणीत करायला लागेल.

दिवसभर गाडीत चरणे होणार असेल तर रात्री लोकांना जास्त भूक नसेल. त्यामुळे त्यावेळी मूडाखि / ब्राऊन ब्रेडचे काकडी-टोमॅटो-पुदिना चटणी सँडविचेस. लोणी, चीज वगैरे आवडीनुसार.

एक मदत हवी आहे.

२५ ते ३० लोकांसाठी एखादे सार / पातळ पदार्थ आणि रायतं सुचवा.

बाकीचा मेनु कोफ्ता करी, व्हेज कुर्मा, कसुरी मेथी + कॉर्न पुलाव, प्लेन पराठा, गाजराचा हलवा असा आहे.

यातले फक्त गाजर हलवा, सार आणि रायते मी करणार आहे, बाकी ऑर्डर केले आहे. त्यामुळे वेळेचा काही प्रश्न नाही.

पायनॅपल रायते आणि टोमॅटो सार कसे वाटेल ?

पायनॅपल रायते आणि टोमॅटो सार कसे वाटेल ?>>> +१
माझी एक मैत्रिण कांदा, काकडी, गाजर, अ‍ॅपल, हि. मिरची, पुदिना इत्यदी घालून समर रायता बनवते. तोही छान लागेल. थोडं काळं मीठ, धने-जीरे पावडर पण घालते पण अगदी चिमूटभर.

मेघना भुस्कुटे,
रेल्वेप्रवासाच्या दृष्टीने तुमचे पर्याय अगदी योग्य आहेत.

Pages