Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बीट उपासाला खातात?? काकडी
बीट उपासाला खातात??
काकडी खतो, रताळं, बटाटा, भेंडी खातात पण बीट खातात हे माहित नव्हत... म्हनजे घरी कधी आईने बीट उपासाला खल्लेल आठवत तरी नाही...
एकदा वनराज सिंहाने आषाढी
एकदा वनराज सिंहाने आषाढी एकादशीला सभा भरवली. जंगलातील सर्व प्राण्यापक्ष्यांना आग्रहाचे आमंत्रण गेले. आमंत्रण कसले, धमकीच होती. न जाऊन सांगतात कुणाला ? सगळेजण तंगडतोड करत सभेच्या ठिकाणी गेले.
पण एक कोंबडी मात्र जागेवरून तसूभर सुद्धा हलली नाही.
का माहितीय्ये ?
=
=
=
कारण कोंबडी उपासाला चालत नाही !!!!!
तात्पर्य : शाकाहारी काहीही चालते.
दिनेशदा
दिनेशदा
बीट + कांदा + आले (चवीपुरते)
बीट + कांदा + आले (चवीपुरते) यांचे सूप गरम गरम प्यायला पावसाळ्यात / हिवाळ्यात बेस्ट आणि थंडगार करून उन्हाळ्यात मस्त!
बीट किसुन त्याची गाजराची करतो
बीट किसुन त्याची गाजराची करतो तशी कोशिंबीर केली तर दातांना चालेल का ?
लाजो, मला तर उपासाला भेंडी
लाजो, मला तर उपासाला भेंडी खातात, हे पण माहित नव्हतं. माझ्या मैत्रिणीकडे तर उपमा पण खातात. अगदी ते लोक कट्टर असुनही.
पोटॅटो सँडविचचा आज एक प्रयोग
पोटॅटो सँडविचचा आज एक प्रयोग करून पाहिला. टेस्टी झाला. उकडलेला बटाटा जरा भरड कुस्करला व पंचफोरन पैकी जिरे+मोहरी+कलौंजी+बडीशेपेच्या अगदी कमी तेलातील फोडणीवर घालून थोडासा परतला. (बाकी काहीही घालायची गरज नाही.) त्यात मीठ मिरपूड घालून टोस्टेड ब्रेड स्लाईसेस च्या मधे घालून खादडला. उकडलेले बटाटे असतील तर अक्षरशः तीन-चार मिनिटात होणारा व पोटभरीचा टेस्टी प्रकार आहे हा. सोबतीला सलाड / सूप असेल तर आणखी छान!
बटाट्याचं काहीही टेश्टीच
बटाट्याचं काहीही टेश्टीच लागेल. कार्ब्सचा हिशेब तेवढा करु नये
सिंडरेला म्हणूनच जोडीला सलाड
सिंडरेला
म्हणूनच जोडीला सलाड व सूपचे पापक्षालन!!
बीट, काकडी फळे/कंदमुळे या
बीट, काकडी फळे/कंदमुळे या वर्गात मोड्तात म्हणुन विचारले, मी पण अजुनपर्यंत उपासाला हे कोणाला खाताना पाहीले नाही नी मी ही अजुन कधी उपवासाला खालेले नाही पण शंका मनात होती.
उकडणे सोपे वाटते कुकरमध्ये ठेवले की झाले मग सगळ्यांचे स्लाईस (काकडी, बीट, कांदा, टोमॅटो).... सॅलड खाल्ल्याचा आनंद.....
भेंडी पण खातात???
किसुन बीट खायला हरकत नाही पण किसायचा आळस
अकु मॉस्त फिलिन्ग आहे. त्यात
अकु मॉस्त फिलिन्ग आहे. त्यात अमुल क्रीम पण डायरेक डब्यातून थोडेसे ओतले तर अजून मस्त लागेल.
माझे एक फेवरिट फिलिन्गः लसून तेलावर परतून त्यात कांदा कॅप्सिकम व किसलेला बटाटा घालून परतणे.
त्यामुळे आजही बनविले कि ते ओहः फीलिन्ग येते.
मस्त खरपूस झाल्यावर सँडविचमेकर मध्ये ग्रिल सँ बनविणे. हे पहिल्यांदा बनविले तेव्हा ९ महिने पूर्ण झालेले मला. खादाडी झाली अन मग लगेच अॅडमिट.
हो हो अमा. मी त्यात कोबी आणि
हो हो अमा. मी त्यात कोबी आणि चीजही किसून टाकते
ग्रील्ड सॅन्डविचला चीजवाचून मजा नाही.
अरुंधती वरच्या बटाटा फिलिंगमधे घरगुती किंवा बाहेरच्या तिखट शेझवान सॉसचे थोडे ठिपके टाकायचे. मस्त लागतं.
ग्रील्ड सॅन्डविचला चीजवाचून
ग्रील्ड सॅन्डविचला चीजवाचून मजा नाही. >> yes yes. girl after my own heart. भूक लागली.
एका रेसिपीमधे अॅपल सॉस
एका रेसिपीमधे अॅपल सॉस वापरायला सांगितला आहे. इथे मिळत नाही..त्या ऐवजी काय वापरता येईल?
किंवा अॅपल सॉस घरी करता येईल का?
किंवा सफरचंद किसून थोडे शिजवून घेतले तर तोच इफेक्ट येईल का?
पोटॅटो सँडविचचा आज एक प्रयोग
पोटॅटो सँडविचचा आज एक प्रयोग करून पाहिला. टेस्टी झाला. उकडलेला बटाटा जरा भरड कुस्करला व>>
मि त्यात कंदा लसुण मसाला, मिठ टकून परतते आणी मग त्यातच चिज किसुन टाकते आणी ग्रिल करते. घरच्यांकडुन सगळ फस्त होउन जात. हव तर त्यात धने जिरे पवडर पण टकता येते.
किंवा सफरचंद किसून थोडे
किंवा सफरचंद किसून थोडे शिजवून घेतले तर तोच इफेक्ट येईल का? >>>> सफरचंदाच्या फोडी (बिया वगैरे काढून) कूकरमध्ये शिजवून त्याचा गर काढा. घरगुती अॅपल सॉस असाच करतात.
वाटीभर मेथ्या भिजवल्या
वाटीभर मेथ्या भिजवल्या होत्या, त्यांना देखणे मोड आले आहेत. पण त्यांचं करावं काय आणि कसं?
मग भिजवल्या का होत्या बुवा - तर एका मैत्रिणीनं सांगितलं म्हणून... ती म्हणाली उसळ करायची...पण त्या कडूच राहतात का मोड आल्यावर हे करूनच पाहू म्हणून भिजवल्या. उसळ करण्याआधी म्हटलं इथे विचारावं. एखादी भारीची रेसिपी मिळेल. खाऊन पाहिली एखाद दुसरी मेथी, तर आफ्टरटेस्ट कडवट आहे पण कडूजहर नाही.
मेथ्यांचं पंचामृत करता येतं.
मेथ्यांचं पंचामृत करता येतं. मी केलं होतं. छान तोंडीलावणं होतं.टिकतंही. फोडणीवर गूळ, चिंचेचा कोळ, मेथ्या, कच्चे शेंगदाणे टाकून रस्सा करून शिजवायचा. आणखी चवीसाठे दाण्याचे-तिळाचे कूट, खोबर्याचे काप घालता येतील.
गोड्या वरणासाठी तुरीची डाळ
गोड्या वरणासाठी तुरीची डाळ शिजवताना त्यात या मोड आलेल्या मेथ्या टाकून वरण शिजवायचं. मग नेहमीप्रमाणे मीठ, गुळ (जरा जास्त घालायचा), कोथिंबीर घालायची. घेताना साजूक तुप घालयचं. मस्त डाळमेथ्यांचं वरण होतं. मेथ्यांचा सुंदर फ्लेवर येतो. डाळमेथ्यांची गोडा मसाला, कांदा घालून आमटीही छान होते.
मोड आलेल्या मेथ्या अनशापोटी चमचाभर खाव्यात असं म्हणतात. अर्थात हे जाणकारांना विचारुनच केलेले बरे.
चिवा हे घे मेथ्यांचं लोणचं :
चिवा हे घे मेथ्यांचं लोणचं : http://www.maayboli.com/node/4447
मेथ्यांचं वरण : http://www.maayboli.com/node/4432
काल बाजारात लांब पेरु सारखं
काल बाजारात लांब पेरु सारखं काहीतरी पाहिलं- भाजिवाल्याकडे-. काय आहे ते? त्याची भाजी करतात का? कशी?
साक्षी ही लिंक
साक्षी ही लिंक पहा.
http://www.maayboli.com/node/17050
चिवा दह्यात मीठ साखर एखादी
चिवा दह्यात मीठ साखर एखादी मिरची आणी मेथ्या घालून कोशिंबिर करता येईल. माझी आई मसालेभात टाईप भातात पण ह्या मेथ्या घालते. आणी अगदीच चव नसेल आवडत मेथ्यांची तर उरलेल्या मेथ्या वाटून केसाला लाव. मस्त कंडिशनर हाकानाका
मोड आलेल्या मेथ्याच लोणचं लै
मोड आलेल्या मेथ्याच लोणचं लै भारी लागतं. मोड आल्यावर मेथ्या कडू लागत नाहीत फारशा.
धन्स सगळ्यांना... काय केलं ते
धन्स सगळ्यांना... काय केलं ते सांगेनच.
आई मोड आलेल्या मेथीदाण्याची
आई मोड आलेल्या मेथीदाण्याची तांदळाबरोबर खिचडी बनवते
पिनटबटर खूप उरल आहे काय काय
पिनटबटर खूप उरल आहे काय काय करता येईल. मोठी बरणी भर आहे
पीनट बटरची उपासाच्या
पीनट बटरची उपासाच्या दाण्याच्या आमटी सारखी आमटी छान होते.कृती नेहेमीचीच फक्त दाण्याऐवजी पीनट बटर मधे पाणी मिसळून ते टाकायचं.
मोठा चमचाभरून मोड आलेल्या
मोठा चमचाभरून मोड आलेल्या मेथ्या + वाटीभर पाणी ; ३ ते चार शिट्या प्रेशरकूकरमधे. त्यात मग गूळ- वेलची- केशर+ कपभर दूध घालून मायक्रोवेव्ह मधून गरम करून . हा प्रकार बाळंतपणानंतर ४-५ महिने जबरदस्तीने खायला लागलाय मला
चूहे मारने की दवा सुद्धा बरी लागत असेल या प्रकारापेक्षा. पण हौस असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर करून / खाऊन पहा
मेधा, मग चूहे मारने की दवा
मेधा, मग चूहे मारने की दवा कशी लागते तेच सांगते झालं...
Pages