युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपमा करताना रवा आधी कोरडाच भाजून घ्यायचा. मग हिरवी मिरची,
उडीद डाळ,मोहरी यांची फ़ोडणी करायची. त्यात कांदा परतायचा,
तो गुलाबी झाला कि त्यात पाणी ओतायचे. पाण्याला उकळी आली
कि त्यात थोडे साजूक तूप, थोडे ताक, ओले खोबरे, मीठ व साखर
टाकायची. आणि परत पाण्याला उकळी आली की त्यात भाजलेला
रवा वैरायचा. नीट ढवळून झाकण ठेवून एक वाफ़ आणायची.
मग झाकण काढून मोकळा करायचा. जरा निवल्यावर आणखी
मोकळा होतो.

थँक्स प्रीति आणी दिनेशदा,
खरं तर उपमा/ सांजा करायला किती सोप्पा असतो. पण काही काही जण फारचं छान करतात. आल्याचा रस पण घातला तर चालतो ना? आणी म्हणे बारीक रवा घ्यावा त्यानी पण चवीत खूप फरक पडतो. खरं खोटं देव जाणे.:)

अजून एक आयडिया, पोहे उपमा करण्या अगोदर आपण फोडणीसाठी तेल तापवतो त्यात शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे मग पोहे उपमा करायचा. आणि वरून हे शेंगदाणे पेरून द्यायचे. यात फायदे दोन, एकतर फोडणीत शेंगदाणे न टाकल्याने (फोडणीत शेंगदाणे अर्धवट तळले जातात व शिजतात) आधीच नीट तळल्यामुळे छान कुरकुरीत लागतात. शिवाय, ज्याला शेंगदाणे नकोत त्याला वरून न पेरता पोहे/उपमा देता येतो.

खरं तर उपमा/ सांजा करायला किती सोप्पा असतो. पण काही काही जण फारचं छान करतात>> अगदी खरं. दिनेशदा मी रव्यात उकळलेल पाणि घालते, ताक नाही घातलं कधी. आता पाण्यात रवा घालून बघते व ताकपण .

दिनेश, दक्षिणा, अनुमोदन. मी ते पाणी उकळताना त्यात मटार, गाजर, फ्लावरचे तुरे इत्यादी पण घालते. तूप एक चमचा घालणे हे सिक्रेट आहे. बारीक रव्याने पण मऊ होतो. उपमा सर्व करताना डावेने त्याची मूद पाडून मग वरून कोथिंबीर, खोबरे व एखादी टोमाटोची चकती ठेवायची. बरोबर बारके दोन मेदू वडे व चट्णी.
बात बन जाएगी. बारीक शेव बरोबरीने द्यायची.

बटाटे पोहे करताना पण ते आधी तळून घ्यायचे. फोड्णीत नाही म्हणजे मस्त लागतात. आज उपमाच केला पाहिजे रात्री. Happy

दिनेशदा गोव्याचे सामोसे काय हो वेगळे असतात आणखी? काय फिलिन्ग असते?

निराली, तेल जरा बरं घालायचं उपम्या-सांज्याला आणि पाणी मोजून घेतले असले तरी अंदाज पाहून घालावे कारण काही रवा चांगला फुलणारा असतो, काही जास्त फुलत नाही. (सुट्या रव्यात असं बर्‍याचदा होतं) तसच वर लिहील्याप्रमाणे वाफा काढण्याआधी साईडने तूप सोडावे. मोकळा होतो अन चव मस्त लागते.

अश्विनी गोव्याला वेगळे असे काही सामोसे बघितले नाहीत. नेहमीचेच पंजाबी सामोसे बघितले.

तिकडे नाश्त्याला आळसाण्याची (एक प्रकारची चवळी ) ऊसळ आणि पाव आणि संध्याकाळी ताजा पाव किंवा ऑमलेट रस्सा (ऑमलेट आणि वर चिकनचा नुसता रस्सा) किंवा मिरची वडा (मिरचीत उकडलेला बटाटा भरुन त्याची भजी, पण तिखट नसते ) असे काहि प्रकार लोकप्रिय आहेत.

पंजिम मार्केटात एक कामत टाइप हाटेल आहे तिथे असे भजी वडे, सामोसे मस्त मिळतात. आमलेट रस्सा मस्त वाट्ते आहे. मला नेहमी रस्सा संपवावा लागतो. एकदा करून बघेन.

तिथे नेहमीचेच मिळतात सामोसे. पणजी रेसिडेन्सीच्या बाजूला एक हॉटेल आहे, तिथले पदार्थ छान असतात. बस स्टँड जवळ एक आहे, तिथेपण चांगले मिळतात.
पाट्टो भागात,(बस स्टॅंडच्या बाजूचा भाग) कोल्हापूरच्या सोयराबाई थोरात एक छोटासा स्टॉल चालवतात (रस्त्यावरच आहे.) त्यांच्याकडचे पदार्थ खासच असतात. काठी कबाब, बिर्यानी खासच. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही असतात.

खास माश्याचे प्रकार खायचे असतील तर पर्वरीला (पणजीच्या आधीचा स्टॉप ) साई सर्व्हीसच्या समोर एक छोटेसे हॉटेल आहे. तिथून त्या व्हॅलीचा मस्त नजारा दिसतो.

सामोसे बिमोसे करणं अपने बस की बात नही.. मला करून खायला घालायला आवडते फार... पण दुसरीकडे किचनचा कंटाळा ही आहेच. निवांत वेळ मिळाला तर हरकत नसते माझी काही. असो...

उपम्याचा रवा जरा जास्त वेळ देऊन एकदम मंद आचेवर भाजला तर उपमा शुभ्र आणि मऊसूत होतो. मटार वगैरे उकळत्या पाण्यात घालायची आयडीया बेस्ट आहे, कारण फोडणीत घातले की टणाटणा उड्या मारतात Sad

अश्विनीमामी, बटाटे पोह्यातले बटाटे तळण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणि सुटले Happy

कारण फोडणीत घातले की टणाटणा उड्या मारतात >>> Happy ह्यासाठी फोडणीत टाकले रे टाकले की लग्गेच झाकण ठेवायचे २-३ मिंट नंतर इतर साहित्य घालायचे मग उड्या नाही मारत.. Happy
उकळत्या पाण्यातल्या वाटाण्याची टेस्ट जरा हीच लागते.. Happy

कुकींगसाठी ( उदा. सायोची मलई बर्फी ) लिप्टन कंपणीची मिल्क पावडर चालेल का? १-२ तासात ऑफिसचा चहापावडरवाला येणार आहे. मी त्याला बरोबर आणायला सांगितले. पाकिटावरचे कंटेंट पाहुन ठरवेल म्हणाले. मला लवकर सांगा कुणीतरी Happy

दक्षिणा, माझी बहीण पण असेच आधी तळून घेते दाणे.
अश्विनी, तुझा उपमा तर अगदी फाईव्ह स्टार उपमा वाटतोय.:)
अनघा मीरा, तुझ्या टिप नी आता करून बघणार, तुप सोडायची आयडीया मस्त Happy

मी "झोलीया" करायचा म्हणुन दोन खुप मोठया मोठया कैर्या आणल्या आहेत......पण त्या जरापण आंबट नाहीयेत..... आणी त्या खुप मोठ्या आहेत..... त्यांच काय करता येइल???? कापुन खाण्याव्यतिरिक्त??? म्हणजे मी अर्धी खाल्लिये......खुप गोड आहेत.....

चक्षु वैसे व्हॉट इस झोलिया? Uhoh
बाकी गोड असतील तर अशाच फोडी करून तिखटमीठ लावून मटकावून टाक, भेळ करून त्यात घालून संपव.

गोड असतील तर साखरांबा/गुळांबा करता येइल की. आणि पन्हंपण यम्म ! आंबट नसल्यामुळे कमी साखर्/गुळ लागेल म्हणजे कॅलरीज पण कमी. Wink

@दक्षिणा - ये रहा झोलिया - http://www.maayboli.com/node/27016
पण कैरी खुप गोड्मिट्ट आहे.... आंबटपणाचा अंशही नाही... Sad
मीच मटकावन्याचा विचार आहे तसा.... पण खुप मोठ्या आहेत..... पाकिस्तानी आंबे आहेत.....

@मनिमाऊ - साखरांबा/गुळांबा/पन्हं यांनापण थोडा आंबटपणा हवाच ना..... Sad

मग सुधाररसला जसा आंबटपणा आणतो, लिंबु पिळुन तसं साखरांबा करुन लिंबु पिळ ना. माहित नाही कसं लागेल. चांगलं लागायला हरकत नाही.

कैरी नुसती कशी खाणार गं? एवढी खाल्लीस तर खोकला होईल. सिझन पण चांगला नाही. Throad infections आहेत सगळयांना. जरी चवीला आंबट नसली तरी कैरीचे गुणधर्म असतीलच ना.

कैरीचं गोडं लोणच कर Happy मस्त मेथी, लाल मिरच्या, कढीपत्ता वगैरे घालुन.... यम्मी...

आई खुप मस्त करायची.... आठवण आली Sad

@ मनिमाऊ -- लिंबु पिळायला जरा कसतरिच वाटतय......
तेच ना छोट्या असत्या तर खावुन पन टाकल्या असत्या... Wink पण खुप मोठ्या आहेत.....
अजुन काहीच करता येनार नाही का??? दोन्ही मिळुन एक किलो तरी असतीलच......

चक्षु,

मी कबुल करते, पण उगाच आव आणला होता. आता तु एकदम माझ्यावर भरोसा ठेवुन मला विचारायला लागल्यावर मी प्रामाणिकपणे कबुल करुन माघार घेते. हे आपलं क्षेत्र नव्हे. मी जरा कॉमन सेन्स वापरुन हुशार असल्याचा आव आणला होता. पण तु असं मी authority असल्यासारखं विचारायला लागल्यावर घाबरायला झालं बाई मला.

इथल्या एखाद्या expert cook ला विनंती कि प्लीज तिला मदत करा, म्हणजे पळ काढायला मी मोकळी. Lol

@मनिमाऊ - अगं मलापण काहि विशेष गती नाहिये ह्या क्षेत्रात...... सेमपिन्च.... Happy
@लाजो लिन्क मस्त....बघते असच गोड काहितरी मरुन बघते..... धन्स हां... Happy

Pages