युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, माहितीबद्दल धन्यवाद
'मसाल्याचा वास म्हणजे त्यातल्या तेलाचा अंश असतो' .....हा विचार कधी केला नव्हता.
तरीच मिसळण्याच्या डब्यातल्या मसाल्याचा स्वाद्/वास काही दिवसानी कमी होतो.

लाल सुक्या मिरच्या कश्या टिकवतात . मी प्लास्टिकच्या पिशवीत बंद करुन ती घट्ट झाकणाच्या स्टिलच्या डब्यात ठेवते , तरी मऊ होतातच मला अजिबाद अश्या चामट मिरच्या आवडत नाहीत. काय करायचे?

मिरच्यांना ऊन तर दाखवावेच पण ते शक्य नसेल तर थोड्या भाजून ठेवाव्यात.
शक्य असेल तर काही मिरच्यांचे तूकडे व काहींची भरड पूड (फ्लेक्स) करुन
ठेवावी. या बरण्या फ्रीजमधेही ठेवता येतात. मिरचीच्या बरणीत तळाशी हिंगाचा
खडा, बिब्बा किंवा पातळ फडक्यात बांधून पार्‍याच्या गोळ्या ठेवाव्यात.

मला वाटतं लग्नानंतर १-२ वर्ष झालेल्या कुठल्याच बाईला मसाल्याचा डबा, तेलाची बरणी, किंवा घरातली कुठलीच गोष्ट कळकट झालेली आवडत नाही. कुणाला आवडेल अस्वच्छ, सगळे जिन्नस एकत्र झालेल्या डब्यातून घेऊन स्वैपाक करायला ? नव्याची नवलाई संपली की आपोआपच आपलं लक्ष घरातल्या स्वच्छतेकडं जातं. मुलंबाळं झाल्यावर तर खूपच जास्त. घरातले डबे सतत स्वच्छ धूवून लख्ख कोरडे करुन त्यात जिन्नस भरणे, किचन ओट्यावरील टाईल्स सतत स्वच्छ ठेवणे, किचन चिमनी स्वच्छ ठेवणे (यात घरातील इतर गोष्टी उदा. चादरी वगैरे पण अर्थातच आले, पण तो इथे विषय नाही) या सर्व अतिशय बेसिक गोष्टी आहेत. त्या जर कुणी करत नसेल तर ते वेगळे म्हणावे लागेल अन नमूद करावे लागेल. अन्यथा घरात सर्वत्र बेसिक स्वच्छता ठेवणे यात वेगळे काहीच नाही, ती एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे.

दिनेशदा, मला आठवतंय की माझी आजी मिरच्या साठवायच्या काचेच्या बरणीवर झाकण लावण्याअगोदर वर्तमानपत्राचा कागद लावून त्यावरून झाकण लावायची. डब्यात ठेवल्या तरी तसेच करायची. त्याअगोदर तीन-चार ऊन्हे तर दाखवलेलीच असायची मिरच्यांना. त्यांना किंचित तेलाचा हात लावायची बहुतेक आणि मग साठवायची. ह्या सर्वामागे त्या कुडकुडीत रहाव्यात हाच उद्देश असेल काय?

शेवग्याच्या शेंगा आमटीत घालताना कशा घालता ?
* फोडणीवर वाफवून / नुसत्या पाण्यात मीठ घालून वेगळ्या उकळवून ?
* शेंगांच्या वरचं हिरवं साल, तुकडे करताना काढायचं का नाही ?

मला वाटतं लग्नानंतर १-२ वर्ष झालेल्या कुठल्याच बाईला मसाल्याचा डबा, तेलाची बरणी, किंवा घरातली कुठलीच गोष्ट कळकट झालेली आवडत नाही.>>मवा, लग्नाला तीस पस्तीस वर्षे झालेल्या बाईच्या घरात मी डबेच्याडबे कळकट्ट बघितले आहेत. आणि वर "आता माझ्याच्याने होत नाही. पूर्वी कसं सर्व लख्ख असायचं" हे पालुपद. (जे मी लहान अस्ल्यापासून ऐकतेच आहे, त्यामुळे पूर्वी म्हणजे नक्की किती पूर्वी? )

वर्षातून एकदा चादरी धुणार्‍या गृअहकृत्यदक्ष गृहिणी पाहिल्यात Happy असो. या बीबीचा तो विषय नाही.

धन्स सगळ्यांना मी मिरच्या आत्ताच आणल्यात त्यामुळे उनं दाखवणे शक्य नाही पण भाजुन ठेवेन ( खरं सांगायचं तर यातलं मी काहिही करत नव्हते अशाच आणुन ठेवत होते) पण आता नाही असं करणार...
अवनी , मी शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवुन घेते, शिजवताना त्यात थोडी हळद, मीठ व थोडा गुळ घालते.

वर्षातून एकदा चादरी धुणार्‍या गृअहकृत्यदक्ष गृहिणी पाहिल्यात >>>>> चादरी धुवायचा किंवा घरातल्या इतर स्वच्छतेचा मक्ता घरातल्या बाईचा असतो का ? एकीकडे स्त्री मुक्तीवर जोरदार पोस्टी टाकायच्या आणि एकीकडे कशा "बाया" घर अस्वच्छ ठेवतात ह्याचे दाखले द्यायचे. तुमची धाव गृहकृत्यदक्ष गृहिणी पर्यंतच म्हणायची.

सॉरी हा ह्या बाफचा विषय नाही पण इतकी विसंगत पोस्ट वाचून अगदीच राहवले नाही.

हो अकु तोच हेतू असतो. पुर्वी अनेक धान्ये, वाल, मिरच्या, चिंच इतकेच नव्हे तर शिकेकाई पण
वर्षभराची घेऊन ठेवत असत. त्यामूळे त्या टिकवण्यासाठी असे उपाय योजावेच लागत.
कोकणात, खास करुन पावसात बाहेर पडायची सोय नसे आणि काही मिळतही नसे बाजारात.

शेवग्याच्या शेंगाच्या साली काढाव्यात, कोवळ्या असतील तर फ़ोडणीत शिजतात. डाळीबरोबर
कूकरमधे शिजवल्या तर मात्र जास्त शिजतात.

लग्नानंतर १-२ वर्ष झालेल्या कुठल्याच बाईला मसाल्याचा डबा, तेलाची बरणी, किंवा घरातली कुठलीच गोष्ट कळकट झालेली आवडत नाही. कुणाला आवडेल अस्वच्छ, सगळे जिन्नस एकत्र झालेल्या डब्यातून घेऊन स्वैपाक करायला ? नव्याची नवलाई संपली की आपोआपच आपलं लक्ष घरातल्या स्वच्छतेकडं जातं. मुलंबाळं झाल्यावर तर खूपच जास्त. घरातले डबे सतत स्वच्छ धूवून लख्ख कोरडे करुन त्यात जिन्नस भरणे, किचन ओट्यावरील टाईल्स सतत स्वच्छ ठेवणे, किचन चिमनी स्वच्छ ठेवणे (यात घरातील इतर गोष्टी उदा. चादरी वगैरे पण अर्थातच आले, पण तो इथे विषय नाही) या सर्व अतिशय बेसिक गोष्टी आहेत. त्या जर कुणी करत नसेल तर ते वेगळे म्हणावे लागेल अन नमूद करावे लागेल. >>

१००% असहमत. हा सोशल कंडिशनिंगचा भाग आहे. अन असे विचार मांडणं हे त्याच सोशल कंडिशनिंग ला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे, माझ्या जव़ळच्या ओळखीतल्या ३-४ जणीना या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाही. चादरी धुणे, डबे घासणे इत्यादी प्रकार झाले किंवा नाही झालेत याकडे त्यांचं लक्ष ही नसतं. याबद्दल त्यांना सासरचे , माहेरचे, मैत्रिणी सगळेच टाकून बोलतात.
त्यातल्या एकीच्याही नवर्‍याला, ती नाही करत तर तू काही नाही करत असं कोणी विचारत नाही. नवर्‍याला पसारा , कळकटपणा खुपु नये, तो फक्त बाईला खुपावा अन त्या करता तिने(च) झिजावे अशी अपेक्षा का असते ?
मायबोलीवरच्या शिकल्या सवरल्या बायका तसल्याच विचारांना कळत नक़ळत दुजोरा देतात, बढावा देतात ही आणखीन खेदाची गोष्ट .

विषय पुन्हा मसाल्याच्या डब्यामधे नेऊयात.

मी सध्या जो हिंग आणलाय तो नेमका मीडीयम खडेवाला हिंग आहे. वरणामधे अथवा भाजीमधे हा हिंग वापरला तर मधेच कुठेतरी हिंगाची तीव्र चव येते. म्हणजे फोडणीमधे तो हिंग व्यवथित मिक्स होत नाहीये. या हिंगाची पूड केली तरी तसेच होतेय. तर हिंग फोडणीमधे मिक्स होण्यासाठी काय करू??

या हिंगाचा एकावेळी वापरायचा किंवा एका दिवसात वापरायचा तुकडा घेऊन
तो थोड्या पाण्यात विरघळवून घ्यायचा. मग ते पाणी चमचा/चमचाभर
फ़ोडणीत टाकायचे. असा हिंग पाण्यात सहज विरघळतो. हे पाणी ताकात
पण वापरता येते.

दिनेशदा, अर्धवट खड्याच्या हिंगाच्या वापराबाबतीतल्या सल्ल्याबद्दल खूप धन्यवाद. माझ्याकडे असा बराच हिंग उरला होता. काय करावे कळतच नव्हते.

दुसरे असे की काळे जीरे कधी वापरायचे? माझ्या नवरोबाने एकदा साध्या जीर्‍यांऐवजी आणले होते. त्याला खास वेगळा वासही नाहिये. मी फोडणीत टाकून पाहिले तर काहीच फरक जाणवला नाही. मग असेच वापरून टाकू की मला त्याचा वापर करता येत नाहीये? आपण नानवर टाकतो ते कलौंजी म्हणजे तुळशीचं बी असतं ना, की हेच काळे जीरे?

माझ्या मसाल्याच्या डब्यातः मोहोरी+मेथी, काळा मसाला, हळद, हिंग, जिरेपूड, धनेपूड, तिखट असते. सध्या मी जीरे वेगळे ठेवून बघते आहे. आधी मोहोरी+मेथी+जीरे ठेवायचे (उपासाला वेगळे जीरे). माझ्या अनुभवाने त्यामुळे जीर्‍याचा वास निघून जायचा. आताशा जीर्‍याला वेगळा छोटा डबा असल्याने वास टिकून रहातोय खरा.

रच्याकने, तशी मेथी मी सगळ्याच फोडणीत टाकते. पण तेलात मेथी टाकून तिचं सत्व तर निघून जात असेल ना? मी जेव्हा कधी कोरडी मेथी फोडणीच्या तेलात न टाकता, भिजवलेली मेथी भाजी/आमटीच्या रश्श्यात टाकते, तेव्हा कदाचित मेथीचं सत्व टिकून रहात असावं, असं मला वाटतं. कुणाला ही शंका आहे का? कारण भिजवलेली मेथी इडलीच्या पीठात कित्ती छान लागते, नाही?

काळ्या जिर्‍याला खरे तर त्याचा असा खास सुगंध असतो. खास करुन काश्मिर भागात ते राजम्यामधे वापरतात. तसे ते नेहमीच्या जिर्‍यासारखेही वापरता येईल.
आमच्या गोवेकर शेजारी ते खरवसामधेही वापरत असत.
मेथी मोड काढून वापरली तर फारच छान पण फोडणीतही टाकायला हरकत नाही. फोडणी करताना तेल अति तापवून मसाले करपवायचे नाहीत.

"त्या जर कुणी करत नसेल तर ते वेगळे म्हणावे लागेल अन नमूद करावे लागेल." या माझ्या वाक्यात अन एकूणच परीच्छेदात बाईला हे खुपावे अन तिनेच त्याकरता झिजावे असे कुठे लिहीले आहे ? अन वेगळे म्हणजे वाईट असेच का वाटतेय ? आश्चर्यच आहे. वेगळे म्हणजे कमी दिसणारे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो कोणाला काय आवडावे / चालावे.

बर्‍याचदा जे ऐकू येते 'मला हे आवडत नाही, ते खपत नाही', त्याला अनुसरुन मी लिहीले होते की आवडत बर्‍याच जणांना नाही. बेसिक स्वच्छता ठेवणे ही एक अतिशय कॉमन गोष्ट आहे, त्यात फार जगावेगळे काही नाही. वरच्या पोस्टींमध्ये आम्हाला अमूक ढमूक चालत नाहि हे बायांनीच लिहीलेय ना, म्हणून मी लिहीलेय की तुमच्याप्रमाणेच इतरही बर्‍याच बायांना ते आवडत नाही, मेजॉरीटी बेसिक स्वच्छता आवडणारीच असते. आता यातून ज्यांना ते आवडते / चालते त्या वाईट असे मी कुठे म्हणलेय असे मला तरी वाटत नाही. अन त्यासाठी बायांनीच झिजावे हा तर फारच विपर्यास झाला माझ्या पोस्टचा.

ज्याच्या त्याच्या घरात किती अन कोणी स्वच्छता ठेवावी हे त्यांनीच ठरवलेले बरे.

(बाफच्या विषयाची विसंगत वाटले तरी उत्तर लिहीणे आवश्यक वाटल्याने मी हे लिहीले आहे, २४ तासांनी काढून टाकेन.)

हम्म.. आमच्याकडे मसाल्याच्या डब्यात २ मधे तिखट, २ मधे हळद, मध्यभागी मोहरी, एकात गोडा मसाला अन एकात खाली १/२ डबा मेथी अन वर हिंगाची छोटी डबी. Happy स्वच्छता सध्या साबा ठेवतात. :)प्रचंड हौस आहे त्यांना संसाराची Happy सगळ्यात छोटे-छोटे सेपरेट चमचे ठेवल्याने व नीट वापरल्याने जास्त खराबच होत नाही म्हणून बरं..

नारळाच्या वड्या किंवा एव्हाना झाल्या असतील Happy तरीही ... फ्रीजमधून बाहेर सारण काढून रुम टेंपरेचरला आणावे. नंतर साखर घालून नेहेमी करतो तश्या वड्या कराव्यात. सारणात थोडी कमी साखर असेल असे गृहीत धरले आहे. Happy

अवनी, मी शेवग्याच्या शेंगा आमटीची फोडणी घातली की त्यातच परतते, त्याचे साल ही काढत नाही.. आमटी खूप उकळते, त्याने त्या शेंगा आमटीतच शिजतात आणि त्यांचा छान अर्क उतरतो... Happy शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवल्या की आमटीची आणि त्यांची चव वेगवेगळी लागते Sad

मी पण शेवग्याच्या शेंगा आमटीची फोडणी घातली की त्यातच परतते आणि शिजवते.

कधी वरण शिजवून व्हायचे असेल तर आमटीसारखीच फोडणी करून त्यात शेंगा घालून थोड्या परतून त्यात थोडं पाणी आणि आमटीचं सगळं साहित्य (चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला, मीठ) घालून शेंगा शिजवून ठेवते. मग आयत्या वेळी शिजलेलं वरण घालून आमटी उकळते.

~साक्षी.

शेवगा जर जुनं असेल तर त्यांची वरची साल काढून टाकावी आणि मग शिजवाव्यात तरच नीट शिजतात.. नाहीतर खाताना कच्चट लागतात.. कोवळ्या शेंगांच्या वरची साल नाही काढली तरी चालते.. पण शक्यतो साल काढण्यानी अगदी वरची साल काढल्यास उत्तम.. शिजवताना व्यवस्थित पाणी घेऊन त्यात गरजेनुसार मीठ घालून शिजवाव्यात साधारण १० मिनिटांत शिजतात... कुकरमध्ये आजिबात शिजवू नयेत. पार चिखल होतो... ज्या पाण्यात शेवगा शिजवल्या आहेत तेच पाणी आमटी करताना वापरावे. म्हणजे व्यवस्थित स्वाद येतो आमटीला पण.. आणि आमटीत घालून आमटीला उकळी आली की शेंगांना पण छान स्वाद येतो आमटीचा..

नमस्कार मी गीतांजली, सहसा रोमातून वाचत असते...इकडच्या recipes खरच एक से एक असतात...आता तर मी मायबोली चा फूड index गाईड सारखा वापरते Happy

मी बर्याच वेळा सलाड वर खायला काळे मीठ वापरते...कुठे तरी वाचले कि सैंधव मीठ प्रकृती साठी चांगले असते
सैंधव मीठ आणि काळे मीठ ह्यात नक्की काय फरक आहे...

मागच्या आठवड्यात विविध भाज्या, फळे, कंदमुळे चिरून-किसून ठेवली होती. त्यामुळे आठवडाभर स्वयंपाक करताना काहीच लोड आलं नाही. आठवड्याच्या भाज्या चिरून ठेवल्या तर जीवनसत्व खूपच कमी होतात का?

चमचाभर रवा आणि चमचाभर तांदळाचं पीठ घालून १० मिनिटं ठेवा. मस्त पेसरट्टू होतील.

गीतु,
काळे मीठ आणि सैंधव सारखेच कि. ते समुद्रातून न काढता खाणीतून काढतात
त्यामूळे त्यात काही खनिजे असतात.
त्यामूळे त्यांना तो रंग आणि चव असते. सोडीयमची मात्रा मात्र तेवढीच असते.

चिउ,
कापून ठेवल्याने जीवनसत्वांचा थोडाफार नाश होतोच. शिजवून सुद्धा ठेवता येतात.

Pages