Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चमचा-चमचाभर आमटीत घालुन
चमचा-चमचाभर आमटीत घालुन संपवता येइल.>>> सिंडे काय गं!
त्यापेक्षा कणकेत भरून करंज्या करून वाफवल्या तर चांगतील! मी खाल्ली आहे अशी करंजी.
का ? चिंच-गूळ घालुन आमटी करतो
का ? चिंच-गूळ घालुन आमटी करतो त्यात गुळ असतो, नारळ पण घालतात वरुन. त्यांना मोदक करायचे नाहीत म्हणून संपवायचा प्रश्न आहे ना.
आज कणकेचे तळलेले मोदक केले.
आज कणकेचे तळलेले मोदक केले. मोदक तळताना मोदक तेलात टाकल्याबरोबर ५ सेकंदात उलटा झाला. काहिहि केल्या सरळ होईना. टाँग घेतला त्याने आणि झार्याने मिळुन प्रयत्न केला तरिहि सोडला कि परत उलटा. त्यामुळे मोदकाचा वरचा भाग मस्त लाल झाला आणि बेस पांढरा. झार्याने तेल टाकत टाकत बेस तळला. पण अजुन काहि करता आले असते का मोदक सरळ राहाण्यासाठि? मोदकांमधे सारण भरपुर भरले होते म्हणुन उलटले असतिल का?
अग तळणी करायला नको वाटते आहे.
अग तळणी करायला नको वाटते आहे. आता वाफवून करंज्या नाहितर पुन्हा उकडीचे मोदक हाच पर्याय दिसतोय वाटत.
पुर्वा आणि आर्च तुमच्या युक्त्या करुन बघेन.
चमचा-चमचाभर आमटीत घालुन संपवता येइल.>>> अश्या पद्ध्तीने रोज आमटी करुन सुध्दा २ महिने लागतील सारण संपायला. एवढ उरल आहे
कणिकेचे वाफवून मोदक देखिल
कणिकेचे वाफवून मोदक देखिल करतात....
डेअरी व्हाइटनर वापरूनच मी
डेअरी व्हाइटनर वापरूनच मी काजू मोदक केले होते.
नेसलेच्या डे.व्हा.चे इन्ग्रेडियंट्स : पार्टली स्किम्ड मिल्क पावडर अँड शुगर
कुठल्या डेअरी व्हाइटनर मध्ये कॉर्न फ्लोर असते?
कुठले डेअरी व्हाइटनर कृत्रिम रासायनिक पदार्त असतो?
कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्न फ्लोर+ फ्लेवर असते.
अनू 3, अळीव भिजत घालून त्यात
अनू 3, अळीव भिजत घालून त्यात हे सारण मिसळून लाडू करता येतील.
रच्याकने, किती नारळांचं सारण केलं होतं?
अनू ३ मैद्याचे पातळ पॅनकेक
अनू ३ मैद्याचे पातळ पॅनकेक करून त्यात चौघडीत हे सारण फिलिन्ग म्हणून भरायचे. मी स्टाफ कॉलेज मध्ये हे डेझर्ट खाल्लेले. क्रेप सुझेत म्हणून पाहिले तर आपले नारळाचे फिलिन्ग धिरड्यात भरलेले. वरून कायतरी सिरप/ सॉस पण घालतात जसे ऑरेंज ज्यूस रिड्यूस केलेला किंवा गोल्डन सिरप पण मग ते फारच गोड होइल.
आमटीचा पर्याय बरोबर आहे.
मोदकाच सारण खूप उरलय. त्याच
मोदकाच सारण खूप उरलय. त्याच काय करता येईल? >>>> वाटीत घेऊन खा >>>> अगदी अगदी..आमच्याकडे तर असंच संपतं सारण.
प्रिया७, बहुदा कढईत तेल कमी
प्रिया७, बहुदा कढईत तेल कमी असेल.
भरत, म्हणूनच मी घटक वाचायला
भरत, म्हणूनच मी घटक वाचायला सांगितले होते. भारताबाहेर (खास करुन एअरलाईन्समधे ) जे मिळते त्यात दूग्धजन्य पदार्थ नसतात. काही वेळा / क्वचितच ताज्या दूधाचा छोटा पॅक मिळतो.
डेअरी व्हाईटनर ताबडतोब विरघळावा अशी अपेक्षा असते. भारतात पुर्वी अमूलने म्हशीच्या दूधाची पावडर बाजारात आणली होती (तो अमूलचा शोध होता. बाकी सर्व देशात त्यावेळी तरी गायीच्या दूधाचीच पावडर केली जात असे.) पण ती सहज विरघळत नसे.
अमूलचे मार्केटींग व्होल्टास करत असे, त्यामूळे आमच्याकडे ती पावडर असे, पण कुणालाच त्याची वास वा चव आवडत नसे.
नंतर आपल्याकडे एक डेअरी व्हाइटनर मिळायला लागले (ब्रँड आठवत नाही) त्यात मात्र दूग्धजन्य पदार्थ नव्हते.
मोदकाच सारण खूप उरलय. त्याच
मोदकाच सारण खूप उरलय. त्याच काय करता येईल? >> नारळाच्या वड्या करा. करंज्या करा.
वड्या करा. करंज्या करा >>
वड्या करा. करंज्या करा >> अनुमोदन
मसाल्याच्या / फोडणीच्या डब्ब्यात काय काय असावे/ नसावे?
आमच्या घरी [७ खणाच्या डब्ब्यात]
लाल तिखट [नुसत्या मिरची चे] -२ खणात
हळद -२ खणात
कोरडा मसाला [जो मला अजिबात आवडत नाही -अतिशय चव हिन आहे ]
मोहरी
राही लेल्या खणात काही बाही मिक्स झालेले
आणी हे सगळे maintain कसे करायचे?? मिक्स होउ नये म्हणुन काय करायचे?
मोहरी, हळद, लाल तिखट, काळा/
मोहरी, हळद, लाल तिखट, काळा/ गोडा मसाला. एकात सुके खोबर्याचा तुकडा वा दोन तीन लसूण पाकळ्या,
एकात सुक्या लाल मिरच्या एकात हिंग पावडरची डब्बी. जिरे बाटलीत सेपरेट कारण उपासाचे. एक नाहीतर दोन चमचे मोठे, फारच व्यवस्थित असेल तर प्रत्येकाला वेगळा चमचा बारका.
मिसळणाच्या डब्यातले घटक घरटी
मिसळणाच्या डब्यातले घटक घरटी बदलतात. सहसा, फोडणीचे घटक- म्हणजे मोहरी, हिंग, हळद, तिखट, काळा मसाला असे असतात. कधी जिरं, धने/ धन्याची पूड, वाटलेलं सुकं खोबरं असंही असतं. सर्वात जास्त फोडण्या ज्या घटकांच्या केल्या जातात, ते झटदिशी एकत्र मिळावेत म्हणून असे एका डब्यात एकत्र ठेवले जातात.
मेन्टेन म्हणजे, ठेवताना/ काढताना डबा नीट ठेवायचा. हिंदकळला, की पदार्थ एकत्र होतात सगळे
पूनम +१
पूनम +१
आमच्या घरातले मसाल्याचा
आमच्या घरातले मसाल्याचा डब्यात काय काय आहे ते जाऊन बघितले.
जिरे-मोहरी-हळद्-हिंग्-गोडा मसाला-सांभार मसाला एवढं आहे. प्रत्येकाचा चमचा वेगळाच आहे. डबा ठेवताना आणि घेताना जिम्नॅस्टिक्स करायचे नाही. मी हा डबा ओट्यावरच ठेवल्याने झाकण काढले की बरे पडते.
टप्परवेअरचा मसाल्याचा डबा अवश्य वापरा. खासकरून पावसाळ्यामधे मसाले खराब होत नाहीत. आणि एकमेकांत मिसळत पण नाहीत.
ठेवताना/ काढताना डबा नीट
ठेवताना/ काढताना डबा नीट ठेवायचा. हिंदकळला, की पदार्थ एकत्र होतात सगळे
अगदि अगदि मी सकाळचा माझा डब्बा आणी त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक करतानाच हा डब्बा निट हाताळते ..
बाकी साबा,जाबा कधी कश्या हाताळतात ते observ [अजुन] केले नाही [उद्या दुपारला पाहाते
] डब्बा बर्याच वेळा उघडाही ठेवतात ते मला अजिबात आवडत नाही ; कधी सगळे पदार्थ ईतके मिक्स झालेले असतात की मी मोठ्या डब्ब्या तुन फोडणीचे सामान वापरते 
माझ्या आई कडे... मसाल्याच्या डब्ब्यात
[आई कडे खुप नाही पण शिस्तीत स्वच्छता पाळाली जाते]
मोहरी,हळद ,आणी हिंगाची डब्बी [आडवी करुन] असते बाकी ति जिरे फक्त उपवासाला वापरते
तिखट मसाला /गोडतिखट मसाला वेगळाच ठेवते
प्लीज, प्लीज, मिक्स झालेल्या
प्लीज, प्लीज, मिक्स झालेल्या मसाल्याचा डबा. अगदी वैताग आणणारी गोष्ट आहे. मोहरीत हळद पाहिली की !!!!

आणि तो डबा वरुन कळकट असला की स्वैपाकच करावासा वाटत नाही.
मोहरीत हळद जिर्यात मसाला मग
मोहरीत हळद
जिर्यात मसाला
मग सगळं एकाच बाटलीत भरा
मिसळण्याचा डबा कशाला?
पुर्वी सरसकट एकाच चवीढवीच्या
पुर्वी सरसकट एकाच चवीढवीच्या भाज्या / आमट्या केल्या जात. त्यामूळे सगळ्याच पदार्थात सगळेच घटक लागत. आता आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ करत असल्याने छोट्या छोट्या काचेच्या किंवा प्लॅस्टीकच्या बाटल्यात सगळे घटक वेगवेगळे ठेवले कि हवे तेच घटक वापरता येतात. चमचेही वेगळे राहतात आणि ते पदार्थ मिसळतही नाहीत. त्यादृष्टीने स्पाईस रॅक हा प्रकार मला आवडतो.
बर्याच घरात मसाल्याची छोटी
बर्याच घरात मसाल्याची छोटी खोकी फ्रीजमधे ठेवलेली बघितली आहेत
त्याचा खरच काही उपयोग होतो की हा पसारा लपवायचा काही प्रकार आहे?
अवनी, मसाल्याचा वास म्हणजे
अवनी,
मसाल्याचा वास म्हणजे त्यातल्या तेलाचा अंश असतो. उघड्या हवेत तो उडून जातो. फ्रिजमधे मसाला बराच काळ टिकतो. शिवाय मूळ पॅकमधेच असल्याने ओळखही राहते.
शक्य तो दोन तीन पदार्थात संपेल एवढेच पॅक घ्यावे. आता छोटे पॅक्स पण मिळतात.
मसाल्याच्या डब्यात जिरे व
मसाल्याच्या डब्यात जिरे व मेथ्या अवश्य असाव्या असं माझ्या आहारतज्ञ मित्राने सल्ला दिला. मेथ्या डाळ शिजवतानाच टाकते. काही भाज्यांना फोडणीत टाकते. जिरे सगळ्याच फोडणीत वापरते.
सध्याच्या घरात गॅसच्या डाव्या
सध्याच्या घरात गॅसच्या डाव्या बाजूला ओट्याखाली एक चपटा ड्रावर आहे. त्यात एक ड्रावर ऑर्गनाय्झर मधे चाकू, बारकी किसणी, चहाची गाळणी, सोलणी , साणशी, फुलक्यांचा चिमटा हे आहेत . अन दोन मसाल्याचे डबे आहेत. एकात हळद , तिखट, सुकी मिर्ची, मोहरी, जिरं, धणे , मेथी हे प्रकार असतात. हिंगाची पूड त्या वनदेवीच्या डबीत असते. गावाहून आणलेला तीव्र वासाचा खडा हिंग फार जपून लपवून ठेवलेला असतो- तो फक्त मलाच माहित आहे कुठे आहे ते.
दुसर्यात डब्यात खडा गरम मसाला ठेवलेला असतो लवंग , दालचिनी, हिरवी व बडी वेलची, दगडफूल, चक्रफूल व जायफळ्,मिरी, तेजपत्ता इत्यादी.
मसाल्याचा डबा क़ळकट दिसला की माझं पण डोकं फिरतं .
डबा १ : हळद, तिखट, मोहरी,
डबा १ : हळद, तिखट, मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरच्या, काळा मसाला/ धणेपूड
डबा २ : मिरीदाणे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडे (साली व दाणे वेगळे), जायफळ/ चक्रीफूल इत्यादी, खसखस.
डबा ३ : पंचफोडण (बडिशेप, कलौंजी, मेथ्या, जिरे, मोहरी), सुक्या खोबर्याचे तुकडे वगैरे.
भाज्या, उसळी, सांबार, रस्सम इ. चे तयार मसाले फ्रीजात.
बाकी दतेम, गरम मसाला, भाजक्या जिर्यांची पूड, मोहरी पूड, मेथी पावडर, सुंठ, मिरपूड वगैरे प्लास्टिक बरण्या/ टपरवेअरच्या बरण्या/ रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटल्यांत भरलेली असते.... किचन शेल्फवर.
मंजूडी ३ नारळाचे सारण केले
मंजूडी ३ नारळाचे सारण केले होते जेमतेम १ किंवा थोड जास्ती संपल असेल. लाडवाचा पर्याय बेस्ट वाटतो आहे. करंज्या तळणी म्हणुन नको आहेत.

अमा करुन बघायला हरकत नाही. नविन काहितरी होईल
अनघा सारण उरल्यामुळे फ्रिज मध्ये ठेवले होते. थोडे घट्ट झाले आहे त्याच्या पुन्हा कोमट किंवा गरम करुन वड्या थापता येतिल का? सारणात गुळ आहे (साखर आजिबात नाही)
कारण वड्या हा आधी केलेला आणि आवडणारा पर्याय आहे. मी थोड सैल होण्यासाठी आमरस घालू शकते त्याचा डबा आहे
वरच्या पैकी कुठलातरी १ उपाय नक्कीच करता येईल, सगळ्यांना धन्यवाद.
माझी आई म्हणते, घरात बाईच नीट
माझी आई म्हणते, घरात बाईच नीट लक्ष आहे की नाही ते मसाल्याच्या डब्यावरन कळते. तो नेहमीच नीटनेटका हवा.
मला हळद कशातही मिक्स झाली की
मला हळद कशातही मिक्स झाली की आवडत नाही. तिखटात, जिर्यात, मोहोरीत, काळ्या मसाल्यात...
आणि हळदीचा चमचा दुसर्या कशातही घातला किंवा दुसरा कसलाही चमचा हळदीत घातला की डोकं फिरतं माझं.
माझ्याकडे डब्यात जिरं, मोहोरी, काळा मसाला, हिंगडबी, जिरेपूड, धनेपूड, तिखट हे पदार्थ असतात. उपासाची फोडणी करताना वेगळ्या बरणीतलं जिरं काढते. मिसळण्याच्या डब्याजवळ मेथांची बरणी. बाकी लसूण, खोबरं वगैरे फोडणीत घालायचं असेल तर आयत्या वेळीच करून घेते.
वरच्या सर्वाना अनुमोदन. मलापण
वरच्या सर्वाना अनुमोदन. मलापण यातला चमचा त्याच्यात झालेला अजिबात चालत नाही. माझ्या प्रत्येक बरणी-डब्यामधे त्या त्या पदार्थाचा चमचा असतोच. मसाल्याच्याच नव्हे तर रवा-पोहे-साबुदाणा-शेंगदाणाकूट्-वगैरेमधे सुद्धा.
मसाल्याचा डबा (बरेचसे मसाले संपत आलेकी) महिन्यातून किमान एकदा घासून उन्हात सुकवून आणते. मला कुठलीही गोष्ट उन्हात सुकवली की एक्दम स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. महिन्याचा किराणा भरायच्या आधी किंवा अधेमधे कुठला डबा बरणी रिकामी झाली की घासून सुकवून घेणे हा कार्यक्रम असतो.
Pages