युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिर्याणीत मसाला जर कमी झाला असेल तर नंतर वरुन परत घालता येतो का? कसा घालायचा?
आणि तसेच जास्त झाला तर काय करावे?

नासलेले दुध वापरुन पनीर करता येईल का? २ गॅलन दुध नासले आहे. फ्रिज मधे ठेऊन.. कारण माहीती नाही. एक्स्पायर झालेले नाही.

निर्मयी, मसाला जास्त झाला तर तुपात घातलेल्या अख्ख्या मसाल्यांवर जरासा कांदा आणि केशर परतून त्यात तांदूळ घालायचे. परतायचे. आधणाचं पाणी ओतून बिरयाणीला हवा तसा भात करायचा आणि मिसळायचा. मसाला कमी पडला तर वरून घालता येतो. पण बिरयाणी आधीच शिजली असेल तर नंतर घातलेला मसाला मुरत नाही. चव जरा वेगळी लागते. (दोन्ही उद्योग केलेत म्हणून फु. स.)

अमया, दूध नासण्याचं कारण माहिती नसताना त्याचं पनीर खाणं ड्यांजर वाटतं.

पुलाव्/बिर्याणित मसाला कमि पडला तर नुसता घातला तर मीळून येत नाही म्हणुन रसदार टोमॅटो बारिक चिरुन किंवा पेस्ट करुन तेलावर परतावा तेल सुटेपर्यंत परतल्यावर बिर्याणि मसला घालुन मिसळावे आता या मसाल्याची लेयर एकदा मधे आणि एकदा सगळ्यात वरच्या थरावर घालुन वरतुन पाण्याचा हबका द्यावा मग, मंद आचेवर वाफ येवुन द्यावी.

ढोकळ्याचे पिठ व्यवस्थित आंबवण्यासाठी काय करावे? रात्री भिजवले तर दुसर्‍यादिवशी सकाळी करता येइल यासाठी?

हसरी, थंडीच्या दिवसात ते आंबायला वेळ लागतो. त्यासाठी ते दुपारी तरी वाटायचे किंवा रात्री वाटले तर दुपारपर्यंत थांबायचे. थोडे दही घातले तर फरक पडेल. पण नजरेला पिठ वाढल्याचे दिसेपर्यंत ढोकळा वाफवू नये.

दिनेशदा,
उद्या रात्री भिजवून रविवारी सकाळसाठी हवयं. एकदा जास्त वेळ आंबवल्याने त्याचा आंबूस वास येत होता म्हणुन टाकुन द्यावे लागले. मला रविवार साठी हवयं त्यासाठी काय करावं लागेल प्लिज सांगा?

भिजवलेले पीठ स्वयंपाक करेतो दोन्ही शेगड्यांच्या मध्ये ठेवायच जेणेकरुन उब मिळेल. पोळ्या झाल्यावर गरम तव्यावर ठेवायचं नन्तर मावेमध्ये ठेवायचं. भिजवतेवेळी कोमट पाणी घालायचं.

मी ईडलीचे पीठ फुगले नाही तर एका मोठ्या पातेल्यात पाणी कोमट करते आणी त्यात पीठाचे भांडे ठेवते. अर्ध्या तासात नाही फुगले तर थंड झालेले पाणि पुन्हा कोमट करुन त्यात भांडे ठेवते. मस्त फुगते पीठ Happy

रात्री बंद जागी ठेवले तर फुगायला पाहिजे. उडदाची डाळ वापरणार ना ? मग ती डाळ ज्या पाण्यात भिजवली तेच पाणी वाटताना वापरायचे.
जर तयार कोरडे पिठ वापरायचे असेल तर आंबट दह्यात भिजवायचे. अगदी शेवटचा उपाय म्हणजे इनो सॉल्ट, अगदी वाफवायला ठेवताना वापरायचा. (एका डब्याला एक टिस्पून, ढवळून लगेच वाफवायला ठेवायचे.)

फर्मेंटेशनसाठी कमी वेळ लागण्याबद्दल बर्‍याच टिप्स आल्या.
जर पीठ वेळेआधी फर्मेंट झाले (म्हणजे इडली/डोसा करायला अजून बराच वेळ आहे) तर त्यात मीठ घालून ढवळून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवावे.

बेकिंग चे पदार्थ करताना [बिना-अंड्याचे] खाण्याचा सोडा/बेकिंग सोडा व बेकिंग पावडर वापरतात..या खा.सो/बे सो ऐवजी काय वापरावे..

पुन्हा एकदा उपमा...............
रवा नुसताच भाजायचा की तेलावर्/तुपावर ?

अवनी, दोन्ही प्रकारे करता येते. आधी रवा नुसता कोरडा भाजून घ्यायचा व मग फोडणीतही पुन्हा थोडा वेळ भाजता येतो.
किंवा काहीजण भाजलेला रवा फोडणीत कांदा वगैरे परतून झाला की त्यात उकळते पाणी घालून मग त्यात हळू हळू वैरतात. इथले उपमा एक्सपर्ट सांगतीलच! पण दोन्ही पध्दतींनी चांगला होतो उपमा. Happy

माझ्या घरी २७ ऑगस्ट ला पार्टी आहे, त्यात मला वेलकम ड्रिंक म्हणून कैरीचा झोलिया करायचा आहे. तर आत्ता कैर्‍या आणून त्याचा गर शिजवून ठेवून तोवर फ्रीजमध्ये टिकवायचा असेल तर काय करावे लागेल ?

साबुदाण्याचे पोहे (?) सागो फ्लेक्स आणले हेत. मला वाटलं मावेमध्ये होतील...काही युक्त्या आहेत का मावे मध्ये ते फुलतील अशा? त्यावर मस्त तुपाची फो देऊन, दाणे घालून चेपायची स्वप्न पडत होती... च्... मदतीला धावा कोणीतरी. तळायचे नाहीयेत. हेल्दीच करायचेत. Happy

तळायचे नाहीयेत. हेल्दीच करायचेत. >>>
चिवा मुळात साबुदाणा हेल्दी नाहीये. त्यामुळे असे प्रकार बेक करून तू मनाचे समाधान करून घेणार का त्यातल्या त्यात कमी हानीकारक खाणार आहे म्हणून.
बाकीचे सांगतीलच मायक्रोवेव्ह कसे करायचे ते.

ही ही... अगं रुनी माहितेय गं साबुदाणा हेल्दा नाही ते (सारख्या मला तेच सांगतात.) ऑफिसात चार वाजता तोंडात टाकायला म्हणून करून घेऊन जाणार होते. हेल्दी शब्द मागे घेते.. पण तरी सांगा ना कोणीतरी कसे बेकायचे ते पोहे...

अवनी आधी रवा कोरडाच थोडा भाजुन घे मग तुपावर परतव म्हणजे चांगला फुलतो असा माझा अनुभव आहे.

बीट कसे खालेले जास्त पौष्टीक असते?? कच्चे कोशिंबीरीत वगैरे घालुन की वाफवुन्/उकडवुन घेतलेले??
कच्चे खाल्ले तर दातांना त्रास होतो मी हल्ली रोज कुकरमध्ये भाताच्या झाकणावर ठेवते. वाफवुन्/उकडवुन घेतले तर त्यातील विटामीन्स कमी होतात का??
आणि बीट, काकङी उपवासाला चालतात का?

साक्षी बीट काकडी उपासाला चालतात नक्की.
बीट कच्चे खाऊ नको दाताला त्रास होत असेल तर, उकडून खाल्ल्याने काहीही कमी होत नाही त्यातलं, डोण्ट वरी.

बीट खाताना (कच्चे अथवा उकडलेले) त्याबरोबर 'क' जीवनसत्व असणे आवश्यक आहे. म्हणजे लिंबु अथवा दही घालुन त्याची कोशिंबीर करुन खावी. हे कुठेतरी वाचलेले आहे (बहुधा मालती कारवारकर). आणी हेच उसळींनाही लागु आहे. मोडाचे कडधान्य, बीट 'क' जीवनसत्वा बरोबर संयोग करुन खावीत.

Pages