Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे कुणीतरी पोह्यामधले दाणे
मागे कुणीतरी पोह्यामधले दाणे मऊ न पडण्याबद्द्ल विचारले होते न? मला गेले दोन पोहे हा अनुभव येतोय. होपफुली हीच युक्ती असेल.
मी तेल तापल्यावर सगळ्यात पहिले दाणे घातले गेले होते आणि नंतर फोडणी, कांदे, पोहे इ. नेहमीची कृती. दाणे मस्त लागत होते. ट्राय करून पहा.
पुरण-केळी प्रकार खाल्ला होता
पुरण-केळी प्रकार खाल्ला होता एकदा. भारी लागतो. केळी उभी चीर देऊन , पुरण भरून साजुक तुपावर भाजायची!
फोडणीत नेहेमी कच्चे
फोडणीत नेहेमी कच्चे शेन्गदाणेच घालावे ( काही ठिकाणी भाजलेले खाल्लेत, ते मऊ पडतात) मग लालसर झाले की कान्दा घालावा, मऊ पडत नाहीत.
तेल तापलं की शेंगदाणे घालुन
तेल तापलं की शेंगदाणे घालुन मस्त लालसर करायचे अन ते भिजवलेल्या पोह्यांवर काढायचे.. मग जिरं मोहरी कांदा फोडणी करायची. मस्त कुरकुरीत राहतात दाणे पोह्यात
अजुन एक आयडिया आहे, फोडणीचं
अजुन एक आयडिया आहे, फोडणीचं तेल तापलं की त्यात शेंगदाणे तळून बाहेर काढून ठेवायचे.
आणि पोहे डिश मध्ये वाढल्यावर सर्वात शेवटी वर पेरायचे. अशाने अत्यंत कुरकुरित तर लागतातच. पण ज्याना नको आहेत त्यांना नुसतीच पोह्याची डिश देता येते.
मला महाराष्ट्रात एका खेड्यात
मला महाराष्ट्रात एका खेड्यात बसने प्रवास करून जायचं आहे. तर अमूल वगैरे कंपनीचं चीज क्यूब अथवा स्लाइस स्वरुपात तीन दिवस फ्रीजशिवाय टिकेल का? दोन दिवस प्रवास व एक दिवस मुक्काम असेल. तिथे ब्रेड मिळेल पण चीज ची खात्री नाही. कुणाला अनुभव आहे का याबाबत?
एव्हढं काय चीज शिवाय अडतं का
एव्हढं काय चीज शिवाय अडतं का ?
बाकी काही ऑप्शन्स असतील ना नाश्त्याला उपलब्ध.. ?
नाहीतर सुक्या चटण्या, पीनट बटर, सॉस वगैरे नेता येईल ब्रेड वर...
चीज खराब होईल असे वाटते.
अजिबात अडत नाही हो. यावेळी एक
अजिबात अडत नाही हो. यावेळी एक पर्याय म्हणून विचारात घ्यावे वाटले.
सोबत सीनियर लोक आहेत त्यांना बाहेरचं अतिचमचमीत चालत नाही आणि पराठे वगैरे कोरडे वाटतात म्हणून. एरवी सॉस व चटणीच नेतो. पीनट बटर चांगला पर्याय वाटतोय. धन्यवाद.
फार उकाडा असेल तर चीज खराब
फार उकाडा असेल तर चीज खराब होईल एक दोन दिवसत. शक्य असेल तर पोर्टेबल फ्रिझर बॉक्स मिळते त्यात ठेवता येइल.
अमूल बटर चे छोटे पॅक नेले तर सोपे होईल हे मी ऐन मद्रास मध्ये टेबलच्या खणात ठेवून वापरले आहेत. ट्रेनिन्ग होते तेव्हा सात आठ दिवस राहिले होते. व बाहेरून ब्रेड आणला की रूम मध्येच ब्रेड बटर खाता येत असे. रोज सांबार भात साठी परत बाहेर जायचा वैताग यायचा तेव्हा हे सोपे
पडायचे. व्हीबा किंवा तत्सम एग लेस मेयॉनीज पण दोन तीन दिवस राहील. जिथे राह णार तिथे दही दूध मिळाले तर काम होईल.
किंवा सरळ तूप न्या. तूप साखर किंवा गूळ दाण्याचे कूट असे पोळी बरोबर घेता येइल.
Jam kinva shrikhand
Jam kinva shrikhand.
Hotel madhe rahnar ka? Room madhe chhota fridge asto.
https://www.amazon.in/s?k
https://www.amazon.in/s?k=portable+freezer+for+car&crid=DITCXMLL1SRI&spr...
इथे कार साठी पोर्टेबल फ्रीझर बॉक्स आहे. ज्येनांची काही औ षधे असतील तर ती ही नीट राहतील.
हल्ली ते व्हॅक्क्युम वाले
हल्ली ते व्हॅक्क्युम वाले स्टील चे थर्मास (?) मिळतात ना त्याचा उपयोग होईल का. गार चीज क्युब्ज , बटर क्युब्ज त्यात घालून नेले तर
राजसी, अमा, रावी सगळ्यांचे
राजसी, अमा, रावी सगळ्यांचे आभार. जॅम नेणारच आहे. अमा, बटरबद्दल भीती वाटत होती म्हणून चीजचा विचार केला. पण आता बटर ट्राय करुन बघेन. वेगळा बॉक्स ठेवेन त्यासाठी.
थर्मास घेणार आहे गरम पाणी भरून.
Pages