युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही प्राची. त्याचे तूप चांगले बनणार नाही असे वाटते.

तु थोड्या बटरचे बनवुन बघ हवं तर. नाहीतर हर्ब बटर/गार्लिक बटर बनव आणि फ्रिज कर किंवा भाज्यांमधे वगैरे घालुन वापरुन टाक. सेवरी कुकिज मधे घालु शकतेस.

सॉल्टेड बटरच तूप अगदी मस्त ( दिसायला ) आणि कणिदार होतं. पण मला अजिबात चव आवडत नाही (मिठामुळे). पण वरण्-भाताबरोबर खाताना मुळीसुध्दा कळत नाही. गोड पदार्थ करायसाठी वापरायचं नाही फक्त.

दोडक्याची भाजी केली तर कधी नव्हे तर गिळगिळीत झाली. एक वेळ नवर्‍याने खाल्ली असती अशी भाजी पण माझ्याच घशाखाली उतरली नसती. म्हणून भाजीला जरा जास्त मसाला तिखट घातले आणि ब्लेंडर फिरवला. नवरा घरी आला तेव्हा गरम गरम सूप तय्यार. कशाचे सूप आहे ते त्याने विचारले नाही मी सांगितले नाही. चवीला झक्कास झालेलं..

(आता पोळीसोबत मुरांबा Proud )

मी केलेल सॉल्टेड बटरच तूप मस्त झालं होत. अर्पणाशी सहमत चव खारट वाटली तर गोड पदार्थात वापरु नका. काही जण कणीदार तुप होण्यासाठी किंचीत मिठ तुप कढवताना घालतात त्यामुळे बटर मध्ये थोड्या प्रमाणात मिठ असेल तर चव बदलणार नाही.

दोडक्याच्या भाजीला खसखशीचे वाटण लावायचे, अगदी भरपूर प्रमाणात. मस्तच लागते. ही आमची बंगाली पद्धत.. मी आईच्या हातची दोडक्याची भाजी कधीच आवडीने खाल्ली नाही, पण आता मात्र अगदी विनातक्रार!! Proud

बंगाली पदार्थांमध्ये काय खसखस घालतात. कलकत्त्यात एका ठिकाणी जेवलो आणि त्यानंतर लेक पूर्णवेळ झोपाळलेला होता. बहुतेक त्या खसखशीनेच Uhoh

पावसाळ्यात मिळणार्‍या पिशवीबंद / सुट्या दुधाला कधी कधी ओल्या चार्‍याचा एक वेगळाच वास येतो. तो वास घालविण्यासाठी काय करता येईल?

रच्याकने गो़कुळच्या दुधाला फारच जाड साय येते.>>>> तेलाचा तवंग येतो का? (शक्यतो हलका पिवळसर)>>> हो. २ वेळा तापवलं दुध की जास्तच दिसतं.>>>

२ शक्यता असाव्यात ... एक म्हणजे भेसळ करणारे फॅअट वाढवन्यासाठी खाद्यतेल (?) घालतात. Angry दुसरी म्हण्जे डेअरी मध्ये गायीचे आणि म्ह्शीचे दुध मिक्स करतात (नक्की का ते माहित नाही) फॅट अ‍ॅडजस्ट करण्यासाठी (standardization) खरे खोटे देव जाणे... पण वारणा दुधामध्ये असा प्रकार झाल्यावर मी तिकडे फोन करुन तक्रार केली होती आणि ळगेच तो प्रकार बंद झाला होता...

सॉल्टेड बटरच तूप अगदी मस्त ( दिसायला ) आणि कणिदार होतं<<< हो का? मी कधी ट्राय पण केलं नव्हतं कारण एका पंजु मैत्रिणीने सांगित्लं होतं की 'अच्छा नही बनता' त्यामुळे कधी विचारच नाही केला. आता छोटा ब्लॉक आणुन ट्राय करते Happy नेहमी अनसॉल्टेडचच करते.

चार स्टिक अनसॉल्टेड बटर अन एक स्टिक सॉल्टेड बटर घालून तूप कढवलं तर अगदी मस्त रवाळ तूप होतं अन तूपमीठ भातापासून शिरा ते गुलाबजाम पर्यंत सगळ्याला मस्त चालतं

( १ स्टिक = १/४ पाउंड )

-कालची मूगाची उसळ बरीच उरली आहे. (खोबरं-कोथिंबीर-काळा मसाला वाली). काय करता येईल त्याचे ? मिसळ आवडते घरी, पण त्यात मटकीची उसळ वापरतो ना आपण, शिवाय मिसळीचा मसाला संपलाय.
-चीझ स्लाईस ६-७ तास फ्रीजबाहेर राहीले तर परत फ्रीज करुन वापरणे योग्य आहे का ?

शहाळ्यातले खोबरे (मलई), जवळजवळ २ शहाळ्यां मधील घरी आहे, मिक्सर मधुन काढुन पेस्ट करुन ठेवली आहे. काय करता येईल त्याचे? त्या पेस्ट ची कन्सिस्टन्सी आपल्या दुधाच्या मलई सारखीच आहे, त्यामुळे वडया जमतील असे वाटत नाहिये..

मवा, कांदा, आलं-लसुण वाटणं गरम मसाला घालुन उसळ जरा सारखी करुन घे. भात खडा मसाला घालुन शिजवुन घे...भात आणि उसळीचे लेअर्स लावुन बिर्याणी म्हणुन खपव Happy वरतुन तळलेला काम्दा घल. सोबत टोम्+कांदा+दह्याची कोशिंबीर किंवा बुंदी रायते Happy

चीज किती वेळ बाहेर होत?? एक तास दोन तास बाहेर असेल तर ठीक पण रात्रभर वगैरे बाहेर राहिलम असेल तर शक्यतो नको खाऊन. त्यातुन सध्या पावसाळा आहे.. लगेच पोटं बिघडायच उगा...

लाजो, भारी आयडीया. Happy थँक्स.
चीज ६-७ तास होतं बाहेर, सकाळच्या वेळात. जाऊदे नाहीच वापरत.

मवा, उसळ मिक्सरमधून खडबडीत वाटून त्याचे पेसरट्टू घाल. एकदम चविष्ट लागतात, लोणी/ दह्याबरोबर गरम गरम गट्टम करायचे.

मंजू, मी हाच विचार करत होते सकाळी, जसे कच्च्या मुगाचे डोसे करतो आलं-कोथिंबीर घालून तसे उसळीचे वाटून करावे म्हणून. पण मग उसळीच्याच चवीचे पेसरट्टू खायला मुली किटकिट करतील का असे वाटले, त्यात अजून काही अ‍ॅड करावे का अशा वेळी ?

मवा, पेसरट्टू म्हणजे काय कळलं नाही. मी धिरडे असं assume करते. जर धिरडे असेल, तर थोडसं तांदुळाचं पीठ घातलं तर चव बदलेल आणि crisp पण करेल. जर पीठ तव्यावर पसरल्यावर वरुन उत्तप्पासारखे कांदा-टोमॅटो घातले आणि बटर टाकले कि मस्त यम्म होइल. शिवाय त्या कांद्यावर चाट मसाला भुरभुरला तर अजुनच छान.

आलं आणि भरपूर कोथिंबीर वाटून घालता येईल, कांदा / टोम्याटो अगदी बारीक चिरून घालता येईल.... आणि वाटलंच तर तांदूळाचं पीठ/ बेसन घाल कन्सिस्टन्सी येण्यासाठी..

हे पान पहायची परवानगी नाही.
webmaster | 18 July, 2010 - 20:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

हे पान वाचण्यासाठी तुम्ही आहारशास्त्र आणि पाककृती
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.>>

मला माहिती आहे , हा प्रश्न विचारायची ही जागा नाहि.. तरीहि जर कोणी सान्गु शकले तर..
हे सभासद कसे होतात..??

मी_चिऊ, त्यासाठी तुम्ही आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूप वर टिचकी मारा. तिथे सामील व्हा हा पर्याय दिसेल त्या वर टिचकी मारा म्हणजे तुम्ही त्या ग्रूपचे सभासद होऊ शकता.
http://www.maayboli.com/og इथे तुम्हाला ग्रूप दिसतील इतर ग्रूपचे ही हवे असल्यास सभासद होता येईल.

Pages