युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिनटबटर खूप उरल आहे काय काय करता येईल.>> चॉकोलेट कप्स.

रेडिमेड डार्क चॉकोलेट मेल्ट करून घ्यायाचे. मग त्याचा एक पातळ थर साच्यात घालायचा. प्लास्टिकचे साचे मिळतात. कप सारखे करून घ्यायचे. मग फ्रिज मधे ठेवायचे. पाच मिनिटाने प्रत्येक मोल्ड मध्ये एकेक चमचा पीनट बटर घालायचे व गार झाल्यावर वरून परत मेल्टेड चॉकोलेट चा थर देऊन पाच मिनिटे फ्रीज करायचे. अनमोल्ड करून डब्यात फ्रिज मध्ये ठेवायचे.

नायजेलाच्या रेसीपीज मध्ये पीनट बटर आइस क्रीमही आहे. त्यातही ती चॉकोचिप्स घालते व वॅनिला आइसक्रीम. वरून कॅरेमल सॉस. दोन्ही रेसीपी हाय कॅलरी आहेत पण मस्त. पार्टी असल्यास किंवा मुलांना गिव्ह अवे गिफ्ट देता येइल.

पूनम, भाजलेल्या दाण्यांचे सालासकट कूट करण्याची तुझी टीप एकदम भारी आहे. वेळवाचवू आणि पौष्टिकही Happy
धन्यवाद Happy

दाणे न भाजताच मिक्सरमधे आयत्यावेळी कुट करायचे आणि ते आयत्यावेळीच तेलात वा तूपात भाजायचे. हा पण शॉर्टकटच. असे केल्याने साले सुटी व्हायचे प्रमाण कमी होते.

कच्चे दाणे भाजायचा विस्।अय निघाला आहेच तर माझी छोटीशी रेसिपी. कच्चे दाणे , थोड्याश्या हिरव्या मिरच्या , मीट मिक्सरमधुन थोडेशे फिरवुन काढायचे ( थोडे म्हणजे दाण्याचे २-३ भाग होतील असे ). यात थोडे तेल टाकुण मावेत भाजायचे. एकदम खमंग प्रकार तयार. तोंडाला चव नसेल तर हा प्रकार नक्कीच ट्र्याय करा Happy

पनीर फ्रीजरमध्ये किती दिवस्/महिने टिकतो? इंडियन स्टोअर मधून आणलेला नानक की कुठलासा ब्रँड अहे, आणि नेमके किती दिवस फ्रीजरम्ध्ये पडून आहे ते आठवत नाही Uhoh आणल्यापासून फ्रीजरमध्येच आहे मात्र . तीनेक महीने तरी झाले असावेत बहुधा. वापरावा का?

भाजलेल्या दाण्यांचे सालासकट कूट >> भारीये. फारच वेळ वाचेल Happy सालं सुटी होणार नाहीत ना? झाली तर त्याचे काय करायचे?

सावली, मी लिहिल्याप्रमाणे कच्चेच दाणे भरड वाटायचे आणि मग ते तेलात परतायचे (जो पदार्थ करायच्या असेल त्याच्या फोडणीतच.) साले सुटी होतात थोडी, पण ती पदार्थात लक्षात येत नाहीत. शंका असेल तर परतण्यापुर्वी एकदा पाखडून टाकायचे.

डेट उलटून गेलीये Sad टाकून द्यावा का? पॅक उघडलेला नाहीये. की थॉ करून रंगरूप/वास बघून ठरवावं?

मी नेहमी १ दिवसाच्या प्रवासाला जाताना ब्रेडला अमूल बटर लावून ब्रेड भाजून नेते. अगदी टोस्ट करत नाही.
उद्या सकाळी ५.३० वाजता निघायचे आहे. तर मला असं विचारायचं आहे की रात्रीच ब्रेड स्लाईसेसना अमूल लावून फ्रीजमधे ठेवले आणि पहाटे उठून फक्त भाजून नेले तर ते व्यवस्थित होतील का? पहाटे माझं आवरून, लेकाचं आवरून (वय साडेतीन) हे सगळं करायला ठेवलं तर खूप घाई होईल.

~साक्षी.

साक्षी माझ्यामते तरी काही फार प्रॉब्लेम यायला नकोय. पण फार गरम करू नकोस कारण मग त्या बटरचा थर घशात बसतो.. Sad (थंड झाल्यावर खाल्लं तरिही)

मला साबुदाणे भिजवण्याची योग्य पद्धत सांगा.. मी खूप प्रयोग करून पाहिलेत, पण खिचडी चामट्/कटकटीत होते. Sad
हे करून पाहिलंय
१. साबुदाणे धुवुन, त्यात साबुदाण्याच्या लेव्हलला पाणि ठेवून रात्रभर भिजवणे,
२. गरम पाणि घालून, भिजवणे,
३. निम्मे दूध, निम्मे पाणि घालून भिजवणे. Sad

याशिवाय खिचडीची वाफ काढायची पण काही विशिष्ट पद्धत असेल तर सांगा..
जनसेवा ची खिचडी खाताना स्वत:च्या हातची खिचडी आठवली की लाज वाटते. Sad

साबुदाना फक्त एकदाच पाणी टाकुन हलकेच काढने ( न चोळता ). आणी साबुदाण्याच्या वर एक पेर ( बोटाचे ) पाणी ठेवणे.

एकदा -क्वचित दोनदा धुवून साबुदाण्याला अंगापेक्षा थोडं जास्त पाणी ठेवते. पेरभर ठेवलं की माझी गंडते.

चार-पाच तासांनी एकदा हातानं साबुदाणा मोकळा करून घेऊन बघ. भिजलेला साबुदाणा आतवर मऊ झाला पाहिजे. एक साबुदाणा चिमटीत पकडून बघता येतं. अंदाजानं मी कधी दोन-पाच थेंब - ते चमचे पाणी जास्त टाकते... बारा-तेरा तास भिजवतेस ना...

अहाहा...साखि... किती दिवस झाले साखि नाही केली... आता करतेच... दक्षिणा, हे जे वजन वाढेल त्याचं तिकीट तुझ्या नावे फाडण्यात येणारे...

मला वाटतं की साबुदाणा कसा आहे मुळात यावर पण अवलंबून असतं. काही वेळा चिकटच असतो साबु...अंदाज हाच राबा उपाय.

मऊ खिचडी करता- खिचडी परतून एकदा वाफ काढली की पाव वाटी दूध शिंपडावे त्यावर, मग सारखे करून झाकून ठेवावे.
साबूदाणा भिजवताना मी साबूदाणा धूवून एक तासभर (साबूदाण्याच्या वर दोन पेर) पाण्यातच ठेवते. मग ते पाणी काढून टाकते. हलका ओलसर राहिल एवढेच पाणी राहू देते साबूदाण्यात.

पुण्यात मिळणारा साबुदाणा कुठल्या दुकानातून आणला आहे त्यावर त्याची खिचडी कशी होते ते ठरते असे माझ्या बाबांचे मत आहे...

चिवा +१. बरेचदा नाष्ट्यासाठी खिचडी करायची असेल तर रात्री भिजवते साबुदाणा. सकाळी उठल्या उठल्या एक साबुदाणा चिमटीत दाबून बघते. जरासा पाण्याचा हबका मारुन साबुदाणा एकसारखा करते.

वाफ आणण्यासाठी खूप वेळ गॅसवर ठेवली खिचडी किंवा तेल/तूप कमी पडले तरी चामट होतो साबुदाणा.

जुन्या पाकृ धाग्यावर की ह्याच धाग्यावर अश्विनीने (वैद्य अश्विनी) तिची कृती लिहिली होती. तिच्या हातची खिचडी एकदम बेश्ट. सापडली तर बघ.

हिम्या + १.
साबूदाण्यावर अवलंबून असतं. शिवाय दाण्याचे कूट सढळ हाताने सोडणे! तरच खिचडी मोकळी होते. जीभेचे चोचले पुरवायचे असल्यास, डायटला लांब ठेवणे!

शिवाय दाण्याचे कूट सढळ हाताने सोडणे! तरच खिचडी मोकळी होते. जीभेचे चोचले पुरवायचे असल्यास, डायटला लांब ठेवणे!>> अगदी अगदी

तेल/ तूप / दाण्याचे कूट/ ओले खोबरे सढळ हाताने न वापरताही (म्हणजे कमी वापरून!) साबुदाणा खिचडी उत्तम होण्यासाठी काही पर्याय आहे का?

खिचडी मायक्रोवेव्हमधे करावी. हमखास मोकळी होते. गॅसवर करायची झाल्यास खिचडी होत आल्यावर चमच्याने तूप घालायचे आणि मग एक वाफ काढायची.

अकु, साबुदाना हा मुळात काही हेल्दी ऑप्शन नाहिये त्यामुळे जेव्हा खिचडी खाणार तेव्हा डायेटचे तीन तेरा वाजतातच. त्यामुळे त्यात कूट तूप कमी वापरून काही विशेष फायदा नाही. जेव्हा महिन्यातून एकदा वगैरे जिभेचे चोचले पुरवायचे अस्तात तेव्हा साखि ठिक आहे. आठवड्यातून एकदा उपवास करणार्‍यानी साखि खाणे योग्य नव्हे.

अकु, वरीचे तांद्ळ हा उत्तम पर्याय आहे.
ते लालसर होईपर्यंत कोरडेच भाजायचे. आणि भरपूर पाण्यात भिजवायचे. (गॅसवर नाही.) अधून मधून ढवळायचे. मग निथळून तूपाची जिरे मिरच्याची फोडणी करुन त्यावर परतायचे. आवडीप्रमाणे कूट आणि खोबरे, मीठ साखर घालायची. हा प्रकार खिचडीसारखाच लागतो आणि अजिबात चिकट होत नाही.
नंदिनी म्हणतेय त्याप्रमाणे, साबुदाण्यात कुठलेही पोषणमूल्य नाही.

चला म्हणजे आधी मला योग्य दर्जाच्या साबुदाण्याच्या शोधार्थ निघालं पाहिजे Proud
असो सर्वांनी विविध उपाययोजना सुचवल्याबद्दल धन्यवाद. करून पाहते. Happy

Pages