युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मला कोणि सांगा ना कि चायीनीज् भेळ कशि बनवतात? मि याआधि विचारला होत, कोणी उत्तर नाहि दिल..

उसळ उरली तर मी चक्क शेवपुरी मध्ये ढकलते. बटाट्या ऐवजी पुरीवर सरळ उसळ घालायची आणि मग कांदा, टोमॅटो, चाट मसाला, तिखट-गोड चटण्या, शेव, कोथिंबीर घालायची. चवीत फारसा फरक पडत नाही. फक्त उसळ थोडी घट्ट असणे आवश्यक आहे.

लाह्यांचं बारीक पीठ करता येईल का घरीच ग्राईंडरवर? ते पीठ दुधातून मस्त लागतं. बेस्ट नाश्ता! नाहीतर नुसत्या लाह्या दुधातून सिंडी सांगतेय तशा.

राजगिर्‍याच्या लाह्या ताक + मीठ + मिरची + किंचित साखर (ऑप्शनल) + कोथिंबीर ह्यांत कालवून खायलाही मस्त लागतात.

खारट झालेल्या भाजीचा खारटपणा शोषून घेण्यासाठी त्यात अनेकदा कच्चा बटाटा चिरून घातला जातो. तो बटाटा कच्चाच राहिला तरी चालतो, नंतर बाहेर काढता येतो/ अन्य पदार्थात वापरता येतो.

उसळ असेल तर त्यात भरपूर पाणी ओतावे. ढवळून मग ती उसळ मोठ्या गाळण्याने गाळून घ्यावी. मग परत खोबरे वगैरे घालून गरम करावी.
साधारण रस्सा भाजी असेल तर अकु ने सांगितल्याप्रमाणे, कच्चे बटाटे सोलून त्यात टाकून ती उकळावी. (आणखी पाणी घालावे लागेल) मग बटाटे काढून घ्यावेत. बटाटे वाया जाणार नाहीत. ते प्रेशरकूकरमधे शिजवून वेगळ्या भाजीसाठी वापरता येतील.

लाजो, तांबड्या भोपळ्याची भाजी आहे. पावाचा स्लाईस एकदम मऊ मऊ होऊन जाईल ना? आज ब्रेड नाहीये पण आणि घरात. Sad
लाजो, अकु, दिनेशदा धन्यवाद झटपट उत्तराबद्दल. बटाटा घालून बघते.

दिनेशदा, नाही भाजी मी थोडी रस ठेवून केलीये पण ही टीप लक्षात ठेवीन.
लाजो, धन्स. आता नेक्स्ट टाईम भरीत Happy बटाट्यामुळे बराचसा खारटपणा कमी झाला... खूप खूप धन्यवाद सगळयांना

भाजी खारट झाली तर कांदा तेलावर परतून तो मिक्सर मधुन काढून भाजित मिक्स करून टाकायचा, त्याने ही खारटपणा कमी होतो म्हणे.

माझा उपमा चवीला होतो चांगला पण कधि थोडासा ढेकळं टाइप होतो तर कधि मऊ. मध्यंतरी एका काकूंकडे उपमा खाल्ला तो मस्त होता आणि रवापण छान मऊ शिजला होता, काय गुपित आहे कोणि सांगाल का? ( मऊ म्हणजे पातळ नाही)

सांजा करताना नेमक त्यात काय काय घालयच? मी चवी साठी फक्त मिर्ची मीठ,थोडी जिर्याची पूड, लिंबु घालते. नेहमी तीच तीच चव वाटते. आणी काही लोकांचा खूपच टेस्टी होतो. नक्की काय काय त्यात असत देव जाणे>

निराली, फोडणीला जिरं, मोहरी, उडीद दाळ, चण्याची दाळ, खोबर्‍याचे तुकडे, आलं, कडिपत्ता, लाल मिरची, दाणे टाकावे, सुंदर चव येते. कांदा व्यवस्थित परतल्यावर त्यात भाजलेला रवा टाकावा, मग गरम पाणी. साक्षी१, ह्याने ढेकळं टाइप होत नाही. एक वाफ आल्यावर तुप सोडुन परत एक वाफ आणावी. तयार झाल्यावर, खोबरं, कोथिंबीर पेरुन गरम गरम खावा Happy

Pages