युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी वेलदोडा ग्राइन्डरमधे कितीही फिरवला तरी बारिक होत नाही. तेव्हा जर त्यात थोडी साखर टाकली तर पटकन बारिक होतो.

पनीर बनवताना बहूदा जास्त विनेगर घातलं गेल्याने रबरासारखं चिकट पनीर बनलंय. भाजीसाठी वापरायलं तर चांगलं नाही लागणार. काय करावं?

चव आणि वास दोन्ही ठिक आहे, पण चिव्वट झालंय. घरात खूप्च जास्त दुध होतं म्हणून कधी नाही ते ताज्या एक लीटर दुधाला नासवलंय. Happy आधी दुध फाटतच नव्हत म्हणून मी परत एकदा व्हिनेगर घातलं. मग लगेच फाटलं दुध पण हे असलं चिवट पनीर मिळालं.
चिवटपणा जाणवणार नसेल तर पराठे जमेल करायला.

इथे नुसतीच युक्ती / टिप लिहीली तर चालते का ?
आधी पण कोणी सांगितलं असेल तर माहीत नाही.
मी कोडाईहून एकदम ओरिजिनल (बर्‍याच जणांच्या सांगण्याप्रमाणे सर्वात खात्रीशीर दुकानातून) लेमनग्रास ऑईल आणलंय. त्याचा बाकी बराच उपयोग आहे, पण ते चहात एक थेंब टाकलं की अप्रतिम गवती चहाचा वास अन चव येतेय. दोन कप चहाला एकच अगदी छोटा थेंब टाकायचा , एकदम सही वाटतंय सध्या पावसाळ्यात तर. Happy

१८० रु ला छोटी बाटली, बहुतेक २५०ग्रॅ. ऑईल ची. बाटलीवर २०० लिहीले होते १८० ला दिली. (आता कमी-जास्त असेल तरी सांगू नका Wink माझा चहाचा आनंद तसाच राहूदे. Happy )

बरे माझी एक सूचना/विनंती आहे.

कुणीतरी एक नविन धागा उघडून मायक्रोवेव्हचे उपयोग यावर माहिती देइल का? माझी एक मैत्रीण मायक्रोवेव्हमधे अर्ध्याहून जास्त स्वैपाक करते. कित्येक कामे उदा. लसूण सोलणे, डाळ भिजवणे, बटाटे उकडणे याम्धे ती मायक्रोवेव्ह वापरते. पण ते किती वेळ वापरायचं वगैरे तिला विचारलं की "आसान है" यवढंच मोघम सांगते Sad

(आता कमी-जास्त असेल तरी सांगू नका डोळा मारा माझा चहाचा आनंद तसाच राहूदे. स्मित )>> अगं हो.
आमच्या लायनीतली प्रतिक्षिप्त क्रिया आहे कोणी बाटलीतून काही वासाचे दाखिवले कि विचारयचे रेट क्या है?
जसे कितना देती है विचारणारे असतात न तसेच. त्या बेल्ट मध्ये खूप अरोमा तेले निघतात. पचौली जिरानियम तेले पण मिळतात. चंदन तेल आहेच.

ओके मामी. :). हो, मी पण बरीच आणली आहेत, चंदन तेल, लवंग तेल, (सततच्या सर्दीसाठी) निलगिरी तेल, winter green oil अशी.
पचौली जिरानियम काय असते ?
नंदिनी, लसूण सोलणे मावेत ?? ऐकले नव्हते आधी.

दुधी भोपळा ज्या घरांमध्ये मुलांना खायला फारसा आवडत नाही, त्यांना दुधी खाऊ घालायचा आणखी एक उपाय सापडलाय! Wink आज डाळपालकात (तूरडाळ + पालक) दुधी उकडून, मिक्सरवर बारीक करून घातला होता. भाजीला वरून लसणाची चरचरीत फोडणी. दुधी मुळे भाजीला दाटसरपणा तर येतोच, चवीत अजिबात बदल नाही, शिवाय दुधीचा अंगचा गोडवा असल्यामुळे जर भाजीत गूळ घालणार असाल तर तोही कमी लागतो. लाल भोपळ्यालाही असेच कोणकोणत्या पातळ भाजीत दडवता येईल ह्यावर विचार चालू आहे! Happy

लसणाच्या एक गड्डीतल्या पाकळ्या सुट्या करून मायक्रोमध्ये पसरवून ठेवायच्या आणि एक मिनिट मावे करायच्या(पाकळ्या फुटायचा आवाज आला तर लगेच बंद करायचे). गार झाल्यावर साली लगेच निघतात. कमी पाकळ्या असतील तर कमी वेळ.

विरजण लावलेले रूम टेम्परेचरचे दूध मायक्रोवेव्ह मध्ये २० टक्के पॉवर वर भांडे हाताला किंचैत गरम लागेपर्यंत तापवले (३-४ मिनिटे) तर दही लवकर आणि घट्ट लागतं

४ बटाटे उकडायला धुवून त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्ह करायचे. मधे एकदा उलट करायचे. (खालची बाजु वर). मग फ्रीज मध्ये ठेवुन द्यायचे. गार झाले की सालं पटकन काढता येतात.

बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रो करायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.

बेसन रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या १/३ तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात. ४० % पॉवर.

अकु, लाल भोपळा पावभाजीत घालता येतो. लहान मूलांना त्या मसाल्याने जो त्रास होतो तो होत नाही. आणि भाजी छान मिळून येते.

नंदिनी, मायक्रोवेव्हचे १०० उपयोग, असे एक पुस्तक बघितल्यासारखे वाटतेय. (बहुतेक दादरला आयडीयल मधे होते.)

अश्विनी, गोव्याला गेलीस परत की आवर्जून स्पाईस गार्डन ला जा, तिथे काही तेले बघितली होती. (फिक्स्ड रेट असतो, पण तूला बिझिनेसच्या दृष्टीने नेगोशिएट करता येईल.)

नंदिनी, इथे आख्खा बाफच आहे ना मायक्रोवेव्हसाठी- http://www.maayboli.com/node/11154

इथे लोकांनी तो वापरण्याच्या टिप्स दिल्या आहेत, पाककृती आहेत.. सोयीसाठी त्याच बाफवर लिहायचे का हे वरचे उपयोगही? किंवा नवीन धागा उघडणार आहेस, तो 'स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे' ह्या ग्रूपात उघड कृपया.

कधी कधी वेलदोडा ग्राइन्डरमधे कितीही फिरवला तरी बारिक होत नाही. तेव्हा जर त्यात थोडी साखर टाकली तर पटकन बारिक होतो.>>>>>>> मी नेहमी आख्खे वेलदोडे तुपात परतुन टम्म फुगले मग थोडी साखर घालुन बारिक करुन ठेवते.. २-४ महिने आरामात टिकतात.. आयत्यावेळी कटकट होत नाही. आणि वेलदोड्याच्या सालीचा जास्त चांगला वास येतो हा स्वानुभव आहे.

अश्विनी, गोव्याला गेलीस परत की आवर्जून स्पाईस गार्डन ला जा, तिथे काही तेले बघितली होती. (फिक्स्ड रेट असतो, पण तूला बिझिनेसच्या दृष्टीने नेगोशिएट करता येईल.)>> बॉस अरे मी तेल नाही विकत फिनिश्ड परफ्यूमच. पण साइड्ने हे तेलाचे प्रवाह नेहमी फिरत असतात. जे लोक ब्लेंडिंग करतात त्यांना लागतात हे तेले. आपण आपले वासाचे धनी. Happy स्पाइस गार्डन मध्ये जाणार आहे पण.

मी कोफ्तेच करणार होते आज रात्रीसाठी, पण सकाळी अचानक दिराचे दोन मित्र आले आणि जेवायला थांबले . सकाळी केलेली भाजी पुरली नसती म्हणून त्या पनीरची किसून पनीर भुर्जी केली. किसल्याने चिवटपणा कमी झाला. थोडी मॉइस्ट वाटावी भाजी म्हणून त्यात दोन चमचे साय घातली फेटून. छान झाली भाजी. पनीरचा चिवटपणा जाणवला नाही.
रात्री पाण्यात घालून फ्रिझमध्ये ठेवल्यानेपण पनीर बर्‍यापैकी नरम पडलं होतं.

अवश्य जाच. तिथल्या वेलदोड्याचे पाकीत बॅगेत ठेवले होते म्हणून माझ्या सर्व कपड्यांना वेलचीचा वास लागला होता !!

चिंगे, तुझी टीप भारी आहे एकदम Happy
मी काल वेलचीला जरा एक चीर देऊन तुपात फुलवले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधे पूड केली. मस्त घमघमाट सुटला होता वेलचीचा, शिवाय पूडही पटकन झाली. आणि भरपूर झाली.
आता यापुढे वेलची सोलणे हे कटकटीचे काम बंद Happy

घरी कढवलेले तुप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर, कढवताना त्यामधे एक कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कढवुन झाल्या झाल्या त्या भांड्यावर झाकण टाकायचे. गरम असतानाच. असलं मस्त कणीदार्/रवाळ तुप होतं ना. - माहितीचा स्त्रोत - डॉ. अनिल अवचटांचा एका दिवाळी अंकातला लेख. समथिंग स्वयंपाकाचे प्रयोग वगैरे नाव होतं.

माझं तुप तोपर्यंत एकदम गुळगुळीत (plain/smooth) व्हायचं. वास छान पण texture बंडल. मला आजीच्या कडे असतं तसं रवाळ तुप आवडतं, म्हणुन मी ही टीप वापरुन पाहिली आणि तेव्हापासुन माझं तुपही सेम आजीसारखं होतं. रवाळ आणि खमंग. Happy

मनिमाऊ, टिप छान आहे. मी बाजारचे तयार तूप पण असे कढवून ठेवतो.
रच्याकने - कढवलेल्या तूपावर झाकण ठेवताना नेहमी लोकांना प्रश्न पडतो कि वाफेचे पाणी नाही का तूपात पडणार ? पण कढवलेल्या तूपात पाण्याचा अंश अजिबात नसतो, त्यामूळे वाफेचे पाणी पडायचा प्रश्नच नसतो.

दिनेश, सई अगदी अस्संच कणिदार रवाळ कढवते लोणी.. तिच्या इतकं सुंदर तूप कोणी केलेलं मी नाही पाहिलेलं आजतागायत Happy

Hi All,

I cant view the above link as I am not member of the Group Aaharshastra & Pakakala, please let me konw how do I get membership to that group so that I can also put my comments and view those tips.

waiting for the reply

Pages