युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी एक उत्तर प्रदेशी मैत्रीण उरलेल्या भातात थोडे पोहे व दही घालून तास-दोन तास भिजवून ठेवायची. नंतर त्यात हि.मि., धणे-जिरे पूड, बाकी हवा तो माल-मसाला, मीठ वगैरे घालून, तांदळाचे पीठ घालून कुरकुरीत तळायचे. दह्यामुळे थोडी वेगळी चव येते. चावल की पकौडी तयार!

ज्यांना लसुणचा स्वाद आवडतो, त्यांच्यासाठी -
फोडणी करुन त्यात लाल तिखट टाकुन लसुण पेस्ट टाकायची, मग वरुन भात घालुन परतायचा. एका खेडेगावच्या ट्रिपमधे खाल्ला होता. एकदम यम्म्म्म्म !

पनीर छान घट्टसर हवे असेल तर काय करायचं? मी गरम दुध फाटेपर्यंत लिंबु पिळुन पनीर केले. पाणी टाकुन पनीर मऊ कापडामधे बांधले. छान घट्ट गोळा झाला. मी तो मळुन मग पनीर मटरसाठी वापरायला घेतला. मी मटरमधे तुकडे टाकल्या टाकल्या, तुकडे विरघळुन पेस्ट झाली. अगदी मऊ सायीसारखी. सगळ्यांनी भाजी बघुनच रिजेक्ट केली. चव छान होती, पण तुकडे का नाही राहिले?

अरुंधती, तू जो पदार्थ लिहिलाहेस तशा प्रकारच्या पदार्थाला महाराष्ट्रात आंबूसघाऱ्‍या म्हणतात. त्याचा पहिला उल्लेख इथे मायबोलीवर बहुतेक बी ने केला होता. नंतर मनुस्विनीने त्या करून पाहिल्या आणि इथे सविस्तर कृती लिहिली आहे.

मी बखर वगैरे लिहितेय की काय असे मला वाटले Wink

मनिमाऊ, पनीर मळले ते चुकलं. पनीर पुरेसे घट्ट झाले कि त्याच्या वड्या कापायच्या. घट्ट होण्यासाठी त्यावर वजन ठेवले तर चांगले. वड्या कापतानाच कधी कधी लक्षात येते कि पनीर जमलेले नाही, त्याचा भुगा होतोय. अश्या वेळी पनीरची भुर्जी करायची.

थॅंक्स, दिनेशदा. भुर्जी करायला पण थोडंसं तुकडे किंवा खिमासारखं रहायला हवं ना पनीर. माझी एकदम फाइन पेस्ट झाली होती. फारच लोण्याबरोबर खाल्ल्यासारखं वाटत होतं.

पुढच्या खेपेस वजन ठेवुन पाणी पुर्ण काढुन टाकेन.

तू जो पदार्थ लिहिलाहेस तशा प्रकारच्या पदार्थाला महाराष्ट्रात आंबूसघाऱ्‍या म्हणतात >> ओह्ह!! असं आहे का... माहितच नव्हतं! थँक्स मंजूडी. Happy

ओह्ह... थँक्स मंजूडी... पण ही पाकृ थोडी वेगळी आहे. माझी ती मैत्रिण २-३ तास ठेवायची दह्यात भात भिजवून. आणि इतके घटक पदार्थ नसायचे त्यात. असलाच तर गरम मसाला - ध जि पूड, कधी आले इ. कधी ती तो भात व मसाल्याचा गोळा मिक्सरमधून फिरवून घ्यायची. आणि त्याचे सिलेंड्रिकल शेप मधील मुटके करून ते तळायची. सुरुवातीला तो पदार्थ कशापासून बनवलाय हेच आम्हाला कोणाला कळाले नव्हते.

खसखस भाजताना जरा जास्तच भाजली गेली आहे, तिला भाजल्याचा वास येत आहे. गोड पदार्थात तर वापरता येणार नाही. तर-
१) तिखट पदार्थात तिचा वास लपेल का?
२) खसखस वापरता येतील असे तिखट पदार्थ कोणते? काजू-खसखशीची पेस्ट वापरतात काही पदार्थात, त्यात अशी जास्त भाजली गेलेली खसखस चालेल का?
३) की टाकूनच देऊ?

पार करपलीच आहे का? नसेल तर कदाचित गोड पदार्थात पण वास कळणार नाही. थोड्यात घालून बघ.

काजू-खसखशीच्या पेस्टमधे काजू आणि दुधाबरोबर भाजल्याचा वास लपून जाईल.

खसखस वापरता येतील असे तिखट पदार्थ कोणते?>>>> सगळ्या पंजाबी पद्धतीच्या भाज्या.

मेथी मटर मलई किंवा माखनवाला अशा पंजाबी भाज्यामधे काजू-खसखशीची पेस्ट वापरतात. त्याच्यामधे वापरून बघ/

(जास्त वापरलीस तर खाणार्‍याना थोड्या वेळाने काठवट्खाना खेळल्यासारखे वाटेल.)

खसखस वापरता येतील असे तिखट पदार्थ कोणते? >> आम्ही चिकन, अंडा मसाला मधे पण भाजलेल्या खसखशीची पुड टाकतो.

रस्सा दाटसर करायचा असल्यास काळा मसाला घालून केलेल्या पदार्थांमध्ये खसखस घालतात. चिकन, मटण, अंडाकरी इ. इ. पिठल्याच्या वड्यांची आमटी, गोळ्याची आमटी इ. मध्ये पण चालेल. कांदा-खोबरं भाजून आणि काळा मसाला घालून करायच्या कोणत्याही मसालेदार रश्यामध्ये चालेल. Happy

वोक्के, धन्यवाद मैत्रिणींनो Happy

प्राची, दूध कायमच मंद आचेवर तापवायचं. तापवलं की संपूर्ण झाकायचं नाही, थोडी फट ठेवायची.

पौर्णिमाला अनुमोदन. आणि रूम टेम्परेचरला ते दूध आलं की फ्रिजात टाकायचं, सायीचा थर अजून जाड होतो ४-५ तासात...

दक्षिणा आणि पूनमला अनुमोदन.. मी दुध रात्री तापवुन घेते आणि झोपताना फ्रिजमध्ये ठेवते, सकाळी अगदी जाड साय आलेली असते, ती काढुन टाकली की मग लोफॅट/ नीरसं दुध तयार.

रच्याकने गो़कुळच्या दुधाला फारच जाड साय येते. काही गडबड तर नाही ना अशी शंका येते कधीकधी! Happy Light 1

नीरसं म्हणजे न तापवलेलं ना?>>>> हो का? मी इतके दिवस साय/फॅट काढुन टाकलेल्या, पचायला हलकं झालेल्या दुधाला नीरसं समजायचे. Uhoh

रच्याकने गो़कुळच्या दुधाला फारच जाड साय येते.>>>> तेलाचा तवंग येतो का? (शक्यतो हलका पिवळसर)>>> हो. २ वेळा तापवलं दुध की जास्तच दिसतं.

विषय निघालाच आहे म्हणुन, दुधात भेसळ करणारे लोक फोडलेल्या प्लॅस्टिक पिशवीत भेसळयुक्त दुध भरुन कापलेल्या कोपर्‍याला सीक करुन विकतात. म्हणुन दुधाची पिशवी वापरली की तिला २-३ आडवेतिडवे कट द्यायचे म्हणजे सहजासहजी ती अशा कारणांसाठी वापरता येत नाही.

नीरसं म्हणजे न तापवलेलं दूध.
पण आपल्याकडे पिशवीत मिळतं ते दूध खरं निरसं नव्हे..
कारण ते पाश्चराईज्ड आणि होमोजिनाईज्ड असतं..
गायीचं किंवा म्हशीचं काढलेलं (तापवण्या अगोदरचं) दूध म्हणजे खरं नीरसं...
आपल्याला जर का पिशवीत निरसं दूध मिळायला लागलं तर ते आपण कधी पिणार नाही, कारण त्याला एक प्रकारचा वास येतो शिवाय ते इतकं शुभ्र सुद्धा नसतं.

सॉल्टेड बटरचं तूप बनवलं आहे का कोणी? माझ्याकडे राशनमध्ये आलेलं एक किलो सॉल्टेड बटर पडून आहे. त्याचं जर मी तूप बनवलं तर नेहमीच्या तुपासारखंच वापरता येईल का?

Pages