युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,

एक शेंदेलोण असते आणि एक पादेलोण असते (असे नांव का आहे माहित नाही Proud ) त्यातले गुलाबीसर दिसणारे सैंधव आणि दुसरे करडे दिसणारे काळे मीठ बहुतेक...

धन्स दिनेशदा, म्हणजे कोणतेही खाऊ शकतो Happy
लाजो मी आयुर्वेदिक स्टोर मधून आणलेले सैंधव मीठ शुभ्र पांढरे आहे Happy
खर तर मलाही संधव मीठ गुलाबी असत किंवा दोन्ही एकच अस वाटायच

पांढरं शुभ्र असतं ते रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव, आणि गुलाबीसर असतं ते ब्लॅक सॉल्ट... म्हणजेच काळं मीठ. तब्येतीला काळं मीठ जास्ती चांगलं... Happy

सगळी मीठं म्हणजे सोडियम क्लोराईडच. गुलाबी रंग आणि ती चव गंधकाच्या संयुगामूळे.
कुठलेही मीठ प्रमाणातच, दिवसाकाठी २ ते ३ ग्रॅम्स एवढेच खायचे असते.
लोणचे, पापड आदी पदार्थात ते भयावह प्रमाणात असते.

मागे मी ही सुक्या लाल मिरच्या ड्ब्यात ठेवल्या की मऊ पडतात म्हणुन त्या उन्हात(२-३ वेळा सकाळ्च्या कोवळ्या उन्हात) ठेवल्या तर त्या फिकट झाल्या. चव ही गेली. मांसाहाराशिवाय इतर कशात मी फार वापरत नाही त्यामुळे त्या उरतातच. मच्छीच्या सारात वापरल्यातर कलर ही नाही नी नेहमीसारखी चव ही नाही. मग मी त्या टाकुन दिल्या. अस का झाल?? जास्त उन दाखवल गेल का?? आता पुन्हा आणायच्या आहेत, मग आणल्यावर काय काळजी घेऊ?? आणताना मी कमीत कमी म्हणजे १०० ग्रॅमच आणते (यापेक्षा कमी मिळतात का? दुकानदाराकडे यापेक्षा कमी मागायला संकोच वाट्तो Happy ).

साक्षी, मिरच्या नक्कीच कमी प्रतीच्या होत्या किंवा किडल्या होत्या. लाल मिरच्या उन्हात ठेवल्याने रंग आणि स्वाद दोन्ही सुधारले पाहिजे.
कधी कधी पांढरे तिखटच हवे असते (पापडासाठी वगैरे) त्यावेळी हिरव्या मिरच्यांवर आधणाचे पाणी ओतून त्या उन्हात वाळवतात. या मिरच्या सुकल्यावर पांढर्‍या होतात.

जर वाटणातच घ्यायच्या असतील तर मिरच्यांचे हवे ते मिश्रण (ब्याडगी, संकेश्वरी, काश्मिरी) घेऊन, भरड कोरड्या वाटून (फ्लेक्स) फ्रिजमधेच ठेवायच्या. वाटल्याने फार कमी जागा लागेल.

ओके दिनेशदा, पण भरड कच्च्याच मिरच्याची करायची की थोडे भाजुन? भाजुन केली तर साराची चव बदलेल का? मी सार करताना मिरच्या जरा वेळ भिजवुन मग वाटते, मग फ्लेक्स डायरेक्ट वाटणात टाकायच्या का?

मिरच्या आणल्यावर अंगठा आणि अनामिका मधे धरुन मोडून बघायच्या (खरे तर आणतानाच तश्या बघून आणायच्या ) खुटकन मोडली तर भाजायची गरज नाही. मोडली नाही तर भाजावी लागेल. पण भाजताना फार भाजायची नाही. गरम तवा जरा निवला कि त्यावर पसरुन ठेवल्या तरी चालतील. मग देठ मोडून एकदाच घुरकन मिक्सरमधून काढायच्या. म्हणजे फ्लेक्स तयार होतात. नीट खुटखुटीत नसल्या तर फ्लेक्स तयार होणार नाहीत. वाटण्याऐवजी एक एक इंचाचे तूकडे केले तरी चालतील (हाताची कधी कधी आग होते, कात्री वापरणे सोयीचे होते) अश्या मोडताना/कापताना एखादी मिरची खराब असेल तर लगेच लक्षात येते.

हे तूकडे जसे अखंड मिरच्या वापरतो (भिजवून / भाजून / वाटून ) तसेच वापरायचे.

नवर्‍याच्या ऑफिस मधे दर वर्षी " टेस्ट ऑफ ईंडिया" म्हणून देसी फूड फेस्ट असते. लंच टाईम ला काहीतरी देसी फूड सर्व करायचं. मी दाबेली द्यायचं ठरवलं आहे. साधारण ४०-४५ कराव्या लागतील. एकूणच सर्व करण्या संबंधी काही टिप्स देता येतील का कुणाला. जसं ईंडिविज्युअली रॅप कराव्यात का? की एकत्रच एखाद्या ट्रे मधे घालून रॅप करू? चॅफींग डिश वापरू का? की गार बरी वाटेल?

थँक्स दिनेशदा... पण आठवड्याच्या भाज्या चिरून-शिजवून ठेवल्या तर भाज्यांमधल्या जीवनसत्त्वांचा नाश होतो की सत्यानाश... म्हणजे थोडाच नाश होत असेल तर ठीकच म्हणायचं. पण एवढा उपद्व्याप करून हाती शून्य लागणार असेल तर मात्र उपयोग नाही.

प्रॅडी,
खुप आधी करुन ठेवल्या तर मऊ पडतील. ऑफ़िसमधे ब्रेड गरम करायची सोय असेल तर
ब्रेड वेगळे व भाजी वेगळी करुन आयत्यावेळी करुन देता येतील.

चिवा.
बहुतेक भाज्या चिरल्यावरदेखील ऑक्सिजन आत घेत असतात. त्यामूळे शिजेपर्यंत हि
क्रिया चालूच राहते. शिजल्यावर ती थांबते.
म्हणून शिजवून झाकून फ़्रिजमधे ठेवल्या तर चांगल्या. भाज्यांसाठी रोज संध्याकाळी
वा रात्री अर्धा तास दिला तर सकाळी घाई होत नाही. पूर्वतयारी असा एक छान बीबी
आहे इथे.

प्रॅडी,
खूप आधी करून दिल्या तर दाबेल्या सोक होतील Sad फार छान टेस्ट येणार नाही. लगेच करून लगेच खाल्ली तर तिची खरी टेस्ट.. दुसरा एखादा पदार्थ बघ ना.. जो गार खाल्ला तरिही चालेल असा..

सुचत नाहीये दुसरं काही. आहेत का काही सजेशन्स? ढोकळा , समोसा , कटलेट्स देऊन झालेत ह्या आधी. हातात घेऊन सुटसुटीत पणे खाता आलं पाहिजे, अगदी आयत्या वेळी असेंबल करायला लागणारे(भेळ्,पाणीपुरी, शेवपुरी ईत्यादी सारखे) पदार्थ नको एवढा क्रायटेरिया आहे.ऑफीस घराजवळ आहे त्यामुळे आयत्या वेळी मी ट्रे नेऊन देईन. मैत्रिणीला मदतीला बोलवलं आहे सो द्यायच्या आधी तासाभरात असेंबल करता येईल. आणी साधारण पुढच्या एका तासात सर्व्ह केलं जाईल.त्यामुळे फार गिचका होईल असं वाटत नाहीये. पण तरी अजून काही सजेशन्स असतील ईतर पदार्थांचे तर जरूर सुचवा.

वडा-पाव. जरा कमी तिखट करुन. इंडियन स्ट्रीट फूड म्हणून ठेव.
एकदा मी कांदा आणि बटाटा भज्या नेल्या होत्या. लोकांना फार आवडल्या.

रगडा-पटीस किंवा पावभाजी चालेल? पावभाजी थोडी थोडी घ्यायची.. आपण नेहेमी घेतो तेवढी नाही वाढायची. माझ्या अनुभवाने भारतीय-अभारतीय, मराठी-अमराठी सगळ्यांना आवडते पावभाजी किंवा रगडा-पटीस.

प्रॅडी, मसाला इडल्या / भाज्या घालून इडल्या व चटणी किंवा वेगवेगळ्या डाळी भिजवून (तूर, मूग, उडीद + इडली रवा) केलेल्या इडल्या + चटणी पर्याय कसा वाटतोय?

वडापाव आहेच, पण नुसते बटाटेवडे + चटणीही चालेल. किंवा मिक्स भजी. (कांदा, बटाटा, पालक, मिरची इत्यादी)

प्रॅडी
दडपे पोहे हा ऑप्शन कसा वाटतोय?
पोहे भाजून, मीठ साखर एकत्र करून ठेवायचे, ऑफिसच्या जवळ घर आहे त्यामुले ऐनवेळी त्यात कांदा/लिंबू/कोथिंबिर घालून वरून ओलं खोबरं पेरून द्यायचे.. सोप्पे पडतील करायला, आणि पोटभरीला दमदमीत होतील. सध्या तरी हे एकच सुचतय.

गोडा मसाला वापरुन करण्यात येणारे काही खास पदार्थ.
वांग्याची भाजी, गवारीची भाजी, पंचामृत, आंबट वरण, पोहे, मसाले भात, अळूची पातळ भाजी, मेथीची गोळा भाजी, मोड काढलेल्या कडधान्यांच्या ऊसळी, मसूराची आमटी... तसा दक्षिणा म्हणतेय त्याप्रमाणे कुठल्याही पदार्थात चालतो.

मी_चिऊ साठी :

साधा पण झटपट कश्मिरी पुलाव

लागणारे सामान :
2 कप बासमती तांदुळ,2 कप दूध,1 चमचा साखर,1/2 चमचा जीरे,3 लवंग,1 तेज पान,3 वेलची
दालचीनी,2 चमचा तुप,स्वादानुसार मीठ
ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळ [सफरचंद, द्राक्ष, पपई, अननस,डाळींब]
कृती :
पुलाव करायच्या अगोदर तांदुळ अर्धा तास भिजत ठेवावे.दुध साखर एकत्र करुन ठेवा.
कढईत जीरे , लवंग, तेज पान, वेलची,दालचीनी तुपावर गलाबी परतुन घ्या.
त्यावर भिजत ठेवलेले तांदुळ ३-४ मिनीटे परता. मग दुध-साखर , मिठ आणी अर्धा कप पाणी वाढवुन शिजवा. गॅस बंद केल्यावर ड्राय फ्रुट्स आणी छोट्या आकारात कापलेली फळांनी सजवा..

टिप : यात भाज्या पण घालु शकतो [शक्यतो वाटाणे, फरस्बी, गाजर ] Happy

कोबीच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, कॉकटेल ईडल्यांवर मोळगापुडी अन थोडी मोहरी-लाल मिरचीची फोडणी घालून. कचोरी - गरवी गुजरातची कोरडी कचोरी मस्त असते, नाहीतर कुठे ऑर्डर देऊन तुरीच्या दाण्याची / मटारची कचोरी मिळत असेल तर ती , हिरवी चटणी - काकडी - टोमेटॉचे छोट सँडविचेस ( एकाचे सॅंडविचला एक किंवा दोनवेळा डायगोनली कट करून) . हिरवी अन लाल चटणी असे दोन प्रकार केले तर मिक्स्ड रंग पण छान दिसतील, तासभरच आधी केले तर सॉगी नाही होणार.

सिंडीच्या रेसिपीने ढोकळा पण छान होईल.

कालच माझ्यासुद्धा मनात कचोरी चाट आलं होतं. आयत्या कचोर्‍या ठेवायच्या. त्याबरोबर सगळं चाटचं सामान. लागेल तसं घेतील. ढोकळा पण मस्त ऑप्शन आहे. पावभाजी पेस्ट्री शीट्स मध्ये घालून पण वेगळा प्रकार. मूंगवडे पण ठेवता येतील. त्याबरोबर चिंचेची चटणी, केचप.
सगळ्यात सोप्पे म्हणजे, नुसते सामोसे नाही का चालणार? हवं तर दीप चे सामोसे आणि त्याबरोबर छोले कर. म्हणजे सामोसा-छोले चाट होईल.

@प्रॅडी - गुजराती हांडवोच्या वड्या.. गिट्स चे पाकिट आणुन त्यात मटार, मका, लाल्/हिरव्या कॅप्स चे तुकडे घालुन बेक करायचे. वड्या कापुन टॉम सॉस किंवा चिली सॉस बरोबर सर्व्ह करायचे. आधी बेक करुन ठवता येइल. आयत्या वेळेस हवं तर जरा मावे मधे गरम करायचं. नाही केलं तरी रुम टेम्प ला पण चांगल्या लागतात.

बिर्यानी , पावभाजी , ढोकळा, ईडली वडा उपमा आदी ऑलरेडी पब्लिकने बुक केलं आहे. त्यामुळे माझी गाडी बरीचशी वडापाव, दहीवडा कडे झुकते आहे. मनुच्या रेसिपीने कचोरीची ट्रायल करून बघते. कचोरी चाट चांगला ऑप्शन वाटतोय. पण नवरोबाला शक्यतो ट्रे मधून उचलून डायरेक्ट प्लेट मधे सर्व्ह करता येईल असं काही हवं आहे.सजेशन्स साठी सगळ्यांना खूप धन्यवाद.

Pages