Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण सी. १- एपि. १ बघत असतानाही
पण सी. १- एपि. १ बघत असतानाही मधूनच सुरू झाल्या सारखे का वाटतेय >>>
ती स्टोरी टेलिंगची मजा आहे... स्क्रिप्ट बारकाईने लिहिलेलं आहे.
एक-एक वाक्य, प्रत्येक सीन नीट ऐकत, बघत रहा. पुढच्या सीझन्समध्ये आधीच्या सीझनचे काही ना काही संदर्भ येत राहतात.
पहिल्या सीझनला बॉशचं पात्र (आणि एकूणच कथानक) बर्यापैकी बोअर होऊ शकतं. पण त्याचा कॅरेक्टर-ग्राफ पुढच्या सीझन्समध्ये उंचीवर जातो.
या सीझनमधलं त्याचं एकटेपण लक्षात घेतलं तर चौथ्या-पाचव्या सीझनची मजा वाढते.
अज्ञातवासी, मी इथे
अज्ञातवासी, मी इथे लिहील्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व ! मी एकच एपिसोड पाहिला आणि पुढे पाहणार नाही हे पण लिहीले आहे. पहिल्या एपिसोडवरून मालिका जज्ज करणे शक्य नाही म्हणून थीम गंमतीशीर आहे असे म्हटले होते. तरीही त्यावरून तुम्ही पूर्ण मालिका पाहिल्याने तुम्हाला जो मनस्ताप झाला आहे त्याबद्दल क्षमा असावी. इथून पुढे अर्धवट पाहून काही लिहू नये हे समजलं.
ललिता प्रिती समजले
ललिता प्रिती समजले
अज्ञातवासी, रानभूली, होमाज
अज्ञातवासी, रानभूली, होमाज टू हॉरर बघायची असेल तर The cabin in the woods हा सिनेमा अवश्य बघा. The absolute best हॉरर- कॉमेडी.
सुपरस्टोअर बघताय का कोणी?
सुपरस्टोअर बघताय का कोणी? मस्त हलकी फुलकी सिटकॉम आहे. अशा सिरीज बर्या वाटतात, एखादा एपिसोड स्किप केला तरी काही फरक नाही पडत.
हो मी 2 वेळा पाहिले सर्व
हो मी 2 वेळा पाहिले सर्व सिझन्स.खूप क्युट आहे.डिना, जोनाह, ग्लेन सर्व पात्रं एकदम स्पॉट ऑन.
सुपरस्टोअर बघताय का कोणी? >>>
सुपरस्टोअर बघताय का कोणी? >>> प्राइमवरची ना? वॉचलिस्टला टाकून खूप दिवस झाले, अजून पाहिली नाही.
खुप आवडते सुपरस्टोअर मला पण!
खुप आवडते सुपरस्टोअर मला पण! विशेष आवडते म्हणजे ग्लेन आणि डिना!
तो रोबोट ला छतावरून ढकलायचा
तो रोबोट ला छतावरून ढकलायचा एपिसोड पाहिला की नाही
माझ्याही वॉच लिस्ट मध्ये होती
माझ्याही वॉच लिस्ट मध्ये होती केव्हाची.पहिल्याच सिजनवरच आहे अजून ,पण आवडतेय खूप .
तो रोबोट ला छतावरून ढकलायचा एपिसोड पाहिला की नाही ? >>सुपरस्टोर मध्ये का ? अजून नाही , पण मला 'द ऑफिस' आठवली यावरून .
ललिता-प्रीति , नेटफ्लिक्सवर आहे .
ऑफिस वाल्याच टीम ची आहे गं
ऑफिस वाल्याच टीम ची आहे गं सुपरस्टोअर.
हो का , म्हणूनच मला बघताना पण
हो का , म्हणूनच मला बघताना पण ऑफिस ची आठवत राहते. एकदम witty पात्रं आहेत सगळी .
The cabin in the woods >>>
The cabin in the woods >>> थँक्स.
खरं तर आता काही बघायला वेळ नाही मिळत. मायबोलीवर आलं तरच काही तरी बघण्याचा विचार येतो मनात. वेबसिरीज पण एखादा एपिसोड. आता त्यातलं नावीन्य गेलं. एक एक ओटीटीचं सबस्क्रीप्शन बंद करत नेणार आहे. रेंटवर बघेन हवं तेव्हां.
नेफ्लि वर एलीट नावाची टीन/
नेफ्लि वर एलीट नावाची टीन/ हायस्कूल सीरीज पाहिली असेल तर त्याचे हिंदी वर्जन आले आहे "क्लास" नावाने. थ्रिलर आहे ८ भागांची. स्टोरी बर्यापैकी एन्गेजिंग आहे. बरेच सेक्शुअल सीन्स बळेच घेतलेत ते नसते तरी चालले असते. बरेच सीन्स कॉपी केल्याने "हे असं कुठे असतं भारतातल्या शाळेत?!" असे वाटते.
एलिट चे पहिले 2 सीजन पाहिलेत.
एलिट चे पहिले 2 सीजन पाहिलेत. मला ठीकठाक वाटली.
ऍटरनी वू पाहिली.
ऍटरनी वू पाहिली.
त्या मुलीचे डोळे एकदम बोलके आहेत.आणि हिरो पण मस्त.
मला त्या ऑटिस्टिक धिप्पाड भावाच्या केस ला अजून चांगलं क्लोजर मिळायला हवं होतं असं वाटलं.
'वू' नी कमाल केलीये त्या
'वू' नी कमाल केलीये त्या मालिकेत. मला अजुन एकदा पहावीशी वाटते आता तु लिहिल्यावर मी-अनु.
प्राईमवर फर्झी नावाची अ फा ट
प्राईमवर फर्झी नावाची अ फा ट सिरीज बघितली. बिंज वॉच अक्षरशः
शाहीद कपूरला वेबसिरीज मधे बघून सुखद धक्का बसला. काय तोड काम केलंय यार त्याने.
सनी - आई वडिलांचे छत्र नसलेला, ब्रोकन, दुखावलेला पण स्वतःच्या कलेवर मेहनत घेणारा, जीवाभावाच्या दोस्ताबरोबर मनापासून सोबत असणारा, आजोबांची (अमोल पालेकर) काळजी करणारा नातू इतके पैलू दाखवलेत त्याने एकाच रोल मधे. त्याचा लुकही एकदम परफेक्ट. एक्स्प्रेशन्स, देहबोली, परिस्थितीने आलेली बेफिकीरी, कधी हतबलता त्याने फार मस्त दाखवलंय.
त्याचा जीवाभावाचा दोस्त फिरोज नावाचं एक कॅरेक्टर पण भारी आहे. सनीबरोबर आजोबा लहानपणीपासून याचाही सांभाळ करतात.
या आजोबांची एक प्रिंटींग प्रेस असते ती पैशाअभावी गहाण पडलेली असते आणि सनीच्या पेंटींग करण्यातूनही काही फारसं उत्पन्न मिळत नसतं. त्यामुळे या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी त्या प्रेस मधे अनेक वर्ष काम करणार्या एका सहकार्याच्या मदतीने सनी आणि फिरोज तिथे खोट्या नोटा छापण्याची कामं सुरू करतात.
त्यातून ते पुढे कसे जातात, आजोबांना कळतं का, बाकी काय अडचणी येतात त्यासाठी बघाच.
एक मायकेल नावाचा पोलिस ऑफिसर कॅरेक्टर पण गाजतोय सध्या मीम्स मधे. विजय सेतूपती नाव त्याचं.

याने तर काय बेअरिंग पकडलंय. मुद्दामच याचं मोडकंतोडकं हिंदी तसंच ठेवलंय बहुतेक. तरीही खटकत नाही. याबद्दल काही लिहित नाही जास्त ते टीव्हीवरच बघा काय धमाल केलीये. याची आणि एका मंत्र्याची शाब्दिक जुगलबंदी फार भारी आहे!
के के मेनन पण एका रोल मधे आहे. पण विजय सेतूपतीपुढे त्यालाही विसरायला झालंय
शिवीगाळ भरपूर आहे (अर्थातच).
पण ओव्हरॉल मस्ट वॉच फॉर विकेंड.
जबरदस्त आहे फरझी! surprise
जबरदस्त आहे फरझी! surprise आहे एक छान यात!
आणि हो, श्रीकांत तिवारी येणार आहे भेटायला होळीला...
हो फरझी मस्त आहे.शाहिद कपूर
हो फरझी मस्त आहे.शाहिद कपूर एकदम सॉलिड दिसतो आता पण.त्याचा मित्र कश्यात पाहिला आठवत नाही, पण तोही छान आहे.सेतुपती ची कुल स्टाइल जबरदस्त.
अमोल पालेकर छोट्या रोलमध्ये अजूनही हँडसम.
केके मेनन जरा झाकोळलाय असं वाटलं.
केके मेनन जरा झाकोळलाय असं
केके मेनन जरा झाकोळलाय असं वाटलं.>>>> येस्स तो असाच आठवतोय आता मला सगळीकडे. स्टीरिओटाईप्स झालाय.
फरझी भारी आहे.. मात्र बाय
फरझी भारी आहे.. मात्र बाय डिफॉल्ट ऑडिओ इंग्लिश आहे.. नक्की हिंदी चेंज करून बघा....
रेजिना कसांड्राला बघून सुखद धक्का.. राशी सुंदर दिसली आहे...
एकही अडल्ट सिन नाही (सेक्स)... फॅमिली मॅन लेव्हल आहे...
शाहिद आणि विजय एकदम बेस्ट... केके भारीच मात्र मला मजा आली झाकीर हुसेन(मंत्री) आणि विजय च्या प्रत्येक संभाषण मध्ये...
फर्जी - प्रोमो बघूनच
फर्जी - प्रोमो बघूनच वॉचलिस्टला अॅड करून ठेवली होती. शाहीद कपूरसाठी!
इथे चांगले रिव्ह्यूज बघून बरं वाटलं.
बघणारच.
फर्झी काल च बघायला सुरू केली.
फर्झी काल च बघायला सुरू केली..आणि ईथे लोकांनी बिंज वॉच करून संपवली देखिल?
८ का ९ भाग आहेत ना?
शाहिद आता बॉलीवुड मधे लोणच्या सारखा मुरलाय. दिसतो ही देखणा आणि अभिनय तर सरसच. जब वी मेट पासून आवडायला लागला.
हैदर आणि उडता पंजाब पासून अजून आवडतो. पंकज कपूर पण आवडायचा.
फर्जी आहे लिस्टित. या वेळी
फर्जी आहे लिस्टित. या वेळी पुरवून पुरवून बघायचा इरादा आहे. बघू कसे जमतेय.
फर्जी आवडली . शाहिद कपूर आणि
फर्जी आवडली . शाहिद कपूर आणि भुवन अरोरा ची एक्टिंग क्लास. विजय सेतुपथी पण मस्त .
spoiler alert
अमोल पालेकर ची क्रांती पत्रिका अजिबातच पटली नाही. ती पत्रिका छापून तो कसली आणि कशी काय क्रांती घडवणार असतो.
८०ज मध्ये ठीक आहे पण सध्याच्या काळात हे अजिबात पटलं नाही. आणि तो सगळ्यांना लोन काढून पगार वैगरे देत असतो.
अंजली_१२ , तुम्ही पूर्णच स्टोरी लिहिलीत. ज्यांनी अजून बघतली नाही त्यांनी जर हे वाचले तर काहीच मजा रहाणार नाही.
अज्ञातवासी, मी इथे
अज्ञातवासी, मी इथे लिहील्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व ! मी एकच एपिसोड पाहिला आणि पुढे पाहणार नाही हे पण लिहीले आहे. पहिल्या एपिसोडवरून मालिका जज्ज करणे शक्य नाही म्हणून थीम गंमतीशीर आहे असे म्हटले होते. तरीही त्यावरून तुम्ही पूर्ण मालिका पाहिल्याने तुम्हाला जो मनस्ताप झाला आहे त्याबद्दल क्षमा असावी. इथून पुढे अर्धवट पाहून काही लिहू नये हे समजलं.
Submitted by रानभुली on 1 February, 2023 - 09:08
>>>>>>
अरे क्षमस्व वगेरे काहीही गरज नाही. तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं, मी एकच भाग बघणार आहे. It was totally my mistake that I was waiting for something good to be happened. पण तसं काहीही घडलं नाही, उलट सगळं बिघडत गेलं...
माझ्या शब्दांमुळे काही गैरसमज झाला असल्यास क्षमा असावी.
फर्जी बघितली, आवडली, पण
फर्जी बघितली, आवडली, पण समथिंग इज मिसिंग हे वाटतच राहिलं.
स्पॉयलर अलर्ट: फरझी पाहायची
स्पॉयलर अलर्ट: फरझी पाहायची बाकी असल्यास वाचू नका.
क्रांतीचा काहीतरी संबंध निघेल असं वाटत होतं आधीपासून. म्हणजे एका पॉइंटला वाटलं कि क्रांतीमधून नानू fake currency वर लिहितील, किंवा काहीतरी अजून... पण क्रांती पत्रिका, त्या श्रीकांत तिवारीच्या बायकोच्या मित्राएवढी पॉईंटलेस झाली. कडाचित लहान कथाबीज मोठे करण्यासाठी केलेला फुकट drama असू शकतो, पण ते म्हणतात ना, पहिल्या अंकात भिंतीवर रायफल लटकली असेल तर तिसऱ्या अंकापर्यंत बार वाजलाच पाहिजे ते काही इथे होत नाही.
शिवाय एक महामुर्खपणा, मॉलमधला पाठलाग... पहिली गोष्ट म्हणजे त्या पोरीला बघून जर आरोपी पळतोय तर तो तिला ओळखणारा असणार हि शक्यता कोणाच्याही डोक्यात का येत नाही? आणि मॉलच्या एंट्री एक्झिट सील करणे किती सोपे होते.. पळू द्यायचं म्हणून पळू दिलं असं वाटत राहतं ते बघताना. या एक दोन गोष्टी सोडता मस्त होती फरझी.
फर्जी - पुरवून पुरवून पहायचा
फर्जी - पुरवून पुरवून पहायचा निश्चय केला होता. पण सगळी संपली.
बरेचसे फिलर्स आले कि अरे मुद्द्यावर या असे होत होते, पण पळवले पण जात नव्हते. चवीचवीने , सिप घेत घेतच जावंसं वाटत होतं. एकदम पाणी न टाकता घटाघट नको प्यायला !
रसभंग रीत सक्रीय : वर अजिंक्यराव म्हणतात तशा अनेक त्रुटी राहतातच. पण चल जाओ ऐश करो, माफ किया मूडमधे माफ केलं.
( मोबाईल ट्रॅकिंग खूपच कॉमन केलंय त्या क्राईम शोजने. शिवाय एकाचा फोन नंबर माहिती असेल तर त्याला आलेले फोन कॉल्स मिळवणे ही अवघड गोष्ट नाही). विजय सेतुपथी बल्की आहे, धावत पाठलागाचे सीन्स हास्यास्पद झाले आहेत.
Pages