वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेतुपथी आवडायला लागला आहे. अजून त्याचे बघण्यालायक पिक्चर्स सांगा . >> >>>>>>
त्याचा एकही सिनेमा मी चुकवत नाही !
आई बाप इंडस्ट्रीत नसताना ,स्वतःच्या कष्टाने वर आलेला अभिनेता .
सहज सुंदर अभिनय !
९६ मध्ये दहावी च्या वर्गातील मुलीला प्रेम व्यक्त करू शकलेला नसल्याने री युनियन मध्ये ती समोर आली असताना सेतुपती ने बोलक्या डोळ्याद्वारे केलेला अभिनय वाखाणण्याजोगा आहे .
ती त्याची न राहता आपली देखील कथा बनून जाते Happy

त्याचे You tube वर हिंदी डब भरपूर सिनेमे आहेत ....

त्याचा डीएसपी बघा.
जुन्या रजनीकांतची आठवण होत असेल तमिळ पब्लिकला.

कन्सल्टन्ट च्या शेवटाबद्दल चर्चा आवश्यक आहे Happy बरेच प्रश्न पडले! पण एकूण खूपच इन्टरेस्टिंग आणि एन्गेजिंग होती.

विजय सेतुपथीचा कॅमेरा सेन्स मला आवडला. तो एकसुरी अ‍ॅक्टिंग करतोय असं वाटे-वाटेपर्यंत त्याचं काहीतरी भारी मोमेन्ट, एक्सप्रेशन दिसत होतं. >> टोटली! डेडपॅन वगैरे म्हणतात ते हेच असावे. अगदी निर्विकारपणे धमाल काहीतरी बोलून जातो. त्याचा वकील त्याला म्हणतो की तुला मला सगळे खरे खरे सांगावे लागेल, तर हा म्हणतो "नक्कीच. एक दोन पेगनंतर" Happy

कन्सल्टन्ट च्या शेवटाबद्दल चर्चा आवश्यक आहे >>>> मै थांब माझ्यासाठी करू चर्चा Wink

९६ कुठे बघावा? ओरिजिनल का डब्ड?

कन्सल्टन्ट च्या शेवटाबद्दल चर्चा आवश्यक आहे Happy >> हमभी कतार मे है. वाटच बघत होते मी, कोणी बघून संपवतयं का याची .

नेफी व वाॅकिंग डेड चे नवीन ऐपिसोड आलेत .... >>> चांगला आहे हा (११ वा) सीझन सुद्धा.

कोणी ती स्पिन ऑफ बघितली आहे का?

मला विजयसेतुपथीचे आणि मिनिस्टरचे सगळे सिन्स खुप आवडले. तो मन्सुन सनीलाच सगळे का करायला सांगतो ते कळत नाही. सनीनेच प्रिंट , ट्रान्सपोर्ट , सेल्स बघायचे मग याने काय करायचे?

विजय सेतुपथी आवडायला लागला आहे. >>+१
शाहिद कपूर आणि अमोल पा. चे हल्के फुल्के सिन्स खरच गोड झालेयत Happy

नॅचरल अ‍ॅक्टिंगच्या हव्यासापायी ओव्हर अ‍ॅक्टिंग वाटली.>>. मला मेघा ची ओव्हर अ‍ॅक्टींग नाही वाटली..आवडली मला ती

तो मन्सुर सनीलाच सगळे का करायला सांगतो ते कळत नाही. सनीनेच प्रिंट , ट्रान्सपोर्ट , सेल्स बघायचे मग याने काय करायचे?
>>> अगदी!

*** स्पॉयलर ***

तसंच शेवटी त्या मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये सापळा लावतात तिथे मेघाला पुढे धाडतात ते पण पटलं नाही.
केवळ तिला बघून सनीने पळ काढावा याची सोय म्हणून Uhoh

फर्जी मधला सेतुपती खूप काही आवडला नाही - कदाचीत ९६ आधी बघितल्यामुळे असेल (त्यात तो प्रचंड आवडला होता). फर्जीत बर्‍याच वेळा त्याचे डायलॉग्ज सबटायटल्सवरून समजून घ्यावे लागतात इतका तोंडातल्या तोंडात बोलतो तो. पण प्रत्येक प्रसंगानुसार बदलत जाणारे डोळ्यातले भाव इथेही अप्रतिमच आहेत - शाहिदच्या एकसुरी डोळ्यांपुढे तर ते अधिकच उठून दिसतात.

तिथे मेघाला पुढे धाडतात >>> लले, धाडत नाहीत. बॉस नाहीच म्हणत असतो पण तिलाच शांत बसवत नाही.

*** स्पॉयलर ***

तसंच शेवटी त्या मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये सापळा लावतात तिथे
खरतर तिथे शाहिद उगाच पळाला. आश्चर्य आनंद वाटल्याची acting करत , कॅज्युअली तिच्याशी बोलून निघून जाऊ शकला असता.

हो खरंच
पण बाकीच्यांना नक्की संशय आला असता कोणी टीम मधलं अजून त्यावेळी मेधा ला बोलवायला, भेटायला आलं असतां तर

Spoiler
=========
{बाकीच्यांना नक्की संशय आला असता कोणी टीम मधलं अजून त्यावेळी मेधा ला बोलवायला} --- शक्यतो कोणी आलं नसतं जर तिने ओळख दाखवली तर करण त्यांना सापळा लावलाय हे दाखवायचं नव्हतं
आणि आलं असतं किंवा त्याची चौकशी केली असती, कार चेक केली असती तरी फरक पडला नसता कारण त्या कार मध्ये काहीच नव्हतं.

नंतर केव्हातरी त्याने दिलेलं चित्र पाहताना मेघाला संशय यायला पाहिजे होता.

आले नियतीच्या मना, तिथे कुणाचेही चालेना.
इथे नियतीच्या जागी लेखक / दिग्दर्शक कल्पून जे झाले ते झाले असे समजायचे.

तो मन्सुन सनीलाच सगळे का करायला सांगतो ते कळत नाही.
>>
कारण तो बिलालची जागा घेतो ना नंतर.
त्याआधी आपले काम निपटून आला असतो परत.
पण चांगलेच आहे. तेवढा जास्त वेळ शाहीद बघायला मिळाला..

कारण तो बिलालची जागा घेतो ना नंतर.>>>++१ म्हणूनच.

मेघा चं कॅरेक्टर मलाही नाही आवडलं. फारच उतावीळ. गन तर अशी मागते जसं लहान मुल खेळणं.
सेतुपती त्या बिलालला खाताना ठसका लागल्यावर डोक्यावर हात मारतो ते जाम आवडलं. एकदम घरगुती उपाय ठसका थांबवण्याचा. लोल.

फर्जी संपवली.

शाहीदसाठीच बघायला घेतलेली त्याने निराश नाही केले. टॉप टू बॉटम, बदाम बदाम बदाम

तो फिरोजही आवडला. ॲक्शन हिरोसोबत मित्र म्हणून जसे कॅरेक्टर असते तसा टिपिकल होता. टाईमपास होता.

सेतूपती हा नवीन आयटम समजला. छान होता. हिंदीत कुठे हा अजून असेल तर शोधायला हवा.

हिरोईनी साधीशीच होती. पण/म्हणून आवडली. मी स्वत:ला शाहीदच्या जागी ठेवता तिच्या नक्कीच प्रेमात पडलो असतो असे वाटले. त्यामुळे त्यांचा लव्हॲंगल रिलेट झाला. त्यांचा तो हॉटेलमधील सीन आवडला जिथे त्याची जुनी गर्लफ्रेंड काड्या करायला येते. अशी सिच्युएशन माझ्या आयुष्यात आली तर असेच हॅंडल करेन.

अमोल पालेकर तर मला नेहमीच अमिताभ बच्चनपेक्षा जास्त आवडत आलाय. कारण तो रिअल लाईफ बच्चन आहे. यातही त्याच्या याच ईमेजला साजेशी भुमिका असल्याने आवडला.

के के मेनन आवडत नाहीत अशी लोकं नसावीत जगात. त्याने तोच तोच अभिनय केला तरी तो नेहमीच भाव खाऊन जातो.

मी वेब सिरीज फारश्या बघत नाही. बोअर होते एकच एक जास्त बघायला. पण ही आवडली. एंगेजिंग होती. वेळ काढून संपवली.

आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. तो ही नक्की बघेन. त्याचा लव्हॲंगल त्याला कुठे नेतो याची उत्सुकता आहे. देव करो आणि शेवट गोड होवो. हिरोला हिरोईन मिळते हा शेवट मला नेहमीच आवडतो.

>> स्पॉयलर देऊन चर्चा करा, माझी बघून झाली नाही अजून. >>>>
नाही नाही , कोपर्यातल्या खुर्च्या पकडून बसू.
त्या रिगसच्या dialogues वर एक चर्चा पाहिजे. Biggrin
"Did you eat lunch yet ??"

तिथे मेघाला पुढे धाडतात >>> लले, धाडत नाहीत. बॉस नाहीच म्हणत असतो पण तिलाच शांत बसवत नाही. >>> दुसरे म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने हे लोक अजून काहीच हालचाल का करत नाहीत. ते दबा धरून बसले आहेत का वगैरे चेक करायचे असते. नेहमीच्या फील्ड टीम मधले कोणी शोधायला गेले तर संशय येइल, तुलनेने हिचा कोणाला संशय येणार नाही असे लॉजिक असते.

मला आवडले तिचे काम सिरीज मधले. आधी मला वाटले होते त्याची ती पहिली गर्लफ्रेण्डच राशी खन्ना आहे. तेव्हा मी मुझे सब प्लॅस्टिक हीरॉइन्सकी सूरते एक जैसी दिखती है मोड मधे होतो.

बॉस नाहीच म्हणत असतो पण तिलाच शांत बसवत नाही. >>>

हो, पण ती मागे लागते म्हणून शेवटी बॉसच 'अच्छा, ठीक है, जाओ' म्हणतो ना (?)
तुला फील्ड वर्कमधलं काही कळत नाही, गपचुप इथे थांब, असं तो तिला का ठणकावत नाही?

कन्सल्टन्ट ७व्या भागानंतर जरा रेटावी लागतीये. त्यामुळे कळलं नाही आठव्या भागात एकदम ह. कुठुन आला. पुन्हा पहावा लागेल सातवा भाग. आशा आहे शेवट आवडेल.

Pages