वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Attack on Titan फेज मध्ये तरी असे वाटत आहे की आजवर पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. फेज बाहेर आल्यावर कदाचित मत बदलेल.

हाऊस - एमडी
एखादा सीझन बरी वाटते. नंतर तोचतोचपणा वाटतो.
शिवाय ते अगम्य रोग आणि त्यांचं अगम्य वर्णन, उपचारपद्धती. फक्त हाऊसलाच दरवेळी निदान करता येतं, वगैरे.

नेटफ्लिक्स वर "खाकी" बघायला सुरुवात केली आहे. "बिहार डायरीज" या अमित लोढा या आयपीएस च्या पुस्तकावर आधारित सीरीज, नीरज पांडे ची आहे. ७ पैकी ३ भाग बघून झालेत, इन्ट्रिगिंग वाटते आहे. कलाकार सगळेच चांगले आहेत.

खाकी चांगली बनवली आहे. शिव्या नाहीत, घुसवलेले प्रौढ सीन नाहीत, असह्य हिंसा नाही त्यामुळे मधेमधे ठेचा न लागता पाहिली जाते. आवडली.

"खाकी" आम्ही पण संपवली बघून. आवडली.
एक तर कन्टेन्ट चांगला आणि ओरिजिनल, आणि डायरेक्शन , अ‍ॅक्टर्स पण छान होते सगळेच. छोटे फ्लॉज आहेत काही, किंवा क्लीशे म्हणू हवं तर. जसे ते महत्त्वाच्या ठिकाणी धमक्या ,डायलॉगबाजी करण्याआधी पायात गोळी मारा रे, किंवा पळत पाठलागाचे सीन्स मधे एकटा हिरो सोडून बाकीचे दमणे, पळणारा आणि पाठलाग करणारा यांच्या मधे ट्रेन येणे, इ. पण असले क्लीशे भल्या भल्यांना अवॉइड करता येत नाहीत. तसंच ते धिंड काढणे खरंच झाले असेल का, कोण रिस्क घेईल ती असे मनात आले.
पण ठीके, तेवढे सोडून देता आले.

पळणारा आणि पाठलाग करणारा यांच्या मधे ट्रेन येणे >>> Lol

एखाद्या स्टेशनात हा प्रयोग करून बघायला सांगायला हवे. बराच वेळ लोक गाडीची वाट बघत असतील तर एखादा असा सीन निर्माण करून ती येते का चेक करायला Happy

प्लॅनेट मराठी वर अथांग नावाची सिरीज बघतेय. दर शुक्रवारी एकच भाग रिलिज होतो. कथा इंग्रजांच्या काळातली आहे. त्यामुळे वाडा, अंधश्रद्धा, वाड्याचे इंग्रजांना मिळालेले अत्याचारी मालक नानासाहेब, त्यांचा छळ सहन करणार्‍या बायका, गुढता असं सगळं काही आहे. त्या वाड्यात एक मास्तर आणि त्यांची बायको भाड्याने राहायला येतात. त्यांच्यात आणि नानासाहेबांचे सुपुत्र - रावसाहेब आणि त्यांची मावशी आऊ यांच्यात घड्णारे कथानक आहे. अजून ३-४ भाग झालेत. बाळबोध असले तरी आवडलेत.

त्या वाड्यात एक मास्तर आणि त्यांची बायको भाड्याने राहायला येतात. त्यांच्यात आणि नानासाहेबांचे सुपुत्र - रावसाहेब आणि त्यांची मावशी आऊ यांच्यात घड्णारे कथानक आहे

>>> बॅरिस्टर नाटकाची स्टोरी वाटतेय.

बॅरिस्टर नाटकाची स्टोरी वाटतेय.>>>>> साधारण थीम तशीच वाटली मलाही. पण थोडे वेगळे ट्विस्ट आहेत.

ती , एदा आणि सेरकन वाली टर्किश सिरिज कोणी बघितली आहे का?
रील्स मध्ये बरेच्वेळा शॉर्ट्स येतात म्हणून काल शोधून बघायला सुरुवात केली .
love is in the air - mx player वर हिन्दी डब्ड आहे .
टिपिकल boy meets girl , first they hate then they fall in love वाली गोष्ट आहे.
लीड पेअर मस्त आहे . एदाच काम करणारी मुलगी खूपच सुन्दर वाटली.

बॉश - सीझन ६ बघून झाला. (प्राइम)

प्रत्येक नवा सीझन आधीच्यापेक्षा भारी वाटतो.
आता एकच सीझन शिल्लक राहिला. तो झाल्यावर काय हा प्रश्न पडेल.

बॉश सगळेच सीझन्स छान आहेत. आणि सीझन संपल्यावर एम्प्टीनेस येतो हे सुद्धा खरे आहे.

'ट्रू डिटेक्टिव' बघितली नसल्यास ती बघू शकता. थोडी डार्क आहे पण बॉश पेक्षा पण खूपच रिअ‍ॅलिस्टिक, मिस्टेरिअस आणि प्रॅक्टिकल.
हॉलिवुड सिनेमांमधले आघाडीचे एकसे एक कलाकार आहेत प्रत्येक सीझनमध्ये.
माईंडहंटरही अशीच जबरदस्त आहे पण का कोणास ठाऊक दोन सीझन्सनंतर बंद झाली.

आधी प्रॉमिसिंग वाटलेली डिस्कवरी ऑफ विचेस' अगदीच टाकाऊ निघाली. ओवरऑल मनोरंजनाच्या बाबतीत ट्वायलाईट सिनेमे अ‍ॅवरेज मानले तर डिऑवि अगदीच वे बीलो अ‍ॅवरेज म्हणावी लागेल. ट्वायलाईट सिनेमाची जनरल स्टोरीलाईनच टाईम ट्रॅवल वगैरे थोडा मसाला टाकून वापरली आहे.

द बेअर (THE BEAR) (अमेरिकेत हुलू वर आहे / भारतात माहित नाही) -

कार्मी हा मॅनहॅटन मधल्या एका फॅन्सी रेस्टॉरंट चा अवॉर्ड विंनिंग शेफ आहे.

त्याला शिकागोला आपल्या फॅमिलीचं बुडणारं सँडविच शॉप चालवायला परत यावं लागतं.

कार्मी स्टोर वाचवायला यशस्वी होतो का ? तो तिथलं वातावरण बदलू शकतो का कि त्याला स्वतःलाच बदलावं लागतं ?

एकूणच, सिरीज फार आवडली. एकदम रिऍलिस्टिक टेक आहे आणि सगळ्या कलाकारांची कामंही छान झाली आहेत.

'ट्रू डिटेक्टिव' बघितली नसल्यास ती बघू शकता. >>> मागेही कुणीतरी याची शिफारस केली होती. हॉटस्टारवर आहे, पण मी त्याची वर्गणी भरलेली नाही. Sad

बॉश-लेगसी : मूळ सिरीजइतकीच चांगली आहे का?

खाकी संपवली. चांगली आहे, आवडली मला.
आता नालंदा, शेखपुरा, नवादा जिल्ह्यांत जावं वाटू लागलं आहे. मस्त चित्रण आहे एकंदरीत.
कालच अमित लोधा विरुद्ध नितिशकुमार सरकारने केलेली कारवाईची बातमी वाचली. हे एक चांगलं आर्टिकल वाटलं. https://www.indiatoday.in/india/story/politics-behind-amit-lodha-controv...
आपल्याकडे हे असंच चालत आलेलं आहे Happy

ब्लॅक बर्ड (ऍपल TV / भारतात कुठे ते माहित नाही)

सत्यघटनेवर आधारलेली 6 भागाची मिनी सिरीज आहे.

जिमी किन (अभि: टॅरोन इगर्टन - किंग्समेन / एल्टन जॉन) हा शिकागो मधला एक गोडबोल्या कॉनमॅन आणि ड्रग डीलर ज्याला दहा वर्ष सक्त मजुरीची सजा झालेलेही आहे.

तो जेल मध्ये असतांना एक FBI एजन्ट त्याला एक डील ऑफर करते कि ज्याने त्याची सजा माफ होईल.

किन चं काम म्हणजे त्याने एका क्रिमीनली इन्सेन फॅसिलिटी मध्ये ऍडमिट व्हायचे आणि लॅरी हॉल नावाच्या एका पेशंट शी दोस्ती करून त्याचा कबुलीजबाब घ्यायचा.

लॅरी हॉल हा एक असा पेशंट होता ज्यावर चाळीसेक मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा संशय होता.

एकूणच सिरीज रोमांचकारक आहे. रेकमेन्डेड वॉच.

एमिली इन पॅरीसचा पुढचा सिझन पाहिला नाही का कोणी ?

नेहमीप्रमाणेच खूप ट्विस्ट, ड्रामा आणि शेवटच्या भागात पुढच्या सिझनची बेगमी .. सगळं आहे! पण मला आवडला हा पण सिझन.
ह्या सिझनमध्ये सिल्वी जरा मवाळ झाल्यासारखी वाटली. पॅरीस नेहमीप्रमाणे मस्त दिसतं.

जुन्या 'अग्निहोत्र'चे सगळे भाग स्टार प्रवाह वर येत आहेत. सध्या आम्ही बघतो आहोत. काय तगडी स्टार कास्ट आहे! एक दोन अपवाद वगळता सगळेच कलाकार मस्त काम करतात. आम्ही ६० वगैरे भाग पाहिले. अजून तरी फार ड्रॅग नाही झालय.

पाहिला. पराग +१.
कायच्या काय ट्विस्ट्स आणि ड्रामा आहेतच. आणि तेच असणार हे माहितच होतं. पण एकुण सीझन त्याच एक्सपेक्टेशनने बघितल्याने आवडला. यात फ्रेंच लोक एकमेकांशी फार जास्त फ्रेंच मध्ये बोलत होती मात्र. Proud
सिल्वी मवाळ +१ मिंडी पण आवडते. पण तिचे पण संवाद लेम झालेत खूप. एल्फीला सगळा वेळ ठेवुन शेवटच्या दहा मिनिटांत लाथच मारली एकदम, तेच होणार माहित असलं तरी फारच अचानक दाखवलं. एल्फी गेल्या सिझन इतका नाही आवडला.

सध्या नवरा hotstar वर विलो बघतोय . मी ही बघतेय मध्ये मध्ये. तो लांब नाक दाढीवाला पटेल आहे कोणीतरी .

यात फ्रेंच लोक एकमेकांशी फार जास्त फ्रेंच मध्ये बोलत होती मात्र >>> हो ते मलाही वाटलं.

एल्फी गेल्या सिझन इतका नाही आवडला. >>> एल्फी एकूण बोर आहे तसा. पण तो तसा असणं गरजेचं असावं. त्याच्यात आणि एमिलीमध्ये अजिबात केमिस्ट्री का काय म्हणतात तशी नाहीये. मिंडी ठिक होती. निकोला डुड ही पुढच्या सिझनमध्ये कटणार.

एमिली इन पॅरीस बघावी काय?
नेटफ्लिक्सवर आहे ना?

बॉश संपवल्यावर पुढे काय हा प्रश्न आहेच.

वेबसिरिज मध्ये बघायला सध्या काहीच आवडत नाहिये . नेफि बंद केलयं
म्हणून मेंटालिस्ट परत चालु केलीय . कंटाळवाणे एपिज पळवतेय .
यावेळी पॅट्रिक पेक्षा चो आणि लिस्बन जास्त आवडतायेत .

Pages