वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लास्ट ऑफ अस बघायचे आहे. गेमचे कौतुक पण ऐकलय आणि खूप टीका पण ऐकलिये. म्हणजे गोष्ट म्हणून गेम सर्वोत्तम आहे. पण गेमप्ले अगदी मिळमिळीत आहे, आणि लास्ट ऑफ अस नंतर उत्तम गोष्ट - मिळमिळीत प्ले अश्या गेम्सची लाटच आली म्हणे.

गेमचे कौतुक पण ऐकलय आणि खूप टीका पण ऐकलिये. म्हणजे गोष्ट म्हणून गेम सर्वोत्तम आहे. पण गेमप्ले अगदी मिळमिळीत आहे, आणि लास्ट ऑफ अस नंतर उत्तम गोष्ट - मिळमिळीत प्ले अश्या गेम्सची लाटच आली म्हणे. >>>>

मी असमहत आहे. कॉल ऑफ ड्युटी सारखी नॉनस्टॉप ऍक्शन गेम ची अपेक्षा ठेऊन गेलात तर अजिबातच नाही आवडणार.

स्टोरी बेस्ड ऍक्शन रोल प्लेयिंग गेम म्हणून झक्कास आहे.

धन्यवाद. माझे आपले ऐकीव माहितीवर आहे. मी स्वतः खेळलो नाहीये. मला सुध्दा स्टोरी बेस्ड गेम आवडतात.

>>स्टोरी बेस्ड ऍक्शन रोल प्लेयिंग गेम म्हणून झक्कास आहे.<< +१
फर्स्ट पर्सन शुटर (कॉल ऑफ ड्युटि) आणि रोल प्लेइंग गेम्स्ची जातकुळी वेगळी आहे. रोल प्लेइंग गेम्सची मजा म्हणजे यु बिल्ड योर ओन प्लॉट.

लास्ट ऑफ अस, तुफान गेम आहे, त्याचं सिनेमाटायझेशन बर्‍यापैकि जमलं आहे (बेस्ड ऑन द फर्स्ट एपिसोड). एक अनचार्टॅड नांवाचा गेम आहे, अफलातुन ग्राफिक्स, स्टोरीटेलिंग, पण त्याचं सिनेमाटायझेशन मात्र मिडियॉकर. म्हणजे टॉम हॉलंड, मार्क व्हालबर्ग ने पाट्या टाकल्यात असं नाहि, पण गेमची मजा सिनेमात येत नाहि. लेट्स होप, लास्ट ऑफ अस त्याच्या पावलावर पाउल टाकुन पुढे जाणार नाहि...

Trial By Fire Netflix वर आहे ही मालिका. अभिनय आणि पटकथा उत्तम. एक सिनेमागृह आगीत भस्मसात होऊन जातं आणि त्यात कित्येक जणांचा बळी जातो. यात एका कुटुंबाच्या मुलांचा बळी जातो. त्या पालकांचा व इतरांचा बिल्डर विरुद्ध दिलेला लढा दाखवला आहे. ही सत्यघटना आहे. या लढ्या मुळे सिनेमागृहे, इमारती , शाळा यावर फायर सेफ्टी चे नियम आणले गेले. नक्की पाहू शकता. सामान्य माणसांची न्यायव्यवस्था समोरील अगतिकता फार प्रकर्षानं जाणवते.

मी पहिला एपिसोड बघितला. कथा, अभिनय सगळा चांगलाच आहे, पण त्रास होतो बघताना त्यामुळे बंद केली सध्यातरी बघणे.

Trial By Fire पाहिली. फारच वाईट वाटत राहिलं पहाताना. शेवट माहिती नव्हता Sad

स्क्वीड गेम चा दुसरा सीझन येतोय असं कुठेतरी वाचलं.

एमिली बघून संपवली. फार अपेक्षा नसल्यामुळे मला तरी टिपी म्हणून बघायला मजा आली .
घरातल्या टीन ला आवडेल असे वाटले म्हणून तिला रेकमेन्ड केली तर १-२ भाग बघितले फार तर. मला म्हणे अ‍ॅक्टिंग इज सो बॅड , डायलॉग्ज आर सो बेसिक. हाउ कॅन यू लाइक इट?! असो Happy

Trial By Fire पाहिली. खुपच हेल्पलेस वाटत राहिलं. अभय देओल आवडतोच पण ती आई झालेली जी आहे तिने अप्रतिम अभिनय केला आहे.
दोन्ही मुलं एकत्र गमावण्याचं दु:ख काय असु शकतं हे इमॅजिन पण करता येत नाहिये.खूप अस्वस्थ करणारी आहे पुर्ण सिरीज.

स्पॉईलर******************
दरवाजे बाहेरुन बंद होते हे कळतं तेव्हा आई आणि बाबा दोघांचे चेहेरे बघुन जे वाटलं ते शब्दात सांगता नाही येणार. दु:ख, संताप, आगतिकता सगळं मिश्रण एकत्र आलंय. मधले काही एपिसोड खुप स्लो झालेत. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करणार्‍या माणसाची इतकी मोठी स्टोरी का दाखवली कळलंच नाही. अनुपम खेर ची स्टोरी पण बळंच वाटली. नसती तरी चाललं असतं. बरेच धागे अर्धे सोडलेत कदाचित जाणुन बुजुन. कारण केस अजुन अर्धवट च असावी. व्हिक्टीम्स ना पैसे देत फिरणारा ड्रायफ्रूट वाला माणुस अचानक येउन सांगतो की मुलगा गेला वगैरे. शालिनी कोर्टात खोटं स्टेटमेंट देउन कुठे गायब होते. त्या सगळ्यांचं पुढे काय होतं कळलं नाही. एकंदर दिग्दर्शन असं आहे की तुम्ही समजुन घ्या स्पून फीडींग करणार नाही. आपल्या बाकी दिगदर्शकांनी इतके वर्ष सगळे धागे शेवटी जोडुन दाखवायची सवय लावलीये त्यामुळे कदाचित चुकल्यासारखं होत असेल Wink
सगळ्याच प्रश्णांना उत्तरं नसतात एवढंच कळलं. या घटनेत बळी गेलेल्या लोकांच्या कुटूंबाला ही वेब सिरीज बघताना काय वाटत असेल ?

नाईट कोर्ट (नवीन) - अमेरिकेत पीकॉक. बहुधा एनबीसीवर नवीन एपिसोड्स दर बुधवारी आहेत.

या नावाच्या जुन्या सिरीज बद्दल ऐकले होते. ही आता नव्याने बनवली आहे. कथा तेव्हाच्या सिरीजचा संदर्भ घेउन येते. फक्त पायलट पाहिला आहे (दोनच एपिसोड उपलब्ध आहेत) आणि तो धमाल आहे. नक्की पाहा.

बिग बँग थिअरी मधली बर्नाडेट - मेलिसा रॉच- यात जज आहे. एक चक्क मराठी नाव आहे कलाकारांत - कपिल तळवलकर. विकीवरील माहितीनुसार पुण्यात जन्मलेला, व कुपर्टिनो मधे वाढलेला आहे.

पण मला जास्त इंटरेस्ट होता तो जॉन लॅरोकेट (असाच उच्चार असेल) मधे. याला पहिल्यांदा "बॉस्टन लीगल" मधे पाहिला होता. तेथे त्याचा बर्‍यापैकी गंभीर व नॉर्मल रोल होता. पण वेस्ट विंग मधे त्याचा अफलातून कॅमिओ पाहिला (तो एपिसोड पाहा किंवा "लायनेल ट्रिबी" म्हणून शोधा. दोनच सीन आहेत बहुधा पण भारी आहेत) आणि एक विनोदी कलाकार म्हणून त्याची वेगळीच ओळख झाली. नंतर कळाले की नाइट कोर्ट नावाच्या एका जुन्या सिरीज मधे तो "डॅन फील्डिंग" म्हणून खूप गाजला होता व त्याला सलग चार "एमीज" मिळाले होते. तोच यात पब्लिक डिफेण्डर म्हणून आहे. पायलट मधे त्याचा रोल जबरी आहे. त्याची यातली इण्ट्रो तर धमाल आहे.

पुढे किती सातत्य टिकते बघू. पण सुरूवात तर भन्नाट आहे.

नेफी वर फौदा सीझन -४ हिंदीत आला आहे .
काल एका दमात संपवला , डोरोन ला पुन्हा स्पेशल फोर्स मध्ये सामावून घेतले जाते .
पण पॅलेस्टाईन अतेरिकी संघटना ने या स्पेशल फोर्स मधील एका एका सदस्याला संपवायला सुरुवात केलेली असते , कॅप्टन गाबी चे देखील अतेरीकी kidnapping करतात .
नेहमप्रमाणेच वेगवान आणि उत्कंठावर्धक !

मरते दम तक कुणी पाहतंय का?
पहिल्या भागात सुरूवातीला खूपच वेगळा विषय निवडला आहे असे वाटले. पण नंतर काहीच्या काही वाटली. पुढचे भाग नाही बघणार.
खरेच काही वेगळे असेल तर बघितलेल्यांनी अपडेट करावे ही विनंती.

मरते दम तक कुणी पाहतंय का? >> पहिला भाग पाहिल्यावर अंदाज आला काय असेल. १९८०-१९९० च्या दशकात खूप पीक आले होते अशा सिनेमांचे, पोस्टर तर भयानक असायची पण नावाजलेला एक ही कलाकार नाही. साधारण हे चित्रपट कसे तयार होत होते आणि त्यांचे अर्थकारण कसे असेल त्यावर प्रकाश टाकला आहे. थोडक्यात नाही बघितली तरी काही फरक पडणार नाही.

सिनेमा मरते दम तक मी पूर्ण बघितली. अमेझॉन वर आहे.
ही एक वेबासिरीज कम डॉक्युमेंट्री आहे. चार सी ग्रेड चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांना प्रत्येकी एक चित्रपट दिग्दर्शित करायला लावला जातो, आणि त्यांच्या दिग्दर्शनाची प्रोसेस यामध्ये उलगडली जाते.
याचा जो इम्पॅक्ट आहे, तो खूप जबरदस्त आहे. एक वेगळच विश्व उलगडत जातं. मी तरी कुठेही बोर झालो नाही, किंवा फॉरवर्ड केलं नाही.
अजून जास्त काही लिहीत नाही, पण एक वेगळा अनुभव नक्की देईन.

हा धागा वर आला म्हणून पाहिले. स्वस्ति यांच्याप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रातलं काहीही आवडत नाहीये. या अवस्थेला काही संज्ञा असेल तर माहिती नाही. सुरूवातीला वेबसिरीज खूप आवडीने पाहिल्या. अर्थात फॅमिली मॅन आणि अशा काही वेसि आल्या तर बघेन.

रघू Happy .

मी सध्या Sherlock बघतेय. बेनडिक्ट चा.
जाम enjoy करतेय. Sherlock , Dr Watson , Molly , Moriarty , inspector सगळेच आवडतायेत.

Benedict आणि मार्टिन freeman cha शेरलॉक होम्स, डॉ वॉटसन अत्यंत आवडता. या शेरलॉक आणि Molly वर खूप fan fiction hi आहेत. (Watson आणि शेरलॉक होम्स वर ही Happy

Fauda नवीन season बघताय का कोणी? माझा आज रात्री शेवटाचा भाग होईल बघून. या season मध्ये जरा जास्त emotions होते असे वाटते, बाकी नेहेमी प्रमाणे कडक Happy

मी फौदा चा सिझन रिलीज झाला त्याच दिवशी अख्खा संपवला होता!
स्पीड १.२५ आणि अनावश्यक चर्चा सत्र सरळ बायपास करून .
स्पेशल फोर्स च्या टीम च्या एका पाठोपाठ एक सदस्याला टेररिस्ट नी टार्गेट करताना दाखवल्यामुळे इमोशन्स वाढल्यात.

नरेन , अज्ञातवासी धन्यवाद. पहिल्या भागानंतर बघणे झाले नाही.
अशीच आणखी एक वेबसिरीज आली आहे प्राईमवर.
शैतान हवेली नावाची.
८० च्या दशकातल्या हॉरर मूवीज ना समर्पित अशी टॅगलाईन आहे. त्या पद्धतीचंच चित्रीकरण, तसेच लोकेशन्स इ सगळं काही आहे. सुरूवातीलाच शैतानी हवेली, चुडैल इति मसाला दाखवून झाला आहे.
आता ८० च्या दशकातला एक (खरा नाही) हरमन नावाचा कुणी हॉरर डायरेक्टर ९० च्या दशकानंतर डीडीएलजे प्रमाणे बनवलेले फॅमिली सिनेमे आपटल्याने एका डॉनचे पैसे परत करू शकत नसतो. त्याला त्या डॉनचे लोक उचलून नेतात, पाण्यात बुडवून मारणार इतक्यात तो डॉनच्या मुलाला घेऊन नवीन हॉरर फिल्म करणार असल्याची अनाऊन्समेंट करतो. डॉन तयार होतो.
लोकेशनसाठी ३० हजार रूपये पर डे, ७० हजार रूपये पर डे आणि दोन रूपये पर डे अशा तीन हवेल्या असतात. त्यातल्या २ रूपये वाली मधे शैतान आहे म्हणून स्वस्त आहे असे प्रॉडक्शन वाला सांगतो. पण हरमनला तीच आवडते.
ही थीम गंमतीशीर आहे. प्रेडिक्टेबल आहे तरीही एक एपिसोड पूर्ण पाहिला. पुढे तेच तेच दाखवणार म्हणून बंद केली. शॉर्ट फिल्म किंवा लहान सिनेमा छान झाला असता या थीमवर.

मी फौदा चा सिझन रिलीज झाला त्याच दिवशी अख्खा संपवला:
हाहा, मी पुरवून पुरवून बघितला.

Spoiler alert :
अरे तो doron महामूर्ख खरच. कधीतरी वरीष्ठ सहकाऱ्यांचे ऐक पण नाही! आता सीजन 5 येईल की नाही अशी चिंता लागून राहिली आहे.

मी आटा Bosch : Legacy सुरु केली आहे, US Prime वर नाहीये सो आता भारतात पाहत आहे Happy

Bosch चे ८ season लगेच संपवले होते

तलसा किंग - न्यु यॉर्क माफिया गँग त्यांचा जेनरल ओक्लाहोमाला पाठवतात, एक्स्पांशन्च्या नांवाखाली; खरी अंदरकि बात वेगळी. पुढे तो तलसा मधे आपलं बस्तान कसं बसवतो यावर स्टोरीलाइन आहे. स्लाय स्टलोन प्रमुख भूमिकेत, अजिबात निराशा करत नाहि. पहिला सिझन स्ट्रीम होतोय - पॅरामाउंटवर...

रानभुली यांनी वर सांगितल्याप्रमाणे शैतान हवेली सुरू केलं आणि पूर्ण बघितलं. काम करता करता बघत होतो, त्यामुळे बंद करण्याचा मूड झाला नाही.
काही गोष्टी सो बॅड, इट्स गुड कॅटेगरी मध्ये असतात. उदा गुंडा, पण हे जे प्रकरण आहे, हे इतकं इतकं वाईट आहे की एन्जॉय तर सोडा, ते अजून किती वाईट होत जाईल हे बघण्यासाठी मी ही सिरीज बघितली.
ही सिरीज ना धड 80ज हॉरर चं स्पुफ आहे, ना धड हॉमज आहे. कुठल्याही प्रकारे चित्रीकरण 80 च्या दशकातलं न वाटता चीप सिरीयल टाईप वाटतं. स्टोरी, अभिनय, डायलॉग आणि अक्षरशः वैताग, वात, चीड आणणारी स्टारकास्ट, या सगळ्याच मिश्रण आहे.
ही सिरीज हॉरर मुविजला समर्पित आहे असं सुरुवातीलाच दाखवलं, पण समर्पित सोडा, खिल्ली उडवताना आम्ही किती भारी, आणि मॉडर्न हे दाखवताना सगळं वाईटात वाईट झालय...
सो बॅड, इट्स बॅड ओन्ली.

बॉश बघायला सुरुवात केलीये..पण सी. १- एपि. १ बघत असतानाही मधूनच सुरू झाल्या सारखे का वाटतेय कळत नाही..काही स्ट्रॅटेजी आहे का?

Pages