वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी बिग बँग सगळे सिजन पाहिले.
मग साक्षत्कार झाला की young sheldon देखील बनवली आहे.
अर्थात बिग बँग कोंबडी आधी आली.
मग हे यंग sheldon अंडे.
पाहिलेत जुने सिजन आताचा सिजन फॉलो करतोय.
मजेशीर आहेच.
IQ आणि EQ , ट्विन्स मधील हे बघायला गमतीचे वाटले.
आता अमेरिकन / टेक्सास इथले रेफेरेन्स असलेले जोक्स तितके लक्षात येत नाहीत.
पण त्याने फार अडत नाही

Dahmer नेटफ्लिक्स वर पाहायला सुरवात केली पण फार स्लो वाटली. मग सोडून दिली. डॉक्युमेंट्री बरी होती त्यापेक्षा

IQ आणि EQ , ट्विन्स मधील हे बघायला गमतीचे वाटले.>> +1

सिझन 6 जरा रेंगाळला आहे पण.>>सहावा सीजन अजून नेटफ्लिक्सवर आला नाहीये. कुठे बघताय तुम्ही सगळे? माझा चौथा सीजन चाललाय.

झकासराव - शेल्डन हा स्वतः एथिस्ट असतो पण त्याची आई टेक्सास मधली कट्टर ख्रिश्चन व धार्मिक. हे बिग बँग थिअरी मधेही होते. यंग शेल्डन चे मी काही भाग पाहिले आहेत. तोच ट्रॅक वाढवला असेल. यात टेक्सासचा संदर्भ एकतर धार्मिकपणा करता येतो, पण तसाच आपल्याकडे आधीच्या पिढीबद्दल म्हणत तशा फॅमिली व्हॅल्यूज करताही येतो. मला हे नक्की शब्दांत पकडता येत नाहीये पण आपल्याकडे जसे आई वडील प्रसंगी मुलाच्या लाइफ मधे पडून ते लाइनीवर आणतात, त्यांचा धाक, आईने घरात पूर्ण लक्ष घालणे असे एकूणच जुन्या पिढीसारखे वागणे - हे अमेरिकन साउथ मधे अजूनही कॉमन आहे. साधारण त्या रोखाने ते दाखवलेले असते. याउलट या सिरीज मधले नायक नायिका हे अर्बन, कॅलिफोर्निया/न्यूयॉर्क मधे राहणारे व भारतात "अमेरिकन" म्हंटल्यावर जे इमॅजिन करतात तसे वागणारे असतात. त्यातला फरक इथे टेक्सासच्या संदर्भाने दाखवतात.

अजून कोणीतरी सोप्या शब्दांत हेच लिहीले तर बरे पडेल Happy

बाकी यंग शेल्डनच्या मी पाहिलेल्या भागात त्याच्या घरी एफबीआय वाले चौकशीला येतात की त्यांना असे कळाले आहे की तेथे कोणीतरी रॉकेट तयार करण्याचा उद्योग करत आहे. त्याचे पालक "अहो तो लहान मुलगा आहे" टाइप समजावयाचा प्रयत्न करत असताना तेथे जे काय होते तो भाग कहर धमाल आहे.

नेफ्लिवर Echoes नावाची लिमिटेड सिरीज पाहिली. ओके आहे. सस्पेन्स थ्रिलर म्हणता येईल. जुळ्या बहिणींपैकी एक गायब होते आणि तिच्या शोधकार्यात अनेक रहस्यं बाहेर येतात अशी साधारण थीम आहे.

ज्यांना हॉरर्स आवडतात त्यांनी नेफ्लिवरची Cabinet of Curiosities नक्की पहा. आठ भागांची मालिका आहे. आठ वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. पैकी २ Lovecraft च्या आहेत. १-२ कथा जरा gory वाटू शकतात. पण एकूण मालिका मस्त आहे. मला आवडली.

नक्की रमड! थँक्यू फॉर रेको.

झी ५ वर ट्रिपलिंग सिरिज बघितली. फार मस्त आहे. जाम आवडली. खुसखुशीत पंचेस, वन लायनर्सने मजा आणली. तीन सख्ख्या भावंडाची काही ना काही कारणाने घडणारी रोडट्रिप , त्यात ओढवलेले प्रसंग, तिघांचे वेगवेगळे स्वभाव ... फार धमाल आहे.
सुमित व्यास आवडत होता त्या युट्युबवरच्या रुममेट्स सिरीजपासून. ही ट्रिपलिंग त्यानेच लिहिली आहे आणि कामही केलंय मोठ्या भावाचं. अमेरिका रिटर्न, कुठे ज्यादा रिस्क न घेणारा, जबाबदार, समजूतदार, भावा बहिणीच्या (नाईलाजाने का होईना) पण मागे उभा असणारा चंदन !!

प्राईमवरच्या फोर मोअर शॉटस मधली सिद्धी पिद्धीचं काम केलेली मानसी गागरु! हि मधली बहिण चंचल... नावाप्रमाणेच चंचल. मोठ्या हवेलीची नवर्‍यामुळे असलेली मालकिण, तसं नवर्‍यावर प्रेम पण बंदिस्त आयुष्य जगत असलेली त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेली. काहीतरी खोटं कारण देऊन यातून सुटायला बघते आणि भावांबरोबर रोडट्रीप घडते.

आणि सगळ्यात धाकटा रॉकस्टार, बेफिकीर, मोठ्या भावाला मानणारा, फंकी चंकी शेंडेफळ चितवन! याने सगळ्यात जास्त धमाल आणली आहे. अ‍ॅकटर कोण माहित नाही पण टोटली फनी कॅरेक्टर जमवलंय! बहिणीशी मजा मस्ती, भावावर प्रेम, आज जगणारा, नो रिग्रेट्स टाईप्स.

बर्‍याच दिवसानी कोणती तरी हिंदी सिरिज आवडली ! खुनखराबा, गँग, हिंसाचार पासून लांब असलेली.

प्रोफेसर अंब्रिज आहे हो नवी एलिझाबेथ२ या क्राऊन मध्ये. ऑलिव्हीआ कोलमन चालली असती की!
चांगली चालू आहे बाकी. प्रिन्सेस डीएना आवडली. बाकी रॉयल्स, ती सिस्टीम, इंस्टिट्यूशन आवडत नाहीच. ही सिरियल आवडतेच.

कालपासून "breathe into the shadows season 2" बघायला सुरुवात केली .
परत स१ बघवा का ? काही काही संदर्भ लागत नाहीयेत .
अब ठीक आहे . फार काही extra ordinary नाही वाटला.
नित्या मेमनचे दाक्षिणात्य उच्चार यात फारच जाणवले .
अमित सध आवडला . काही काही सीन्स मध्ये त्याचा खाक्या एक्दम मस्त वाटतो .
विक्टर सगळ्यात जास्त आव्वडला .

आपण स्वतःचे स्वतं:साठी केलेले प्लान्स दहा वेळा विस्कटतात ( आयुश्यातील मोठ्या मोठ्या प्लान्स बद्दल नाही , रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलतेय मी) , ईथे समोरची व्यक्ती या वेळेला अशीच रिअ‍ॅक्ट होईल आणि अशीच वागेल , असे एका नाही ३,४ व्यक्तींबद्दल अंदाज बांधण आणि त्यावर आपली खेळी ठरवणं आणि ती तशीच घडणं हा प्रचंड योगायोग आहे . तो ईथे सहज घडतो Happy
आयुश्यात एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा कोणाचा खून केला , तर ती व्यक्ती साधरण आयुश्य जगू शकते ? जराही खंत , सद्सदविवेक बुद्ध्ई नाही ? ईतक्या सहज मुडदे पडतात आणि पोलिस ईकडे तिकडे शोधाशोध करतायेत.
पण एकंदर चित्रपट एन्गेजिन्ग वाटला . बर्याच प्रसंगात , आता पुढे काय ची उत्सुकता चाळवते .

पहिला भाग पण चांगला आहे. बघितलात तर काही संदर्भ अजून स्पष्ट होतील. अभिषेक ची मेंटल स्टेट त्यात स्पष्ट केली आहे.

हो चिन्मयी , पहिला सीझन बघितलाय , पण आता बरेच महिने झाले.
काही संदर्भ आठवत नाहीत. म्हणून विचार करतेय , परत बघू का?

Crown चा current season प्रचंड आवडला आहे so far. एडिटिंग आणि दिग्दर्शन आवडलेत.
Umbridge क्वीन आहे हे वाचून आधी कसंस झाले पण Olivia Coleman पेक्षा खुपच बरी वाटली. Diana ठीक , चार्ल्स आधी नाही आवड्ला, थोडा नंतर ठीक वाटू लागलाय. फर्म वर ज्या प्रमाणे शालजोडीतले ताशेरे ओढले आहेत ते पाहून फार मजा आली. जॉन मेजर Balmoral la जातो तेव्हा तर वॉव झाले! अजून काही लिहिले तर spoiler होईल पण chariots of fire was a revelation!
So far so good!

ट्रिपलिंग - भारीच आहे.
Cabinet of Curiosities - पाहातोय...काही भाग ठिक आहेत.
love death + robots बद्दल आधीच लिहिल आहे . अनिमेशन खुपच उच्च दर्जाच आहे.
Enola Holmes 2 आला आहे नेट्फ्लिक्स वर.
यंग शेल्डन मस्तच आहे . यंग शेल्डन खुप पर्फेक्ट आहे. सन्दर्भ बिग बँग थिअरी

सेम हिअर! तिसरा आणि चौथा एपिसोड संपवायचा म्हणून संपवला. पण फारच बोर चालू आहे. तेच आणि तेच आणि तेच! रेंगाळत चाललय.

हो बरोबर. मी तर दहाही पाहिले . पण तेच तेच.

images (4).jpegअटॅक ऑन टायटन पाहायला चालू केले, तात्काळ हूक झालो. दोन सिझन पाच दिवसात संपले.

अत्यंत थरारक आणि उत्कंठावर्धक.

मानवजात अस्तित्वासाठी लपून राहत आहे. अजस्त्र मानवसदृष्य टायटन्स मोठ्या संख्येने माणसांवर हल्ला चढवतात. अनेक माणसे त्यांचे भक्ष होतात. स्वरक्षणासाठी माणसांना भल्यामोठ्या भिंतींचा आधार घ्यावा लागतो आणि संपूर्ण मानवजात तीन भिंतीच्या मागे शहरे वसवून राहू लागते.
अनेक वर्ष भिंतीआड जाता आणि माणसांमध्ये सुरक्षिततेची (खोटी) भावना तयार होते. पण एके दिवस एक नेहमीपेक्षा अजस्त्र टायटन (collosus) तिसरी भिंत ' मारिया ' तोडतो आणि टायटन्स मारीयाजवळच्या गावामध्ये घुसतात. तिथे एरेन म्हणून लहान मुलाची आई त्याच्यासमोर टायटन कडून खाल्ली जाते. एरेन सर्व टायटन्स चा विनाश करण्याची शपथ घेतो. त्याच्या कुटुंबासोबत राहणारी अनाथ मुलगी मिकासा आणि त्यांचा मित्र आर्मिन हे सुध्दा एरेन सोबर जाण्याचा निर्णय घेतात.

"फोर मोर शॉट्स प्लिज" चा तिसरा सिझन पहायला सुरूवात केली. दोन भाग पाहिले. उरलेले पहावे की नाही हा विचार करतोय. पहिल्या दोन सिझन सारखेच वाटतात व काहीही नाविन्य नाही.

( Sorry for my language)
चार बायका व त्यांचे f***ed up life व ते सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांबरोबर संधी मिळेल तिथे परत f** करून व नंतर यामुळे life सुधारण्याऐवजी आणखी f***ed up करून घेतलेले दाखवणे हाच ह्या सिरीजचा उद्देश वाटतोय.

तिसर्‍या सिझनच्या दुसर्‍या भागात जी अंजना (किर्ती कुलहारी) असते तिचे आधी कधीतरी तिच्या आधीच्या नवर्‍याबरोबर घटस्फोटानंतरही किसिंग झाले असते. ते तिच्या मुलीने बघितले असते. त्या मुलीचे वडील त्यांच्या आत्ताच्या बायकोला त्या लहान मुलीसमोर ओठावर किसिंग करतात.मग ती मुलगी तिच्या वडींलांना माझ्या आईला पण तसेच किसिंग कर म्हणून सांगते व मी आधी तुला हे करताना पाहिले हे ही सांगते. एखादी आई असती तर मुलीला काही तरी कारण काढून बाजूला घेऊन गेली असती. पण ती अंजना असते मुलांचे मन न दुखावणारी सिंगल पॅरेंट आई, त्यामुळे मुलीला उगाच अस नाही गं, त्यावेळी नाही गं, तू लहान असताना असे काहीतरी justification देत बसते. ती लहान मुलगी प्रत्येक तिची बाब खोडते आणि सर्वांसमोर माझ्या बापाने आईला कसे किसिंग केले हे सांगते. हा पुर्ण प्रसंग पाहून डोके आपटावे असे वाटले.

4 मोअर shots please
पहिले 2 सिजन बरे होते,
हा सिजन कथा पुढे नेत नाही.
नाही त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स establish करतोय.
उलट त्या मूर्खपणा करत आहेत असं वाटतं.

अ‍ॅपल प्लस वर "मॉस्किटो कोस्ट" बघायाला सुरूवात केली आहे. चांगली वाटते. मला आधी ओझार्क सारखीच असेल असे वाटले होते. पण सादरीकरण वेगळे आहे जरा.

नेफ्लिवर 1899 नावाची सायफाय सिरीज पाहिली. Dark सिरीजवाल्यांची ही नवीन सिरीज आहे . सुरुवातीला काहीतरी बर्म्युडा ट्रँगलशी संबंधित असेल असं वाटलं होतं. पण नंतर वेगळ्याच मार्गावर जाते सिरीयल. बऱ्यापैकी उत्कंठावर्धक आहे. काही ठिकाणी जरा स्लो वाटते. पण एकूण ठीक. Dark इतकी किचकट नाहीये. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या सीझनमध्ये मिळत नाहीत. होपफुली पुढचा सीझन येईल.

संथ आहेच. डार्क पाहिली असशील तर तुला अंदाज येईल. मला आधी घोस्ट शिप मूव्ही सारखी आहे असं वाटलं होतं. पण ती हॉरर मूव्ही आहे. ही सिरीज हॉरर निश्चित नाही.

फारएन्ड
तुझा 10 नोव्हेंबरच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वाचला होता पण पोच द्यायची राहून गेली.

Pages