वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या तब्बुच्या सिरीजचा शेवटचा भाग बघेन ठरवलं होतं, तो बघितला. थोडं कळलं बाकी डोक्यावरुन गेला. पुढचा सीझन येईल बहुतेक. पहिला भाग पुर्वी बघायला घेतला होता आणि अजिबात बघवेना.

मी सध्या मिसमॅच सिझन १ बघायला चालू केली आहे.
पहिल्याच भागात आई १७ वर्षाच्या मुलीमागे लग्नासाठी लागली आहे आणी टिपिकल रंग रुपावरून बोलतेय हे खटकलंच.
अशा रेटने मला बहुतेक काहीच आवडेनासं होईल असं वाटू लागलंय. काहीही काय दाखवतात.

द वॉकिंग डेड चा ११ वा सीझन नेफिवर आला आहे. कंटिन्यूटी करता आधीचे एक दोन एपिसोड्स बघत आहे सध्या.

बघ बघ. पहिले २-३ भाग नेटाने बघ. मग नक्की एंगेज करेल. मी पहिले ७-८ सीझन्स एण्ड टू एण्ड दोनदा पाहिलेत Happy पहिल्या की दुसर्‍या भागात तो लीड अटलांटा मधे एका रणगाड्यात अडकतो तेथून मी टोटली हुक्ड झालो.

मी वॉकिंग डेड वेड्यासारखी पाहिली पहिले १० सिझन्स २ महिन्यापुर्वी. धन्यवाद फारेन्ड व अमितव. जबरदस्त आहे. ११ वा आजच सुरु केला.

एमिली पॅरीस मात्र आवडली नाही. पहिल्या सिझनच्या दुसर्‍या भागातच बंद केली.

वेन्सडे फारच हॅरी पॉटरी आहे.
गॉबलेट ऑफ फायर मधले अनेक सीन्स, प्रिझनर ऑफ अ‍ॅझ्कॅबान, चेंबर ऑफ सीक्रेट्स, अगदी प्रॉफसी, चार वेगळे हाऊसेस, सॉर्सरर्स स्टोन. विलनचे रिझरक्शन एवढे सगळे पॅरलल्स असतांना हा शो नेट्फ्लिक्स च्या हिस्ट्री मधला स्ट्रेंजर थिंग्ज च्या खालोखालचा मोस्ट वॉच्ड शो कसा होऊ शकतो?
जेन्ना ऑर्टेगाच्या परफॉर्मन्सने शो खूप एंगेजिंग झाला आहे मान्य..पण हॅ पॉ च्या तुलनेत फारच अंडरवेल्मिंग आहे.
बर्टनने हॅपॉ शी फार साम्य नसल्याचे कुठल्या बेसिस वर ठोकून दिले कळाले नाहे. चीटेड फीलिंग आले.
पण ऑर्टेगा ऑस्सम आहे.

शार्क टँक इंडीया सिजन २ चालू झाला. सिजन १ च्या मानाने जास्त इमो. ड्रामे दिसत आहेत पण तरी हा आवडता शो आहे.
अश्नीर आणि मामाअर्थ ची मालकीण दिसत नाहीये. कारदेखो.कॉमवाला एक शार्क म्हणून असणार होता त्याचे काय झाले. ५-६ एपिसोडस झाले की.

हाफ pants फुल pants पाहिली..प्राईमवर
चांगली आहे हलकीफुलकी.. family सोबत पाहता येण्यासारखी

नेटफ्लिक्स वर homeland चा सिझन ८ पाहायचा राहून गेला होता. तो पहातोय.. carrie आणि soul नेहमी प्रमाणेच मस्त.

ऍमेझॉन प्राईम वर chuck नावाची series चालू केलेई आहे . एक rouge CIA एजन्ट गव्हर्मेंट सीक्रेट असलेली एनक्रिप्टेड फाईल एका सुपरस्टोर मध्ये काम करणाऱ्या त्याच्या गीक मित्राला पाठवतो आणि मग एक CIA आणि एक NSA एजन्ट त्याच्याबरोबर undercover राहून ती secrets चा उपयोग करून कसे गुन्हे थांबवतात अशी कथा आहे.

प्राईम वरच ११.२२.६३ अशी एक सिरीझ आहे. एक माणूस time ट्रॅव्हल करून JFK चे assasination थांबवायचा प्रयत्न करतॊ अशी गोष्ट आहे

११.२२.६३ स्टीफन किंगच्या पुस्तकावर आहे, पुस्तक तर भारी आहे. आणि तो ॲक्टर सुद्धा चांगला आहे.

एमेली मस्त आहे. मला फार आवडली. विशेषत: फ्रेंच असूनही त्यांची मूल्यं आणि विचार करण्याची पद्धती अगदी भारतीय असल्यासारखी वाटते. चांगली स्टोरी, चांगले संवाद. फार डीप नसली तरी....
त्या उलट आपल्याकडच्याच सिरीज ने अगदी ताळतंत्र सोडल्या सारखे वाटते...

Gabriael साठी डोळ्यात बदाम. Happy
खूपच क्युट दिसतो. त्याची आजी आणि तो यांचे संवाद तर टिपिकल भारतीय!!

>>यलोस्टोन प्राईमवर फुकट उपलब्ध दिसत नाही <<
पांचवा सिझन बहुतेक पे-पर-व्यु आहे. आधीचे चारहि सिझन पिकॉक वर होते, आता क्ल्पना नाहि. मिळाल्यास जरुर बघा. मागे मी इथेच कुठेतरी या सिरीज बाबत लिहिलं होतंं. संपुर्ण सिरिज अतिशय ग्रिपिंग आहे, अ‍ॅब्सोलुट बिंजवर्दि...

यलोस्टोनचा प्रिक्वल - १८८३ पॅरामाउंट वर आहे. तो हि पैसे वसूल आहे. टिम मग्रा, फेथ हिल हि नवरा-बायकोची जोडि पर्फेक्ट फिट बसली आहे; टिम मग्रा (जेम्स डटन) याची स्टोरी आहे.. टेनेसी ते मांटाना पर्यंतचा प्रवास (व्हाया टेक्सस), नेटिव इंडियन्स (कमांची).. न्यु फ्रंटिअयर बाबतचं आकर्षण इ. चं मस्त चित्रण आहे. परत बिंजवर्दि, शिवाय एकच सिझन... Wink

या दोन स्टोरीलाइन्स मधे आता अजुन एक नविन सिरिज सुरु झालेली आहे. - १९२३. हि पण एकदम कडक आहे. यात जेम्स्चा भाऊ, जेक डटन चं मुख्य कॅरेक्टर आहे. जेम्सची मुलं, जॉन आणि स्पेन्सर या सिरिजमधे येतात. तगडि स्टारकास्ट आहे - हॅरिसन फोर्ड, हेलन मिरेन, बिलि बॉब थॉर्टन, टिमथी डाल्टन, जेरमी फ्लिन इ. इ. पॅरामाउंटवर आहे, आतापर्यंत चार एपिसोड्स आले आहेत...

ओवरऑल, इफ यु लाइक वेस्टर्न्स, इट्स अ मस्ट वॉच फ्लिक...

नेटफ्लिक्स वर कोटारो लिव्हस अलोन सिरीस आहे जपानी आहे पण subtitles वाचून समजते स्टोरी. कोटारो बनलेला ४-५ वर्षाचा मुलगा खूप गोंडस आहे आणी छान ऍक्ट केलं आहे.

HBO वरचा लास्ट ऑफ अस ह्या नव्या सिरीज चा पहिला एपिसोड पहिला.

मला तरी आवडला. लास्ट ऑफ अस नावाच्याच सुपरहिट विडिओ गेम चे रूपांतरण आहे आणि सिरीज चे दिग्दर्शन चेर्नोबिल च्या क्रेग माझीन ने केलं आहे.

मॅनडालोरीअन आणि नार्कोस चा पेद्रो पास्कल आणि गेम ऑफ थ्रोन्स मधली लिन रामसें प्रमुख भूमिकेत आहेत.

वॉकिंग डेड आणि तत्सम झोम्बी सिरीज आवडत असतील तर नक्की पहा.

Pages