वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फर्जी - मी पहिला एपिसोड बघायला घेतला पण स्लो वाटते आहे सध्या तरी. समजला पॉइन्ट, पुढे चला . आवरा लवकर असे होत होते. पेशन्स टिकला तर बघेन पुढे.

सामी स्टोरी नाही लिहिली हो. तसंही नावावरून कळतंच आहे काय असेल?
पण ती कशी उलगडते ते बघण्यात मजा आहे.
सॉरी तसं वाटत असेल तर (पण संपादनाची वेळ गेली)

राशी खन्ना अगदीच नवखी असताना कुठल्यातरी हिंदी मालिकेत पाहिलेलं होतं. खूपच गोड चेहरा. खूप म्हणजे किती तर गोड लागले म्हणून दिवसभर फक्त रसगुल्ले खाल्ल्यावर जे होईल तसं अतीगोडाने तोंडाला बसावी तशी नजरेला मिठी बसेल इतकी गोड होती.
यात बरीचशी बदलली आहे. माणसात आली आहे. Happy

फर्झी मी पहिला एपिसोड संपवला ( रेटला) पण दुसरा एपिसोड वर पुन्हा अडकले, त्या शाहिद ची बॅक स्टोरी किती बोर आहे! कशाला इतके डीटेल्स मधे दाखवले आहे. पहिला भाग १५ मिनिट आपण गरीब, मध्यमवर्गीय आपले लाइफ किती वाइट यात खर्च केली. दुसर्‍या भागात पुन्हा तेच आई विना मुलगा वगैरे बघून कंटाळले आणि बंद केली. सवय नाही राहिली आता इतके पाल्हाळ बघायची.

आम्ही रोज दळत दळत बघतोय. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला प्रकार आहे. स्टोरी अगदीच छोटी आहे (असावी). यातलं भारतीय टेंप्लेट मात्र लक्ष देऊन बघण्यासारखं आहे.
यंग इन्वेस्टिगेटर फीमेल हापिसर, तिची आई तिला लग्न कर म्हणून मागे लागलेली, मग चार दोन कांदेपोहे, हिंदू - मुस्लिम मित्र, झोपड्यांत रहाणार्‍या... पेक्षाही 'चप्पल घालणार्‍या'... रादर शूज 'न' घालणार्‍या निम्नस्तरीय लोकांचा स्ट्रगल, तोडकी मोडकी इंग्रजी येणारा पण स्मार्ट अ‍ॅस मित्र, त्याच्या इंग्रजी वरुन चार दोन जोक.... तर ते काही असो. भिंतीवर नकाशा काढून त्याला पुश पिन लावून त्याला दोर्‍या अडकवून क्राईम अ‍ॅनलाईझ आणि प्रेडिक्ट करने हे अक्षरशः अ म र आहे. Proud

बाकी लवकर पकडा त्यांना एकदाचं, म्हणजे आम्हाला काही तरी दुसरं बघता येईल. आणि कृपा करुन ब्रेकिंग बॅडच करा... आम आदमी दळणाचा डबा टाकू नका मध्येच.
बाकी२ : त्या विजय सेतुपतीला कधी जमतं काम कधी नाही. कधी कंफर्टेबल तर कधी अत्यंत कोरडेपणे पाट्या टाकू संवाद असा सगळा प्रकार आहे.

ओके बरे झाले सांगितलेस, फीमेल ऑफिसर ची पण बॅक स्टोरी असेल तर मग बघायलाच नको आता.
स्मार्ट आणि अनअपोलोजेटिक क्रिमिनल दाखलेले मला आवडते Happy कशाला उगीच सहानुभूतीवाली स्टोरी दाखवून मुळात तो चांगलाच आहे असे कन्विन्स करता. ते पण सटल नाही तर ढ माणसासारखे समजावून सांगत.
भिंतीवर नकाशा काढून त्याला पुश पिन लावून त्याला दोर्‍या अडकवून क्राईम अ‍ॅनलाईझ आणि प्रेडिक्ट करने हे अक्षरशः अ म र आहे. >> Lol हो तर, शरलॉक ला पण ते चुकलेले नाही Happy

भिंतीवर नकाशा काढून त्याला पुश पिन लावून त्याला दोर्‍या अडकवून क्राईम अ‍ॅनलाईझ आणि प्रेडिक्ट करने हे अक्षरशः अ म र आहे >>> Lol

फीमेल ऑफिसर ची पण बॅक स्टोरी >> बॅक स्टोरी!!! कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात ताईंना सुराग मिळतो. काय समजलीस काय! Lol
ब्रेकिंग बॅड म्हणजे क्रिमिनलला क्रिमिनल सारखाच दाखवणे. उगा बळेच ह्युमनाईझ करुन सिंपथी बस मध्ये न बसवणे. क्राईम रॅशनलाईझ न करणे इ. इ. इतकंच म्हणायचं होतं. Happy

यंग इन्वेस्टिगेटर फीमेल हापिसर>>> ती डोक्यात गेली. खूपच पुढे पुढे करते सगळी़कडे. स्वतःच पोलिसांना घेऊन प्रेस वर चेकिग करायला जाणे वगैरे वगैरे.
तसे बरेच लुपहोल्स सिनेमॅटिक लिबर्टी आहेच. तरीही बघितली. Happy

नेटफ्लिक्स वर रॉमँटीक्स नावाने काय आलंय? मुव्ही का सिरीज? कोणी बघितली तर उजेड पाडा.

फर्जी सिरीज पाहीली. आवडली. ठीक ठाक वाटली. वर सांगितल्याप्रमाणे बरेचसे लुप होल्स आहेत. नेहमीप्रमाणे शेवट अर्धवट ठेऊन पुढच्या सिझनची तयारी केली आहे.

सर्वांचा अभिनय छान. काही संवाद विनोदी ढंगाने घेतले आहेत त्यामुळे मजा येते. मिनिस्टर व विजय सेतूपथी यांच्यातले संवाद मजेशिर आहेत.

काही उपकथा का घुसडतात ते कळत नाही. उदा. विजय सेतूपथी व त्याच्या बायकोचे ताणलेले संबंध, कोर्ट केस वगैरे. याचा मुळ कथेशी काहीही संबंध नाही तरीही हे यात टाकले आहे. पण विजय सेतूपथीच्या बायकोचा रोल केलेल्या अभिनेत्रीचा (रेजिना कसांड्रा) स्क्रिन प्रेझेन्स एकदम छान आहे त्यामुळे तिला बघण्याच्या नादात हे लक्षात येत नाही.

कधीकधी वाटतं सिनेमात आणि सिरीज मध्ये यशस्वी ऑफिसर्स/डॉक्टर्स/स्पाईज चं पर्सनल आयुष्य ताणलेलं/गेलेलं आहे असं दाखवावंच लागतं का?(फॅमिली मॅन मध्ये मनोज वाजपेयी, हाऊस एमडी मध्ये सर्व मुख्य पात्रं,वॉर मध्ये ह्रितीक चे मृत प्रेम वाणी कपूर इत्यादी.)
पर्सनल आयुष्यात पण सुखी आहे, कामात पण सुखी आहे, दोन्हीकडे थोडं कमी जास्त चालूच राहतं असं दाखवता येत नाही का?

कामात पण सुखी आहे, दोन्हीकडे थोडं कमी जास्त चालूच राहतं असं दाखवता येत नाही का?>>> पात्रा बद्दल सॉफ्ट कोर्नर निर्माण करण्या साठी ही धडपड असावी.

फॅमिली मॅन मध्ये मनोज वाजपेयी >>> ट्रू लाईज मधे अर्नोल्ड सर्वसामान्य घरगुती नवरा दाखवला आहे. त्याच्या बायकोला त्याच्यापेक्षा एक स्पाय आवडत असतो. पण प्रत्यक्षात अर्नोल्ड स्पाय असतो. स्पायपटाला दिलेला हा तडका बॉण्डपटापेक्षा ट्रू लाईजला वेगळा ठरवायला उपयोगी पडला. तेव्हांपासून असेल कदाचित, स्पाय किंवा अचाट साहसी नायकाचं असं रूपडं पडद्यावर येऊ लागलं.

फर्जी सिरीज एकदा(च) बघण्यालायक वाटली. फॅमिली मॅनची सर नाही. कुठल्यातरी एका भागात श्रीकांत तिवारीलापण फोन करतात असं दाखवलंय. Happy

द नाइट मॅनेजर बघतेय, चांगली वाटतेय सध्या तरी !
सिद्धार्थ रॉय कपुर फार हॅन्डसम दिसतो , अनिल कपुर नाही आवडला !

द नाइट मॅनेजरचं हिंदी अ‍ॅडाप्टेशन बर्‍यापैकि जमलं आहे. ओरिजिनल पाहिलेली एचबिओ किंवा प्राइमवर, नक्कि आठवंत नाहि. ती तर मस्तंच आहे. ह्यु लॉरी (डिकि), अनिल कपुर(शेली) ने साकारलेल्या भूमिकेत आहे. हिंदित चारच एपिसोड्स आले आहेत. बहुतेक पुढे चार एपिसोडस्चा दुसरा सिझन येइल; स्टोरी अजुन खूप बाकि आहे...

Night manager काल पहायला सुरुवात केली. Mobile वर अडकतेय streaming .
आदित्य रॉय कपूर छानच दिसतोय.

रोमँटिक्स ही यश राज फिल्म्सवरची डॉक्यु-सिरीज (हा शब्द मला नवीनच कळला) आहे! चार की पाचच भाग आहेत. पहिला आणि दुसरा आवडला. तिसरा त्या मानाने नाही आवडला.
पहिला भाग यश चोप्रांवर आहे, दुसरा आदित्य चोप्रावर आणि डीडीएलजेवर. तिसरा त्याच्या पुढच्या चित्रपटांवर. यात उदय चोप्राला उगाचच जास्त फुटेज दिलंय असं वाटलं. 'दिल तो पागल है' बद्दल काहीच नाहीये.
पहिले दोन भाग मात्र आवडले.

उदय चोप्राला उगाचच जास्त फुटेज दिलंय असं वाटलं. >>>> लोल तसाही बिचारा मुव्ही मधे पुढे येऊ शकला नाही ना. मग इथे दिला असेल चान्स.

Prime वर dexter 8 सिजन बघून झाले.
जुनीच सेरीज आहे.

Dexter morgan एक फॉरेन्सिक expert आहे,
Miami metro homicide मध्ये.
पण त्याचं एक समांतर आयुष्य सुरू असतं.
तो सिरीयल किलर चा सिरीयल किलर असतो.
तो तसा का , हळूहळू त्याला आठवणारा आणि त्यालाही उलगडत जाणारा भूतकाळ, त्याच्या डोक्यात सुरू असलेली उलथापालथ, त्याचे बाबा, बहीण, सगळे कलीग,
पुढे पुढे त्याची प्रेयसी , वेगवेगळे सायकोपाथ , त्यांचा सफाया अशी स्टोरी सरकत राहते. प्रत्येक सीजनच्या शेवटी मोठी घडामोड झालेली दिसते.
सगळे कलाकार फार छान अभिनय करतात.
एंगेजिंग वाटली मला.
काहीवेळा बॉलिवुडी योगायोग होतो ते एक सोडलं तर बाकी सर्व उत्तम.
विषयच सिरीयल किलर / सायकोपाथ असलातरी मिनीटामिनिटाला रक्ताच्या चिळकांड्या वै नाही दाखवलंय.
काही वेळा कथेच्या ओघात असे सीन् आहेत.
काहीवेळा इंटिमेंट सिन अथवा न्यूड सिन आहेत.
हे लक्षात राहूदे.

फर्जी बघायला घेतलीय.
दिड एपिसोड तीन तुकड्यात पाहिले.
सेक्सी सीन नाहीत पण शिव्या आहेत. त्यामुळे आई आणि मुले जागे असताना बघता येत नाही.

मित्रांकडून ऐकले की पहिले दोन एपिसोड स्लो आहेत. मग मस्त स्पीड पकडते.
मला दिड एपिसोड तसे स्लो वाटले नाहीत. कदाचित त्या मित्रांचे बेंचमार्क्स वेगळे असावेत. पण म्हणून पुढे कथानक काय वेग पकडते यासाठी ऊत्सुक आहे.

शाहीद कपूर नेहमीसारखाच बदाम बदाम बदाम. किंबहुना त्याच्यासाठीच ही सिरीज बघायला घेतली आहे अन्यथा मी वेबसिरीज बघायचे टाळतो. ईतका माझ्याकडे वेळ नसतो.
शाहीदचा मित्र झालेला फिरोज म्हणून जे कॅरेक्टर आहे ते ही धमाल आहे.

संवाद चुरचुरीत आहेत त्यामुळे बोअर होत नाही. नोट छपाईचे जे सीन डिटेल मध्ये दाखवलेत ते मस्त वाटले.
बाकी या विकेंडला पुढे बघणे झाले तर तसे अपडेटतो.

रोमँटिक्स ही यश राज फिल्म्सवरची डॉक्यु-सिरीज >>> कोणत्या ओटीटीवर ?

रोमँटिक्स ही यश राज फिल्म्सवरची डॉक्यु-सिरीज >>> कोणत्या ओटीटीवर ?
>>> नेटफ्लिक्स

आज रोमँटिक्सचा चौथा म्हणजे शेवटचा भाग पाहिला. हा आवडला.
तसाही बिचारा मुव्ही मधे पुढे येऊ शकला नाही ना. मग इथे दिला असेल चान्स Lol हो. नेपोटिझमबद्दल आदित्य चोप्राने उदय चोप्राचंच उदाहरण दिलंय! त्याला पुढे आणण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करूनही तो यशस्वी झाला नाही कारण शेवटी प्रेक्षकांना जो आवडतो तोच यशस्वी होतो. हे बरोबर आहे. पण दुसऱ्या एखाद्याला फारशी गुणवत्ता नसताना अशी परत परत संधी तरी मिळाली असती का?

Pages