वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राईम वर पॅनीक नावाची मालिका पाहिली. आवडली.
सुरूवातीला हंगर गेमची आठवण आली. टीन ड्रामा आणि गेम उत्सुकता वाढवतो. पण छोट्याश्या गावात जेथे सगळे सगळ्यांना ओळखतात तेथे मोठा गेम गुपचूप खेळला जातो हे पटत नाही.

छान आहे फॅमिली मॅन. मनोज वाजपेयीला सर्वच कलाकारांनी छान साथ दिली आहे. उत्कंठावर्धक आणि मनोरंजक आहे. प्रसंगाची लांबी पुरेशी असल्याने संथ वाटते काहीशी. पण रटाळ अजिबातच नाही.

हो
आम्ही वीकेंड ला बघणार आहे.हावरट सारखा आधी कोणी एकेकट्याने आधीच बघायचा नाही म्हणून सांगून ठेवलंय.

काल सुरू केला बघायला कुटुंबवत्सल माणूस... मनोज वाजपेयी अजूनच बारीक झाल्यासारखा वाटला...

माय क्लायंट्स वाईफमधला हिरो (तळपदे ) पण चांगलं काम करतोय.

मी पण बघायला सुरुवात केली.
मनोज वाजपेयी अजूनच बारीक झाल्यासारखा वाटला... >>> हो ना. आणि सुचिपण.
सगळे आपापल्या जागी फिट्ट आहेत.
ध्रीती खरच सुचि ची मुलगी वाटते. They both look similar .
अरविंद ला बघून डोळे भरून आले. Happy .
अर्धे एपिसोड तामिळ आहेत. मला सुरुवातीला वाटलं , settings मध्ये language बदलली की काय !. लगेच चेक केली.

हो मी पण सुरू केली काल. बरेच भाग तामिळ आहेत त्यामुळे वाचायचेही काम आहे इथे . श्रीकांतची मुलगी अशी काय आहे? कशाचा माज आहे एवढा? मान्य आहे वडील नसतील देत जास्ती वेळ तिला पण ही काय पद्धत वडीलांशी असं वागायची? टीनेजच्या नावाखाली अती झालेत नखरे . दोन चार कानाखाली द्याव्याशा वाटतात तिला. सुचिचा त्रागा पण विनाकारण वाटतो. समंथा आवडतेय. जबरी जमलीये तिला भूमिका. फॅमिली मॅनची फॅमिली त्याच्याशी तुटक वागताना बघून वाईट वाटतंय.

(नो स्पॉयलर्स बिलो)
आम्ही फॅमिली मॅन 2 सिझन काल पाहून समाप्त केला.मस्त बनलाय.सर्व साऊथ च्या कलाकारांनी उत्तम काम केलंय.बाकी नेहमीचे कलाकार छानच.

मधले काही ट्विस्ट अक्षरशः श्वास रोखायला लावणारे आहेत.
तिसऱ्या सिझन ची नांदी आहे शेवटी.
सुरुवातीला एक दोन भाग तामिळ ऐकून जरा जड जाते.पण मग कथा रंगत गेल्यावर त्याचे काही वाटत नाही.
तरुण/ प्री टिन्स बरोबर पाहत असल्यास बेड सीन्स (तोही पूर्ण नाही) फक्त एक थोडक्यात आहे.

मला तामिळ पण कळत असल्याने अगदी अस्सल तामिळ बाज राखलाय संवादांत हे पाहून मजा आली.... एकदम ब्येस हाये समदच....

तमिळ मधे पण श्रीलंकन तमिळचा अ‍ॅक्सेन्ट वेगळा असतो हे कळाले. तमिळ समजत नसल्याने ते बारकावे नाहीत टिपता आले. मनोज वाजपेयी कसला कसलेला कलाकार आहे ! संवाद आणि पटकथेची जोड आहेच. नेहमीच्या प्रसंगात विनोदांची धमाल उडवून देतात. ते सगळे अगदी नैसर्गिक वाटतात. त्याच्या मुलाला ट्रंपेट वाजवायचा शौक आहे. त्याचं ते वाजवणं दर वेळी अशा अवेळी येतं की हसू आवरत नाही.

तळपदेला घेऊन तो एका महागड्या कॅफे मधे जातो. तिथे मेन्युची किंमत वाचून तळपदे ऑर्डर देतो तो प्रसंग धमाल आहे. पुन्हा श्रीकांत त्याच्या बायकोला घेऊन वाढदिवस साजरा करायला रेस्तराँ मधे जातो तेव्हां तिचे इंग्लीश शब्द ऐकून आधी समजलेय असे रिअ‍ॅक्ट होतो.. मग गुगल करतो आणि मग पुन्हा एकदा प्रतिक्रिया देतो. ते फार भारी होतं. त्या प्रसंगात मवा क्युट वाटलाय.

आई आणि मुलीतले प्रसंग अगदी अगदी (घमाचु) कॅटेगरीतले आहेत.

मनोज वाजपेयी आधी इतका आवडत नव्हता. त्याचे सिनेमे पण फारसे पाहिलेले नाहीत. तो बर्यापैकी व्हीलन मटेरियल वाटतो. फॅमिलीमॅन बघितल्यापासून छान वाटतोय. कॉमेडी पण छान वाटते, effortless.

सुची आणि दोन्ही पोरं डोक्यात जातात. Working parents असणारी मुलं अशीच असावीत का? किंवा जरा जास्तच सूट मिळालेली आहेत.
पहिल्यांदाच शरद केळकर आवडत नाहिये. अगदी लय भारी मधला व्हिलन पण आवडला होता, पण इथे नाही.
तळपदे(डे) एकदम मस्त.
Done. Happy

प्लिज लोकानो
खूप जणांनी सिझन 2 पाहिला नाहीये
इतक्यात स्पॉयलर्स देऊ नका
जमल्यास, पटल्यास एडिट करा.

मनोज वाजपेयी फारच आवडलाय यात. सहज अभिनय आहे त्याचा. तो श्रीकांत तिवारीच दिसेल ज्याला कोणाला खरं नाव माहीत नसेल त्याला. मला तरी पहिल्या सिझनपासून तसं वाटलं. पिंजर मधे पण आवडला होता क्लायमॅक्स सीनमध्ये. क्रिती शॉर्ट फिल्म पण भारीये त्याची. बाकी स्टोरीची चर्चा वेगळा धागा असेल तर त्यावर करता येईल.

सगळे मनोज वाजपेयीचं कौतुक करत आहेत पण समंथा अक्कीनेनी बद्दल कोणच बोलत नाही. कमी संवाद असले तरी डोळे आणि देहबोलीतून सुरेख अभिनय केला आहे. दुसरा भाग पूर्णपणे समंथाचा आहे.

मी लिहीलंय पहिल्याच कमेंट मधे. तीचा रोल कठीण असूनही तिने उत्तम केलाय‌ . मी पहिल्यांदाच पाहिला तिचा अभिनय आणि आवडला पण.

आम्ही एका दिवसात संपवला, मस्तं आहे !
मनोज वाजपेयी अ‍ॅज ऑलवेज भारी आणि मला सगळे तमिळ कलाकार जामच आवडले, कसले अस्सल ऑथेंटिक दिसतात !
आधी सुरवातीचे तमिळ पाहून मलाही लँग्वेज सेटिंग्ज गंडले कि काय शंका आली Happy
नंतर गोष्ट पुढे जाते तसे तमिळ संवादांमुळे उलट जास्तं रिअल वाटतात सगळे सीन्स !

समंथाचा रोल छान आहे. पण काही ठिकाणी तिच्या गेटअपने तिची acting ओवरपॉवर केलेय असं वाटतं. काही वेळा बोलताना तिचे ओठ हलतच नाहीत असं वाटतं. मेकअपमुळे असेल कदाचित.

सिजन 1 पाहिला नाहीये, डायरेक्ट दुसरा पाहिला तर समजेल का?>>>> नको. बघा तुम्ही सिजन १....नाहीतर डोक्याला शॉट लागत राहतील काही ठिकाणी. काही लिंक्स आहेत सिजन १ मधे.

डायरेक्ट दुसरा पाहिला तर काही गोष्टी तर्क लावून समजतील्,पण पात्रं, त्यांची मानसिकता हे सर्व नीट समजायला आणि मनात मुरायला पहिला सिझन नीट पाहिला तर दुसरा पहायला जास्त मजा येईल.

समंथाच्या अभिनयाबद्दल मिश्र प्रतिक्रिया आहेत. बरेच जणांनी तिने संपूर्ण मालिकेत एकच अभिनय केला आहे असे म्हटले आहे. खरे तर संपूर्ण चेहरा हलवणे आवश्यक नसेल तेव्हां (Practical Aesthetics) देहबोली, डोळे आणी आवाज यातून कॅरेक्टर उभं करता येतं. जर ते पात्रं गंभीर असेल तर ते विनोदी दाखवून किंवा हास्यविनोद करताना दाखवून चालणारं नसतंच. समंथाने ते बेअरींग पकडले आहे. मठ्ठ असणे वेगळे आणि आवश्यक तितका संयत आणि सूक्ष्म अभिनय उभा करणे वेगळे. मामुट्टी या अभिनेत्याला असे करताना पाहिले आहे. अशा प्रकारच्या अभिनयाला दाद मिळेलच असे नाही. अर्जुन कपूरचा चेहराही बोलत नाही, ना त्याच्या डोळ्यात भाव उमटतात ना आवाजातले चढ उतार कॅरेक्टर उभं करतात. दोन्हीतला फरक आहे हा.

समंथाने सूडाने पेटलेल्या स्त्री चे कॅरेक्टर उभे केले आहे. त्यापुढे तिला आयुष्यात काहीही महत्वाचे नाही. अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन असाच होता.

मला अर्थातच तिचा अभिनय आवडला.
ओव्हर ऍकटिंग न करता रंगवलेली संयत आणि उत्तम स्त्री खलनायक पात्रं फार कमी असतील.
त्यापैकी फॅमिली मॅन मधली राजी एक.

Pages