Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण दुसऱ्या एखाद्याला फारशी
पण दुसऱ्या एखाद्याला फारशी गुणवत्ता नसताना अशी परत परत संधी तरी मिळाली असती का?
>>>>>
गुणवत्ता असताना संधी डावलणे हे अन्यायकारक आहे म्हणू शकतो. पण हे वरचे फेअर आहे.
चित्रपट बनवणारे आपल्या साधारण गुणवत्ता असणाऱ्या मुलाला एक्स्ट्रा चान्स देणे स्वाभाविक आहे.
ईतर साधारण गुणवत्ता असणाऱ्यांना ते का एक्स्ट्रा चान्स देतील?
अमिताभ बच्चनने सुरूवातीच्या
पण दुसऱ्या एखाद्याला फारशी गुणवत्ता नसताना अशी परत परत संधी तरी मिळाली असती का?
>>>>> अमिताभ बच्चनने सुरूवातीच्या काळात लागोपाठ अकरा फ्लॉप दिले होते. शशी कपूरने सुद्धा अनेक फ्लॉप दिले होते. जब जब फुल खिले है पर्यंत आलेले सगळे फ्लॉप्स होते.
अभिनेत्याची गुणवत्ता आणि
अभिनेत्याची गुणवत्ता आणि चित्रपटाचे बॉक्स ऑफिस यश यांचा आपापसात संबंध असेलच असे नाही.
पण हो, त्यामुळे अमुक तमुक अभिनेत्याला पब्लिक स्विकारत नाही असा शिक्का बसायची भिती असते. निर्माते पैसे लावायला घाबरतात.
आणि व्हायसे व्हर्सा
नेपोटीझम वर वेगळा धागा हवा...
नेपोटीझम वर वेगळा धागा हवा... साऊथ इंडस्ट्री अक्खी नेपोटिसम वर उभी आहे... आणि दिग्दर्शक चांगला असेल तर अभिनय चांगला करून घेतोच....
अरे नाइट मॅनेजर४ च भाग आहेत
अरे नाइट मॅनेजर४ च भाग आहेत पार्ट १ मधे. उरलेले जून मधे येणार म्हणे. आता ओरिजिनल इन्ग्रजी सीरीज बघावी का असा विचार करते आहे.
तुम्ही जर का पुर्वी The 70s
तुम्ही जर का पुर्वी The 70s Show पाहिला असेल, तर त्यातील पात्रांच्या पुढच्या पिढीचा The 90s Show आला आहे नेफ्लि वर. अजून तरी एकच सिझन आणि त्यात १० एपिसोड्स आहेत.
अमेरिकेत पीकॉक चॅनेल वर एक
अमेरिकेत पीकॉक चॅनेल वर एक "मॅजिक सिटी" नावाची सिरीयल आहे. एक भाग पाहिला त्यातला. इंटरेस्टिंग वाटतोय. जेफरी डीन मॉर्गन मुख्य लीड आहे. बाकीचे बरेचसे नवे आहेत.
जेफरी डीन मॉर्गन हा एकदम फेवरिट आहे सध्या. द वॉकिंग डेड मधला "नीगन". तेथे त्याला खूप वाव आहेच. त्याला ड्वेन जॉन्सनच्या "रॅम्पेज" मधेही पाहिल्याचे आठवते.
The 90s Show आला आहे नेफ्लि
The 90s Show आला आहे नेफ्लि वर. अजून तरी एकच सिझन आणि त्यात १० एपिसोड्स आहेत. >>> कसा आहे? तेच लोक आहेत का सगळे? मी तो मूळ शो तुकड्यातुकड्यांत पाहिला आहे.
मस्त चालूय फर्जी. ५ एपिसोड
मस्त चालूय फर्जी. ५ एपिसोड सलटवले. शाहीद कपूर बदाम बदाम बदाम. जशी सिरीज पुढे सरकतेय तसा आणखी देखणा आणि नॅचरल वाटू लागलाय. सिरीजने वेगही पकडला आहे. सविस्तर लिहावेसे वाटल्यास संपल्यावरच.
आजवर कधी कुठली सिरीज मोबाईलवर बघितली नव्हती. पोरांसमोर बघण्यासारखी नसली तरी वाट बघून टीव्हीवरच बघणे प्रीफर केले होते. पण फर्जीबाबत राहावले नाही आणि मोबाईलवरही दिड- दोन एपिसोड बघणे झाले.
काल एका बैठकीत "Consultant"
काल एका बैठकीत "Consultant" (prime)बघून संपवली.
एका online game बनवणार्या कंपनीत एक धक्कादायक घटना घडते आणि मग सुरू होते एका मागोमाग एक चक्रावणार्या घटनांची मालिका.
थोडीशी अतर्क्य , थोडीशी Dark , थोडीशी रहस्यमय , थोडीशी creepy, थोडीशी मानवी भावनां च्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी पण बर्यापैकी खिळवून ठैवणारी. पुढे काय होणार , नक्की काय झालं होतं याचा विचार आपण करत रहातो. शेवटच्या बर्याच अगोदर आपण अंदाज ही बांधून ठेवतो.
. इलेन अतिशय सुंदर वाटते. मोठ्ठे डोळे , प्रसन्न हास्य , गोड बोलणं. रिगस अतिशय डोक्यात जातो , इतकं त्याच काम भारी आहे.
काही गोष्टी अर्धवट सोडल्यात. शेवट ढेपाळला असं वाटलं.
एकंदरीत मला मजा आली बघायला. मुलांसोबत मात्र बघू नका.
ईथले रेको वाचून बॉश बघायला
ईथले रेको वाचून बॉश बघायला सुरुवात केली आहे.
. सी१ संपवला .
मागे एकदा एक एपिसोड पाहिला होता , कंटाळून बंद केला .
यावेळी जरा नेटाने रेटला
आवडतेय मालिका .
तेच लोक आहेत का सगळे? >>>
तेच लोक आहेत का सगळे? >>> जुनी लोकं आहेतच पण वयाने २० वर्षे पुढे गेली आहेत आणि त्यांची नविन पिढी आली आहे.
Metro Park चा दुसरा सिझन आला
Metro Park चा दुसरा सिझन आला आहे Amazon Prime वर.
नेफि वर क्लास सिरीज संपवली !
नेफि वर क्लास सिरीज संपवली !
सुरवातीचे दोन भाग इमानदारीने बघितले , काहीतरी सापडेल या आशेने .
मग डायरेक्ट शेवटचा भाग १.२५* स्पीड ने पळवून बघितला .
हाय फाय कॉलेज , तेथील स्कॉलारशीप साठी राजकारण !
मी तीन एपिसोड साठी वेळ वया घालवला ......
नेफी ची स्पीड वाढवण्याची सोय
नेफी ची स्पीड वाढवण्याची सोय मला खूप आवडते !
चांगली सिरीज / मूव्ही वाटले तर नॉर्मल स्पीड ठेवायचा , नाहीतर डायरेक्ट १.२५ ......
अमेझॉन , hot star कधी सुधारणार कोणास ठावूक ?
अगदी you tube सुद्धा स्पीड वाढवण्याचे ऑप्शन देते ...
मनी हाईस्ट कालपासून पाहतोय.
मनी हाईस्ट कालपासून पाहतोय. एक सीझन संपला. दुसरा अर्धा झाला.
चांगली मालिका आहे. भरपूर डिटेलिंगमुळे मधे मधे संथ आणि कंटाळवाणी होते. अशा मालिकात योगायोग असतात. ते कमी आहेत. त्रुटी आहेतच. सरकारी छापखान्याच्या आत मधे सिक्युरिटी गार्ड्स नाहीत हे अजब वाटतं. भारतात तरी असतात. स्पेन मधे सरकारचा चोरांवर विश्वास असेल.
रिझर्व्ह बँकेत पण फक्त पाचच गार्डस ते ही गव्हर्नरच्या सिक्युरिटीसाठी. जिथे व्हॉल्ट्स आहेत तिथे अजिबात नाहीत. घटना अगदीच प्लॅन नुसार घडतात. या सर्व गोष्टी बाजूला टाकता आल्या तर मनोरंजक आहे. जितकं ऐकलंय तितकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मालिका नाही.
आता नव्याने बघणार्यांना कशी
आता नव्याने बघणार्यांना कशी वाटेल कल्पना नाही. पण जेव्हा ती रिलीज झाली तेव्हा पहिल्या सीझन ने प्रचंड एंगेज केले होते. मात्र दुसरा सीझन मी जेमतेम १-२ एपिसोड्स बघू शकलो.
द कन्सल्टंट थोडी पाहिली. एंगेजिंग वाटते.
झाली तेव्हा पहिल्या सीझन ने
झाली तेव्हा पहिल्या सीझन ने प्रचंड एंगेज केले होते. मात्र दुसरा सीझन मी जेमतेम १-२ एपिसोड्स बघू शकलो.>>>>>>
हेच लिहायला दीन तासापूर्वी आलो होतो
माझाही अनुभव तसाच आहे , दुसऱ्या सीझन मध्ये एक दीन एपिसोडला पुढे काय होणार याची कल्पना यायला लागली मग ती सिरीज बघणेच बंद केले ...
मी पण कन्सल्टन्ट बघायला घेतली
मी पण कन्सल्टन्ट बघायला घेतली आहे. २ भाग पाहिले. इन्टरेस्टिंग वाटतेय अजून तरी.
आता नव्याने बघणार्यांना कशी
आता नव्याने बघणार्यांना कशी वाटेल कल्पना नाही. पण जेव्हा ती रिलीज झाली तेव्हा पहिल्या सीझन ने प्रचंड एंगेज केले होते. >>> खरं आहे. आपण कुठल्या मूडमधे पाहतो त्यावर ठरतं कदाचित. इथे मनी हाईस्टचे प्रोमोज वगैरे नव्हते. हवा नव्हती. खूप दिवस तो लाल मुखवटा पाहून बघायची इछा होत नव्हती. इथे वाचूनच पाहिली. आपला मूड चांगला असेल तर अॅक्शन हिरो आवडून जातो आणि पण पठाण आवडत नाही आणि व्हाईस व्हर्सा.
पण या मालिकेबाबत लॉजिक सोडून देता येत नाही. कारण प्लॉटचा दावाच हा आहे कि खूप अभ्यास करून दरोडा टाकला आहे. टेक्निकल आणि लॉजिकल फॅक्टर्स तपशीलवार आधीच तपासलेले आहेत. अशा वेळी त्रुटींकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यातच दोन सीझन लागोपाठ पाहताना पॅटर्न लक्षात येतो. त्यात जराही फरक केलेला नाही. यामुळे द्सरा सीझन प्रचंड कंटाळवाणा झाला आहे. फ्लॅशबॅकची भरमार आहे. फ्लॅशबॅक मधले प्रसंग दाखवताना जीवनविषयक तत्त्वज्ञानाची प्रत्येक सणकी पात्राने भडास ओकलेली आहे.
इमोशन्स हे फक्त स्त्री पुरूष नात्यात सेक्सविषयक तत्वज्ञानात असतात असं दाखवण हे कूल असतं हा बॉलिवूडच्या अलिकडच्या दिग्दर्शकांचा समज हा अशाच सिनेमा , मालिकातून दृढ झालेला असावा. स्त्री पुरूष एकत्र बसून सेक्सविषयक गरजा बिनधास्त डिस्कस करतात हा मानवी जीवनाचा परमोच्च विकासबिंदू आपण दाखवतोय या कल्पनेने असे दिग्दर्शक , लेखक भारावून गेलेले असतील.
त्या ऐवजी "मां तुमने पराठे बनाये है ? कितने दिन हो गये तुम्हारे हाथ के पराठे , मक्के की रोटी, सरसो का साग नही खाया मां" हा डायलॉग थेटच काळजात घुसतो. प्रेमाचा आणि भावनांचा मार्ग पोटातून जातो हे आमच्या बॉलीवुडच्या मागच्या पिढीला नीट समजलेलं होतं.
इमोशन्स हे फक्त स्त्री पुरूष
इमोशन्स हे फक्त स्त्री पुरूष नात्यात सेक्सविषयक तत्वज्ञानात असतात असं दाखवण हे कूल असतं हा बॉलिवूडच्या अलिकडच्या दिग्दर्शकांचा समज हा अशाच सिनेमा , मालिकातून दृढ झालेला असावा. स्त्री पुरूष एकत्र बसून सेक्सविषयक गरजा बिनधास्त डिस्कस करतात हा मानवी जीवनाचा परमोच्च विकासबिंदू आपण दाखवतोय या कल्पनेने असे दिग्दर्शक , लेखक भारावून गेलेले असतील. >>> मनी हाईस्ट पाहिली नाही. पण या पॉईंटला +१
त्या ऐवजी "मां तुमने पराठे बनाये है ? कितने दिन हो गये तुम्हारे हाथ के पराठे , मक्के की रोटी, सरसो का साग नही खाया मां" हा डायलॉग थेटच काळजात घुसतो. प्रेमाचा आणि भावनांचा मार्ग पोटातून जातो हे आमच्या बॉलीवुडच्या मागच्या पिढीला नीट समजलेलं होतं. >>> परफेक्ट!
Consultant" (prime)>>> बघतेय.
Consultant" (prime)>>> बघतेय. ४ भाग लागोपाठ बघितले. अर्ध्या तासाचे असल्याने पटपट बघून होताfunction at() { [native code] }अ. एंगेजिंग आहे सिरीज. आवडली. ऑफिस सेटप पण आवडला.
rmd >>> धन्यवाद.
rmd >>> धन्यवाद.
मनी हाईस्ट दुसरा सीझनही संपला. घरात बसायचे असल्याने टिच्चून पाहिली.
झी मराठी किंवा एकता कपूरच्या मालिका कशा सुरूवातीला खिळवतात, पण नंतर पाणी टाकायला सुरूवात करतात , तसा प्रकार आहे. फक्त निर्मितीमूल्ये उत्तम आहेत.
पहिल्या सीझन मधे ज्या क्रमाने घटना घडतात तशाच क्रमाने आणि त्याच पद्धतीच्या घटना घडत राहतात. मूळ मुद्द्यावर गाडी येतेय असे वाटत असतानाच कुठलाही अनावश्यक फ्लॅशबॅक सुरू होतो. बहुतांश फ्लॅशबॅक मधे एकतर उंची रेस्तरॉज किंवा श्रीमंती मिरवणार्या उमरावी इमारती, गार्डन मधल्या पार्टीज येतात. आपला जीव तिकडे त्या उत्कंठावर्धक घटनेत पुढे काय झालं यात अडकलेला असताना यांचे लहानपण सांगायचे, त्यांच्या गमती सांगायच्या. त्या गंमती पण सणकी लोकांच्या. अधून मधून अनेक गोष्टींवर ज्ञानप्रकाश टाकणे , सध्याच्या प्रथेनुसार इंटेलेक्चुअल म्हणजे एलजीटीबीटी बाबींवर प्रेक्षकांना शहाणे करून सोडणे हे सगळे येते. पळवावी तर एखादा संदर्भ चटकन निसटून जातो, मग पुन्हा मागे येऊन काय बोलला तो हे होत राहतं.
शेवटच्या दोन भागात त्या मानाने वेग पकडला आहे. जर भरजरी ठिगळं लावली नसती तर प्रेक्षकाला विचार करायची संधी मिळाली नसती. इतकी लांबीही वाढली नसती. दुसरा सीझन पाहताना एकच उत्सुकता लागून राहते ती म्हणजे कधी संपणार हे ? पण शेवटचा अनपेक्षित धक्का मस्त दिलाय.
प्रोफेसरचा अभिनय आवडला. सर्वांचेच अभिनय सफाईदार आहेत. डेनवर चा आक्रस्ताळेपणा छान आलाय. बर्लिन ही व्यक्तिरेखा गुंतागुंतीची आहे. ती संयतपणे उभी केली आहे. शेवटची ती प्रेग्नंट इन्स्पेक्टर लाऊड आहे. पहिली नंतर बावळट वाटायला लागते.
कॉलेजला असताना लेक्चर्स
कॉलेजला असताना लेक्चर्स बुडवून अलंकारला मॉर्निंग शो चे इंग्रजी सिनेमे पाहताना एखादं पात्र शिव्या देऊ लागलं, फक फक बोलायला लागलं कि पब्लिक चक चक चक असा आवाज तोंडातून काढायचं. गाड्यांचा वेगवान पाठलाग दाखवला तरीही तोच आवाज. एखादं स्त्री पात्र एखाद्या पुरूष पात्राला "फक यू" म्हणालं तरी तोच आवाज.
नंतर त्यातले काही ओळखीचे निघाले तेव्हां समजलं त्यांना फक्त चित्रं हलताना दिसल्याशी मतलब असायचा. सेक्स, फक हे शब्द ऐकून काहीतरी भारीच चाललेलं दिसतंय म्हणून चक चक चक आवाज !
गेले ते चकचकीत दिवस !!
चक चक सोलापूर भागात करतात..
चक चक सोलापूर भागात करतात.. लै भारी अर्थाने...
'फर्झी' बघून झाली. ठीकठाक
'फर्झी' बघून झाली. ठीकठाक वाटली. काही लूपहोल्स आहेतच. रिलीज करण्याची घाई केल्याने ते झालंय असं वाटलं मला.
शेवटचे २ एपिसोड वेगवान आहेत.
अमोल पालेकर आणि शाहिद कपूरचे सीन्स आवडले. त्या दोन पात्रांचे कॉन्ट्रास्ट ते दोघं एकत्र असतानाच चांगले दिसून येतात.
मेघा बोअर झाली. म्हणजे ती अॅक्ट्रेस. नॅचरल अॅक्टिंगच्या हव्यासापायी ओव्हर अॅक्टिंग वाटली.
विजय सेतुपथीचा कॅमेरा सेन्स मला आवडला. तो एकसुरी अॅक्टिंग करतोय असं वाटे-वाटेपर्यंत त्याचं काहीतरी भारी मोमेन्ट, एक्सप्रेशन दिसत होतं. (नंतर चक्क त्याच्यासाठी ओरिजिनल विक्रम-वेधा शोधून पाहिला. डब्ड आवृत्ती सापडली. डबिंगने शेण खाल्लंय तिथे. असो.)
पुढचा सीझन बघेन की नाही नक्की नाही.
नंतर चक्क त्याच्यासाठी
नंतर चक्क त्याच्यासाठी ओरिजिनल विक्रम-वेधा शोधून पाहिला > सेम हिअर . ओरिजिनल विक्रम-वेधा पाहिल्यावर हिंदी बघायची अजिबात इच्छा नाही. विजय सेतुपथी आवडायला लागला आहे. अजून त्याचे बघण्यालायक पिक्चर्स सांगा .
विजय सेतुपथी आवडायला लागला
विजय सेतुपथी आवडायला लागला आहे. अजून त्याचे बघण्यालायक पिक्चर्स सांगा . >> ९६ पहा
विजय सेतुपथी - विक्रम बघा,
विजय सेतुपथी - विक्रम बघा, जबरदस्त आहे.
96 मला सुद्धा बघायचा आहे. (ती
96 मला सुद्धा बघायचा आहे. (ती सध्या काय करते टाइप थीम असावी असं वाटतंय.)
चित्रपटाच्या धाग्यावर चर्चा करा, लोकहो, इथे नको
Pages